क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुजाराने पानेसारला मारलेला अप्रतिम कव्हर ड्राईव्ह एवढाच फलंदाजीतला आजचा खराखुरा आनंद . >>> +1

गो पुजारा ! फलंदाजीत तोच सध्या आधारस्तंभ दिसतोय. बाकी लोकांवर अजूनही माझा टेस्टसाठी विश्वास नाही. (सेहवाग, सच्या सोडून, अर्थात आजकाल सचिन आउट झाला तरी फारसे वाईट वाटत नाही हे खरेच पण तो जागा अडवतोय वगैरेला माझे समर्थन नाही. ) आज विराटने विराट खेळी करावी. तो वनडेचा डिफॉल्ट आवडता बॅटसमन आहे. टेस्टचाही होऊदेत.
रहाणेला संधी मिळायला हवी. गंभीरने दुसर्‍या इनिंग मध्ये खेळी केली नाही तर मात्र नक्कीच रहाणे तिसर्‍या मॅच मध्ये असेल असे दिसते. गंभीरवर सध्या प्रेशर आहेच.

<< या खेळपट्टीवर २२०+ धावसंख्या "मजबूत" म्हणावे लागेल.. >> दुपारनंतर सामना नाही पाहूं शकलो, त्यामुळे कॉमेंटस करणं योग्य नाही. पण सकाळच्या सत्रापेक्षां खेळपट्टी नंतर फलंदाजीसाठी अधिक मित्रत्व दाखवत होती असं एकंदरीत वाटतंय. शिवाय , स्वतः बनवलेली खेळपट्टी नेमकी दिवसेंदिवस कस कशी बदलत जाईल, याबद्दल कोणताही क्यूरेटर सुद्धां खात्रीलायक भाकीत करूं नाही शकत; आपण ' देखो आगे आगे होता है क्या ' हा मार्ग अनुसरणं उत्तम !! Wink
पुजाराला पुन्हा सलाम ! It's a pleasure to watch him play , correct & gracefull , both in defence & agression !!

उद्या.............. पुजारा चहा पर्यंत द्विशतक मारणार....आणि अश्विन शतक मारणार...... आपण ४०० पर्यंत जाउन डाव सोडणार.......

गंभीरवर सध्या प्रेशर आहेच. >>>>>>>> त्याच्या दुप्पट रहाणे वर असेल ......... कारण पव्हेलिअन मधे बसुन अधिच प्रेशर आहे...नंतर सिलेक्ट झाल्यावर त्यला स्वतः ला सिध्द करण्यासाठी १ - २ च कसोटी मिळेल...ते ही फिरणार्या खेळपट्टीवर

'स्पिनींग विकेट' हें दुधारी शस्त्र आहे; सचिन पुढे पाय टाकून बचावात्मक खेळताना डाव्या यष्टीबाहेरचा पानेसारचा चेंडू वळून बॅटबाहेरून येऊन सचिनची उजवी यष्टी उडवतो !! ही विकेट सगळ्याना 'मामा' बनवण्यासाठीच तर केलीय !!म >> नक्की कोण कोणाला मामा बनवतोय ह्या विकेटवर हे देवच जाणे Sad सचिन पनेसर Sad

पण मुंबई विकेट अहमदाबादपेक्षा तेज गोलंदाजानाही
साथ देणारी असेल हें त्यानेही स्पष्ट केलंय. अशा वेळीं अहमदाबादला उत्कृष्ट गोलंदाजी करणारा यादव मुंबई कसोटीसाठी 'अनफिट' असावा हे दुर्दैव !>>> भाऊ त्यापेक्षा वाईट गोष्ट हि कि मोजके २-३ वगळता टिम मॅनेजमेण्टचा बाकीच्या फास्ट बॉलर्सवर फारसा विश्वास दिसत नाही. त्यापेक्षा भज्जीचा पंट घेऊ अशी विचार सरणी दिसतेय. योगची इच्छा सफल झालेली आहे. Happy

गंभीरवर सध्या प्रेशर आहेच. >>>>>>>> त्याच्या दुप्पट रहाणे वर असेल ......... कारण पव्हेलिअन मधे बसुन अधिच प्रेशर आहे...नंतर सिलेक्ट झाल्यावर त्यला स्वतः ला सिध्द करण्यासाठी १ - २ च कसोटी मिळेल. >> अगदी अगदी.

नंतर सिलेक्ट झाल्यावर त्यला स्वतः ला सिध्द करण्यासाठी १ - २ च कसोटी मिळेल.>>> याबाबतीत तरी धोनीने गांगुलीप्रमाणे सलग मॅचेस दिल्या पाहिजेत त्याला.

भाऊ - कार्टून जबरी Happy

आश्विन बोलिंग मधे काय करतो याची उत्सुकता आहे. गेले वर्षभर त्याचा मोठा फुगा करून ठेवण्यात आलेला आहे. त्यामानाने अजून बोलिंग मधे फारसे दिसलेले नाही. त्यातही भारताबाहेर काय करतो हे महत्त्वाचे आहे, पण निदान या दोन सिरीज मधे निर्णायक रोल केला तरी चांगली सुरूवात आहे.

अरेच्चा , आजच्या खेळावर अजून कांहीच भाष्य नाही ! आपण फिरकी खेळण्यात माहीर आहोत व इंग्रजाना फिरकी खेळताच येत नाही , या दोन्ही थिअरीजपुढे आतां प्रश्नचिन्ह उभं रहातंय !! Wink

>>या दोन्ही थिअरीजपुढे आतां प्रश्नचिन्ह उभं रहातंय
भाऊ सहमत पण एक गोष्ट आजचा खेळ पाहता लक्षात येईलः
माँटी पानेसारने ज्या लेंथ्/टप्प्यावर चेंडू टाकला होता नेमकी तेच आपल्या मुख्य गोलंदाजांना जमले नाही.. जेव्हा जमले तेव्हा अश्विन ने दोन तीन वेळा जवळ जवळ कूक चा बळी मिळवला होता.. ओझा च्या दोन्ही विकेट्स पहा- चेंडूचा टप्पा खोलवर ठेवला होता.
भज्जी ने निराशा केली-- जवळ जवळ दिवसभर आखूड टप्पा ठेवून त्याने केपी व कूक ला आरामात खेळू दिले. पण जेव्हा जेव्हा त्या ठराविक लेंथ वर टप्पा पडला- चेंडू भयानक वळला, ऊसळला, असे दिसून आले..
आपला कोच व गोलंदाज यांच्याही हे नक्कीच लक्षात आले असावे अशी आशा आहे.. ऊद्या तशी गोलंदाजी केली तर निश्चीतच ईं; च्या फलंदाजांना खेळणे अवघड होवू शकते.

मात्र आता आत्मविश्वास परत आलेला केपि, व फॉर्मात असलेला कूक हे दोघे मुख्य अडसर आहेत...

ऊद्याच्या पहिल्या एका तासाच्या खेळावर बरेच काही अवलंबून असेल.

जाता जाता: रहाणे च्या बाबतीत फारच अन्याय होतो आहे.. एकतर तंबूत किंवा मार खायला/जखमी व्हायला फॉर्वर्ड शॉर्ट लेग ला ऊभे करणे... हे जरा अन्यायकारक वाटते नाही का?

रच्याकने: आज दिवसाखेर सेहवाग स्लिप मध्ये "ऊभा" होता.. खाली बसलेल्या पोसिशन मध्ये असता तर कूक चा झेल नक्की हातात होता! या अगदी छोट्या वाटणार्‍या बाबी आहेत पण "प्रो" टीम व "आक्रमक" टीम असेल तर अशा चुका होत नाहीत..

पुन्हः एकदा अश्विन व ओझाच निर्णायक बळी घेतील असे वाटते भज्जी ने आज तरी निराशाच केली आहे.. युवी व सेहवाग ला देखिल गोलंदाजी द्यायला हवी होती..

योगजी, तुमच्या निरीक्षणामुळे आतां आपण फिरकी गोलंदाजीचे व इंग्लंड जलद गोलंदाजीचे दादा आहेत, याही थिअरीपुढे मोठंच प्रश्नचिन्ह उभं रहातं !!! Wink [ रच्याकने, द्रविडनेही 'क्रिकइन्फो'वरच्या व्हिडीओ मुलाखतीत तुमच्या निरीक्षणाला दुजोरा दिलाय - ' Indian bowlers falling short of length & luck ; they could have bowled slightly fuller ' ]
<< युवी व सेहवाग ला देखिल गोलंदाजी द्यायला हवी होती..>> सचिनचा लेगस्पीनही अधून मधून
वापरून पहाण या खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजाना चकवण्यासाठी उपयोगी पडूं शकतं .
<<रहाणे च्या बाबतीत फारच अन्याय होतो आहे.. >> 'होतो' आहे, हेतूपुरःसर केला जात नाहीय, हेंही तितकंच खरं ! भगवानके घर देर है, अंधेर नही.. हें रहाणेने समजून घेणं योग्य !! कूक कर्णधार असूनही फिरकी गोलंदाजांसाठी स्वतः 'फोरवर्ड शॉर्टलेग'ला क्षेत्ररक्षणासाठी उभा रहातो, ही पण रहाणेला दिलासा देणारी बाब असावी ! Wink [ वाडेकर कर्णधार असताना वे. इंडीजमधे सुरवातीला फिरकीसाठी तो देखील 'फॉरवर्ड शॉर्टलेग'ला स्वतः क्षेत्ररक्षणासाठी उभा रहात असे; नंतर सोलकरने त्या पोझिशनवर क्षेत्ररक्षणासाठी आपला कायमचाच ठसा उमटवला !]
आजचं पहिलं सत्र या सामन्यात निर्णायक ठरूं शकतं, हा सर्वांचाच कयास आहे. बघूं काय होतंय .

>>कूक कर्णधार असूनही फिरकी गोलंदाजांसाठी स्वतः 'फोरवर्ड शॉर्टलेग'ला क्षेत्ररक्षणासाठी उभा रहातो, ही पण रहाणेला दिलासा देणारी बाब असावी

त्या अर्थी नव्हे... तर त्याला संघात ने घेता, खेळायला संधी न मिळताच तो जखमी होवून बाहेर जाऊ शकतो असे म्हणायचे होते.
ज्यापर्कारे कूक व पिटरसन खेळत आहेत... मला वाटते ईं. आज दिवसाखेर २००+ ची आघाडी घेवून
सामन्याला "निर्णायक" कलाटणी देऊ शकते..

<< खेळायला संधी न मिळताच तो जखमी होवून बाहेर जाऊ शकतो असे म्हणायचे होते. >> योगजी, हे कळलं मला म्हणून स्माईली टाकूनच कूकचा संदर्भ दिलाय मी !
<< मला वाटते ईं. आज दिवसाखेर २००+ ची आघाडी घेवून सामन्याला "निर्णायक" कलाटणी देऊ शकते.. >> अनेक शक्यतांपैकीं ही एक आहे हें खरं !

पहिल्या दिवशी पासून टर्न होणारी पिच हवीचा अर्थ पहिल्या दिवशीच असा तर नाही लावला गेला ना?

आपली पिसं निघत आहेत. त्यांचे बॉल वळताना आपले वळतील असे वाटले पण हा दुसर्‍या दिवशी दुपार पासूनच फ्लॅट ट्रॅक झाला आहे असे वाटते.

२०० ची लिड सहज असेन आणि उद्या दुपारी आपण वाचविन्यासाठी खेळू असे वाटायला सुरू झाले आहे.(अर्थात दोन पाच विकेट सलग मिळाल्या तर गोष्ट वेगळी पण तसे काही होणार नाही)

मला अगदी त्यांची १९८५ ची सिरीज आठवते. डेव्हिड गावर चा संघ जेव्हा आला होता तेव्हा आपल्या स्पिनर्स चे कौतुक, इंग्लंडचा स्पिनविरूद्ध वीकनेस वगैरे चा हाईप अनेक दिवस पेपर्स मधे चालू होता. पहिल्या मुंबईच्या टेस्ट मधे अपेक्षेप्रमाणे इंग्लंड ढेपाळले (तरी चौथ्या डावात हव्या असलेल्या अत्यंत कमी धावा करताना आपले बरेच लोक आउट झाले होते). 'शिवा' ने बर्‍याच विकेट्स काढल्या. पण नंतर पुढच्याच मॅचपासून गॅटिंग, टिम रॉबिन्सन, लॅम्ब वगैरे एकदम व्यवस्थित खेळू लागले आणि हमखास हरणार वाटलेली सिरीज ते २-१ ने जिंकून गेले.

आताही अचानक आपल्या स्पिनर्स विरूद्ध ते यापेक्षा त्यांच्या स्पिनर्स विरूद्द आपण जास्त ढेपाळताना दिसत आहोत.

१९८५ पुन्हा रिपीट होऊ द्यायचे नसेल तर कोणातरी बोलर ला काहीतरी जबरी करणे आवश्यक आहे. इथे आम्ही फ्लिंटॉफ-गांगुली लेव्हलचा बदला वगैरे घेतील मागच्या वर्षीच्या ०-४ चा अशा अपेक्षेने स्कोअर पाहात आहोत Happy

चेंडू वळत नाहीय असं म्हणण्यापेक्षां आपले गोलंदाज टप्पा व दिशा यावर नियंत्रण ठेवून फिरकी गोलंदाजी करूं शकत नाहीयेत असं म्हणणं अधिक योग्य होईल. हरभजनसारखा अनुभवी गोलंदाज 'फॉरवर्ड शॉर्टलेग' ठेवून लेगस्टंपच्या बाहेर बरेच चेंडू टाकून त्याच दिशेने वळवतो, याला काय म्हणायचं !

हो. नियंत्रण करू शकत नाहीत हे खरेच आहे. पण बाकी दोघे लेग कडून कुठे टाकत आहेत. फुल चेंडू येतच नाहीयेत असे वाटते. उलट तेच ते चेंडू (एखाद दुसरा ओव्हर मध्ये अपवाद) दिसतात. त्यामुळे बॉल प्रिडिक्टेबल होत आहेत असे मला वाटले.

पुजारा, कुक आणि केपी ह्या तिघांनी दाखवून दिले की पिच ला सरेंडर न होता केवळ फुटवर्क आणि तंत्राने दरवेळी चांगला बॉल देखील चांगल्या पद्धतीने डिफेन्ड करता येतो. हॅट्स ऑफ !

केदार,

अरे तो भज्जी निर्बुध्दा सारखा टाकतोय... ओझा व अश्विन चे खोलात टप्पा पडलेले चेंडू विकेट घेवून जात आहे किंवा धोकादायक होत आहेत तसे समोर पहात असताना भज्जि चक्क भंजाळल्यासारखा गोलंदाजी करत होता... अगदीच माठ!
केपी अक्षरशः खेळवत होता अपल्याला..

पाणेसारने पहिल्याच डावासारखी गोलंदाजी केली तर याच खेळपट्टीवर आपली फेमस लाईन अप २०० देखिल गाठू शकणार नाही असे मला वाटते.. कारण त्या कुणाकडेच (पुजारा वगळता) पाणेसारला खेळायला आवश्यक तंत्र व मानसिकता दिसली नाही पहिल्या डावात.

ओझा व पाणेसर या डावखुर्‍या गोलंदाजांसाठी एक ठराविक टपा व दिशा दिल्यास ही खेळपटी लय डेंजर आहे..

अजून २ दिवसाचा खेळ बाकी आहेच... पण आता आपल्याच फलंदाजीचा कस लागणार आहे तही फिरकी विरुध्द!

होय- पुजारा व केपी ने या खेळपट्टीवर कशा प्रकारचे तंत्र, मानसिकता व अ‍ॅप्रोच असावा हे दाखवून दिले.. कूक फॉर्मात आहेच पण या वेळी तो बराचसा सुदैवी ठरला हेही सत्य आहे!

चला ईं. सर्वबाद... ८६ ची आघाडी. आता पुन: एकदा सेहवाग व गंभीर कशी सुरूवात करतात यावर पुढचे अवलंबून असेल.

सचिन दुसर्‍या डावात किती करेल्? आकडे लावताय का लोक्स? Happy

भाऊ बघताय ना..?

मॉटि व स्वान फिरकी कशी टाकावी याच खेळपट्टीवर याचे धडे आपल्या गोलंदाजांना देत आहेत आणि केपी व कूक पासून कहिही न शिकता कसे खेळावे याचे प्रात्यक्षिक सेहवाग देत आहे..
या खेळपट्टीवर "माँटि टप्पा" म्हणून तो ठराविक टप्पा घोषित केला जावा असे वाटते. त्याच्या टप्प्याची अचूकता पाहून वासिम अक्रमला देखिल गहिवरून येईल.. तीच खेळप्पटि पण पाणेसारच्या गोलंदाजीमूळे अधिक भेदक वाटते आहे!!!!

सही... आता खरी "कसोटी" सचिन आणि कंपनीची... पुजारा गेलाच आहे.. तेव्हा आपले २०० तरी होतील का अशी शंका आहे! सचिन नेहेमीप्रमाणेच चाचपडत खेळत आहे तेही दिवसाखेरची षटके म्हणजे ५०-५०.

Both KP. Cook showed that on this pitch u wait and wait until the ball finally turns to put bat on it.. u don't commit the the short. Dravid summarized it very well other day that the reason Pujara was successful in first innings: he was ready to adjust at the last minute.. he was ready to either go back to the ball or play on full depending on how the ball was delivered.

To me that fine adjustment is what is needed.. and someone like Sachin will only know better than this esp on WANKHEDE pitch.. the question is only if he can win the battle in his mind.. the bat will follow the course!

There we go......... Sachin to me is OVER!!! Please spare us from further show......

listen to Sunny: Sachin is now also screwing up basics of his technics.. taking leg/middle guard and trying to play across the line!!! I am sure, tonight and coming days will invite lot of debate and arguments over Sachin's performance and place in the Team!!!

It can't get any worst than this I suppose.......

Its beyond any one to know/understand/comprehend as to why someone with 100+ centuries, 20+ yrs expericne... would get so psyched and overdone by his own expectations and mind games that on his home pitch he can't even make double figures!! Is the Sun finally setting down on this Legend? Tomorrow will answer that.

I am sure Sachin followers will come soon on this BB and point out how others have played equally bad.. well such is the misery now that we need to defend Sachin by comparing against Others in the Team. Sad... for Indian cricket! Sad

योगेश, आठवतंय का? मायबोली शीर्षकगीत ध्वनीमुद्रण करून पुण्याहून मुंबईला येताना गाडीत आपल्या गप्पा चाललेल्या...मी म्हणालो होतो..आता सचिनने निवृत्ती घ्यावी...लोकांनी ’त्याला काढा..आता पुरे’ म्हणेपर्यंत त्याने वाट पाहू नये..गावसकरचा कित्ता गिरवावा आणि सन्मानाने निवृत्त व्हावं ...
तेव्हा तू म्हणाला होतास की शंभरावं शतक झालं की तो होईल निवृत्त...आणि मी म्हटलं होतं...नाही...ते शक्य नाही.
पाहा,जे होऊ नये तेच सुरु आहे अजूनही...खेळत राहिला सचिन तर कदाचित अजून एखाद दुसरं शतक ठोकेलही...पण आता ती मजा नाही राहिली त्याला पाहण्यात...अतिशय सामान्य दर्जाचे गोलंदाजही हल्ली त्याचा सहजपणे त्रिफळा उडवत असतात..ऐकतांना त्रास होतो आता...अर्था्त विश्वचषकाआधीच मी सोडून दिलंय क्रिकेट पाहणं..तरी बातम्यात कळत राहतंच ना! Sad

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वचपा घेण्याची भाषा तोंडाने करण्यासारखा मूर्खपणा नाही व कृतिने करण्यासारखा शहाणपणा नाही !! Wink

प्रमोद जी,
मान्य!

courtesy crincinfo:

Wicket of the day
Might this have been Sachin Tendulkar's final Test innings in Mumbai? There was an audible gasp of shock as Tendulkar was trapped leg before by a Monty Panesar delivery that did not spin and may well have been a bit quicker. It was the second time in the match that Panesar had claimed his wicket and sustained a grim run of form for the 39-year-old. Tendulkar has now not reached 20 in his last six Test innings and, as he returned to the pavilion, it was hard to avoid the feeling that, after a career in which he has defeated all opponents, he may have finally met a foe he cannot beat: time.

रच्याकने: तिकडे पाँटींग देखिल कमी धावा काढून दोन्ही डावात त्रिफळाचित झालेला आहे..

अरे योग, त्याच काय आहे की सचिन आता खासदार झाला आहे. त्यामुळे त्याने परफॉर्म केले नाही तरी चालते. Happy

सॉरी सचिन ! पण आज खरंच निराशा झाली.मे बी ३र्ड मॅच. पुढच्या दोन मॅच मध्ये परफॉर्म केले नाही तर बोर्ड सचिनला बसवू शकते.रिटायरमेंट मध्ये त्याचा लक्ष्मण होऊ नये.

धोणीला आता खेळपट्टीवर पण ब्लेम करता येणार नाही. नक्कीच तो बॅटिंग आणि सिनियर प्लेअर्सवर घसरेल.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वचपा घेण्याची भाषा तोंडाने करण्यासारखा मूर्खपणा नाही व कृतिने करण्यासारखा शहाणपणा नाही >> अगदी.. धोणीला कोणितरी हे शिकवले पाहिजे.. Happy

>>अरे योग, त्याच काय आहे की सचिन आता खासदार झाला आहे. त्यामुळे त्याने परफॉर्म केले नाही तरी चालते.
come on u can do better than that... Happy

Pages