क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकेटकिपर ने आता हेल्मेट अथवा..........तलवारबाजी करताना पुर्ण चेहरा झाकणारा हेल्मेटच वापरावे... खेळ खेळच राहील तरच आनंद येतो.>> बाऊचरबद्दल जे झाले ते वाईट असले तरी, हेल्मेट घालून खेळणे सुरू होईल असे वाटत नाहि, कारण अशा घटना दुर्मिळ आहेत त्यामुळे 'गरज पडेल तेंव्हाच' - unpredicted bounce असलेल्या पिचवर स्टंप्सजवळ कीप करतानाच - वापरले जाण्याची शक्यता आहे. बाऊअचरचे वयोमानानुसार reflexes कमी झाल्यामूळेही हे झाले असावे.

आजतगायत बाऊचरच्या खात्यावर कसोटी, एकदिवसीय आणि ट-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील यष्टीमागे एकूण ९९९ आंतरराष्ट्रीय बळी जमा आहेत. १००० बळी पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ १ झेल/यष्टीचित करण्याची आवश्यकता होती. आता ते शक्य दिसत नाही.

बाऊचरचे एकूण ९५३ आंतरराष्ट्रीय झेल (कसोटी - ५३२ + एकदिवसीय - ४०३ + ट-२० - १८) व ४६ यष्टीचित आहेत (कसोटी - २३ + एकदिवसीय - २२ + ट-२० - १). म्हणजे एकूण ९९९ बळी होतात. यात आऊटफिल्डवरील झेलाचा समावेश आहे का नाही याची कल्पना नाही.

आज इंग्लंड विरुद्ध दाफ्रिका या कसोटी सामन्यात इंग्लंडची लक्तरे ओव्हलच्या वेशीवर टांगली गेली. आमलाचं त्रिशतक आणि कालिसची १८२ ची खेळी यामुळे इंग्लंडला फक्त दोनच बळी मिळाले. याउलट दाफ्रिकेने यजमानांचे वीस बळी आरामात टिपले. २ विरुद्ध २० हा बराच मोठा विरोधाभास आहे.

-गा.पै.

नमस्कार क्रिकेट तज्ञ व इतर क्रिकेटप्रेमी,
श्रीलंका वि. भारत य मालिकेवर सर्वांनी बहिष्कार टाकला आहे का? पहिले दोन सामने बघितले, तिसरा दिसतच नाही. सामना सुरु होऊन दोन तास होत आले, क्रिकिन्फो वर अजून काहीच नाही. पहिल्या सामन्यात तर प्रेक्षकहि दिसले नाहीत, ओसाड होते स्टेडियम!! श्रीलंकेचे लोक तितकेसे श्रीमंत नसतील, पण भारतीयांना काय धाड भरली होती, पटकन उठून आपले जायचे श्रीलंकेला. क्रिकेट बघायला नको का?

चला, झाला सुरु सामना एकदाचा. आणि प्रेक्षकहि खूप आले आहेत. म्हणजे खेळाडूंना पैसे नक्की मिळतील. भारताचा खेळ नेहेमीसारखाच. शेवटच्या १० षटकात ९७ धावा, नि एकहि गडी बाद नाही.
सेहवाग बाद! पेरेराची लाज राखली.
पण अजून बरेच अतिरथी, महारथी आहेत - गंभीर, कोहली, शर्मा, रैन, धोणी, पठाण, नि आश्विन, झहीरपण!

भारतात कसोटी सामना, भारताचा पूर्ण ताकदीचा(म्हणजे जी काही आहे ती ताकद) संघ मैदानात, लक्ष्मण निवृत्त तरीही या धाग्यावर दुष्काळ? ऑलिंपिकमुळे क्रिकेटसारख्या खेळांकडे भारतीयांचे दुर्लक्ष होत आहे Lol

ऑलिंपिकमुळे क्रिकेटसारख्या खेळांकडे भारतीयांचे दुर्लक्ष होत आहे >> Lol

हि टेस्ट म्हणजे कुतूहल आहे. कोण काय काय करणार ...

चेतेश्वर पुजारा नि आश्विन यांनी काय करायचे ते केलेच आहे. धोनीने पण फलंदाजी चांगली केली नि कप्तानपदपण बरोबर निभावले असे पहिल्या डावावरून वाटते.

आता न्यू झीलंड सामना जिंकायची शक्यता जवळजवळ नाहीच. अनिर्णित ठेवला तर नशीब त्यांचे.
यापुढे भारताने सर्व सामने भारतातच खेळावे. म्हणजे जिंकणे सोपे होईल. शिवाय राजकारण, भ्रष्टाचार या कडे लक्ष जाणार नाही. कुठे चार दोन दंगली झाल्या, अतिरेकी हल्ले झाले तरी उगाच लोक जास्त बोंबाबोंब करणार नाहीत. हे असे चालायचेच म्हणून निवांतपणे क्रिकेट बघत बसतील.

ऑस्ट्रेलियाच्या भूमिवर त्यांच्याच युवा संघाला धूळ चारत भारताच्या युवा संघाने अंडर १९ वर्ल्ड कप विजेतेपदाला गवसणी घातली . कर्णधार उन्मुक्त चंद आणि समीत पटेल यांच्या संयमी खेळीने रंगतदार अंतिम सामन्यात भारताला विजय मिळाला . या विजयामुळे अंडर १९च्या अंतिम सामन्यात भारत तिसर्‍यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला .

अभिनंदन...यंग इंडिया.:स्मित:

तसेच "टीम इंडीया" चे देखील अभिनंदन...एक डाव आणि ११५ धावांनी विजय मिळवल्याबद्दल...:स्मित:

दोन्ही संघांचे अभिनंदन, विशेषतः १९ वर्षाखालील संघाचे. बघू आता मुख्य संघात यातील कोण येतात ते.

कैफ, युवराज आणि इरफान पठाण लक्षात आहेत अशा संघात चांगली कामगिरी करून मुख्य संघात आलेले.

विराट कोहली अंडर १९ विश्वचषक विजेत्या संघाचा कप्तान होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी-२० कप जिंकला त्याच्या आसपासच कोहलीच्या चमूनेही अंडर-१९ जिंकले होते. त्या संघातले रवींद्र जडेजा आणि सौरभ तिवारी हेही भारताच्या राष्ट्रीय संघात आलेले आहेत.

उन्मुक्तने माझ्या संघातले सगळे खेळाडू आज्ञाधारक आहेत असे म्हटले!

भारतीय युवा संघाचे अभिनंदन!

फारएण्ड... झहिर खान पन अंडर १९ मधुनच आलेला ना?
त्याने टायटन कप मधिल पदार्पणाच्या सामन्यातील अफलातून यॉर्करवर स्टिव्ह वॉचा उडवलेला त्रिफळा कायम स्मरणात राहिलाय.

शनिवारी अंडर १९ वर्ल्ड कप फायनल संपुर्ण पाहीली.. वेळेचे सार्थक झाले..:)

उन्मुक्त चांद... काय जबरी खेळला! कॅप्टन असावा तर असा.. काय जबरदस्त बॉडी लँग्वेज आहे या मुलाची! वे बियाँड हिज एज! काय त्याची बॅटींगची स्टाइल.. काय त्याची सिक्सर मारण्याची स्टाइल...काय त्याची चालण्याची स्टाइल.. काय त्याची बघण्याची स्टाइल... व्वा! हि जस्ट ऊझेस कॉन्फिडन्स! धिस गाय इज बॉर्न टु बी अ कॅप्टन!

सेहवाग १-२ वर्षात गेल्यावर हा त्याची ओपनिंगची जागा भरुन काढणार यात काही वादच नाही.. २२५ धावा चेज करताना वर्ल्ड कप फायनलसारख्या स्टेजवर एकदाही हा गांगरुन गेला नाही.. उलट समोरच्या प्रत्येक पार्टनरला धिर देत होता.. गाइड करत होता.. धोनीला कॅप्टन कुल म्हणतात हे खरे आहे पण इन निअर फ्युचर..भारताचा कर्णधार म्हणुन उन्मुक्त त्याच्याही पेक्षा कुल कॅप्टन होउ शकेल अशी दाट शक्यता मला वाटते.. गेल्या दिड वर्षात याच्या कॅप्टनशिपखाली भारताने ४ स्पर्धा जिंकल्या व त्या प्रत्येक विजयात उन्मुक्तने शतकी खेळी केली आहे...

उन्मुक्त व विराट कोहली या दोघांच्या बॉडी लँग्वेजमधे खुपसे साम्य आहे...

क्रिक इन्फो वर अजुनही त्याची ती वर्ल्ड कप फायनलची ..६ सिक्सर्सची जबरदस्त नाबाद शतकी खेळी तुम्हाला संपुर्ण बघायला मिळेल..:)

मुकुंद गंभीर आणि उन्मुक्त चा कोच एकच आहे.. आणि त्याने सुद्धा उन्मुक्त गंभीर पेक्षा चांगला खेळाडू आहे असे म्हणले आहे.. अर्थात गंभीर उन्मुक्तच्या वयाचा असताना केलेली तुलना आहे..

ज्येष्ठ संघाच्या कामगिरीमुळे युवा संघाला प्रेरणा मिळते तसंच दर्जेदार नवोदित खेळाडू तयार आहेत ही जाणीव ज्येष्ठांच्या खेळात शैथिल्य येणार नाही [त्यांच्या डोक्यात हवा जाणार नाही Wink ] याची शाश्वतीही देते. एकंदरीतच , भारतीय क्रिकेट एका वरच्या पातळीवर स्थिरावतंय हे खरं.
ऑस्ट्रेलियात अगदीं शाळेपासूनच देशातील प्रतिभावान मुलांचा शोध घेऊन त्यांच्या क्रिकेट प्रगतिवर सतत लक्ष ठेवण्यासाठी व त्याना सक्रिय प्रोत्साहन देण्यासाठी तिथल्या क्रिकेट मंडळाची खास कायमस्वरूपी व्यवस्था असल्याचं वाचलं होतं. म्हणूनच, आत्ताचा भारतीय युवा संघाचा तिथला विजय विशेष कौतुकास्पद व त्याचं कांहीसं श्रेय बीसीसीआयच्या धोरणात्मक व व्यवस्थापकीय कौशल्यालाही देणं [ इतर बाबतीत बीसीसीआयवर टीका करतानाही ] उचित ठरेल, असं वाटतं.
युवा संघाचं मनःपूर्वक अभिनंदन.

त्याने टायटन कप मधिल पदार्पणाच्या सामन्यातील अफलातून यॉर्करवर स्टिव्ह वॉचा उडवलेला त्रिफळा कायम स्मरणात राहिलाय.
>>>
इंद्र्या, ती टायटन कप नव्हे... टायटन कप ९६ ला दसरा दिवाळी आसपास झाली होती. भारत-ऑसी-अफ्रिका. सचिनचं अ‍ॅज कॅप्टन पहिलं जेतेपद.
जहीर खान अन युवराजच्या पदार्पणाची स्पर्धा म्हणजे नैरोबी मध्ये खेळली गेलेली २००० ची आयसीसी नॉकआऊट. पदार्पणाची स्पर्धा असली तरी ऑन पेपर पदार्पण आधीच्या केनिया विरुद्धच्या सामन्यात झालं होतं...
या स्पर्धेत आपण केनिया, ऑसी, अफ्रिकेला हरवून फायनलला न्यूझिलंडकडून हरलो होतो.
कीवींचं पहिलं मेजर विजेतेपद होतं.
नक्की आठवत नाही, पण बहुतेक केर्न्स नी धोपटला होता आपल्याला...

Pages