क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छ्या, सचिनने साफ निराश केले या कसोटीत व सिरीजमधे आत्तापर्यंत.
बाकी आपल्या संघातील पूर्वीची फ्लेअर आता दिसतच नाही. गेले दीड वर्ष 'बाहेर' हे चालू होते, आता घरीही होत आहे असे दिसते.

पण खरे सांगायचे तर कसोटी सामन्यांना सर्वात प्राधान्य देणार्‍या व अजिबात प्राधान्य न देणार्‍या दोन संघांमधली, व्यवस्थांमधली कसोटी मालिका आहे ही - यापेक्षा वेगळे काही झाले तरच आश्चर्य वाटेल! Happy

<< कसोटी सामन्यांना सर्वात प्राधान्य देणार्‍या व अजिबात प्राधान्य न देणार्‍या दोन संघांमधली, व्यवस्थांमधली कसोटी मालिका आहे ही >> सहमत . मुख्यतः कसोटी सामन्यात जम बसवून आपल्याला कर्तबगारी दाखवायची आहे, असं मनापासून वाटणारे [ तसं बोलतात सगळेच !] खेळाडू खूपच कमी आहेत, असं इथल्या कसोटीसाठीच्या एकंदर तयारी व खेळावरून तरी जाणवतं. तसं होणं चूक, बरोबर कीं अपरिहार्य हा मुद्दा वादाचा असूं शकतो पण तसं होतंय याबद्दल मात्र फार मतभेद नसावेत असं वाटतं. कसोटी सामन्याबद्दलचं औदासिन्य क्रिकेटप्रेमींमधेही तीव्रतेने जाणवतं. नवीन पिढीला तर मर्यादित षटकांचच बाळकडू मिळाल्याने हें औदासिन्य वाढण्याची शक्यताच अधिक. सध्या कसोटी क्षेत्रात चाललेली आपली घसरण ही या सर्वाचाच एकत्रित परिणाम तर नाही ?

<<मुख्यतः कसोटी सामन्यात जम बसवून आपल्याला कर्तबगारी दाखवायची आहे, असं मनापासून वाटणारे [ तसं बोलतात सगळेच !] खेळाडू खूपच कमी आहेत, असं इथल्या कसोटीसाठीच्या एकंदर तयारी व खेळावरून तरी जाणवतं. तसं होणं चूक, बरोबर कीं अपरिहार्य हा मुद्दा वादाचा असूं शकतो पण तसं होतंय याबद्दल मात्र फार मतभेद नसावेत असं वाटतं. कसोटी सामन्याबद्दलचं औदासिन्य क्रिकेटप्रेमींमधेही तीव्रतेने जाणवतं. नवीन पिढीला तर मर्यादित षटकांचच बाळकडू मिळाल्याने हें औदासिन्य वाढण्याची शक्यताच अधिक. >>

भाऊ.......अनुमोदन

>>सध्या कसोटी क्षेत्रात चाललेली आपली घसरण ही या सर्वाचाच एकत्रित परिणाम तर नाही ?

भाऊ,
हे नाही पटत... कारण ईं. मध्ये धुव्वा ऊडाला तेव्हा बाऊंसी विकेट्स अशी कारणे देण्यात आली.. आता भारतात स्पिन विकेट मागून घेतली (as they say careful what u wish for.. ) तरी तेच? यात औदासिन्यापेक्षा मुळात आवश्यक तंत्र, मानसिकता, अ‍ॅप्लिकेशन, फिटनेस याचा अभाव आहे. गॅरी च्या नेतृत्वाखाली हाच संघ क्र १ वर होता ना? तेव्हा कोच ची भूमिका हा तर मुद्दा आहेच पण वर लिहीले तेही मुद्दे आहेत..
सेहवाग स्लिप मध्ये "पहारा देत असतो" दोन झेल सोडले लेकाने.. खाली बसला असतात तर झेल आरामात होते.
असो... यादी लंबी आहे.... आज शिक्कामोर्तब होईलच.

योग,

मुळात औदासिन्य येण्यामुळेच आवश्यक तंत्र, मानसिकता, अ‍ॅप्लिकेशन, फिटनेस याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. २० षटकाचा खेळ जिंकण्यासाठी कसोटीच्या तुलनेत काहीच तंत्रशुद्ध खेळाची गरज नाही. मी स्वतः २०-२० चा फॅन आहे. पण अखेर जिथे पैसा तिथेच जास्त लक्ष राहते. हरभजन व झहीर सोडता आपले इतर मुख्य बॉलर्स २०-२० कडूनच टेस्टकडे आलेले आहेत आणि कालच्या दोन बाजूंच्या बॉलिंगला पाहता तोच फरक जाणवत होता......
पिटरसन जरी आपल्या बॉलर्सला चोपत असला तरी त्याला अशा फॉर्मात बघताना फारच मस्त वाटले. Happy

योग, तुझे मुद्दे बरोबर आहेत, पण मला वाटते त्याचे कारण म्हणजे भाऊंनी लिहीलेला 'एकत्रित परीणाम' आहे. ज्या गोष्टींचा अभाव तू लिहीलेला आहेस, त्या कसोटी क्रिकेट कडे दुर्लक्ष करण्यामुळे झालेल्या आहेत असे मलाही वाटते.

<< यात औदासिन्यापेक्षा मुळात आवश्यक तंत्र, मानसिकता, अ‍ॅप्लिकेशन, फिटनेस याचा अभाव आहे. >> योगजी, औदासिन्य प्रेक्षकांचं व कसोटीच्या ' तयारी'चा अभाव खेळाडूंच्या मानसिकतेमुळें, असं मी म्हणतोय .

आज धोणी ची प्रतिक्रीया काय असेल बरे...?
"our bowlers failed to capitalize on pitch conditions or England bowlers used the pitch conditions better than us. We didn't get any partenerships going.. (१, ०, १०, १२ अशा धावा काढल्यावर ते कसे होणार म्हणा?)...blah blah..

wait a minute: what about ur performance as captain leading from front?
yes i am always "upfront" about it.. Happy

does it boughter u that ur key batsmen aka sachin et al have failed to perform..?
not really not anymore.. u see they are only one innings away from getting into form.. (just that they don;t seem to be able to play that one inning.) Happy

so whats next..
IPL 2013, its around corner now Happy

Any positives from this game:
yes if insisted our curators will deliver turning tracks.. however it should not turn when we bat, they missed that point. We need to work on that..

Any message to ur fans:
yes to bhaau, farend, asami, yog: please keep watching cricket.. Happy

yes if insisted our curators will deliver turning tracks.. however it should not turn when we bat,>>> Lol

हा माझाही एकः
The ball should come to our batsmen in slow motion, like it does in the action-replay. Then each batsman will have more time to play it Happy

Yogajee, Good one ! Our politicians can learn a thing or two from Dhoni about facing the hostile media !!! Wink
<< please keep watching cricket.. >> ... on fifth day of this Test ! Wink

२०१३ च्या हंगामात यापैकी कुठले खेळाडू भारताकडून क्रिकेट खेळत रहातील असे वाटते,. ? (ई. वि च्या मालिकेचा निकाल व बोर्डाने आधिच पुढील दौर्‍यासाठी कुणाला निवडले आहे वगैरे चा अनुल्लेख करावा!) Happy

नसल्यास त्यांच्या जागी कुणाला तुमची पसंती असेलः
१. सचिन
२. भज्जी
३. झहीर
४. ईशांत शर्मा

गंभीर- कसोटी, कोहली- एकदिवसीय असे कर्णधारपद २०१३ पासून पुढे राबवावे का..?

Take a bow Faf du Plessis !!! That's how you play Test cricket !! Any team would have given hope surviving 150 overs to save a match . But not SA today . And Faf ,376 balls in 4th innings , that's the sort of fight that is exactly missing in our Indian Team .

केदार जाधव पूर्ण अनुमोदन.... कॅलिसला पण तितकेच क्रेडीट दिले पाहिजे... पहिल्याच दिवशी जखमी होउनही.. दोन्ही इनिंग्स मध्ये ८व्या क्रमांकावर खेळायला येऊन उत्तम खेळला.. आणि मॅच वाचवण्याच्या दृष्टीने खेळ केला...

yes thats why they-SA truly desrve to be no 1...

well nothing left to say about our team, but the crux is our team lost the game in the mind... bat is then merely a dead piece of wood in their hands!!!

Taking no credit away from England, however the Mumbai game was ours to lose... we did so.. Happy

" कसोटी सामन्यांना सर्वात प्राधान्य देणार्‍या व अजिबात प्राधान्य न देणार्‍या दोन संघांमधली, व्यवस्थांमधली कसोटी मालिका आहे ही "
"मुख्यतः कसोटी सामन्यात जम बसवून आपल्याला कर्तबगारी दाखवायची आहे, असं मनापासून वाटणारे [ तसं बोलतात सगळेच !] खेळाडू खूपच कमी आहेत, असं इथल्या कसोटीसाठीच्या एकंदर तयारी व खेळावरून तरी जाणवतं" >> ह्या दोन्ही बाबतींमधे सहमती.

पहिला जिंकलो नि दुसरा अतिशय दयनीय खेळून हरलो. टेलर मेड विकेटवर त्याच खेळामधे हरलो. बॅटींग मधे सचिन, युवराज, कोहली नि काही अंशी धोनी (अंशी कारण माझ्यासाठी वरच्या सहामधल्या काही जणांनी खेळणे विकेटकिपरने खेळण्यापेक्षा अधिक मह्त्वाचे आहे, धोनीच्या keeping बद्दल मला तरी शंका नाहि आहेत) नि अंशतः गंभीर हे मुख्य दोषी. त्यातही पहिले दोन अधिक जबाबदार. test matches are won in sessions. Barring few of the first inning batting sessions we pretty much lost all other sessions. त्यामूळे बॅटींगपेक्षाही अधिक दोषी धरता येतील अशा तीन गोष्टी.

१. बॉलर्स - भज्जी नि अश्विन (Ojha is not match winner, he is your mule who can ball abundance number of controlled overs, tieing up one end so OTHERs can get wickets.) Other 2 spinners came short in that aspect. I'm not buying in explanation that indians did not ball that bad and their pace was not suitable for the pitch as panesar's was. Swann did adjustments to his pace and bhajji, ashwin failed grandly to do so. Bhajji has been performing poorly for quite some time (For anyone watching champions trophy, it was clear that he had lost his last weapon - limited overs specialist tag,) He was picked up in spite of poor outing in domestic circuits sheds pathetic situation indian spin balling is at. Clearly there are no alternative spinners available. Ashwin never seemed like test spinner (very good limited overs option but certainly not test level in spite of his competitive edge)
2. Captaincy : Dhoni was clearly disappointing. I believe that captain is as good as his team. But still at no point Dhoni tried to take control of situation which is quite a diversion from his earlier trait. "Wait and watch approach" can work only up to certain extent. It would have been interesting to see how Sehwag or Gambhir would have handled this match. For anyone who had watched them handling DD or KKR spin departments would have wished one of them to be captain for this match at least.
3. Coach : I think it's high time BCCI should hold coach accountable. Whatever Fletcher is bringing to the table is not agreeing with Indian cricket team.

For next 2 matches, it would be great of Rahane replaces Yuvraj ( As such looking at number of overs Yuvi has bowled, it's very clear that Dhoni does not prefer him as third spinner. Once you take away all-rounder(??) tag from him, there is very little that can tilt the scale in his favor. If think tank insists on all rounder at that spot, maybe its time to try Tewary as he will at least bring in third form of spin in picture - though I certainly do not think that's a test class spinning option).

Clearly Bhajji ought to go, even on spinner friendly wicket, it's probably safe punting on Yadav and Zaheer/Ishant than Bhajji. Ashwin stays purely due to lack of an alternative. Ojha being left arm orthodox, makes it hard for anyone like Abdulla etc to get in team.

With under-performing Kohli, unreliable contributions at top and lower middle order, it's extremely hard to to replace Sachin with new player at this instance. Yes he looked miserable in second test (IMHO left arm spinners have been his achilles heel recently) but is there anyone else waiting in wings who can take the burden of spot number 4 ? Against all common senses, anyone who steps in that spot will be compared to Sachin and stamped to be doomed.

Drastic option may be to replace Bhajji with Irfan and push him to open pushing Gambhir down at number 4/5 to strengthen Indian response to spin threat. Happy

जाता जाता : भाऊ ह्या सिरीजच्या सुरूवातीला तुम्ही भारतीय खेळाडूंची स्पिन खेळण्याची क्षमता नि बॉलर्सची स्पिनवर विजय मिळवण्याची क्षमता कमी झाली आहे असे लिहिले होते. जर अहमदाबादसारखी पहिल्या इनिंगमधे संथ असलेले पिच मुंबईमधे असते तर आपण टॉस जिंकल्यामुळे काय झाले असते हे सांगायला नकोच. तेंव्हा खर तर पहिल्या बॉलपासून वळणारे पिच मिळाल्याने तुमचेच दोन्ही मुद्दे अधोरेखित झाले आहेत हे सामन्याचे दिवस मोजण्याच्या नादात तुमच्या लक्षात आलेले दिसत नाहिये Wink

योग गमतीचा मुद्दा बाजूला ठेवून, बेदीने भज्जीवर जहरी टिका करण्यापेक्षा अधिक काही केले असते तर ..... मला आठवते त्याप्रमाणे बंगलोरच्या गावस्करच्या शेवटच्या कसोटीमधे शेवटच्या इनिंगमधे कशी बॉलिंग करायची हे पाकिस्तानच्या स्पिनर्सना सांगण्याचे काम बेदीचेच होते. Sad

असाम्या बेदी बाहेरचाच पण आपला कोच झोपला होता की आपल्याकडे कुठलेही अ‍ॅनॅलिसिस टूल नाही? फुल लेंग्थ मध्ये बॉल आणि ते ही ऑफ च्या ६ इंच डावीकडे पडायला पाहिजे होते, ते त्याला हजारो बॉल्स नंतरही का नाही सांगता आले. इनिंग्स ब्रेक, दिवसाचा ब्रेक हे सगळे असतानाही. जे टिव्हीवर आपल्यासारख्या ले मॅन ला कळावे ते त्यांना का कळू नये हे उमजत नाही.

केदार मला ते कळले असते तर मीच भारताचा कोच नसतो का :D. फ्लेचरला स्पिन बॉलिंगबद्दल फारसे कळत नसेल ??? किंवा त्याने हजारदा लक्षात आणून दिल्यावरही बॉलर्स तसे करत नसतील ??? दुसरी शक्यता अधिक वाटते - कारणे दोन असू शकतील,
१. भज्जीच्या सध्याच्या मुलाखती वाचल्या आहेस का ? मूळात बॉलिंगमधे काहीतरी गोच निर्माण झालेली आहे हेच त्याला मान्य नाहिये तेंव्हा पुढचे बोलणेच खुंटले.
२. t-20/ ODI ला सुटसुटीत होइल अशी बॉलिंग करण्याच्या नादात टेस्टकडे झालेले दुर्लक्ष.

<< ते त्याला हजारो बॉल्स नंतरही का नाही सांगता आले. >> इतक्या प्रचंड स्पर्धात्मक वातावरणातून राष्ट्रीय संघात पोचलेल्या गोलंदाजाना ही प्राथमिक गोष्ट सांगायला का प्रशिक्षक लागतो /असतो ! मला वाटतं काय करायचंय तें माहित असणं पण तें करतां न येणं, ही गोची होती आपल्या गोलंदाजांची; टप्पा व दिशा यावर नियंत्रणच नव्हतं बिचार्‍यांचं ! या उलट, माँटी व स्वान यांच्या चेंडुवरच्या आदर्शवत नियंत्रणामुळे त्यानी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा करून घेतला !!

मला वाटतं काय करायचंय तें माहित असणं पण तें करतां न येणं, ही गोची होती आपल्या गोलंदाजांची; टप्पा व दिशा यावर नियंत्रणच नव्हतं बिचार्‍यांचं >> हे अधिक समर्पक वाटते. गंभीर किंवा धोनीच्या मुलाखतींमधे त्यांनी फक्त बॉल स्पीडवर भर दिलाय ?

गंभीर- कसोटी, कोहली- एकदिवसीय असे कर्णधारपद २०१३ पासून पुढे राबवावे का..?>> हे मी आत्ता वाचले. हे नक्की योगनेच लिहिलेले आहे का ? Lol

>>मला वाटतं काय करायचंय तें माहित असणं पण तें करतां न येणं, ही गोची होती आपल्या गोलंदाजांची; टप्पा व दिशा यावर नियंत्रणच नव्हतं बिचार्‍यांचं ! या उलट, माँटी व स्वान यांच्या चेंडुवरच्या आदर्शवत नियंत्रणामुळे त्यानी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा करून घेतला !!

भाऊ, अचूक!

No changes in the team for next match barring Yadav out due to injury. Go figure Happy

<< No changes in the team for next match >> Is it to assure England of no change in the result of next match ! Wink

Is it to assure England of no change in the result of next match ! >> पुढच्या मॅचमधे डिवचल्यासारखे खेळतील असे मला उगाच वाटतेय.

Is it to assure England of no change in the result of next match ! >> पुढच्या मॅचमधे डिवचल्यासारखे खेळतील असे मला उगाच वाटतेय.>>> असाम्या.. किती तो आशावाद... गेल्या सिरीज मध्ये पण असे बोलत होतो आपण.. काहीही उपयोग नाही... शेण खायचे फिक्स आहे... कोणी किती ते टॉस करुन ठरवतात बहुतेक...

Pages