क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१० ड्रॉ कुठल्या म्हणतोयस तू ? >>> मला वाटलं आपण परदेशी टेस्ट बद्दल बोलत आहोत इतका वेळ. एकुण सलग १४ टेस्ट झाल्यात ज्यात आपण एकतर हारलो, आणि ५ ते ६ वेळेस जिंकू शकत असतानाही त्या ड्रॉ झाल्या गेल्या १४ टेस्ट मध्ये (आउट) बलदंड भारत टीम फाफलतीये. त्यामुळे लोकं (आंतराष्ट्रीय खेळलेले) सध्या चिडलेले आहेत. >> आपण नक्कीच कुठल्या तरी दोन वेगळ्या भारतीत टिम follow करतो रे Happy तू सलग १४ बाहेरच्या ज्या म्हणतो आहेस त्यात फक्त शेवटच्या चारच्या वेळी धवन, विजय, पुजारा, कोहली, रोहित, राहणे हा लाईन अप होता. त्या आधीचे ४-० पानीपत aus नि england मधे झाली त्यात सेहवाग, गंभीर, तेंडूलकर, द्रविड, लक्ष्मण होते. ह्या ८-० मधे सध्याच्या टीम ला कसा दोषी ठरवणार ? मी हाच्य लाईनप बद्दल दोन दिवस बोलत आहे कि हा सेटल होउ दे नि ह्याने consistency दाखवायला हवी नि हा promising आहे वगैरे वगैरे. असो.

राहाणे मुंबईसाठी आधी ओपन करत असे मी मला माहित नव्हते. थोडी फार शोधाशोध केल्यावर त्यानेच middle order prefer केली असे सापडले. (http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/series-tournament/aust...) तसे असेल तर It's wise decision. आपल्या देशात ओपनरला किम्मत नाही. दुर्दैवाने फक्त शतकांमधे आपण किम्मती मोजतो नि ओपनरचा महत्वाचा भाग to negotiate the opening spell हा सोयीस्करपणे विसरतो.

पण हा नविन संघ थोड्याफार बदलाने अभिमानास्पद कामगिरी करेल- इथे व बाहेरही - असा मला रास्त विश्वास आहे ! >> +१ फक्त बॉलिंग युनिट नीट जमायला हवे.

लोल. अरे हो. शिखर वगैरे चारच खेळले. आणि तसेही शिखर बद्दल मी + लिहिले. इंडिव्हिज्युल लेवलला मला फक्त धोणी, रोहित, जडेजा, अश्विन अशा लोकांचा प्रॉब्ब्लेम आहे. पण टीम म्हणले की कोण नक्की खेळतेय त्याचा विचार करतो पण "भारत" लेवलला विचार करावा लागतो. धोणी, अश्विन वगैरे मंडळी तेंव्हाही होतीच आणि आपला एक मुद्दा असा होता (आहे ) की धोणी बाहेर प्रचंड बचावात्मक खेळतो. त्यामुळे जिंकण्याची संधी असतानाही मॅच ड्रॉ झाल्या.

असो. खूप झाले! आता उपखंडातच आहोत तर आशिया कप मारूच. Happy

केदार फार जास्त अपेक्षा करतोयेस.. संगाचा फॉर्म बघता तो जर प्रत्येक मॅच मध्ये खेळला तर अवघड जाणार...

द.आफ्रिकेनी ऑसीजची चांगलीच गोची केली आज.. डिव्हीलर्स आणि ड्युमिनीने शतकं मारली.. आणि आता ऑसीज.. १०० च्या आसपास ४ बाद..

१०० च्या आसपास ४ बाद.. >> अरे थांब. अजून स्मिथ नि हडीन यायचेत आणि ते चांगलेच फॉर्ममधे आहेत. तेंव्हा interesting होईल.

केदार फार जास्त अपेक्षा करतोयेस.. संगाचा फॉर्म बघता तो जर प्रत्येक मॅच मध्ये खेळला तर अवघड जाणार... >> पण तो जास्तीत जास्त लंकेला ३०० पर्यंत ढकलेल नि ज्या तर्‍हेने आपण ३००+ subcontinental pitches चेस करतो ते बघता अशक्य नाहि.

केदार फार जास्त अपेक्षा करतोयेस.. संगाचा फॉर्म बघता तो जर प्रत्येक मॅच मध्ये खेळला तर अवघड जाणार... >> पण तो जास्तीत जास्त लंकेला ३०० पर्यंत ढकलेल नि ज्या तर्‍हेने आपण ३००+ subcontinental pitches चेस करतो ते बघता अशक्य नाहि.>>> अशक्य नाहीच्चे.. पण आपली लोक मध्येच गळपटतात. आणि मग सगळी गम्मत होते... आता धोनी पण नाहीये.. कार्तिक खाली फार काही नीट खेळत नाही.. जडेजा.. आऊटरेट बेभरवश्याचा आहे..

"संजू चा समावेश करायला हवा होता फार्मात आहे" - संजू U १९ वर्ल्ड कप खेळतोय. पण त्याला हळू हळू सिनीअर टीम मधे समाविष्ट करायला हवं हे मात्र खरं.

पुजाराला घ्यायला हवे पण कोणाला काढणार? माझ्या मते रोहितला एक दोन गेम घेऊ नये. पुजाराला ओपनर म्हणून किंवा रहाणे ओपन आणि पुजारा नं ४.

भूवनेश्वर ऐवजी इश्वर पांडेला संधी देऊन बघावी. फार फरक पडेल असे वाटत नाही. झाला तर फायदाच होऊ शकतो. ( कमी धावा देऊन.)

संजुला टी२० वर्ल्ड कप मधे घ्यावे...

भुवनेश्वर कुमार रन्स फार कमी देत आहे.. त्याचा फायदा होत आहे.. सध्या रोहीत आणि बिन्नी यापैकी बसावा

रहानेला ओपनर नकोच.. खाली चांगला खेळत आहे उगाच त्याची लाईन बिघडेल

मला वाटतं कीं फलंदाजीतले बदल फार महत्वाचे नाहीत; कारण, त्याबाबतीत प्रश्न प्रतिभा व कुवत हा नसून फक्त 'फॉर्म'मधे असण्या-नसण्याचाच आहे. अत्यंत हुषारीने, कल्पकतेने बदल आवश्यक आहेत ते गोलंदाज व गोलंदाजीबद्दल. पुन्हा पुन्हा मीं तेंच टुमणं लावतोय हा आरोप अंगावर घेवूनही मला सांगावसं वाटतं कीं, फिरकीवर आपण अधिक विश्वास दाखवणं, गोलंदाज निवडीत दूरदृष्टीने धाडसी प्रयोग करणं हेंच आज खरं गरजेचं आहे. [ काल, सामना निर्णायक, अंतिम अवस्थेत असताना, झियाउर रेहमान बांगलादेशसाठी षटकार-चौकारांचा पाऊस पाडत असताना, अफगाणिस्तानच्या नबिने स्वतः फिरकी गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेवून सामना जिंकून दाखवला ! ] फिरकीला अवास्तव महत्व मी देत नाहीय; पण फिऱकीला आतां प्रत्येक देश महत्व देत असताना आपण मात्र त्याकडे द्यावं तितकं लक्ष देत नाही हें आपल्याला महागात पडतंय व पडणार आहे, असं मला जाणवतं. उदयोन्मुख प्रतिभा शोधून जोपासायची सोडून आतां पुन्हा भज्जीला आणायचे बेत चालले आहेत !!!

भारत-पाक सामना सुरू....

आज शर्माची फटकेबाज सुरुवात, काहीतरी सिद्ध करून दाखवायला खेळल्यासारखी.
याउलट विराट कोहलीचा टायमिंग चुकत असल्याने फॉर ए चेंज त्याची थोडीशी गडबडीची सुरुवात वाटतेय..
कोणीही खेळा पण आज करो या मरो..

मला वाटतं कीं फलंदाजीतले बदल फार महत्वाचे नाहीत; कारण, त्याबाबतीत प्रश्न प्रतिभा व कुवत हा नसून फक्त 'फॉर्म'मधे असण्या-नसण्याचाच आहे >>> सहमत मागच्या वर्षी झालो असतो पण नोव्हे नंतर तसं वाटत नाही. तिथेही बदल हवे आहेत असे वाटते. रैना, युवी, फेल असतात, धोणी कधीतरी खेळतो. रोहितचं काही सांगता येत नाही. फक्त विराट स्थितप्रज्ञासारखा आहे. आणि बाहेर तर हे फार ओळखू येते. मला होप्स आहेत नाही असे नाही, पण अगदी एशिया कप मध्येही पाहा. बांग्लादेशासोबत विराट आणि रहाणेच तरले. लोअर मिडल ऑर्डर खेळली नाही. आणि ते जेंव्हा खेळले गेल्या दोन्ही मॅच मध्ये फलंदाजीत फेल गेलो. (आजच्या मॅच सहित)

प्रतिभा आहे हे मान्यच. पण आपल्याला सध्या प्रॉब्लेम आहे.

निदान मिश्रा आज आहे. तो चांगली टाकेल अश्या होप्स आहेत.

बाकी धोणीने न खेळून कॅप्टनशिपचा वाद मिटवला असे मला वाटायला लागले आहे. एशिया कप मध्ये आपण बाहेर जाण्याची भिती आहे सध्या तरी. अनलेस पाक आपल्यापेक्षाही वाईट खेळले तरच आपण तरू.

भज्जी यायला हवा असे मलाही वाटते. अश्विनपेक्षा तो नक्कीच उजवा आहे.

शेवटच्या १०-५ ओव्हर्स मधे "ब्लास्ट" करणारा सध्या एकही फलंदाज भारताकडे नाही आहे..
धोनी शेवटाच्या ५ ओव्हर्स मधे टिकला तर धावसंख्या वेगाने वाढवायचा (भले आधी टुकुटुकु करुन वात आणायचा)

आता विराट सलामीलाच बहुदा येत आहे.. पहिल्या १० ओवर्स मधेच तो खेळपट्टीवर असतो. त्यामुळे शेवट पर्यंत टिकला तरी किती फटाके फोडेल हे त्याच्या स्टॅमिनावर अवलंबुन आहे.. ६ - ७ वर पोलार्ड, धोनी, सारखा एक तरी फलंदाज हवाच.. तरच शेवटी बुस्टींग मिळेल .. राहाणे ने एक बाजु लावुन धरलेली परंतु दुसर्या बाजुने रायडु सुध्दा बाजु लावुन धरण्यातच धन्य मानले. त्यामुळे मधल्या षटकात धाववेग प्रचंड खाली आला कुठे कुठे तर २-३ च्या सरासरीवर आलेला.. २५ ते ३८ ओव्हर या दरम्यान जी संथ धावगती ठेवली त्याचा परीणाम २४५ वर आपण अडकलो.. जिथे आपण २७०-२८० पर्यंत पोहचणे शक्य होते ..

<<शेवटच्या १०-५ ओव्हर्स मधे "ब्लास्ट" करणारा सध्या एकही फलंदाज भारताकडे नाही आहे..>> मला वाटतं शिखर धवनला खालीं खेळवणं हा यावर उपाय होवूं शकतो; शिखर धवन हा जात्याच आक्रमक फलंदाज आहे . [ वरच्या क्रमांकावर खेळताना त्याच्या आक्रमतेवर अंकुश आला कीं तो बाद होतो, असं मला नेहमीं जाणवतं].म्हणूनच हा उपाय सुचवायचं धार्ष्ट्य दाखवतोय.

खरं तर रोहित सलामीचा फलंदाज नसताना त्याला मारुनमुटकून तिथंच बसवलंय (वीरु-गौतीला डच्चू द्यायचा म्हणून आणलं ?). अजिंक्यला सलामीला आणायला हरकत नाही आणि रोहितला चारवर खेळवून बघावं; पण त्यातून अजिंक्यचा जो काही थोडाफार सूर लागलाय तो जायला नको. आणि तोही बराच स्लो खेळतो म्हणा वन डेमध्ये! बिन्नीला संधी देत राहिलं तर कदाचित तो ती जागा (सातवी) भरुन काढेल व्यवस्थित.

पण सगळं "जर-तर" आहे!

हो ते आहेच रे. पण मी लिहिले होते की मिश्राला आपण फक्त बेंच म्हणून घेतो. त्याला खेळवावे असे मला वाटते. अश्विन परत उपखंडात आल्यावर बादशहा टाईप विकेट घेतोय.

थँक गॉड सम सेन्स इज इन्स्टॉल्ड. रहाणे ओपनिंगला आला आणि ५० ही केले. ओपनिंगला खेळताना तो चाचपडत नव्हता, नं ४, ५ वर तो चाचपडत होता बरेचदा.

थँक गॉड सम सेन्स इज इन्स्टॉल्ड. रहाणे ओपनिंगला आला आणि ५० ही केले. ओपनिंगला खेळताना तो चाचपडत नव्हता, नं ४, ५ वर तो चाचपडत होता बरेचदा. >> Actually problem is to have multiple players with similar style and tempo in a team - Rahane, Sharma, Rayadu all 3 need time to establish their innings and 3 of them in 11 is little bit much. One of them has to make way for someone who can be get going from first ball.

It is surprising that Pujara and Pandey did not play today. Very bizarre !

It is surprising that Pujara and Pandey did not play today. Very bizarre ! >> बरोबर निदान इश्वर पांडेला संधी द्यायला हवी होती.
रायडू ओपनिंगला नसावा. तो नं ५ बरोबर आहे असे मला वाटते.

शिखर - रहाणे - कोहली - शर्मा - धोणी - रायडू - जडेजा असे बॅटसमन असावेत. धोणीला मी एक ने प्रमोट केले आहे. आणि जर कदाचित पुजारा आला तर मग ३. ला पुजारा आणि मग कोहली. त्या केस मध्ये रायडू नसेल असे वाटते.

क्लास मॅच झाली... आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया.. जब्बरदस्त.. जेव्हा दोन्ही कडून जिद्दींची टक्कर होते तेव्हा काय धमाल अनुभवायला मिळते ती बोरींग समजल्या जाणार्‍या टेस्ट मॅच मध्ये अनुभवली.. मस्तच !!

रायडू ओपनिंगला नसावा. तो नं ५ बरोबर आहे असे मला वाटते. >> त्याने ओपनिंगला यावे असे मी म्हणत नाहिये तर एकाच प्रकारचे तीन जण असणे हा problem आहे असे म्हणतोय मग ते कुठेही खेळू दे. आपली बॉलींग strength बघता आपण २५०+ chase करत राहणार हे उघड आहे तसे असेल तर कोहली सारखे जे एकदा gear बदलला कि त्यात gear मधे सहज राहू शकतील असे किंवा धवन सारखे aggressive किंवा धोनी सारखे कधीही वरच्या gear मधे सहज जाऊ शकतील असा अजून एक जण हवा. शर्मा, रायडू किंवा राहणे ह्यातले एकाच वेळी दोघे जण असावेत. माझ्या आठवणी प्रमाणे मधे शर्माला रैनासारखे वापरायचा अयशस्वी प्रयत्न झालेला आहे. MI follow करणारा कोणीही सांगू शकेल कि रायडूला आल्या आल्या तिसर्‍या gear मधे जायला फारसे जमत नाही (which is kind of strange since he is pretty aggressive when it comes to shot making). पण मग अजून कोण ह्याचे उत्तर मला सुचत नाही - सॅमसन ?

तू पुजाराचे जे म्हणतो आहेस ते पण त्याच केस मधे येणार, वरच्या तिघांमधे अजून एक भर Happy असो धोनी परत आला कि परत सगळे बदलेल.

t-20 world cup साठी काय करणार देव जाणे.
dhawan, sharma, kohli, rahane, dhoni, karthik/samson/raina (?), jadeja, ashwin, mishra, shami, ?

क्लास मॅच झाली... आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया.. जब्बरदस्त.. जेव्हा दोन्ही कडून जिद्दींची टक्कर होते तेव्हा काय धमाल अनुभवायला मिळते ती बोरींग समजल्या जाणार्‍या टेस्ट मॅच मध्ये अनुभवली.. मस्तच !! >> आपली वर्षाखेरीस down under बोंब लागणार आहे असे दिसतेय. तोवर harris ची surgery होऊन तो पण परत आला असेल.

अरे वर्षाअखेरीस परत.. अजूनही मागचे ४-० ताजे असल्यासारखे वाटतेय.. बाकी हॅरीस येवो न येवो, तो जॉन्सन नावाचा प्राणी दिवसेंदिवस इतका खतरनाक होत चाल्लाय की आफ्रिका-ईंग्लंडलाही नाचवतोय तर आपण... तो एकटाच पुरेसा ठरेल.
यावर एकच उपाय, आयपीएलमध्ये दमवा त्याला अक्षरशा..

असो, विश्वचषकाची टीम समजेल त्या मालिकेत.. आणि आपण किती पाण्यात ते देखील..

हो, ती ठाऊक आहे, होम सिरीज किती आहेत पण अध्येमध्ये.. सध्या गेलेली पत मिळवायला त्यांची जास्त गरज आहे.

<<... spinners ला वापरायची treatment आवडली कि नाहि ? >> असामीजी, ती treatment पेशंटला लागूही पडली असं नाही वाटलं ? Wink

Pages