Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40        
      
    क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
मात्र दुसर्या बाजूने बघता
मात्र दुसर्या बाजूने बघता आयपीएल ई. मधून प्रतिस्पर्धी बोलर्स ची बरीच माहिती आधीच झालेली असते. १९९९ मधे आपले लोक ब्रेट लीला मेलबर्न मधे खेळले ते एकदम पहिल्यांदाच खेळत होते. आत सहसा तसे होत नाही, तो एक अॅडव्हांटेज या नव्या लोकांना आहे. >> पण भारतीय पिचेस वर ली ला खेळणे नि मेलबर्न किंवा पर्थ वर खेळणे हा मोठा फरक आहे. इथे फक्त पेस नाहितर पेस, बाउन्स, स्विंग movement एकत्र येतोय. त्यामूळे acclimatize होणे ह्याला पर्याय नाही. आपले सोड, england, RSA, aussies एकमेकांशी खेळताना सुद्धा २ सराव सामने खेळतात टेस्ट खेळायच्या आधी. आपण शेवटचे असे केलेले तेंव्हा सराव सामने भारतीय पद्धतीच्या खेळपट्ट्ञांवर medium pacers च्या विरुद्ध.
पण ते दौरे सहसा असे आखतात की परदेशी संघ इझी पिच वर पोहोचेपर्यंत सिरीज हरलेले असतात >>
पण भारतीय पिचेस वर ली ला
पण भारतीय पिचेस वर ली ला खेळणे नि मेलबर्न किंवा पर्थ वर खेळणे हा मोठा फरक आहे.>> ते आहेच रे, पण ब्रेट ली ला आयुष्यात पहिल्यांदा थेट मेलबर्नला खेळणे, व स्टेन ला आयपीएल मधे हजार वेळा खेळून मग आफ्रिकेत खेळणे, दोन्हीमधे जो काय थोडाफार फरक असेल तो मी एक फायदा म्हणून लिहीला. तो पिच मधला फरक गृहीत धरूनच ते लिहेलेले आहे.
पण ब्रेट ली ला आयुष्यात
पण ब्रेट ली ला आयुष्यात पहिल्यांदा थेट मेलबर्नला खेळणे, व स्टेन ला आयपीएल मधे हजार वेळा खेळून मग आफ्रिकेत खेळणे, >> हो at least weird action वगैरे असेल तर ते तरी कळते.
हो. आणि टेस्ट्स मधे ज्या
हो. आणि टेस्ट्स मधे ज्या माइण्ड गेम्स खूप खेळल्या जातात, त्याचाही फायदा होतो. बोलरला उचकवला की तो जास्त फोकस होतो (हरभजन होतो, प्रसाद त्या १९९६ च्या वर्ल्ड कप गेम मधे झाला होता) की जास्त वेवर्ड बोलिंग करतो (बरीच उदाहरणे), तो कोणता स्विंग टाकताना काय अॅक्शन करतो (दोन्ही स्विंग च्या वेळच्या अॅक्शन मधला फरक), डावखुरा असेल तर तो 'आत येणारा' चेंडू टाकू शकतो का यावरून बरीच तयारी होते. अर्थात हे क्लासिकल टेस्ट बॅट्समनशिप बद्दल आहे.
शोएब चा यॉर्कर एकदम खतरनाक होता. पण यॉर्कर चुकल्यावर जर धुतला तर तो लगेच शॉर्ट पिच टाकायला सुरूवात करत असे. सचिन व इतरांनी हे ओळखून त्याला पार खलास करून टाकला. या असल्या काड्या तुम्ही ऑलरेडी खेळला असाल तर करू शकता.
प्रत्यक्ष खेळण्याला पर्याय
प्रत्यक्ष खेळण्याला पर्याय नसला तरी आजकाल recording मूळे बरीच mystery कमी झाली आहे. मेंडीस ला खेळण्यासाठी गंभीर नि सेहवागने आधीच्या series मधे त्याने केलेले प्रयोग पाहिले होते असे वाचलेले.
IPL सुरू होईल,कुठे बघायला मिळाले तर बरे होईल. मस्त balanced teams आहेत.
<< लोक ब्रेट लीला मेलबर्न मधे
<< लोक ब्रेट लीला मेलबर्न मधे खेळले ते एकदम पहिल्यांदाच खेळत होते. आत सहसा तसे होत नाही, तो एक अॅडव्हांटेज या नव्या लोकांना आहे.>> द.आफ्रिकेत पहिल्या कसोटीत स्टेनला खेळताना जी हतबलता त्याच्याविरुद्ध आयपीएलमधे खेळलेल्या आपल्या फलंदाजानी दाखवली, त्यावरून हा 'अॅडव्हांटेज' किती तकलादूही असूं शकतो, हें लक्षात येतं. संघ जिंकणं /हरणं याशिवाय एखाद्या प्रतिभावान खेळाडूला असं अचानक अनोख्या परिस्थितीत लोटणंही अन्यायकारक ठरतं. अशोक मांकड हा अतिशय शास्त्रशुद्ध खेळणारा व अत्यंत अभ्यासू व मेहनती फलंदाज. इंग्लंडमधल्या केवळ एक-दोन कसोटींमुळे त्याच्या करिअरचंच पानिपत झालं !
केदार बाहेरच्या चार टेस्टच्या
केदार बाहेरच्या चार टेस्टच्या जोरावर तू कसले धाडसी निष्कर्ष काढतोयस भाऊ >>> चार? अरे असाम्या १४ म्हण. आणि लेट अलोन त्या अफ्रिके आणि न्युझिलंड मधील वन डे सिरिज.
माझा मुद्दा देशी वाघ बाहेर जाऊन खेळण्याचा आहे तसाच टेस्ट मध्ये धोणीच्या कॅप्टन्सीचा आहे.
त्यातील १४ मधी ५ आपण जिंकू शकलो असतो ते केवळ धोणीच्या कातडीबचावू धोरणामुळे ड्रॉ झाल्या आहेत. आणि मीच असे म्हणत नाही तर काल / आजचे टाईम्स पाहा, क्रिकइन्फोवरचे अनेक लेख पाहा. गागुंली पासून अमरनाथ पर्यंत धोणी बद्दल काहीतरी स्टेटमेंट करत आहेत. आणि हे सर्व डेजा हू आहे भाऊ, मागेही हे सर्व झालेच पण आपण शिकलो का?
क्त १०० केल म्हणजे काम झाले ह्यातून कधी बाहेर येणार ? >>> अरे मी हे स्टेटमेंट केलेच नाही. क्रिकेट हा टीम स्पोर्ट आहे. आणि सध्याचे प्लेअर गुणवत्ता असूनही बाहेर चांगले खेळू शकत नाहीत हा माझा मुद्दा आहे. आणि मुद्दा काढलाच आहेस तर १०० ला कमी का लेखायचे? प्रत्येकाने १०० टाका (निदान एका मॅच मध्ये) मॅच आपण आपोआप जिंकू !
कितीही मुद्दे काढा आणि कितीही बचावात्मक लिहा, आपली टीम बाहेर हारत आहे हे सत्य आहे. आणि मी त्यामुळेच सध्याच्या टीमला देशी वाघ म्हणतोय. मग तुम्ही मुद्दा पिचचा काढा, गवताचा काढा की कशाचाही. एकदा मॅच सुरू झाली की विजय (आणि पराभव असला तर तो बचेंगे तो और भी लढेंगे वाला ) मिळावा अशीच माफक अपेक्षा आहे.
अहो बाहेरचे जाऊ द्या ह्या टीम मधी ८० टक्के लोक न्युझिलंडने भारतात येऊन आपल्याला ठोकले तेंव्हाही होतेच.
नं १, नं २ का नको? हे म्हणजे परिक्षा घ्या पण आम्हाला गुण देऊ नका असं होतं.
टेस्ट्स मधे ज्या माइण्ड गेम्स खूप खेळल्या जातात, >>> राईट इट इज ऑल अबाऊट माईंड गेम्स इन टेस्ट. तुम्ही एखाद्या देशासाठी खेळता म्हणजे गुणवत्ता आहेच. पण माईंड गेम्स, प्रेशर कसे हँडल करू शकता ह्यावर महान फलंदाज सुनिल गावस्कार म्हणतो, " दॅट इज व्हॉट सेपरट मेन्स फ्रॉम बॉईज" !
सध्याचे खेळाडू -
जडेजा : बाहेर नेमका हा काय करतो? म्हणजे कश्यासाठी घेत आहात बाहेर? रणजी मध्ये दोनदा ३०० मारणार्याल्या केवळ उच्च खेळाडू म्हणले जाते आणि हा बाहेर आणि देशात टेस्ट मध्ये प्रत्येक बॉलला मारायलाच जातो. का?
शिवाय
अश्विन :
टेस्ट मध्ये बसवले. थँक गॉड! बिग क्वेश्च्न फॉर मी. नक्की का घेतलं जात? अजून ऑफी कमी आहेत का देशात? दुसर्याला संधी का मिळू नये. फक्त भारतात चालतो हा. परदेशात एखाद मॅच वगैरे, पण तितकेच.
मुरली :
कधी आउट होईल हे काही सांगता येत नाही. फार क्वचित चांगला खेळतो. पण जेंव्हा खेळतो तेंव्हा ती इनिंग अफलातून असते पण पुढे काय? देशात अनेक ओपनर्स आहे. रहाणेला ओपन करून केदार जाधवला मधल्या फळीत संधी द्यावी. केदार जाधव नावाचे टॅलेंट वाया जात आहे.
रोहित? माय गॉड. गुणवत्ता वगैरे असूनही नो अप्लिकेशन. प्रत्येक वेळी अतिशय घाणेरड्या रितीने बाद होतो. जणू काही १०थ मॅन बॅटिंग करतो आहे.
वरचे चौघेही देशात खेळावेत अश्या मताचा मी झालो आहे. ते इथे जबरदस्त खेळतात. आता टेस्ट, वन डे च्या वेगळ्या टीम्स सारखेच, भारतातील टेस्ट टीम वेगळी अन परदेशातील वेगळी असे प्रयोग भारताने करून पाहावेत. नाहीतरी हारत आहोतच
इंग्लंड साठी टीम मध्ये वरील लोकांचा करू नये.
इशांत शर्मा हा फक्त टेस्ट खेळाडूच असायला हवा. ते पण सध्याच्या बळावर त्याला संधी मिळेल. इंग्लंड दौर्यात नाही चांगला खेळला तर बसवावे. उमेश यादवल संधी मिळायला हवी.
अमित मिश्राला टीम मध्ये घेऊन फक्त १२थ मॅनचे काम देतात. त्याला संधी मिळावी.
सा अ ११/२. मिचेल १४९ ने
सा अ ११/२. मिचेल १४९ ने टाकतोय. क्लास !! तो आपला वरूण अॅरॉन पण बरेचदा १४५+ असतो पण लाईन अॅन्ड लेन्थ? असे दोन बॉलर्स आपल्याला हवेत.
केदार वरच्या दोन्ही पोस्टना
केदार वरच्या दोन्ही पोस्टना अनुमोदन
कितीही मुद्दे काढा आणि कितीही बचावात्मक लिहा, आपली टीम बाहेर हारत आहे हे सत्य आहे >> +१. नुसता हारत नाहिये कन्विंसिंगली हारत आहे. शिवाय काही हातातल्या मॅचेस घालवल्यात.
चार? अरे असाम्या १४ म्हण. आणि
चार? अरे असाम्या १४ म्हण. आणि लेट अलोन त्या अफ्रिके आणि न्युझिलंड मधील वन डे सिरिज. >> केदार मी वर स्पष्ट म्हटालय कि माझे मुद्दे हे फक्त टेस्ट्स च्या अनुषंगाने आहेत नि तिन वेगळ्या प्रकारचे क्रिकेट एकत्र करून त्यावर आधारित निष्कर्ष काढणे मला अचूक वाटत नाही. तुझे हरण्याबद्दलचे मुद्दे लिमिटेड क्रिकेट मधे बाहेर हरण्याबद्दल योग्य आहेत. टेस्ट्स बद्दल चुकीचे आहेत.
रहाणेला ओपन करून केदार जाधवला मधल्या फळीत संधी द्यावी. केदार जाधव नावाचे टॅलेंट वाया जात आहे. >> हे धेडगुजरी प्रकार प्रकारेक सेहवाग झाला म्हणून हि लॉटरी दर वेळि लागेल असे नाही. raahaNe is settled as wonderful middle order batsman.
अजून ऑफी कमी आहेत का देशात? > > अश्विन बद्दल मान्य आहे पण भज्जी वगळता अजून एक ऑफी सांग बरं. IPL auction list पाहात होतो नि कोणी सापडला नाही. एक बाबा अपराजिथ आहे पण तो पण पार्ट टाईम आहे.
धेडगुजरी प्रकार करण्याला
धेडगुजरी प्रकार करण्याला इनोव्हेटिव्ह म्हणतात ना राव. यु निड टू टेक चान्सेस. आणि नुसता सेहवाग नाही तर तेंडुलकर पण अश्याच तू म्हणतोस त्या धेडगुजरी प्रकारामुळे ओपनिंगला आला होता हा इतिहास आहे. क्रिएटिव्हिटी असायलाच हवी.
धोणी स्वतः नं ५ ला खेळायला यायला हवा. व्हॉट काईंडा ऑफ कॅप्टन इज ही? सगळे मुख्य लोकं बाद झाल्यावर ( तो चांगला बॅटसमन आहे हे स्टॅट सांगतेच) तो येतो. आणि प्रत्येक वेळी आय शुड हॅव स्टेड देअर टिल एन्ड वगैरे बोलायचे.
रहाणे - धवण, पुजारा, विराट, धोणी आणि मग रोहित आणि त्याचा लाडका जडेजा / अश्विन वगैरे अशी टेस्ट मध्ये लोक खेळायला यायला हवीत. आणि जर रहाणेला मिडल ऑर्डरलाच ठेवायचे तर विजयला डच्चू देऊन रोहित धवण ही जोडी (जी वनडेत मस्त आहे सध्या तरी) यायला हवी. रोहित आणि धोणी निड टू टेक ओनरशिप.
राहता राहिला तीन क्रिकेटचा मुद्दा मला नाही वाटत मी प्रत्येक वेळी तो आणतोय. मी स्पेस्किफिकली टेस्ट बद्दलच लिहिलं आहे आणि फक्त एकदा लेट अलोन वन डे सिरिज ( ती पण आपण ग्रेट वगैरे असून हारलोच सलग दोनदा) असे लिहिले.
माझा मुद्दा - प्रॉब्लेम टेस्ट किंवा वन डे नाही असामी, तर प्रॉब्लेम आहे आउटसाईड परफॉर्मन्स आणि मुख्यतः टेस्ट मधील जास्तच. फक्त जोडीला ते वाक्य वापरले.
ऑफ स्पिन - सध्याचा नं १ ऑफी तुम्ही बेंच वर ठेवता यातच सर्व नाही का आले? आणि तो सोडून दुसरी नावं स्पिन मध्ये सापडत नाहीत तर आपण पारंपारिक स्पिन वाले आहोत असे म्हणण्यात आता खरचं अर्थ उरला नाही असं वाटत आहे.
नावच घ्यायच असेल परवेझ रसूल हे एक आणखी नाव - तो बॅटसमन पण आहे. आणि प्रग्यान ओझा? समहौ तो धोणी फेवरेट मध्ये येत नाही.
रहाणे विषयी: जसं सेहवाग /
रहाणे विषयी: जसं सेहवाग / तेंडुलकर ला धेडगुजरी / innovative पद्धतीनं ओपनर बनवलं, तसच, रहाणे ला ओपनर चा मिडल ऑर्डर बॅट्समन बनवलय. त्याची देशांतर्गत स्पर्धांमधली ची बरीचशी कारकीर्द ओपनर म्हणून गेली आहे असं मला वाटतं.
<< तर आपण पारंपारिक स्पिन
<< तर आपण पारंपारिक स्पिन वाले आहोत असे म्हणण्यात आता खरचं अर्थ उरला नाही असं वाटत आहे. >> स्पीनर्सनी मैदान गाजवलं त्या त्या वेळीं त्यांच्या कप्तानाचा त्यांच्यावरील प्रचंड विश्वास हा त्यामागील आत्यंतिक महत्वाचा घटक होता, असं मला अगदीं वाडेकरच्या वेळेपासून जाणवत आलं आहे. धोनीचा खरा विश्वास फक्त सीमर्सवरच आहे व केवळ नाईलाज म्हणून स्पीनरच्या हातांत तो चेंडू देतो, असंही मला नेहमीं तीव्रतेने जाणवतं. कदाचित, फिरकी मागे पडण्याचं हें एक महत्वाचं कारण असूं शकेल.
धोनीचा खरा विश्वास फक्त
धोनीचा खरा विश्वास फक्त सीमर्सवरच आहे व केवळ नाईलाज म्हणून स्पीनरच्या हातांत तो चेंडू देतो, असंही मला नेहमीं तीव्रतेने जाणवतं. >> थोडा सहमत आहे पण हे फक्त जर टीम मध्ये प्रग्यान ओझा किंवा मिश्रा असेल तरच. पण जर जडेजा / अश्विन असेल तर उलट आहे. कालच्या टेस्ट मध्ये जडेजाने ५२ ओव्हर्स टाकल्या. त्यातील ३० तर आपला लिड होता तेंव्हाच्या होत्या. आणि बॉल अजिबात वळत बिळत नव्हता. केवळ वेळकाढू धोरण होते ते.
धेडगुजरी प्रकार करण्याला
धेडगुजरी प्रकार करण्याला इनोव्हेटिव्ह म्हणतात ना राव. यु निड टू टेक चान्सेस. आणि नुसता सेहवाग नाही तर तेंडुलकर पण अश्याच तू म्हणतोस त्या धेडगुजरी प्रकारामुळे ओपनिंगला आला होता हा इतिहास आहे. क्रिएटिव्हिटी असायलाच हवी. >> भाऊ पण सेहवाग ची खेळण्याची पद्धत बघ, तेंडूलकरची बघ नि राहाणे ची बघ. उद्या innovation हवे म्हणून अश्विन ला ओपन करायला सांगा म्हणशील ? अशा एका successful experiment मागे किती failed attempts आहेत ते आठव कि - लक्ष्मण, सदागोपालन रमेश, मोंगिया, विजय (मुरली नाहि दहिया) हि नावे आठवतात का ? सेहवाग गेली ४-५ वर्षे त्याला ओपन करायचे नाहि म्हणतोय. तेंडूलकर test मधे open करत नाही. राहाणे आयुष्यभर नं ३ वर रणजीमधे रन्स कुटत आला आहे. सरळ उचलून ओपनर करायचा ? का ? कशासाठी ? विजय नसेल चांगला वाटत (Though I think as far as tests are concerned he has shown precisely what is being asked from opener - to dampen opposition strike ballers. Though he has failed to turn them in bigger scores) तर प्रॉपर ओपनर शोधा.
माझा मुद्दा - प्रॉब्लेम टेस्ट किंवा वन डे नाही असामी, तर प्रॉब्लेम आहे आउटसाईड परफॉर्मन्स आणि मुख्यतः टेस्ट मधील जास्तच. >> हाच तर खरा वांधा आहे. तु चार बाहेरच्या टेस्ट्स वरून conclusions काढतोयस आणि त्यात batsmen did not fare that bad (barring Rohit) हे विसरतो आहेस. ODI बद्दल तुझे points valid आहेत.
नावच घ्यायच असेल परवेझ रसूल हे एक आणखी नाव - तो बॅटसमन पण आहे. आणि प्रग्यान ओझा? समहौ तो धोणी फेवरेट मध्ये येत नाही. >> ओझा ऑफ स्पिनर नाहि रे भाऊ. परवेझ रसूल ची domestic कामगिरी बघितली आहेस का ? अश्विन नि तो ह्यात बाहेर खेळण्यामागे फारसे डावे उजवे नाहिये. domestic tournaments मधे नाव घेण्याजोगा एक पण consistent offispinner नाहिये. त्यामूळे फारशी आशा लावून बसू नका.
मी जवळ जवळ प्रत्येक पोस्ट मधे म्हणतोय कि ह्यावेळच्या पराभवाचे मुख्य कारण धोनीचे विचित्र tactics आहेत. "धोनीचा खरा विश्वास फक्त सीमर्सवरच आहे व केवळ नाईलाज म्हणून स्पीनरच्या हातांत तो चेंडू देतो" >>+१ धोनी जाडेजा किंवा अश्विनलाही बाहेर wicket taking ballers म्हणून न वापरता धावा रोखण्याचे साधन म्हणूनच वापरतो.
धोनी गेला कोहली कर्णधार झाला
धोनी गेला
कोहली कर्णधार झाला
जाडेजा किंवा अश्विनलाही बाहेर
जाडेजा किंवा अश्विनलाही बाहेर wicket taking ballers म्हणून न वापरता धावा रोखण्याचे साधन म्हणूनच वापरतो. >>>. २० विकेट हव्या. धावा गेल्या तरी चालतात. खंदे बॅट्समन कश्यासाठी आहेत? एकदम एकापेक्षा एक लाईन अप आहे आपलं (पेपर वर) धोणीचा तो प्रॉब्लेम आहे. टेस्ट मध्ये हि डज नॉट गो फॉर किल.
डोन्ट नो तू ४ हारलेल्या का घेऊन बसत आहेस. त्या १० ड्रॉ झालेल्या पैकी आपण ५ की ६ जिंकू शकलो असतो. ऑपर्च्यूनिटी लॉस्ट नाही का ती?
अरे ते एशिया कप साठी आहे रे
अरे ते एशिया कप साठी आहे रे भाऊ. वन डे मालिका.
त्या १० ड्रॉ झालेल्या पैकी
त्या १० ड्रॉ झालेल्या पैकी आपण ५ की ६ जिंकू शकलो असतो. ऑपर्च्यूनिटी लॉस्ट नाही का ती? >> १० ड्रॉ कुठल्या म्हणतोयस तू ?
कोहली कर्णधार झाला >>अरे ते temparory आहे रे.
सगळ असच असते सुरूवातीला
सगळ असच असते सुरूवातीला
सगळ असच असते सुरूवातीला>>> हे
सगळ असच असते सुरूवातीला>>> हे नक्कीच ट्राय आउट आहे लाँग टर्म साठी. पण प्रत्यक्षात २०१५ च्या वर्ल्ड कप नंतर कर्णधार बदलतील असे वाटते. तोपर्यंत नाही.
हे नक्कीच ट्राय आउट आहे लाँग
हे नक्कीच ट्राय आउट आहे लाँग टर्म साठी. पण प्रत्यक्षात २०१५ च्या वर्ल्ड कप नंतर कर्णधार बदलतील असे वाटते. तोपर्यंत नाही. >> धोनी ने पण तो २०१५ पर्यंत interested आहे असे सांगितलय. कोहलीला पण जरा वेळ मिळेल तोवर नीट कल्पना यायला.
फारएण्ड, मागे एकदा धोनीनेच
फारएण्ड, मागे एकदा धोनीनेच सांगितलं होतं की २०१५ च्या वर्ल्ड कप पर्यंत तोच कर्णधार असणार आहे. (निवड समिती वगैरे अस्तित्वात आहे ती धोनी आणि श्रीनिवासन ने सांगितलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यापुरती)
असामी: रहाणे मुंबईचा ओपनरच होता. संदीप पाटील च्या सल्ल्यामुळे (की तो भारतासाठी मधल्या फळीत खेळणार आहे), त्याला मुंबईकडून तिसर्या क्रमांकावर खेळवायला सुरुवात केली.
रहाणे मुंबईचा ओपनरच होता.
रहाणे मुंबईचा ओपनरच होता. संदीप पाटील च्या सल्ल्यामुळे (की तो भारतासाठी मधल्या फळीत खेळणार आहे), त्याला मुंबईकडून तिसर्या क्रमांकावर खेळवायला सुरुवात केली. >> हो का ? मला कल्पना नव्हती ह्याची.
मी स्टॅटिस्टिक्स शोधत होतो,
मी स्टॅटिस्टिक्स शोधत होतो, पण देशांतर्गत सामन्यांची आकडेवारी ईतकी सहज उपलब्ध नाहीये. पण हे २ संदर्भ सापडले.
“I would prefer him to bat in the top three. He has been playing for Mumbai for the last few years and he started with opening the innings. I believe he is a genuine opening batsman because right from the start of his domestic cricket, right from his Under-15 days, he has played as opener." - Mumbai coach Sulakshan Kulkarni
“I think Rahane should bat higher up in the order. I have seen him opening the batting since his under-15 days and then in under 19 level. For Mumbai also he started as an opener and then was shifted to No. 3, but he has been batting in the top 3 in whatever cricket he has played so far and I think it will be difficult for him to bat at No.6,” - Former India batsman Lalchand Rajput
भाऊ, व्यंगचित्र झकास.
भाऊ, व्यंगचित्र झकास. धन्यवाद.
थोडक्यात बीसीसीआयच्या खेळाडूंनी परदेशात काय केले याची चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांची खरी मजा भारतातच.
जसे मी अनेक वर्षांपूर्वी कंपनीच्या "कामाला" बरेचदा युरोपला जाऊन आलो तसे. म्हणून अधून मधून "खेळायला" परदेशी जाऊन यायचे. तेव्हढीच त्यांना करमणूक.
हो का ? मला कल्पना नव्हती
हो का ? मला कल्पना नव्हती ह्याची. >> मागे मी दोन तीनदा लिहिले होते की तो ओपनर आहे म्हणून. तो ओपनर पेक्षाही वन डाऊन चांगला आहे पण पुजाराला हलवायला नको आणि कोहली ४ नं वर फिट आहे म्हणून त्याने ओपन करावे असे लिहिले.
१० ड्रॉ कुठल्या म्हणतोयस तू ? >>> मला वाटलं आपण परदेशी टेस्ट बद्दल बोलत आहोत इतका वेळ. एकुण सलग १४ टेस्ट झाल्यात ज्यात आपण एकतर हारलो, आणि ५ ते ६ वेळेस जिंकू शकत असतानाही त्या ड्रॉ झाल्या गेल्या १४ टेस्ट मध्ये (आउट) बलदंड भारत टीम फाफलतीये. त्यामुळे लोकं (आंतराष्ट्रीय खेळलेले) सध्या चिडलेले आहेत.
रैना पण असाच एकद झिंबॉब्वे मध्ये कॅप्टन झाला होता.
धोणीची इंजूरी "अचानक" निघाली आहे. त्याला बहुदा त्या ६ मार्चला येणार्या रिपोर्ट मुळे बसवले आहे. कारण त्याचे ही नाव फिक्स मध्ये असण्याची शक्यता आता लोकं वर्तवत आहेत. ( देव करो नी असे न होओ)
वल्डकप पर्यंत धोणीच वनडेचा कप्तान असावा. कोहलीला उगाच मध्ये आणू नये.
माझं देवाला साकडं -कप्तान
माझं देवाला साकडं -कप्तान झाल्याने कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम न होवो; पुजाराची साडेसाती आतां संपुष्टात येवो; धोनी फिक्सींगमधे अडकलेला नसो; कार्तिकने मिळालेल्या संधिचं सोनं करो; झहिरने निवृत्तिपूर्वी आपल्या कार्किर्दीवर कळस लागेल अशी कामगिरी करो; आपल्या पारंपारिक फिरकीचा दबदबा पुन्हा निर्माण होवो; हा नविन संघ जुन्यांचेच दाखले देण्याची कंटाळवाणी, अप्रिय वेळ आमच्यावर न आणो !
माझं देवाला साकडं -कप्तान
माझं देवाला साकडं -कप्तान झाल्याने कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम न होवो; पुजाराची साडेसाती आतां संपुष्टात येवो; धोनी फिक्सींगमधे अडकलेला नसो; कार्तिकने मिळालेल्या संधिचं सोनं करो; झहिरने निवृत्तिपूर्वी आपल्या कार्किर्दीवर कळस लागेल अशी कामगिरी करो; आपल्या पारंपारिक फिरकीचा दबदबा पुन्हा निर्माण होवो; हा नविन संघ जुन्यांचेच दाखले देण्याची कंटाळवाणी, अप्रिय वेळ आमच्यावर न आणो ! >>>>>>>>>>
भाउ.....इतके लिहिण्यापेक्षा............... "संघ .. भारतात / भारतीय उपखंडातच खेळावा" ............इतकेच लिहिले असते तरी चालले असते
<< भाउ.....इतके
<< भाउ.....इतके लिहिण्यापेक्षा..............>> उपरोध म्हणून हें ठीक आहे व मला आवडलंही. पण हा नविन संघ थोड्याफार बदलाने अभिमानास्पद कामगिरी करेल- इथे व बाहेरही - असा मला रास्त विश्वास आहे ! I know what I am saying and I mean it !
Pages