क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतिय संघ परदेशी विशेषतः जलद खेळपट्ट्यांवर बहुदा नेहमीच हारलेला आहे! त्यात वेगळे काही नाही!

पण ह्यावेळी खुपच वाईट हारतोय हे नक्की!

सध्या मी विलो वर अ‍ॅशेस बघतो. तसे कसोटी सामने बघणे बरेचदा रटाळ असते. पण मागच्या सामन्यात जो रूट खेळताना बघून खूष झालो. मिशेल जॉन्सन ची गोलंदाजी नि रूटचा बचाव. फारच छान.

झक्की, मस्त :). मिचेल (असाच उच्चार ऐकला आहे) जॉन्सन सध्या जबरी बोलिंग करत आहे. तसा तो गेली ६-७ वर्षे होता - मध्यंतरी बहुधा दुखापतीमुळे बाहेर होता. बोलर्स पहिल्या स्टिंट नंतर जेव्हा दुखापतीमुळे बाहेर जातात तेव्हा पुन्हा आले की पहिल्यासारखे राहात नाहीत. मात्र जॉन्सन च्या बाबतीत उलटेच झाले आहे. वेग, भेदकता सगळेच वाढले आहे.

परवा आफ्रिकेत स्टेन, मॉर्केल व अ‍ॅशेस मधे जॉन्सन - फास्ट बोलिंग पुन्हा बघायला मजा येत आहे. आपल्याकडे ती झहीर-इशांत च्या पीक टाइमला यायची.

द. अफ्रिकेला डि कॉक बरा भेटला.

मला वाटते आता धोणी नि शामी यांनी नावे बदलून डि धोणि नि डि शामी अशी करावीत. कदाचित फरक पडेल. बाकी इतरत्र आनंदच आहे. वाटल्यास एक डि कोह्ली पण असावा.

जॉन्सन ला IPL खेळण्याचा जबरदस्त फायदा झालेला आहे. तोच्नाही, SPD Smith, Shane Watson ह्यांना परत limelight मधे आणण्याचे श्रेय IPL ला जाते.

इंडीया मधे मज्जा आलेली त्याची >> +१. डि कॉक ला स्पिन काहीही झेपत नव्हता खरा. अगदी युवराज झालेला त्याचा.

१० बळी घेऊ शकणारे गोलंदाज जोपर्यंत भारत तयार करत नाही तोपर्यंत असेच चालायचे. सतत १४०+ चा तिखट मारा करू शकणारे जलद गोलंदाज, फलंदाजाच्या मनाचा ठेवा घेऊन त्याला फटका मारण्यास प्रवृत्त करणारी फिरकी यांचा तुटवडा जाणवतो आहे.

<<<१० बळी घेऊ शकणारे गोलंदाज जोपर्यंत ..........फिरकी यांचा तुटवडा जाणवतो आहे.>>>

याखेरीज आणखी कुठल्या प्रकारची गोलंदाजी असते? कदाचित मध्यम जलदगति नि स्विंग असलेली? ते तरी आहे का बी सी सी आय कडे?

आजचा दिवस मिश्र गेला. पहिल्या सत्रात असे नक्कीच वाटत होते की अजून एक दोन विकेट जातील. एकदम नाकाबंदी केली होती त्यांनी, पण पुजारा आणि कोहलीने क्लास बचाव केला आणि कोहलीचे प्रति आक्रमन तर जबरी. जय कोहली !

भेदक गोलंदाजी बघायला मजा येत होती हे खरे.

आजकाल क्रिकेट प्रेमी लोकांना किती पाहू नि किती नको असे झाले आहे. अ‍ॅशेस, द. अफ्रिका वि. बी सी सी आय.

त्यातून मला वेळ भरपूर व कळत जास्त नाही, त्यामुळे अधून मधून, जसे आज एकहि धाव न होता शर्मा नि झहीरने तीन अव्वल फलंदाज बाद केले, ते बघताना किंवा कोहलीचे फटके बघताना मजा येते. हळू हळू धावा जास्त यावर फलंदाजाचे श्रेष्ठत्व किंवा विकेट्स जास्त असण्यात गोलंदाचे श्रेष्ठत्व नसते, हे कळू लागले आहे. विशेषतः कोण फलंदाज चाचपडत खेळतो आहे नि कोण व्यवस्थित, जाणून उमजून फटके मारतो आहे हे कळते.

आता भाऊंची व्यंगचित्रे येऊ द्या.

आता मात्र माझी खात्री झाली. द. अफ्रिकेविरुद्ध जिंकायचे तर फक्त डि धोणी, डि शामी नि डू शर्माच पाहिजे.

एरवी फलंदाजी चांगली झाली, गोलंदाजीहि तशी वाईट नव्हती. म्हणजे आता फक्त नावेच बदलली पाहिजेत.

या ड्रॉ वरून अनेकांना भारताने एकदा इंग्लंड मधे केलेला चेस आठवेल.
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63240.html

४३८ चेस करताना एका वेळेस भारताचा स्कोअर ३६६/१ होता. नंतर पडझड झाली. गावसकर ने पहिल्या सेशन मधे रन्स वेगात केले नाहीत पण विकेट जाऊ दिली नाही. नंतर मात्र त्याने व वेंगसरकरने वेगात रन्स केले.

विस्डेन च्या रिपोर्टनुसारः
Vengsarkar joined Gavaskar in an accelerating stand which produced 153 at better than a run a minute. Gavaskar masterminded the show, doing all the thinking and playing most of the shots.

त्या १५३ मधे वेंगसरकरचे ५२ होते, म्हणजे गावसकर किती आक्रमक खेळला असेल त्याची कल्पना येते.

डि व्हि नि डू प्ले यांनी पराभवाच्या खोल खाईतून विजय खेचून वर काढला पण दुर्दैवाने तो काठावरच अडकला. फिलँडर ला सहज शक्य होते उरलेल्या धावा करणे, पण काय झाले कळलं नाही.

तो मॅच फिक्सिंगवाला क्रोन्ये का कोण तो अजून त्याचे धंदे करत आहे का?

मस्त झाली मॅच. टेस्ट क्रिकेट अ‍ॅट इट्स बेस्ट. द्रविड म्हणाला तसं असावं की त्यांना प्लेसिस आऊट झाल्यावर प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन ठरवायला वेळच मिळाला नाही. तसंही ताहीर वॉकिंग विकेट होती आणि मॉर्केल जायबंदी होता. त्यामुळे सा. अ. चा सेफ्टी फर्स्ट चा मंत्र अगदीच काही चुकिचा नव्हता. पण मस्त मॅच पहायला मिळाली.

"तो मॅच फिक्सिंगवाला क्रोन्ये का कोण तो अजून त्याचे धंदे करत आहे का?" - करत असल्यास कल्पना नाही. स्वर्ग / नरकातून हे प्रकार कसे मॅनेज केले जातात ह्याविषयी काही ठोस माहिती उपलब्ध नाहीये Happy

न्यू झीलंडच्या कोरी अ‍ॅण्डरसनने वन डे मधले शतकाचे रेकॉर्ड (सर्वात कमी चेंडूत) मोडले - जे आधी शाहिद आफ्रिदीच्या नावावर होते. क्रिकइन्फो वर हायडेफ हायलाईट्स आहेत. जरूर बघा. इनिंग फार सुंदर ई नाही पण पॉवरफुल क्लीन हिट्स आहेत. आयपीएल मधे येणार हा.
http://www.espncricinfo.com/

जेसी रायडर ने याच मॅच मधे मारलेले ४६ चेंडूतील शतक पूर्ण झाकोळले गेले!

१६ षटकार ! भन्नाट !!
जेसी रायडर हेंही एक अचाट रसायन आहे!!
तुफान गोलंदाजीचा तोफखाना असा पारंपारिक लौकीक असलेल्या वेस्ट ईंडीजच्या गोलंदाजीची अशीं सतत लक्तरं काढलीं गेलेलीं पहावत नाहींत !! Sad

इंग्लंडची ०-५ कडे वाटचाल दिसते. बॉयकॉट की ब्रेअर्लीचे प्रसिद्ध वाक्य कुक आज विसरलेला दिसतो. When you win the toss, half the time you bat first. The other times, you think, and then bat first Happy

पहिला दिवस मस्त होता. मिचेल जॉन्सनच्या प्रत्येक बॉलवर टाळ्या वाजतात. शेवटच्य ओव्हर मध्ये अँडरसनने धाव घेतली नाही कारण कुकला एक बॉल खेळावा लागेल म्हणून. ही अवस्था बोलकी आहे. Happy ते पण कुक फलंदाज असून !!

सद्या कुक चे काहीच शिजत नाही आहे....सगळे पदार्थ अर्धकच्चेच राहतात....म्हणुन बहुतेक त्याला दिला नसेल.. जे काही शिजवायचे ते दुसर्या दिवशी शिजव...... Biggrin

रणजी स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने मुंबईला धूळ चारली. विजय झोल आणि केदार जाधव यांनी मुंबईच्या गोलंदाजीची पिसे काढली. मुंबईनेही जिंकायचा प्रयत्न केला नाही. कप्तान बहुतेक झहीर होता.
त्याआधी त्यांच्या गोलंदाजांनी मुंबैकर फलंदाजांची पाठ जमिनीला लावली. Now Maharashtra better win the championship.

पण हे फक्त त्याबद्दल नाही. स्टार स्पोर्ट्सवर या सामन्याचे प्रक्षेपण होत होते. समालोचक होते : श्री. सु.म. गावस्कर आणि श्री रो.सु.गावस्कर. एक अंपायरही इम्पोर्टेड होता. रणजीचे प्रोफाइल उंचावले म्हणायचे का?

किवीज विरूद्ध पहिल्या मॅच मधे पराभव. मात्र विराट कोहलीने न्यू झीलंड मधे पहिल्यांदाच खेळताना, तसेच आधी वॉर्म अप, वातावरणाची, खेळपट्ट्यांची माहिती होणे (पूर्वी इंग्लिश, ऑसीज महिना महिना आधी जाउन बसत) अशी काहीही तयारी नसताना जबरदस्त बॅटिंग केलीय. पहिल्या पाच बॉल मधले दोन शॉटस पाहा. त्यातही दुसर्‍या शॉट मधे - पुल मारल्यावर बॉल चा आवाज काय खतरनाक आलाय.
http://www.youtube.com/watch?v=ljAAh-nlvSk

लोकसत्ताने मात्र मॅच न बघता लिहील्यासारखी बातमी दिलीय. म्हणे हुडहुडी. हायलाईट्स पाहताना कळते की टप्पा, बाउन्स ई ची माहिती होण्याआधीच आक्रमकपणे हुक्स ई मारायला गेल्यामुळे विकेट्स दिल्या आहेत. पूर्वीचे बॅट लावू की नको करत स्लिप मधे बॉल पोहोचवत त्यापेक्षा चांगले.

Pages