क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी वर्तमानपत्रांतलं क्रीडाजगत म्हणजे तसं लो-बजेटच वाटतं मला नेहमी. टाईम्स ऑफ इण्डियाचं कव्हरेज, अ‍ॅनालिसिस वाचायला मला खूप आवडतं.

कालच्या मॅचदरम्यान स्कोअरबरोबर WASP नावाचा एक पॅरामिटर दाखवत होते. तो पाहिला का? प्रथमच दाखवला ना? मला तरी याआधी पाहिल्याचा आठवत नव्हता.

कालच्या मॅचदरम्यान स्कोअरबरोबर WASP नावाचा एक पॅरामिटर दाखवत होते. >>
हो . मीही पहिल्यांदाच पाहिला
छान आहे तो . दुसर्या इनिंग मध्ये बॅटींग टीमच्या जिंकण्याची Probability दाखवतो तो .

महाराष्ट्राचा बंगाल वर रॉयल विजय.... उपांत्य फेरीत १० गडी राखून दणदणीत विजय... गोलंदाजांनी पहिल्या डावातच बंगालच्या फलंदाजीची वाट लावल्यावर फलंदाजांनी मस्त धाव संख्या उभारली.. आणि त्यामुळे बंगाल कायमच प्रेशर खाली खेळले..

महाराष्ट्राची फलंदाजी चांगलीच बहरात आहे यंदा... फायनलला पण अशीच चालली तर मस्त मज्जा येणार.

पाकिस्तान - श्रीलंका मॅच पण जबरी झाली..

पाकिस्ताननी शेवटच्या दिवशी ३०० पेक्षा जास्त धावा ५७ ओव्हर्स मध्ये काढल्या.. आणि मॅच जिंकली.. जबरी टेस्ट मॅच.. जवळपास वनडे सारखा खेळ करत मॅच जिंकली..

दुसर्या इनिंग मध्ये बॅटींग टीमच्या जिंकण्याची Probability दाखवतो तो . >

नाही केदार. तो दोन्ही इनिंग साठी आहे. Winning and score predictor आधीही स्कोअर प्रिडिक्टर होते तसेच. पहिल्या इनिंग मध्ये पण WASP 290, WASP 280 असे ओव्हर्स नंतर दिसत होते.

नाही केदार. तो दोन्ही इनिंग साठी आहे. Winning and score predictor आधीही स्कोअर प्रिडिक्टर होते तसेच. पहिल्या इनिंग मध्ये पण WASP 290, WASP 280 असे ओव्हर्स नंतर दिसत होते. >> पहिल्या इनिंगसाठी स्कोअर नि दुसर्‍या इनिंगसाठी टीमच्या जिंकण्याची Probability दाखवतो, तेंव्हाचा नि गेल्या ५ वर्षांचा डेटा वापरतो असे सांगत होते.

अमोल espn3 live दाखवतेय रे.

आधी असे वाटत होते की बीसीसीआय ल काही चांगले नवीन खेळाडू मिळाले आहेत, जसे रहाणे, धवन, जडेजा इ. पण पुनः कोहली नि धोणीवर भिस्त टाकून बाकीचे भरभर बाद होतात. कदाचित्, अजून नवखे नि पुनः परदेशी त्यामुळे असे होत असेल.
शामी मात्र छानच.

जडेजाच्या बॅटिंग बद्दल मला खूप शंका आहेत. तो ऑलराऊंडर म्हणून आला आहे पण गेले कित्येक वर्षे (अनेक हजारो मॅचेस - रणजी सोडता, आंतरराष्ट्रीय) मध्ये तो अजिबात काही करत नाही.

मला वाटत इशांत शर्माला ब्रेक द्यावा. तो नक्की टीम मध्ये का आहे ते कळत नाही. दुसर्‍याला संधी मिळायला हवी. इश्वर पांडे गेला आहे तर त्याला दोन मॅच मध्ये संधी लगेच द्यावी.

शामी इज शायनिंग ! खूप दिवसांनी भारताला एक चांगला बोलर मिळाला आहे. गो शामी !

खत्रा खेळले. हरले तरी हरकत नाही. धवन, कोहली जबरी. धोनी, रहाणे किंवा रोहित अजून थोडे टिकले असते तरी जिंकली असती. पण मजा आली. दुसर्‍या डावांमधे मॅच एवढी फिरेल व ३०० ने मागे असलेली टीम ऑल्मोस्ट मॅच जिंकण्याच्या स्टेज ला येइल असे कोणालाच वाटले नसेल. Glorious uncertainties! जडेजाची फिल्डिंगही जबरी, तसेच शामी, झहीर आणि इशांतची बोलिंग. कोरी अ‍ॅण्डरसनला महान काढला दुसर्‍या डावात.

१०० रन्स मधे यजमान ऑलआउट झाले तिथेच मॅच फिरली होती.. फॉलोऑन न देता वेगात रन्स काढुन भारतावर मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न चमत्कारीरित्या भंग पावले.. परंतु पहिल्या डावात आघाडी मोठी असल्यानेच ४०० च्या वर आघाडी मिळाली... रहाणे आणि धवन यांना ढापले नसते तर आता चित्र वेगळे दिसले असते

रहाणे - धवन - दुसर्‍या इनिंग मधे का पहिल्या - ढापले? अजून आपल्या विकेट्स सगळ्या बघितल्या नाहीत. रहाणे तर पहिल्या डावात कॅच आउट झालेला आठवतो.

दुसरी इनिंग मधे रहाणे ला ढापले... पायचित .. १ सेकंद देखील अंपायर ने वेळ लावला नाही... खर तर बॅटीला बॉल लागुन मग पॅड ला लागलेला.. हे रिप्ले मधे स्पष्ट दिसत होते तसा आवाज देखील आलेला ..

तरी थोडा विचार न करता इतक्या जलदगती ने निर्णय घेतला ...

दुसर्‍या डावात पाच जण यष्टीमागे झेल देऊन बाद झाले!
"मला वाटते २०-२० किंवा एकदिवशीय सामन्यांत खेळून प्रत्येक चेंडूला फटकावलेच पाहिजे ही वृत्ति बळावली आहे."

(असे सुनील गावस्कर म्हणाला. मला काय कळते?)

माझ्या भारतातल्या काही मित्रांच्या मते आजकाल आय पी एल सोडून बाकी कशात कुणा तरुण, नवीन भारतीय खेळाडूंना इंटरेस्टच नाही. पैशाचे प्रेम इतर सर्व प्रेमांवर मात करते. त्याला इलाज नाही आजकालच्या जगात.

भाई, एक झक्कपैकी विनोदी चित्र येऊ द्या!

आता बीसीसीआय चा संघ परदेशी नेहेमीच हरतो, त्यात काय रडायचे? त्यापेक्षा त्यालाच विनोदी करून हसावे.

आणि आय सी सी म्हणे काही देशांना प्रथम दर्जाचे नि इतरांना दुसर्‍या दर्जाचे असे करणार आहेत. अर्थात भारतात जास्त पैसे मिळतात म्हणून भारत नेहेमीच पहिल्या दर्जात असणार. क्रिकेट गेले खड्ड्यात!
Happy

क्रिकेट गेले खड्ड्यात!
क्रिकेट मंडळांना पैसा महत्वाचा
कोणते मंडळ किती फायदा कमावते ?

जबरी टेस्ट क्रिकेट सुरू आहे. अजिंक्य राहणे व धोनी ची भागीदारी अत्यंत योग्य वेळी झाली काल. किवीज च्या १९२ ला उत्तर देताना २२८/६ -जेव्हा कोहली आउट झाला. मॅच येथे पूर्ण ओपन होती. मात्र या दोघांनी पुढे ३४८ पर्यंत स्कोअर नेला आणि शेवटी राहणे ने (पहिले कसोटी) शतक मारून ४३८ पर्यंत नेण्यास मदत केली. तो ९ वा आउट झाला. जबरी खेळ. क्लासिक 'स्टीव वॉ' इनिंग! बर्‍याच वेळा लक्ष्मण ही असा खेळत असे.

तिकडे मिचेल जॉन्सन धमाल उडवतोय. आफ्रिकेविरूद्ध पहिल्या मॅच मधे १२ विकेट्स. त्यातील सात पहिल्या डावात उडवल्यावर दुसर्‍या डावात त्यांच्या पहिल्या ७ पैकी ५ यानेच काढल्या. त्याची बोलिंग बघायला जाम मजा येते. बर्‍याच दिवसांनी 'पेस' बघायला मिळतोय.

अजिंक्य रहाणे.. पुन्हा एक मराठी.. जबरदस्त परफाँर्मन्स.... अफलातुन कव्हर डराइव्हस.... कुल माईण्ड कीलर...

मिचेल जॉन्सन चा फॉर्म बघता MI ने मलिंगाला त्याच्या ऐवजी थेवून मोठी चूक केली असावी बहुधा.

भारतीय संघ त्याच्या वयाच्या मानाने जबरदस्त mature cricket खेळतोय, irrespective of result.

<<भारतीय संघ त्याच्या वयाच्या मानाने जबरदस्त mature cricket खेळतोय, irrespective of result.>> सहमत. प्रतिभा तर नि:संशय आहेच व द.आफ्रिका, न्यूझीलंड येथील अनुभव सुरवातीलाच मिळाल्याने हा संघ
शैलीदार खेळ व अभिमानास्पद कामगिरी करेल अशी खात्री वाटते. [ अर्थात, पैसा व यश डोक्यात जावूं नये, एवढीच प्रार्थना].

दौर्‍याचा शेवट गोड व्हायच्या मार्गावर आहे, बस्स एक विकेट काढा उद्या सकाळी..
बरेचसे क्रेडीट रहाणेच्या क्लास खेळीला जाते.. मागच्या सामन्यात देखील रहाणेला चुकीचे बाद दिले नसते तर आज २-० निकाल असता.. आणि एकदिवसीयमध्ये कितीही गंडले असलो तरी इथे कसोटीत मात्र मालिका जिंकणे न्यूझीलंडच्या तुलनेत आपण जास्त डिजर्व्ह करत होतो..

एकदिवसीयमध्ये आपल्याला तेथील बाऊन्सी खेळपट्ट्या आणि जवळ असलेली सीमारेषा यावर जसे स्मार्ट क्रिकेट खेळले पाहिजे त्याचा नसलेला अनुभव नडला, अन्यथा न्यूझीलंड हा काही फार काही तगडा संघ नव्हता. रॉस टेलर-विल्यिमसन-मॅकुलम या दोन-तीन फलंदाजांनीच निकालात फरक पाडलाय.

मिचेल जॉन्सन चा फॉर्म बघता MI ने मलिंगाला त्याच्या ऐवजी थेवून मोठी चूक केली असावी बहुधा.
>>>>>>
जॉन्सनला वगळण्याचा निर्णय गंडलाय मात्र खरेच, सध्याचाच फॉर्म नाही तर गेल्या वर्षभरातील त्याची कामगिरी पाहता. तो काहीतरीच बदललेला बॉलर वाटतो. आपली आणि ईंग्लंडचीच नाही तर आता आफ्रिकेची सुद्धा त्याने निव्वळ वेगावर तारांबळ उडवली. आयपीएलमध्ये जसा कलकत्यासाठी सुनिल नारायण तसे मुंबईसाठी ट्रंप कार्ड ठरला असता तो. किंबहुना गेल्या आयपीएलमध्येही त्यानेच मुंबईच्या गोलंदाजीचा भार उचललेला.

पण अंबानीताईंचा पैसा, आपण काय बोलणार त्यावर, त्या आणि केजरीवाल बघून घेतील काय ते Wink

<< मॅच हारायच्या मार्गावर..>> मॅच अटीतटीची होण्याची शक्यता अधिक; शेवटच्या डावात ३५० पर्यंत मजल मारणं भारताला अशक्य नसावं .

पण त्या आधी एक तर सगळे न्यू झीलंडचे लोक बाद झाले पाहिजेत किंवा त्यांनी डाव घोषित केला पाहिजे. बाद करायचे तर झेल घ्यावे लागतात! नाहीतर प्रार्थना करा की ते लवकर डाव घोषित करतील.
मग परत सलामीचे अतिरथी बीयर प्यायला लवकर परततील नि रहाणे सुद्धा. त्याचे काम झाले आहे. फार तर धोणी, जडेजा कसा बसा दिवस संपेपर्यंत वेळ काढतील किंवा अगदी शेवटी बाद होतील नि आपण म्हणू, वा, वा काय पण लढत दिली!

याची कस्सून चौकशी करायला पाहिजे की काय झाले चौथ्या दिवशी, किंवा तिसर्‍या दिवशीच्या रात्री. कदाचित आधीपासून विजय साजरा केल्या गेला?!

किंवा हेहि आहेच की मॅकलम, वाटलिंग, निशाम फार छान खेळले, क्रिकेट - गेम ऑफ अनसर्टंटी वगैरे.

कधीतरी परदेशात जिंकलेले बघू देत देवा, मी मरण्या आधी!

आता मला वाटते बांगला देश किंवा झिंब्वाब्वे ला जावे. थोडी संधि आहे तिथे जिंकायची.
Sad

टेस्ट मधे, विशेषतः परदेशात खेळताना, धोनी अतीव बचावात्मक कॅप्टन्सी करतो. सामना बघताना ते सतत जाणवतं.

Pages