Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण इथे प्रतिपक्षाच्या
पण इथे प्रतिपक्षाच्या खेळाडूंना बाद करायचे त्या ऐवजी खेळू द्यायचे यात काय बचावात्मक आहे?
काल एका कॉमेंटेटर ने सांगितले की त्यांना जरा पाच सहा चेंडू मारायला द्या नि मग ते मिसहिट करतील. त्याला म्हणतात विकेट विकत घेणे. तसे करणे आवश्यक आहे हे तो परत परत सांगत होता. निदान लंच नंतर तरी धोणी ला काहीतरी बदल करायला पाहिजे होते. असो.
धोनी कसोटीत कर्णधार म्हणून
धोनी कसोटीत कर्णधार म्हणून नेहमीच गंडतो. जो वेस्टईंडिज समोरही बचावात्मक धोरण अवलंबतो, अफ्रिकेत विजयाची संधी पराभवाच्या भितीने गमावतो, त्याने कर्णधार म्हणून काही डावपेच लढवावेत अशी अपेक्षाच मी हल्ली त्याच्याकडून ठेवत नाही. आश्विनला २०-२० मध्ये पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी देणार्या याच कर्णधाराने त्याला कसोटीत बरेचदा नकारात्मक गोलंदाजी करायला लाऊन त्याची वाट लावली असे खेदाने म्हणावे लागते. सध्या तर सिनिअर थिंकटँक सोबतीला नसल्याने आणखी बिकट परिस्थिती आहे.
उद्या आता तसेही जिंकायची शक्यता शून्यच, कारण न्यूझीलंड पहिला सामना जि़ंकलेली असल्याने ते भारताला विजयाची संधी शून्य करूनच डाव घोषित करणार. तरीही सामना अनिर्णित होण्यापेक्षा भारतीय संघ हरला तर जास्त बरे होईल. तसेही १-० ने हरलो आहोतच, तर २-० ने ते देखील असा सामना गमाऊन हरलो तर किमान विमान जमिनीवर तरी येईल, अन्यथा अनिर्णीत सामन्यातही इशांतने ७ विकेट काढल्या, रहाणेने शतक मारले वगैरे मोजत अल्पसंतुष्टपणात सुखी होतील.
कारण न्यूझीलंड पहिला सामना
कारण न्यूझीलंड पहिला सामना जि़ंकलेली असल्याने ते भारताला विजयाची संधी शून्य करूनच डाव घोषित करणार.>>> सहमत आहे. ते भारताला चॅलेंज देतील एवढे आक्रमक नाहीत. बर्याच वेळा ऑस्ट्रेलिया, आफ्रिकाही आधी स्वतःची पोझिशन सेफ करूनच मग डिक्लेअर करतात. तरीही यावेळेस खूप मागून पुढे आल्याने करतीलही सकाळी लौकर डिक्लेअर, सांगता येत नाही.
३५०+ ची भागीदारी, पहिल्या डावात एवढे पिछाडीवर असताना दुसर्या डावात मोठी आघाडी. आणि प्रमुख फलंदाजाचा स्कोअर २८१! पूर्वी कधीतरी पाहिल्यासारखे वाटत नाही का?
धोनी परदेशात खूप बचावात्मक डावपेच खेळतो हे खरे आहे. याचा अर्थ कोच व टीम मॅनेजर कडून त्याला पाहिजे तेवढा सपोर्ट मिळत नसावा. राहुल द्रविड ला काहीतरी सल्लागार किंवा तत्सम रूपात टीमबरोबर यापुढे पाठवले पाहिजे. कुंबळे व प्रसाद ने असे रोल मागच्या काही वर्षांत यशस्वी पणे केले आहेत.
३५०+ ची भागीदारी, पहिल्या
३५०+ ची भागीदारी, पहिल्या डावात एवढे पिछाडीवर असताना दुसर्या डावात मोठी आघाडी. आणि प्रमुख फलंदाजाचा स्कोअर २८१! पूर्वी कधीतरी पाहिल्यासारखे वाटत नाही का? >> २००१ चे aussies aaNi 2014 चे आपण ह्यात साम्य आहे असे सांगतोयस का ?
धोनी परदेशात खूप बचावात्मक डावपेच खेळतो >> +१
२८१! पूर्वी कधीतरी
२८१! पूर्वी कधीतरी पाहिल्यासारखे वाटत नाही का >>> अरे फारएंड ती गोलंदाजी आणि आपली गोलंदाजी ह्यात खूप फरक आहे. लोकं (तुच नाही) उगाच तुलना करत आहेत असे मला वाटते. क्वालिटी ऑफ बोलिंग मुद्दा लक्षात घ्यायला हवा.
पण तरीही ब्रॅन्डनच्या ३०० चे महत्व कमी होत नाही. ब्राव्हो ! फक्त तीन वेळेस त्याने चुक केली. दोनदा आपण कॅच सोडली आणि एकदा धोणीने सगळ्या स्लिप काढल्या होत्या आणि धोणीला पहिल्या स्लिप मध्ये जाऊन कॅच घेणे अवघड झाले. ऑस्सम इनिंग ! ब्रॅन्डन च्या डिटरमिनेशनची तुलना मात्र सचिनच्या इंग्लंडच्या इनिंग सोबत करता येण्याची शक्यता आहे. हॅटस ऑफ !
परदेशात वर्चस्व गाजवणारे पहिले पाच आता नाहीत. सेहवाग, गंभिर, द्रविड, सचिन आणि लक्ष्मण. त्यामुळे आपण सतत हारत आहोत. दे निड टू अॅक्नॉलेज द फॅक्ट. गंभिर = विजय ही तुलनाच होऊ शकत नाही. (विजय चांगला असला तरी) आणि मग टर्बनेटर असायचा गोलंदाजीत.
धोणी टेस्ट मॅच कप्तान म्हणून मला कधीच आवडला नाही. एक किपर/ बॅटसमन म्हणून तो श्रेष्टच आहे.
अरे मी तुलना करत नाहीये. तो
अरे मी तुलना करत नाहीये. तो स्कोअर बघून त्यावेळचे चित्र आठवले का एवढेच विचारले
हो अर्थातच आठवली. ही मॅच
हो अर्थातच आठवली. ही मॅच त्यांच्या ऑलटाईम बेस्ट मध्ये असणार.
मॅच अनिर्णित अपेक्षेप्रमाणे.
मॅच अनिर्णित अपेक्षेप्रमाणे. किवीज नी भारताला रन्स करण्याएवढा व स्वतःला विकेट्स काढण्याएवढा वेळ ठेवलाच नाही. कोहली चांगला खेळला दुसर्या डावात.
"धोणी टेस्ट मॅच कप्तान म्हणून
"धोणी टेस्ट मॅच कप्तान म्हणून मला कधीच आवडला नाही." - सहमत
"एक किपर/ बॅटसमन म्हणून तो श्रेष्टच आहे." - अंशतः सहमत. विकेटकीपर / बॅट्समन म्हणून मर्यादित षटकांच्या सामन्यात (५० / २०) तो चांगला आहे. पण टेस्ट मधे त्याच्या तांत्रिक उणिवा (किपींग आणि बॅटींग) नेहेमीच जाणवतात. विशेषतः जर उपखंडाबाहेर खेळत असलो तर अधिकच.
कालच्या मॅच मधून अजून एक वादाचा मुद्दा आलाय. should a batsman walk (संदर्भः विराट कोहली). दोन्ही बाजूंनी मतं आहेत ह्या विषयावर.
परदेशात वर्चस्व गाजवणारे
परदेशात वर्चस्व गाजवणारे पहिले पाच आता नाहीत. सेहवाग, गंभिर, द्रविड, सचिन आणि लक्ष्मण. त्यामुळे आपण सतत हारत आहोत. दे निड टू अॅक्नॉलेज द फॅक्ट >> काय fact acknolwedge करायचे केदार ? हेच पाच असतानाच Eng नि Aus 4-0 हरलोय रे. ह्याउलट नवशिक्या खेळाडूंनी दोन्ही बाहेरच्या दौर्यांमधे चांगलाच खेळ केलाय. थोडि चांगली consistent balling असती तर results वेगळे असते. दोषच द्यायचाय तर धोनीच्या विचित्र tactics नि inconsistent balling चा आहे म्हणता येईल. हे चित्र पुढेही असेच राहील असे वाटतेय. चांगली बॅटींग नि ढिसाळ बॉलिंग. अगदी u-19 पर्यंत शमी सोबत उभा राहिल असा बॉलर दिसत नाहि
किवीज नी भारताला रन्स करण्याएवढा व स्वतःला विकेट्स काढण्याएवढा वेळ ठेवलाच नाही. >> That was actually surprising considering Kiwis opted for green top to exploit deficiencies in indian batting line. It seems that for all the talk of being aggressive and all, McCullam could not resist achieving personal milestones and could not overcome memories of fourth inning Indian chase from first match.
हेच पाच असतानाच Eng नि Aus
हेच पाच असतानाच Eng नि Aus 4-0 हरलोय रे.>> थोडा फरक आहे असामी. हे ४-० प्रातिनिधीक नक्कीच नव्हते. त्याआधी दहा वर्षे जो पॅटर्न होता त्यात एक हरली की पुढची खुन्नस मधे जिंकत.
सिरीज फारशा जिंकल्या नाहीत. पण खुन्नस मुळे मजा यायची. या टीम मधे पण ती आहे. कॉन्फिडन्स त्या आधीच्या टीम पेक्षाही जास्त आहे. पण समहाउ निकालांमधे ते अजून दिसत नाही. पण पहिल्या एक दोन बाहेरच्या सिरीज आहेत या सर्वांच्या. हळुहळू फरक पडेल. त्या बिग-५ च्या टीम ला आधीच्या बॅगेज मधून बाहेर पडत आत्मविश्वास यायला वेळ लागला. यांना तो प्रॉब्लेम नाही. मला होप्स आहेत.
थोडा फरक आहे असामी. हे ४-०
थोडा फरक आहे असामी. हे ४-० प्रातिनिधीक नक्कीच नव्हते. >> माझी पोस्ट केदारच्या "परदेशात वर्चस्व गाजवणारे पहिले पाच आता नाहीत. सेहवाग, गंभिर, द्रविड, सचिन आणि लक्ष्मण. त्यामुळे आपण सतत हारत आहोत" ह्या वाक्याच्या संदर्भात वाच रे. बिग-५ च्या टीम पेक्षा खाली नक्कीच नाहिये ह्यांचा performance हे सांगत होतो.
बिग-५ च्या टीम पेक्षा खाली
बिग-५ च्या टीम पेक्षा खाली नक्कीच नाहिये ह्यांचा performance हे सांगत होतो.>>> खाली कसा नाही - अजून तरी आहे खाली (परदेशात). पण पुढे सुधारेल असे मला तरी वाटते. कारण यांची सुरूवात मुळात बरीच पुढून झाली आहे आणि कौशल्य ही आहे.
खाली कसा नाही - अजून तरी आहे
खाली कसा नाही - अजून तरी आहे खाली (परदेशात). >>
http://stats.espncricinfo.com/ci/engine/stats/index.html?class=1;home_or....
आफ्रिकेच्या तीन सिरिजमधे एक draw series, Australia तीन सिरिजमधे एक draw series, New Zealand दोन सिरिजमधे एक जिंकलेली series नि एक हरलेली, England बरोबर १-१-१. ह्याउलट नव्या टिमचे दोन दौरे दोन्ही series 1-0 हरले आहेत. "परदेशात वर्चस्व गाजवणारे पहिले पाच आता नाहीत. सेहवाग, गंभिर, द्रविड, सचिन आणि लक्ष्मण. त्यामुळे आपण सतत हारत आहोत" ह्या वाक्याचा अर्थ काय होतोय कि big five नी वर्चस्व गाजवल्यामूळे आपण बाहेर जिंकत आलो आहोत नि नवे batsman तसे करत नाहियेत. मी एव्हढेच म्हणतोय कि जरी दोन्ही सिरीज हरलो असलो तरी नव्या बॅटस्मनचा खेळ कुठेही big five पेक्षा कमी पडलेला नाहिये. (अर्थात दोन सिरिज हा पुरेसा data नाही नि त्यानी big five सारखी consistency दाखवली तरच त्यात अर्थ आहे हे मान्य). हरण्याची कारणे धोनीच्या विचित्र tactics नि inconsistent balling ही आहेत.(जसे Big Five एखादे session/inning खराब खेळत असत तसेच नव्या bastmen चेहि झाले आहे नि त्यात काहि आश्चर्याचा भाग नाही पण त्यामूळे आपण हरलो असे म्हणणे खूपच धाडसाचे होईल).
तू बॅगेजचे म्हणतोयस तर नव्या टिमला Big Five चा performance चे baggage घेऊनच खेळावे लागलेय हेहि लक्षात घे.
I am not saying new batsmen are perfect and better than Big Five. They have their own flaws and they have to show they can be consistent over longer series and over longer periods, but at least they do not carry blame for squandering these 2 series.
आफ्रिकेच्या तीन सिरिजमधे एक
आफ्रिकेच्या तीन सिरिजमधे एक draw series, Australia तीन सिरिजमधे एक draw series, New Zealand दोन सिरिजमधे एक जिंकलेली series नि एक हरलेली, England बरोबर १-१-१. ह्याउलट नव्या टिमचे दोन दौरे दोन्ही series 1-0 हरले आहेत.>>> मग यातच आले ना? मी फक्त आधीच्या पेक्षा आत्तापर्यंत परफॉर्मन्स खाली आहे एवढाच मुद्दा लिहीला. तू केदारच्या मुद्द्याचा प्रतिवाद करतोयस त्याबद्दल नाही. त्यातही तू सिरीज लेव्हलला न बघता मॅच लेव्हल ला बघितलेस तर आणखी ठळकपणे दिसेल.
आणि मी फक्त "अजून तरी कमी आहे" एवढेच म्हणतोय. ही टीम चांगलीच आहे आणि पुढे सुधारेल हे नक्कीच.
याव्यतिरिक्त एक स्वतंत्र आर्ग्युमेण्टः बिग-५ नी (त्यात मी गंभीर च्या ऐवजी दादा धरतो नेह्मी. गंभीरचा काही दोष नाही पण तो २-३ वर्षेच चमकला आहे अजूनतरी) जी पॅशन निर्माण केली लोकांच्यात तशी यांना करायला किती वेळ लागेल माहीत नाही. त्यातल्या त्यात कोहलीचा खेळ आहे. रिचर्ड्सचा जसा माज दिसायचा तसा याच्या खेळात, बॉडी लँग्वेज मधे दिसतो. दोघांनाही स्ट्रॉन्ग टीम चा सपोर्ट होता/आहे (सध्या तुलना एवढीच
). पण अजूनही अमुक खेळतो आहे तर कामधंदे सोडून मॅचसमोर बसल्याचे आठवत नाही.
पण अजूनही अमुक खेळतो आहे तर
पण अजूनही अमुक खेळतो आहे तर कामधंदे सोडून मॅचसमोर बसल्याचे आठवत नाही. >> तेंडूलकर (who was once in generation cricketer anyways) वगळता एखाद्या खेळाडू साठी कामधंदे सोडून मॅचससाठीबसणारे कमीच आहेत. जे क्रिकेटचे वेडे आहेत ते अजूनही बसतात नि ह्यांच्याआधीहि बसत होतेच कि. ह्या मुद्द्याला अगदीच अर्थ नाही.
त्यातही तू सिरीज लेव्हलला न बघता मॅच लेव्हल ला बघितलेस तर आणखी ठळकपणे दिसेल. >> खरच अमोल ? मॅच लेव्हल ल बघितले तर कुठल्या angle ने ह्यांचा खेळ कमी वाटला रे नक्की ? They almost pulled out heist in Auckland, They handled green top thrown at them with aplomb in second test. They scored 400 runs against RSA in first test while succeeded standing up to Steyn. Take out Rohit Sharma's dismissal on first ball and check how many dismissals were fishing outside off-stump for the ball that is swinging away while feet rooted in the crease ? A glance at their collective experience playing outside India and see how many times this has happened before ?
अर्थात हे सर्व फक्त टेस्ट मॅचच्या संदर्भात आहे. जर ODI पण धरायच्या असतील तर केदारचा मुद्दा १००% मान्य आहे.
दोघांनाही स्ट्रॉन्ग टीम चा सपोर्ट होता/आहे >> हे दोघे कोण नक्की ? कोहली नि रिचर्ड्स नि दादा नि रिचर्ड्स ?
कदाचित तू म्हणतोस त्यात तथ्य
कदाचित तू म्हणतोस त्यात तथ्य आहे. मे बी जेव्हा हे चांगले खेळले तेव्हा बोलर्स नी विकेट्स काढल्या नाहीत. मला दिसते आहे ते दोन्ही दौर्यात एकही टेस्ट मॅच जिंकलेली नाही. वैयक्तिकरीत्या कधी धवन, कधी कोहली चांगले खेळलेत. पण बिग-५ च्या बाबतीतही सुरूवातीला तसेच व्हायचे. नंतर (२००१ नंतर) कुंबळे, झहीर, इशांत विकेट्स काढू लागले तेव्हाच आपण जिंकू लागलो.
हे दोघे कोण नक्की ?>>> कोहली नि रिचर्ड्स
टीम बिल्डिंग मुद्दा - आताची
टीम बिल्डिंग मुद्दा -
आताची टीम चांगली आहे (देशात) ह्यात वादच नाही, एक कोहली, पुजारा सारखे लोकं सोडले तर परदेशात कोण खेळतंय? हा प्रश्न आहे. त्यातही पुजारा फेल गेला. रोहित तर टेस्ट मॅच मध्ये चाचपडत खेळत होता. ( सर्व अवे मॅचेस). शिखरला एक पाटा मिळाली की त्याने १०० टाकले. पण शिखर नक्कीच दोन इनिंग चांगला खेळला (इतरांच्या मानाने).
टीम बिल्डिंग मध्ये आहोत हे किती दिवस म्हणवून घेणार? ही लोकं IPL मध्ये अनेक वर्षापासून खेळत आहे, त्यांना लोकांची बॉलिकरतकशी पडते ते त्याचा अनुभव आहे, हजारो वनडे खेळली आहेत. ( रोहित तर ऑलमोस्ट प्रत्येक देशात वन डे खेळला आहे) गरज आहे ती अप्लिकेशनची. आणि अप्लिकेशन टीम लेवलला होत नसते तर वैयक्तीक लेव्हलला होते. जसे शिखर ने ९८ करताना पहिले २० रन ६० बॉल मध्ये काढले पण नंतर धुतला. किती लोकं (धोणी सहित) हे परदेशी (फक्त आणि फक्त परदेशी ) टेस्ट मध्ये करताना दिसत आहेत?
हेच लोकं देशात खेळूदेत एकदम ४-० ते पण ऑस्ट्रेलिया सोबत. मग कोणीच कसे म्हणत नाही की अरे ही तर टीम अजून बिल्ड प्रोसेस मध्ये आहे. !!
सध्याची आपली टीम ( काही अपवाद वगळता) देशी वाघ आहेत हे जो पर्यंत सिलेक्टर्स मान्य करत नाहीत तो पर्यंत सगळी गंमतच.
(त्यात मी गंभीर च्या ऐवजी दादा धरतो नेह्मी >> अरे बीग फाईव्ह असे मी नाही म्हणालो ते तुम्ही इंटरप्रिट करत आहात. दादा २००८ मध्ये रिटायर झालाय. आणि त्याचे स्थान गंभीर कसा घेईल? मी २०११ च्या आसपासची टीम म्हणतोय ज्यात खुन्नसनी पुढची मॅच लढवायचे. जे तू लिहिलेस ऑलरेडी.
असो देशी वाघ आता एशिया कप मध्ये परत नं १ ला येतील आणि जणू काही हा प्रॉब्लेम (परदेशी खेळण्याचा) आपल्याला नाहीच अशी समजूत काढून आपण परत पुढच्या (आणि महत्वाच्या वल्डकपच्या) दौर्याकडे नजर ठेवू.
आपण इथे पाटा विकेट बनवायच्या
आपण इथे पाटा विकेट बनवायच्या व खेळाडू परदेशातल्या विकेटसवर निष्प्रभ ठरतात म्हणून टाहो फोडायचा, हें कितपत योग्य आहे ? मर्यादित षटकांच्या सामन्यांची प्रचंड भुरळ पाडायची व नविन कसोटीवीर कां तयार होत नाहीत याचं उत्तर कां शोधत बसायचं ? फिरकी हें आपलं परंपरागत बलस्थान असूनही, फिरकीवर अविश्वास दाखवून वेगवान गोलंदाज तयार होत नाहीत याचीच खंत करत कां बसायचं ? मला तरी या सर्वाचं एकच उत्तर दिसतं - परदेशांत आपण हरलों तर त्याचं फार वाईट वाटून घेऊं नये व इथं आपण जिंकलो तर त्याने फार भुरकटून जावूं नये !
केदार बाहेरच्या चार
केदार बाहेरच्या चार टेस्टच्या जोरावर तू कसले धाडसी निष्कर्ष काढतोयस भाऊ ? आणि रोहित वगळता उरलेल्या प्रत्येकाने नीट contribute केलय. फक्त १०० केल म्हणजे काम झाले ह्यातून कधी बाहेर येणार ? अगदी मार्टीन क्रो सारखा खडूस माणूससुद्धा खुल्या दिलाने त्यांचे कौतुक करतोय नि 'This batting order is going to haunt the world for next 10 years, alas they able to find some able bodied bowlers' म्हणतोय. IPL, ODI, test are completely different beasts. Do not bundle them together and pass judgement. Big five सुद्धा अगदी सुरूवातीला एकत्र आल्यावर असेच चाचपडले होते कि. There is building involved in team building.
सध्याची आपली टीम ( काही अपवाद वगळता) देशी वाघ आहेत हे जो पर्यंत सिलेक्टर्स मान्य करत नाहीत तो पर्यंत सगळी गंमतच.>> ह्या लॉजिकला काहि अर्थ आहे का रे ? शेकडा पन्नास टक्के मॅचेस ते ज्या देशात खेळतोअस तिथे चांगले खेळले म्हणून ते useless ठरतात ? पाटा विकेट्स असल्या तर सगळेच खेळले पाहिजेत ना ? विशेषतः परदेशातल्या live pitches वर शेकड्याने धावा काढणारे तर इथे कधी बाद सुद्धा होता कामा नयेत नि India ought to lose each series without single draw or victory. असे का होत नाहि मग नक्कि ?
हेच लोकं देशात खेळूदेत एकदम ४-० ते पण ऑस्ट्रेलिया सोबत. मग कोणीच कसे म्हणत नाही की अरे ही तर टीम अजून बिल्ड प्रोसेस मध्ये आहे. !! >> ते ज्या देशात वाढले नि क्रिकेट खेळायला शिकले तिकडे त्यांनी सरस खेळने अपेक्षित आहे. ह्याउलट बाहेर जिथे ते फारसे खेळले नाहियेत तिथे जाऊन जिगरबाज खेळले ह्यात ती टीम बिल्ड प्रोसेस आहे.
आपण इथे पाटा विकेट बनवायच्या व खेळाडू परदेशातल्या विकेटसवर निष्प्रभ ठरतात म्हणून टाहो फोडायचा, हें कितपत योग्य आहे ? मर्यादित षटकांच्या सामन्यांची प्रचंड भुरळ पाडायची व नविन कसोटीवीर कां तयार होत नाहीत याचं उत्तर कां शोधत बसायचं ? >> +1
Biggest flaw this and even team before it, had is lack of ability to closeout he matches. कितीही केस उपटले तरी आपल्याला ते का करता येत नाही हे कळत नाही.
आपण इथे पाटा विकेट बनवायच्या
आपण इथे पाटा विकेट बनवायच्या व खेळाडू परदेशातल्या विकेटसवर निष्प्रभ ठरतात म्हणून टाहो फोडायचा,
पूर्वी भारताजवळ तंत्रज्ञान, पैसे सर्व कमी पडत होते, पण खेळावर प्रेम होते. आता तंत्रज्ञान नि पैसे असले तरी का करत नाहीत, असेहि विचारले होते.
पण उत्तर मिळाले नाही. म्हणून मग माझे मत असे झाले की खेळ गेला खड्ड्यात. काही केले तरी पैसे मिळतातच ना, मग कशाला उपद्व्याप? अशीच वृत्ति दिसते.
या धाग्यवर अर्थातच ज्यांचे खेळावर प्रेम आहे तेच लोक येतात, त्यातले राजकारण, अर्थकारण हे समजत असले तरी यात कुणाला फारसे स्वारस्य नाही.
हा प्रश्न बीसीसी आय ला विचारला पाहिजे. तेंडूलकरला काय ते बक्षीस दिले सरकारने, मग त्याच सरकारने बी सी सी आय ला हा प्रश्न का विचारू नये?
आता तेंडूलकर पण सरकारात आला आहे, त्याला विचारावे.
तोपर्यंत एक झक्क व्यंगचित्र येऊ द्या भाऊ.
<< आता तंत्रज्ञान नि पैसे
<< आता तंत्रज्ञान नि पैसे असले तरी का करत नाहीत, असेहि विचारले होते.>> अहो, झक्कीजी, बीसीसीआयचं काय घेवून बसलाय, इथले क्रिकेटचे महाज्ञानी लोकही म्हणतात कीं प्रत्येक देशच आपल्याला सोईच्या अशाच विकेट बनवतो मग आपणच तशा कां बनवूं नये ? ज्या कालखंडात अधिकाधिक सामने उपखंडात खेळूं, निदान त्या कालखंडात तरी जागतिक क्रमवारीत क्र.१वर येण्याची संधि अधिक !!! कायमचा क्र. १ हवाच आहे कशाला ? अर्थात, आमच्यासारखे वेडेही बरेच आहेत ज्याना आपल्या खेळाडूनी इतर देशात जावूनही मर्दुमकी गाजवली तर अधिकच आनंद होईल !
कीं प्रत्येक देशच आपल्याला
कीं प्रत्येक देशच आपल्याला सोईच्या अशाच विकेट बनवतो मग आपणच तशा कां बनवूं नये ?
हेहि बरोबर!!! तेहि बरोबर!! सगळ्यांना पैसे मिळतात तर आपणच का उगाच तक्रारी करायच्या? अक्कल असेल तर त्यातून आपलाहि काही धनलाभ झाला तर बघावे.
आहे का काही कल्पना, आपल्याला त्यातून कसे पैसे मिळतील याची?
प्रत्येक देशच आपल्याला
प्रत्येक देशच आपल्याला सोईच्या अशाच विकेट बनवतो मग आपणच तशा कां बनवूं नये >> भाऊ असे का करू नये ह्याचे उत्तर काय आहे ? क्रिकेटच्या तमाम इतिहासात अंशतः Bradman, Lyod, Steve Waugh ह्यांच्या टिम वगळता कुठल्याही देशात कुठल्याही पिचवर त्या देशाला धोपटणारे किती संघ होउन गेले ? त्यातही Bradman चा संघ उपखंडात खेळला नाही, वेस्ट इंडीजचा संघ किवीजविरुद्ध new zealand मधे जिंकायला झगडलाय, नि वॉ भारतात भारताविरुद्ध. सर्वत्र वेगळे पिचेस आहेत नि प्रत्येक संघाची वेगवेगळी बलस्थाने आहेत ह्यात खरी मजा नि चुरस नाहि का ?
<< सर्वत्र वेगळे पिचेस आहेत
<< सर्वत्र वेगळे पिचेस आहेत नि प्रत्येक संघाची वेगवेगळी बलस्थाने आहेत ह्यात खरी मजा नि चुरस नाहि का ? >> आहे ना ! पण ' आम्ही तुमच्याकडे येतो तुम्ही आम्हाला मारा , मग तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मारतो' , यांत काय मजा आहे तें नाही कळलं !!!
झक्कीजी, केवळ आपली फर्माईश म्हणून प्रयत्न केलाय -

पण ' आम्ही तुमच्याकडे येतो
पण ' आम्ही तुमच्याकडे येतो तुम्ही आम्हाला मारा , मग तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मारतो' , यांत काय मजा आहे तें नाही कळलं !!! >> खरच भाऊ एव्हढे black and white आहे का हे ? पूर्वी साधारण ९० च्या आधी फिरकीला धार्जिण्या खेळपट्ट्या बनवूनही आपण भारतात बर्यापैकी नि बाहेर (७१,७७ वगैरे चे उरळक अपवाद वगळता) हरत होतो. नंतर कुंबळे आल्यावर कमीत कमी भारतात तरी आपल्याला हरवणे कठीण होउन बसले होते. २००० नंतर कुंबळे चा तो हुकुमी एक्का थोडा कमी झाल्यावर आपण काहि टेस्ट्स भारतात पण हरलो. पण त्याच वेळी काहि pacers च्या spiked कामगिरीमूळे बाहेर आधीपेक्षा जास्त जिंकलो किंवा कमीत कमी draw करून आलो. शेवटच्या Aus नि England series वगळता ' आम्ही तुमच्याकडे येतो तुम्ही आम्हाला मारा , मग तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मारतो' हे नक्की कधी झाले ? ashes मधल्या गेल्या २० वर्षांमधल्या lop sided निकालांबद्दल तुमचे काय मत आहे ? इथल्या पाटा विकेट्स असल्या तर सगळेच खेळले पाहिजेत ना ? विशेषतः परदेशातल्या live pitches वर शेकड्याने धावा काढणारे तर इथे कधी बाद सुद्धा होता कामा नयेत नि India ought to lose each series without single draw or victory. असे का होत नाहि मग नक्कि ? Play to your strength असे तुम्हीच वर म्हणालात ना ? मग फिरकी तुमची strength असेल तर बाहेर जाऊन फिरकीला साहाय्य न करणार्या पिचेस वर जाऊन क्र.१ कसा घ्यायचा ?
तुमचा idealstic approarch खरच practical आहे का ? तुम्ही म्हणता तशा green pitches बनवल्या नि भारतातले सामने हरलो तर 'ओह काय चुरशीचा सामना झाला, cricket won though India lost' एव्हढे औदार्य दाखवणारे रसिक आहेत आपल्याकडे ? It's just the game हे ज्या दिवशी डोक्यात बसेल त्या दिवशी तुम्ही म्हणता सर्वत्र क्र. १ होण्याची स्वप्ने पाहूया.
To be honest there is nothing bogus than No 1 rank. There yet has to be a team which had managed to win everywhere against all oppositions in all conditions. As long as at the end of the day you can relax and say 'wow what a game it was' who cares about the rank ?
आज येथे येऊन भाषण दिल्याबद्दल
आज येथे येऊन भाषण दिल्याबद्दल श्रीयुत असामी ह्यांचे मनःपूर्वक आभार!
<< फिरकीला धार्जिण्या
<< फिरकीला धार्जिण्या खेळपट्ट्या बनवूनही आपण भारतात बर्यापैकी नि बाहेर (७१,७७ वगैरे चे उरळक अपवाद वगळता) हरत होतो. >> असामीजी, पूर्वीं जिंकण्याची अपेक्षाही फारशी उत्कट नसेच व एखादी व्यक्तिगत कामगिरी चांगली झाली तर त्यावर आनंद मानायची प्रेक्षकांची तयारी असे. पण वाडेकरपासून सांघिक कामगिरीची दखल घेणं व जिंकण्याची ईर्षा निर्माण झाली. आतां तर जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या संघाबद्दलच्या अपेक्षाना वेगळे निकष व अपेक्षाभंगाना वेगळी धार लागणारच ना ? मला एवढंच म्हणायचं होतं की १] घरच्या खेळपट्ट्यांचा कोणत्याही संघाला कांहीसा फायदा होणं स्वाभाविक असलं तरी तो लाभ निर्णायक ठरण्याइतपत नसावा व २] घरच्या संघाला मिळणार्या 'अॅडव्हांटेज'वर मात करण्यासाठी प्रत्येक बाहेरच्या संघाने विशेष तयारी केली पाहिजे [ व ती करण्यासाठी भारतात कांहीं खेळपट्ट्या तरी पाटा नसाव्यात !]. बाकी हरणं-जिंकणं हें सांघिक गुणवत्तेवर !
१] घरच्या खेळपट्ट्यांचा
१] घरच्या खेळपट्ट्यांचा कोणत्याही संघाला कांहीसा फायदा होणं स्वाभाविक असलं तरी तो लाभ निर्णायक ठरण्याइतपत नसावा > >अनुमोदन. फक्त हे सर्व संघाच्या बाबतीमधे व्हावे फक्त आपल्याच नको. नाहितर घर का न घाट का अशी अवस्था होईल.
२] घरच्या संघाला मिळणार्या 'अॅडव्हांटेज'वर मात करण्यासाठी प्रत्येक बाहेरच्या संघाने विशेष तयारी केली पाहिजे [ व ती करण्यासाठी भारतात कांहीं खेळपट्ट्या तरी पाटा नसाव्यात !] >> मला वाटते दुसरा भाग आत्ताही आहे, प्रश्न हा आहे कि दौर्यांच्या भाऊ गर्दीमधे BCCI तयारीसाठी पुरेसा वेळ देते आहे का ? A teams ना जेंव्हा बाहेर पाठवले जाते तेंव्हा त्यांचे सामने तशाच पिचेस वर खेळले जावेत ह्याची खबरदारी घेतली जाते का ? दोघांचेहि उत्तर नकारर्थी आहे. गैर समज नसावा कि हि दोन्ही excuses नाहि, पण England किंवा aus जी पूर्वतयारी करता ती बघितल्यावर आपल्या संघाची दया येते.
'घरच्या खेळपट्ट्यां'च्या
'घरच्या खेळपट्ट्यां'च्या बाबतीत इतर संघ (ऑसी, इंग्लंड, आफ्रिका) व आपण यात एक मुख्य फरक म्हणजे आपल्याकडे बहुतांश सगळी पिचेस एकसारखीच डस्ट बाउल्स असतात. गवत नाही, पहिल्याच दिवशी क्रॅक्स दिसणे ई. मोहाली हा जरा नंतरचा अपवाद. ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन, मेलबोर्न वेगळे, सिडने वेगळे व पर्थ वेगळे. इंग्लंड मधे लॉर्ड्स व लीड्स वेगळे, तर ओव्हल वेगळे. काही ठिकाणी स्विंग चांगला, काही ठिकाणी बाउन्स व कॅरी तर काही ठिकाणी स्पिनला सपोर्ट.
पण ते दौरे सहसा असे आखतात की परदेशी संघ इझी पिच वर पोहोचेपर्यंत सिरीज हरलेले असतात
अजून असंख्य फरक आहेत. आपला संघ न्यूझीलंड मधे पहिली वन डे खेळला तेव्हा कोहली सारखे लोक तेथे पहिल्यांदाच मॅच खेळत होते. प्रॅक्टिस मॅचेस, एक दोन छोटे मोठे फर्स्ट क्लास सामने काही प्रकार नाही. प्रत्यक्ष मॅचेस च्या आधी टीमने काही दिवस आधी जाउन acclimatize होणे ई. गेल्या काही वर्षांत खूप कमी झाले आहे. मात्र दुसर्या बाजूने बघता आयपीएल ई. मधून प्रतिस्पर्धी बोलर्स ची बरीच माहिती आधीच झालेली असते. १९९९ मधे आपले लोक ब्रेट लीला मेलबर्न मधे खेळले ते एकदम पहिल्यांदाच खेळत होते. आत सहसा तसे होत नाही, तो एक अॅडव्हांटेज या नव्या लोकांना आहे.
Pages