क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रहाणे, रायडू, पुजारा वगैरेना आशियाच्या बाहेर खेळवणे आणि धवन, रोहित, रैना वगैरेना पाट्यावर खेळवणे हा चांगला पर्याय होउ शकतो
सॅमसन, बिन्नी, उन्मुक्त, विजय झोल वगैरे लोक या सगळ्यात कुठे बसतात बघितले पाहिजे
कोहली, धोनी सध्यातरी दोन्हीकडे असावेत

स्वरुपजी, आपल्या संघ निवडीतच गोची असावी असं मला नेहमी वाटतं; पाटा विकेटवर धांवांचा पाऊस पाडणार्‍या फलंदाजाचं तंत्र इतर विकेटसवर तोकडं व उघडं पडणारं आहे, याचा अंदाज निवडसमितीवर मुद्दाम घेतलेल्या अनुभवी खेळाडूना यायला नको ? व, तसा अंदाज आला तर त्या फलंदाजाला वगळण्याचं धैर्य व प्रामाणिकपणा त्यानी नको दाखवायला ? जर निव्वळ आंकडेवारीवरूनच संघ निवड करायची, तर अनुभवी खेळाडू हवेतच कशाला निवडसमितीवर, हा मला पडलेला प्रश्न.

फलंदाजांबाबत चुकीची संघनिवड आपली नेहमीच होत आलीय, परदेशी जाताना गोलंदाज आपण मारे वेगवान चार-पाच घेऊन जातो पण फलंदाजांबाबत कोणाला कुठे खेळायला जमेल की नाही हे बघत नाही, त्यामुळे रैनासारख्याला साहेबांच्या देशात कसोटीत खेळवायची चूक करतो आणि मग त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाल्यावर तो फ्लॉप आहे असा निष्कर्श काढतो.

या आशिया कप मध्ये एक चांगले झाले की धोनी नव्हता त्यामुळे कोहलीने तीन फिरकी गोलंदाज खेळवत अमित मिश्राला संधी दिली. अन्यथा धोनीच्या राज्यात जडेजा आणि आश्विन हि चेन्नई सुपरकिंगची जोडगोळीच खेळत राहीली असती. परदेशात, खास करून कसोटीत हे फारसा प्रभाव पाडू शकत नाहीत, तिथे अमित मिश्रा असता तर कदाचित वेगळे चित्र बघायला मिळाले असते वा पुढे तशी शक्यता आहे.

जर निव्वळ आंकडेवारीवरूनच संघ निवड करायची, तर अनुभवी खेळाडू हवेतच कशाला निवडसमितीवर, हा मला पडलेला प्रश्न. >> आज रेडीफवर प्रसाद, प्रभाकर, मनिंदर सिंग वगैरेंनी भारताच्या बॉलिंग वर लिहिलेले वाचाच Wink

गावस्करभाऊ फ्लेचरमास्तरांवर भारीच उखडलेले दिसतायत..... साहजिक आहे म्हणा!
पण द्रवीडने प्रशिक्षकपदाला नम्र नकार देउन चांगलेच केले..... he surely need some more time to be a coach!

<< आयला, हा काय प्रकार आहे ? >> सर्व फलंदाज ' क्लीन बोल्ड ' आहेत. त्यामुळे दोन शक्यता जाणवतात -
अ] फलंदाज स्टंप्सच्या पूर्णपणे बाहेर उभे राहून खेळत असावेत ; किंवा,
ब] भाजपाच्या निवडणूक प्रचाराच्या टीव्हीवर दाखवलेल्या व्यंचि प्रमाणे चेंडू टाकल्याबरोबर स्टंप्स बाजूला सरकवण्याची व्यवस्था केली गेली असावी ! Wink

इंग्लंड - श्रीलंका टेस्ट सिरीज जबरी झाली..

पहिली मॅच श्रीलंकेने शेवटच्या दिवशी जबरी खेळ करुन ड्रॉ केली.. आणि दुसर्‍या मॅच मध्ये तशीच वेळ इंग्लंड वर होती.. त्यांनी अटोकाट प्रयत्न केले पण शेवटून दुसर्‍या बॉलला मॅच हारले.. दुसर्‍या डावात मॅथ्यूज चे शतक श्रीलंकेला मोठए आव्हान देण्यासाठी उपयुक्त ठरले.. इंग्लंडची सुरुवात ठिकठाकच झाली आणि नंतर मोईन अलीने त्याचे पहिले शतक नोंदवले.. एखादी विकेट जास्त असती तर इंग्लंड मॅच वाचवू शकले असते.. ब्रॉड आणि अँडरसननी भरपूर बॉल नुसतेच तटवले आणि मोईन अलीला साथ दिली पण शेवटी अँडरसन आखूड टप्प्याच्या चेंडू वर बाद झाला...

लंके नंतर आपला england दौरा हा nightmare scenario असतो Sad हि मॅच हरल्यामूळे आपल्या विरुद्ध अधिक चिवटपणे (to prove a point) खेळणार हे नक्की. हेराथ ची बॉलिंग खेळल्यावर जाडेजाला हाताळणे सोपे जाईल. कुक तर अतिशय आतुरतेने वाट बघत असेल आपली, मागच्या दोन्ही bad patches मधून आपण त्याला बाहेर काढलेले आहे. Wink निकाल काहिही लागला तर लंकेने जेव्हढा चिवटपणा दाखवला तेव्हढा दाखवला तरी आनंद होईल.

केबलवाल्याच्या अवकृपेने पहिल्या कसोटीतील एकही चेंडू बघता आला नाही, पण मुरली विजय सारखा गावठी खेळाडू खेळून गेला म्हणजे खेळपट्टी काय असेल याचा अंदाज लावता आला.

आता दुसरी कसोटी क्रिकेटची पंढरी जिची टीशर्ट घुमावत दादाने काशी केली होती त्या लॉर्डसवर आहे ना?

अँडरसन - जडेजा ने आपआपल्या परीनं योगदान दिलं आहे. >> धोनीचा हा issue stress करायचा हेतू एकदम tactical वाटतो, फक्त जेली बीन्स प्रकारासारखा backfire होउ नये म्हणजे झाले Happy

<< म्हणजे खेळपट्टी काय असेल याचा अंदाज लावता आला. >> बॉयकॉटने तीव्र नापसंति व्यक्त केलीय त्या संथ विकेटबद्दल .
<< यंदा दुसर्‍या टेस्ट मधला एक दिवस लॉर्ड्सला मॅच बघायला जाणार.>> हें वाचून हेवा वाटला !
बाकीचं माहीत नाही पण जडेजा मात्र 'लॉर्डस'वर चमकणारच; उगीच काय धोनीने त्याला 'सर' किताब आधीच बहाल केलाय ! Wink

आज इंग्लंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजी दिली आहे; यावरून पीच व हवामानाचा अंदाज यावा. भारत ५०-२ !

<< नाजूक अवस्था! >> असं असूनही इंग्लंडच्या पिचेसवर व वातावरणात बहुधा प्रथमच कसोटी खेळणार्‍या ह्या तरूण खेळाडूंच्या तंत्राबाबत व कुवतीबाबत गंभीर शंका येत नाही, हेंहीं खरं !

जडेजा आणि धोनी हे खरं तर कधीच कसोटी चे खेळाडू वाटत नाहीत. जडेजा सारखा अर्धवट गोलंदाज + फलंदाज घेण्यापेक्षा अश्विन सारखा पूर्ण गोलंदाज घ्यावा (निदान लॉर्ड्स वर, जिथे खेळपट्टी जिवंत आहे) असं मला वाटतं. कसोटीमधे अश्विन (मी त्याच्या बॉलिंग चा फार फॅन नाहीये, पण सद्ध्या तेव्ह्ढाच एक पर्याय आहे) जडेजा पेक्षा चांगली फलंदाजी करतो.

अपेक्षित ईंग्लंड !
दादा, द्रविड, सच्याच्या अनुपस्थितीत हे राम !

धवनला विश्रांतीचा ब्रेक द्यायची गरज.
रहाणेला टाका ओपनिंगला.
शर्माला पाचव्या क्रमांकावर आणा. (तश्या फारश्या अपेक्षा त्याच्याकडूनही नाहीतच.)
पण अपेक्षा म्हणाल त्या तर धोनीकडूनही नाहीत, (टेनिस बॉलवर बॉक्स क्रिकेट खेळल्यासारखी बॅटींग करतो) मात्र त्याला पर्याय नाही.
मागे जडेजाला बसवून आश्विनला खेळवा, तो फलंदाज म्हणून तरी नक्कीच पैसा वसोल आहे.
बिन्नीचे काय करायचे ते आता तुम्हीच ठरवा.

अजून सामना बराच बाकी आहे, पण आजका खेल कुछ जम्या नही बॉस Sad

<< अजून सामना बराच बाकी आहे, पण ..... >> सामना बराच बाकी असला तरी पांच दिवस चालण्याइतका नसावा असं वाटतंय व भारताने २००+ धांवा केल्या [ आत्तां १८७-७] तर निर्णय शेवटची इनींग खेळणार्‍या इंग्लंडच्या बाजूनेच असेल असंही नाही. खेळपट्टी व वातावरण अनुकूल असल्याने आपल्याही गोलंदाजांच्या करामतीवर जरा विश्वास दाखवायला काय हरकत आहे ?
धवनच्या फलंदाजीच्या सध्याच्या क्रमाकासंबंधीच्या शंकेबाबत सहमत. जडेजाला टीकाकाराना खोटं पाडण्याची वाईट संवय आहे म्हणून त्याच्याबद्दलच्या मताशीं सहमत असूनही चूप बसणंच योग्य !

व्हाट अ‍ॅन इनीन्ग्स ! अभिनंदन रहाणे ! लॉर्डसवर शतक , तेंही इतक्या कठीण अवस्थेत !!!

अपेक्षित १७० सर्वबाद ऐवजी २७०-८ !!!

अजिंक्य रहाणेचे अभिनंदन. केवळ लॉर्ड्सवर शतक ठोकले म्हणून नव्हे तर तळच्या फलंदाजांना हाताशी धरून शतक काढले म्हणून. पूर्वी स्टीव्ह वॉ अशा खेळ्या करायचा. शिखर धवनला सावध झाले पाहिजे, रोहितसारखा फलंदाज राखीव बसतोय. भुवनेश्वरच्या लढाऊ वृत्तीचेही कौतुक वाटते.

धवनच्या फलंदाजीच्या सध्याच्या क्रमाकासंबंधीच्या शंकेबाबत सहमत. >> तो NZ मधे अशाच वातावरणात चांगला खेळला होता. जरा धीर धरून बघूया का काही बदल होतो का ते ?

पुजारा नि विजय अजिबात strike rotate करत नाहीत. अँडरसन सारख्या कुशल बॉलरला तुम्ही सहा बॉल प्लॉट करायला दिलेत, तेही त्याला धार्जीण्या खेळपट्ट्यांवर तर एखादा बॉल घात करून जाणे साहजिक नाही का ?

उदयन अरे एकच दिवस झालय कि रे.

<< भुवनेश्वरच्या लढाऊ वृत्तीचेही कौतुक वाटते.>> अगदीं खरंय. तो मन लावून फलंदाजीचं तंत्रही आत्मसात करतोय. गोलंदाजीत त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेतच. कीप अप !

हो एकच दिवस झाला पण जिथे 150-170 वर संपणार होते तिथे अमुल्य 150 रन्स चा बोनस मिळाला आहे बहूदा हेच रन्स मँच च्या निकालात कारणीभूत ठरतील

रहाणे जबरदस्त खेळला. दिवसाखेर नाबाद राहिला असता तर उद्या मजा आली असती. असो. जे मिळालं ते ही अपेक्षेपेक्षा जास्त आहे. भुवनेश खरच कमिटेड खेळाडू वाटतो. सलामीसाठी गंभीर पण आहे (धवन ऐवजी).

Pages