क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< जरा धीर धरून बघूया का काही बदल होतो का ते ? >> असामीजी, मलाही धवन एक शैलीदार व आक्रमक फलंदाज म्हणून आवडतोच. पण क्र. १/२ वर फलंदाजी करताना आपल्यापेक्षा त्यानेच ' जरा धीर धरून बघूया का ' असं स्वतःला सांगायची वेळ आलीय, एवढंच. Wink

काल रहाणे जबरी खेळला... अँडरसनला स्टँड अँड डिलिव्हर स्टाईलने मारलेली सिक्स फारच जबरी होती.. बाकीचे पण शॉट्स सही होते.. पुल वगैरे पण निवांत केले एकदम.. (रोहित शर्माची टीममधे वर्णी लागणे अवघड दिसते आहे... रहाणे स्वतःची जागा पक्की करतो आहे असे खेळून... इंग्लंडमध्ये तरी २० गडी बाद करु शकणारी गोलंदाजी हवी आहे. त्यामुळे तिथे एक जास्तीचा फलंदाज खेळवणे मुश्किल दिसत आहे) १८० त डाव आटोपतो की काय असे वाटत असताना भुवनेश कुमार ला बरोबर घेऊन फार मस्त किल्ला लढवला.. बाद झाला नसता तर अजून मजा आली असती.. तो बॉल सोडल्यास कुठे चान्स दिल्यासारखे वाटले नाही.. अँडरसननी कॅच चांगला पकडला.. भुवनेश पण मस्त खेळला.. तो ज्या बॉलवर बाद झाला तो थोडा खालती राहिला.. अन्यथा चित्र अजून वेगळेच दिसले असते.. शेवटच्या चार ओव्हर पण शामी आणि इशांत ने निवांत खेळून काढल्या..

पोस्ट लंच सेशनमध्ये कुठे माशी शिंकली देवच जाणे.. पहिल्य टेस्ट मध्ये पण पोस्ट लंच मधेच विकेट्स जास्त पडल्या.. काल पण तेच..

आज शामी शर्मानी थोडा नीट प्रतिकार केला तर इंग्लंडवरचा दबाव अजूनच वाढेल..

३००-३५० झाल्या पाहिजे... दोघांनी जिंकु किंवा मरु या नात्यानेच हल्ला करायला हवा... या खेळपट्टीवर भुवी आणि सामीच्या सीम गोलंदाजीचा सामना करणे इतके सोपे नाही आहे त्यातच इशांतला देखील सुर गवसला आहे..
स्विंग होणार्या खेळपट्टीवर बिनी काय कमाल करु शकतो हे त्याने बांग्लादेशात दाखवुन दिले आहेच..

त्यामुळॅ या ४ गोलंदाजावर जास्त भर राहणार ...........जर हवेत स्विंग होत असेल तर

<< पोस्ट लंच सेशनमध्ये कुठे माशी शिंकली देवच जाणे.. >> 'कॉमेंट्री बॉक्स'मधून झालेली याची कारणमीमांसा - चेंडू चांगल्यापैकीं स्वींग होत असताना 'फुल्-लेंग्थ' चेंडूच परिणामकारक ठरतात व पोस्ट-लंच सेशनमधे इंग्लीश गोलंदाजानी नेमकं हेंच केलं. [ मला पडलेला प्रश्न- स्वतःच्या चांगल्या परिचयाच्या खेळपट्ट्यांवर व वातावरणात सतत गोलंदाजी केलेल्या इंग्लीश गोलंदाजाना काल ही साधी गोष्ट कळायला एक अख्खं सेशन जावं लागतं ? ]

शेवटच्या सेशनमध्ये कॉमेंट्री करताना तो मॅप दाखवत होते.. आणि त्यात प्लंकेटला शिव्या पण देऊन झाल्या.. त्यानी शॉर्टपिच बॉलिंग करुन सेट होऊ दिले म्हणून.. पण घरच्या मैदानावर खेळताना इतकी अक्षम्य चूक कशी काय होते...

आपल्या लोकांनी पीच अप गोलंदाजी केली तर इंग्लंडची पण वाट लागणार आहे.. हिरवळीचा फायदा मिळायलाच हवा..

बहुतेक समालोचक भारतीयच आहेत.. विलकिन्स सोडल्यास एकही इंग्लिश समालोचक दिसला नाही.. द्रवीडला समालोचन करताना ऐकायला कसे तरीच वाटते.. आवाज अजून कानात बसला नाहीये... गांगुली फारच कर्कश्श वाटतो..

<< आपल्या लोकांनी पीच अप गोलंदाजी केली तर इंग्लंडची पण वाट लागणार आहे.. >> सहमत. भुवनेश व शामी विशेष प्रभावी ठरावेत अशी रास्त अपेक्षा आहे. आज सकाळचं इंग्लंडच्या फलंदाजीचं पहिलं सत्र सामन्यासाठी खूप महत्वाचं ठरावं. [ अर्थात भारतीय क्र. १० व ११च्या फलंदाजानी सकाळचं संपूर्ण पहिलं सत्र स्वतःच खेळून न काढलं तरच ! Wink ]

अपेक्षेपेक्षा जरा लवकरच पहिला डाव आटपला... असो..

पण लगेच इंग्लंडची एक विकेट पण पडली.. कूक परत एकदा काहीच न शिजवता बाद झालेला आहे... आपले लोक पण थोडे शॉर्ट पीच बॉलिंगच करत आहेत.. थोडे पुढे पीच करा रे.. मॅच आपलीच आहे मग..

बहुतेक समालोचक भारतीयच आहेत.. >> देशात वेगळे broadcast असते बहुधा. इथे सगळे फिरंग आहेत Happy

आणि त्यात प्लंकेटला शिव्या पण देऊन झाल्या.. त्यानी शॉर्टपिच बॉलिंग करुन सेट होऊ दिले म्हणून.. >> त्याने म्हणे बॉल रीव्हर्स स्विंग व्हावा म्हणून त्याला एकाच बाजूने बॉल आपटेल अशी शॉर्‍ट पिच बॉलिंग करायची असा डाव आहे वगैरे वगैरे. एव्हढे पुढचे प्लॅनिंग असेल का का खरच ? पहिल्या टेस्टमधे पण तेच सुरू होते त्याचे.

भुवनेश खूपच चलाखीने व चिकाटीने गोलंदाजी करतोय . दूसरी विकेट मिळवलीच त्याने !

अरारा.. तसे असेल तर प्लंकेट विकेट लेसच राहिल आख्ख्या सिरीज मधे.. आपल्या लोकांनी फक्त शॉर्टपिच बॉल शांतपणे सोडून देणे शिकले पाहिजे.. टेस्टमॅच आहे त्यामुळे सहाच्या सहा शॉर्टपिच बॉल निवांत सोडून दिले तरी फार काही फरक पडणार नाही..

देशात वेगळे broadcast असते बहुधा. इथे सगळे फिरंग आहेत>>> एच डी वर कोण आहे ते बघायला पाहिजे.. स्टार वाले. रेग्युलर चॅनल वर वेगळे आणि एच डी वर वेगळे असे प्रकार करु शकतातच..

एवढ्यात दुसरीही विकेट गेलेली आहे.. परत एकदा भुवनेश्वर कुमार... सलग ८ ओव्हर्स टाकल्यात त्याने.. त्यानी ५ विकेट जर काढल्या आणि आपण मॅच जिंकलोच तर त्यालाच एमओएम द्यायला पाहिजे.. पहिल्या इनिंगमधे तो साथीला होता म्हणूनच रहाणेचे शतक झाले आहे..

हा यंदाचा भारताचा "भुवन" ठरणार का??

धोनी ने सोडलेला बॅलन्स चा कॅच महागात पडेल की काय अशी शक्यता वाटतेय. तो कॅच निर्विवादपणे धोनी चा होता, आणी धोनी ची पहिली रिअ‍ॅक्शन बघून तो कॅच साठी जातोय असच वाटलं आणी मधेच त्यानी सोडून दिला प्रयत्न. बिन्नी ची पहिली टेस्ट विकेट हूकली.

धोनीला सूर लगावत नाही घेता येत झेल. जेवढी सही तो स्टंपिग करतो या बाबतीत तो तितकाच वीक आहे.

काल मी आज का खेल कुछ जम्या नही बोलायला घाई केली वाटते, १७०-१८० चा स्कोअर बंद्यांनी २९५ ला पोहोचवला. अर्थात रहाणेकडून आशा होत्याच मला. पण भुवीचे खेळणे कौतुकास्पद. त्याचा खेळ पाहता तो फ्लूक मध्ये खेळतोय असे वाटत नव्हते. याचा एक फायदा होईल या मालिकेत, की एकाचे बघून सारेच तळाचे फलंदाज हाराकीरी न करता आपल्या विकेटला किंमत देऊन खेळतील.

सध्या ईंग्लंड १५७-४
पाऊस दूरच राहीला पाच दिवस तर बरे, एक रंगतदार सामना घडण्याची लक्षणे दुसर्‍याच दिवशी दिसत आहेत.

खरय... पन हा बॅलन्स त्येंच्या साईटला काहीतरी बॅलन्स घेवुनच जानार......sad.gif आता असे तरी दिसतय.. लवकर आउट झाला तरच आपल्याकडे रंस चा बॅलन्स राहिल.uhoh.gif

कालच्यापेक्षा आज विकेट फलंदाजीला खूपच सोपी असूनही [ हें सर्वच तज्ञांचं मत आहे ] भारताने इंग्लंडला चांगलंच रोखलं आहे, ही जमेचीच बाजू. मॅच रंगतदार हिण्याची लक्षणं दिसताहेत .

कालच्यापेक्षा आज विकेट फलंदाजीला खूपच सोपी असूनही [ हें सर्वच तज्ञांचं मत आहे ]
>>>>>>
खरेय विकेट सोपी होती कालच्यापेक्षा.
ईंग्लिश संघ सध्या स्वताच्याच फॉर्मशी झगडतोय. पण अर्थातच आजच्या कामगिरीबद्दल भारतीय गोलंदाजांना फुल्ल मार्क्स. Happy

पहिल्या इनिंगमध्ये जर ईंग्लंडला बरोबरीत रोखले तर अ‍ॅडव्हांटेज ईंडिया !

अवांतर - सेहेवागची आठवण येतेय. तो वेगाने सामना खेचून न्यायची क्षमता राखायचा. अर्थात सेकंड इनिंगमधील त्याचा रेकॉर्ड पारच गचाळ होता पहिल्या इनिंगच्या तुलनेत हे वेगळे. मात्र इथे हे काम कोहलीने केल्यास मजा येईल. त्याकडून एका तडफदार कसोटी शतकाच्या प्रतीक्षेत.

हिम्या, रहाणेबद्दल सहमत. मस्त खेळला तो. क्लासिक ड्राइव्ह्ज, ते अगदी टेनिस शॉट्स पर्यंत बरेच वेगवेगळे मारले. त्याने. ते हुक्/पुल्स ही मस्त होते. तो सरळ मारलेला सिक्स तर जबरी.

येथे इसपीएन चे हायलाईट्स दिसतात त्यातील कॉमेण्टरी इंग्लिश लोकांची आहे.

एकूण मॅच बद्दल - पेशन्स लोकहो, पेशन्स. इतक्या वेळेस लॉर्ड्सवर खेळताना आपण एकदाच जिंकलेलो आहोत तेथे माझ्या आठवणीत. तेही सिनीयर बिन्नीने विकेट्स काढल्या होत्या तेव्हा. आता ज्यु. बिन्नी खेळत आहे.

धवन चे माहीत नाही, पण कोहली नक्की खेळेल लौकरच.

इशांत शर्माला आपण मिचेल जॉन्सन नाही आणि ऑस्ट्रेलियात बॉलींग करत नसूण इंग्लंडमधे करतो आहोत ही अक्कल कधी येईल काय ??

ज्या विकेटवर बॉल बर्‍यापैकी स्विंग आणि सिम होत होता सकाळी, तिथे हा प्राणी शॉर्टपीच का टाकत होता ?

... आणि स्लीपच्या दिशेने कॅच गेला तर दोघांनीही डाईव्ह मारुन प्रयत्न करायला घोडं कुठे पेंड खातंय ?

तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण.. अगदी सेहवागही स्लीपमध्ये असता तरी बॅलन्स तिशीत परतला असता.

श्या राव.. काल चांगलाच चान्स घालवला... अर्थात सेशन वाईज बघितले तर सध्या तरी आपण पुढे आहोत.. पहिल्या दिवशीच्या पोस्ट टी सेशन मुळे.

आज शेपुट वळवळायच्या आत गुंडाळले गेले पाहिजे.. नाहीतर आहे ड्रॉ किंवा लॉस..

काल श्रीलंकेच्य पण शेपटाने झुंजवले आफ्रिकेला.. सिक्स डाऊन आलेले सगळे खेळाडू जास्तच जबाबदारीने खेळायला लागलेत सध्या...

एचडीवर आहेत सगळे चांगले समालोचक..

<< आणि स्लीपच्या दिशेने कॅच गेला तर दोघांनीही डाईव्ह मारुन प्रयत्न करायला घोडं कुठे पेंड खातंय ?>> खरंच तो झेल सुटणं/सोडणं हास्यास्पदच वाटलं. यजमान संघाचा मान ठेवणं याशिवाय त्या चूकीचं दुसरं समर्थनच होऊं शकत नाही. बिचारा बिन्नी !

आज त्यांना लवकरात लवकर गुंडाळणे मनोरंजनाच्या द्रुष्टीने अत्यावश्यक, जेणे करून या विकांताला आपल्या फलंदाजीचा अनुभव लुटता येईल. Happy

लंका-आफ्रिका
आफिकेने अचूक वेळी डाव घोषित केला.
१२२ षटकात ३७० चे टारगेट .. ३ ची धावगती ..
हा सामना पण रंगतदार होण्याची शक्यता

विज्याला आता काहीच प्रुव्ह करायचे नाही म्हणून आरामात खेळतोय आजचा ३ राच दिवस आहे म्हणून नांगर टाकला आहे

वीराट ने आता पुढच्या टेस्ट मध्ये आराम करावा.. अनुश्का बरोबर मजा करुन परत जाव... नाहीतर अर्ध लक्श तीच्याकडे च..

रहाणे ला ढापला राव! श्या: Sad

विजय चांगला खेळतोय. मला धोनी आणी जडेजा पेक्षा बिन्नी चं तंत्र जास्त चांगलं वाटतं

स्पार्टाकस, तुम्हाला आशावादाचा एव्हरेस्ट म्हणावं लागेल.... तुम्ही ईशांत शर्माला अक्कल येण्याची अपेक्षा बाळगताय म्हणून म्हट्लं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे ७ वर्षं आणी ५६ कसोटींचा अनुभव असूनही तो जर अजून नवखाच वाटत असेल, तर कठीण आहे. बर्याच खेळाडूंचं तर एव्हढं पूर्णं करीअर असतं.

Pages