Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या दिवशीं असं, दुसर्या
पहिल्या दिवशीं असं, दुसर्या दिवशी तसं, एका सत्रात एक तर दुसर्या सत्रात भलतंच, असं आपल्या लहरीप्रमाणे वागायला ही खेळपट्टी काय स्वतःला लॉर्ड समजते ?
सामना प्रत्येक सत्रात छान वळणं घेत चाललाय !!!
"सामना प्रत्येक सत्रात छान
"सामना प्रत्येक सत्रात छान वळणं घेत चाललाय !!!" - भाऊ, this is the beauty of test cricket. टेस्ट मॅच मधे काय बघायचं हा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी अशा मॅचेस पहायला हव्या.
मला धोनी आणी जडेजा पेक्षा
मला धोनी आणी जडेजा पेक्षा बिन्नी चं तंत्र जास्त चांगलं वाटतं
>>>>>
सहमत
धोनी आणि जडेजाकडे अश्या कंडिशन आणि खेळपट्ट्यांवर कसोटी खेळायचे तंत्र फारसे नाहीच आहे.
बिन्नीची फलंदाजी बघण्याचा योग अजून मला या दौर्यात आलाच नाही त्यामुळे तुर्तास नो कॉमेंटस.
बाकी यांच्यापेक्षा चांगला फलंदाज आश्विन हा मेन स्पिनर असूनही उगाचच्या उगाच तंबूत बसला आहे. त्यातल्या त्यात भुवनेश्वरच्या फलंदाजीतील कमालीमुळे त्या ठिकाणी त्याची उणीव फारशी जाणवली नाही इतकेच.
वीराट ने आता पुढच्या टेस्ट
वीराट ने आता पुढच्या टेस्ट मध्ये आराम करावा.. अनुश्का बरोबर मजा करुन परत जाव... नाहीतर अर्ध लक्श तीच्याकडे च..
>>>>>>
फसलाय बिचारा, आधीच फॉर्म गंडलाय त्यात नियम बदलवत पोरीला घेऊन दौर्यावर गेलाय. अजून एकदोनदा फ्लॉप गेला की जी मिडीया त्याला डोक्यावर घेऊन नाचायची तीच आपल्या चॅनेलचा टीआरपी वाढवायला या इश्यूचे दिवसरात्र भांडवल करून त्याची पार नाचक्की करून टाकतील हे नक्की
पहिल्या दिवशीं असं, दुसर्या
पहिल्या दिवशीं असं, दुसर्या दिवशी तसं, एका सत्रात एक तर दुसर्या सत्रात भलतंच, असं आपल्या लहरीप्रमाणे वागायला ही खेळपट्टी काय स्वतःला लॉर्ड समजते ?
>>>>>>>>>
छान ट्विस्ट आणि टर्न येत आहेत, पण खेळपट्टी फारशी लहरी नाहीये भाऊ.
सकाळचे सत्र- शेवटचे सत्र, रोलर फिरवणे, चेंडू नवा जुना असणे, यामुळे पडणारे थोडेफार फरक तर असणारच. पण हे ट्विस्ट आणि टर्न आहेत ते खेळाडूंमुळे. या विकेटमध्ये चांगल्या तंत्राने खेळणार्यासाठी धावाही आहेत तर गोलंदाजांसाठी देखील पहिल्या चेंडूपासून आतागायत काही ना काही आहेच. अनईवन बाऊंस देखील बॅटसमनची सुस्ती घालवेल इतपतच आहे. अंपायरने आणखी काही गोंधळ नाही घातले तर बेस्ट टीम जिंकेल अशी ही खेळपट्टी आहे, माझ्यातर्फे फुल्ल मार्क्स !
बाकी लॉर्ड'ची कोटी मस्त
ओव्हल सोडले तर इंग्लंड मधे
ओव्हल सोडले तर इंग्लंड मधे स्पिनर्स फारसे उपयोगी ठरल्याचे आठवत नाही. वॉर्न असेल पण त्याचे अर्धे कारण इंग्लिश खेळाडू त्याच्यासमोर ढेपाळायचे हे ही होते. आश्विन मला अजूनही नुसताच हाईप जास्त वाटतो. भारतातही अजून जेवढा चालायला हवा तेवढा चालल्याचे लक्षात नाही.
खुद्द कुंबळेला ही परदेशात मॅच वर परिणाम करणारी कामगिरी करायला बरीच वर्षे जावी लागली होती.
फारएण्ड, जर आकडे चेक केले तर
फारएण्ड,
जर आकडे चेक केले तर आश्विनचा रेकॉर्ड चांगलाच निघेल, कदाचित तुम्ही म्हणता त्या हाईपमुळे त्याच्याकडून आपण अपेक्षाही जास्तीच्या करत असू असेही असेल. अन्यथा आजच्या तारखेला उपलब्ध पर्यायात आपला मेन स्पिनर तोच आहे. बरेचदा धोनी मर्यादीत षटकांच्या सामन्यात त्याला स्लॉग वा पॉप्वरप्लेमध्ये रन रोखायला पायावर मारा करायला लावतो, त्यामुळे तो वेगळा भासतो खरे पण आहे तो विकेटटेकर बॉलरच.
बाकी ईंग्लंडमध्ये त्यांच्याशी खेळताना कुठलीही कशीही खेळपट्टी असो एक क्लासिकल स्पिनर तर संघात हवाच, फक्त त्याचा वापर कसा कुठे आणि किती करायचा याची अक्कल कर्णधाराला हवी.
फसलाय बिचारा, आधीच फॉर्म
फसलाय बिचारा, आधीच फॉर्म गंडलाय त्यात नियम बदलवत पोरीला घेऊन दौर्यावर गेलाय. अजून एकदोनदा फ्लॉप गेला की जी मिडीया त्याला डोक्यावर घेऊन नाचायची तीच आपल्या चॅनेलचा टीआरपी वाढवायला या इश्यूचे दिवसरात्र भांडवल करून त्याची पार नाचक्की करून टाकतील हे नक्की>>>>>>>>>
आता काय ही कसोटी संपली... पुढच्या कसोटीत रोहीत शर्मा आला तर साहेब धोक्यात..
<< छान ट्विस्ट आणि टर्न येत
<< छान ट्विस्ट आणि टर्न येत आहेत, पण खेळपट्टी फारशी लहरी नाहीये भाऊ >> ऋन्मेssषजी, सहमत. जरा गंमतीतच मीं खेळपट्टीला लहरी म्हटलं होतं.
<< पुढच्या कसोटीत रोहीत शर्मा आला तर साहेब धोक्यात..>> कोकण्यानुं, कोहली हा 'लंबे रेसका घोडा' आहे व तो हें सिद्ध करेलच. किंबहुना, सध्याचं अपयश ही त्याच्याकरतां व भारताकरतां इष्टापत्तिच म्हणणं अधिक योग्य; कारण, 'अॅरोगन्स' ही एकच कमतरता तो 'ग्रेट' या संज्ञेला पात्र होण्याच्या आड येवूं शकते व ती या अपयशाने कमी व्हायला मदतच होईल. फलंदाजीतली कोहलीची असामान्य गुणवत्ता वादातीत आहे, असं मला वाटतं.
फेरफटका, इशांत शर्माला अक्कल
फेरफटका,
इशांत शर्माला अक्कल येईल अशी मला अपेक्षा नाहीच. धोणीला अक्कल येऊन तो इशांत शर्मा आणि जाडेजा ऐवजी अश्विन आणि वरूण अॅरन / पंकज सिंग यांना चान्स देईल अशी अपेक्षा आहे. इशांतपेक्षा ते आणखी काय वाईट करू शकतात ? धवनला अजून एक संधी अन्यथा आपला गंभीर परतायला हवा. धोणीचा इगो गेला चुलीत.
बिन्नीला नक्की कशासाठी घेतला आहे? त्याला जेमतेम १०-१२ ओव्हर्स बॉलींग देणार आणि बॅटींगला धोणी आणि जाडेजा यांच्या नंतर ? त्या तिघांपेक्षाही भुवनेश्वर कुमारची बॅटींग टेक्नीकली परफेक्ट आहे. पण त्याचा ऑलराऊंडर करण्याच्या नादात त्याचा इरफान पठाण केला नाही म्हणजे मिळवली.
<< धोणीचा इगो गेला चुलीत. >>
<< धोणीचा इगो गेला चुलीत. >> असे खणखणीत, क्लासिकल, बोलर्स बॅक 'स्ट्रेट ड्राईव्ह' हल्ली क्वचितच पहायला मिळतात !
काल विजय का कुढत कुढत खेळत
काल विजय का कुढत कुढत खेळत होता.....त्याचे कारण बर्याच जणांना समजले असेल अशी आशा आहे.. एक बाजु लावुन धरली तर किमान १ दिवसाचा खेळ खेळता येतो.. म्हणुन त्याने एक बाजु लावुन धरलेली.. तिसर्याच दिवशी जर आपले ५-६ विकेट २०० रन्स वर पडले असते तर चौथ्या दिवशीच्या लंच पर्यंत आपण २५०- २७५ रन्स मधे ऑलआउट होण्याचा धोका नक्कीच होता... मग इंग्लंडला दोन सेशन आणि ५वा संपुर्ण दिवस असे तब्बल पावणे दोन दिवस मिळाले असते आणि रन्स त्यांच्या समोर २५० होते... अश्या वेळेला इंग्लंड ला कसोटी जिंकण्याची आपसुक संधी आपण निर्माण करुन दिली असती.....
त्यापेक्षा विकेट वाचवुन चौथ्या दिवशीच्या चहापान पर्यंत ३२० रन्स आणि ८ विकेट तरी गेल्या तरी चहापाना नंतर मारामारी करुन किमान ३०-४० रन्स ची भर घालता येईल २ विकेट्स च्या बदल्यात आणि यजमानांना चौथ्या दिवशीचे शेवटचे १० ओवर्स आणि शेवटचा दिवस देउन ३५० चे लक्ष्य देता येईल... तरच कसोटी रंगदार ठरेल ... आता इंग्लंड वर जास्त प्रेशर असेल की सामना जिंकायचा कि अनिर्णित ठेवायचा... या दबावात एक तर त्यांचे विकेट्स निघतील नाहीतर ते कुढत कुढत खेळतील .......
चौथ्या दिवशीचा पहिला सेशन जर धोनी आणि विजय ने आरामात खेळुन काढला भले त्यात अवघे ५० रन्स जरी झाले तरी चालतील...तर नंतरचा चहापान पर्यंत दोघे ही धुलाई करु शकतील.. त्यानंतर येणारे जाडेजा आणि बेन्नी फक्त मारामारी केली तरी चालेल.. पण त्यासाठी भारताने किमान २८० च्या वर आघाडी घेतली पाहिजे...
विजयची ३ र्या दिवसाची इनिंग
विजयची ३ र्या दिवसाची इनिंग हा 'डिफेन्सीव बॅटींग' चा उत्कृष्ठ वस्तुपाठ होता. या पीचवर २००-२२५ चा लीडही इंग्लंडला भारी पडू शकेल.
व्हर्नान फिलँडरला बॉल
व्हर्नान फिलँडरला बॉल टँपरींगबद्दल फक्तं फाईनवर का सोडलं ?? हा सरळसरळ फसवणुकीचा प्रकार नाही का ? या आधीही दक्षिण आफ्रीकेच्याच ड्युप्लेसीने असाच प्रताप केला होता. श्रीलंका मॅच हरल्यास ही सबब पुढे करणार हे निश्चीत.
भारत आतां कसोटी क्रिकेटमधे
भारत आतां कसोटी क्रिकेटमधे खूप ज्येष्ठ व अनुभवी देश आहे. योजना व डांवपेंच अपेक्षितच आहेत. पण त्यानुसार प्रत्यक्ष खेळही बव्हंशी होतोय , हें कौतुकास्पद. सामना रंगतदार होण्याची सर्व लक्षणं दिसताहेत. आपली फिरकी किती भेदक ठरते यावरही खूप कांहीं अवलंबून असेल, असं वाटतंय.
जयवर्धने पाठोपाठ संगकारा
जयवर्धने पाठोपाठ संगकारा गेला. श्रीलंकेच्या कपाळात !
आपली फिरकी किती भेदक ठरते
आपली फिरकी किती भेदक ठरते यावरही खूप कांहीं अवलंबून असेल, असं वाटतंय >>> भाऊ... जडेजाची फिरकी घेत आहेत अस चित्र डोळ्या समोर आलं.
जाडेजा आणि मुरली विजय हे दोन
जाडेजा आणि मुरली विजय हे दोन फिरकी गोलंदाज आहेत... विजय ने एक विकेट सुध्दा घेतली आहे पहिल्या डावात.. तसेच धोनी देखील फिरकी गोलंदाजी टाकु शकतो वेळ पडल्यास..
<< श्रीलंकेच्या कपाळात ! >>
<< श्रीलंकेच्या कपाळात ! >> स्पार्टाकसजी, तुमचा आणखी एक मस्त खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह !!
१४००
१४००
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/england-vs-india-second-test-mcc-groundsm...
हे वाचा
कॅरेबियन प्रिमीयर लिगमध्ये
कॅरेबियन प्रिमीयर लिगमध्ये परवा नारायणांच्या सुनिलने सुपर ओव्हर चक्क मेडन टाकली !
जिंकायला १२ रन्स. समोर निकोलस पूरन आणि रॉस टेलर होते ( तोच तो - पलकेले प्लंडरर
). पूरनने मूळ मॅचमध्ये १७ बॉलमध्ये ३७ रन्स ठोकल्या होत्या. त्यात सुनिल नारायणलाही दोन सिक्स मारल्या होत्या. परंतु सुपर ओव्हरच्या पहिल्या चार बॉलवर त्याला एकही रन काढता आली नाही ! पाचव्या बॉलवर बाऊंड्रीवर मार्टीन गप्टीलने त्याचा कॅच पकडला आणि शेवटच्या बॉलवर रॉस टेलरलाही काही करता आलं नाही.
दुव्याबद्दल धन्यवाद उदयन..!
दुव्याबद्दल धन्यवाद उदयन..! मला वाटतं की विमानतळाच्या धावपट्टीवर लक्ष ठेवायला खास नजरबाज असतात तसेच आता क्रिकेटच्या खेळपट्टीसाठीही नेमले पाहिजेत.
आ.न.,
-गा.पै.
कॅरेबियन प्रिमीयर लिगमध्ये
कॅरेबियन प्रिमीयर लिगमध्ये परवा नारायणांच्या सुनिलने सुपर ओव्हर चक्क मेडन टाकली !
>>>>>>>>>>>
हो हे आजच सकाळी माझ्या आईने मला सांगितले, तिला चॅनेल सर्फ करताना कुठेतरी ती मॅच दिसली आणि सुपर ओव्हर आणि नारायण दिसला म्हणून पाहिले. तो आमच्या घरात फार फेमस झाला आहे. १२ चे टारगेट होते बहुधा. बघायला हवी ती ओवर कुठे मिळते का बघायला.
श्रीलंका मात्र आटोपल्यातच जमा
श्रीलंका मात्र आटोपल्यातच जमा आहे दुसरीकडे, आफ्रिकेचा वेळीच डाव घोषित करायचा निर्णय अपेक्षेप्रमाणेच अचूक. अन्यथा संगकाराने अनिर्णित राखून दिला असता सामना.
ऋन्मेssष ही बघ सुनील नारायणची
ऋन्मेssष ही बघ सुनील नारायणची मेडन ओव्हर
श्रीलंका गेली बाराच्या
श्रीलंका गेली बाराच्या भावात.
दक्षिण आफ्रीकेने १५३ रन्सनी धुतले. स्टाईन आणि मॉर्केलने ४-४ विकेट्स वाजवल्या. उरलेला गाळ डुमिनीच्या वाट्याला आला.
कुरतडेश्वर फिलँडरला मात्रं हाताचा आंगठाच चोखत बसावं लागलं.
आता लॉर्ड्सला काय होतंय पाहूया.
धन्यू स्पार्टाकस, तो बॅटसमन
धन्यू स्पार्टाकस,
तो बॅटसमन पण आंधळ्यावेड्यासारखा दांडपट्टा फिरवत होता. पण भारीच आहे सुनिल नारायण, शेवटचा रॉस टेलरला पण त्याने भारी बॉल टाकला ..
अरे, आपल्या पोरानी पण बाजी
अरे, आपल्या पोरानी पण बाजी मारलीय, तें बघा ! ३१८ची आघाडी, मुरली ९५, भुवनेश्वरच्या ५०, जडेजाच्या ६०+ !! टॉस जिंकून आपल्याला प्रथम फलंदाजी देणार्या इंग्लंडला आतां हरणं म्हणजे दुप्पट नामुष्की ! बघूं काय होतंय.
नारायणाच्या सुनीलला मीं 'स्थितप्रज्ञ' किताब केंव्हांच बहाल केला आहे ! ग्रेटच आहे तो !!
२.५ चा रनरेट हवा आहे इंग्लंड
२.५ चा रनरेट हवा आहे इंग्लंड ला आजची ४० आणि उद्याची ९० असे मिळुन १३० ओवर्स मधे ३२० रन्स काढायच्या आहेत...
आजच्या दिवसात भुवी प्रचंड थकलेला असेल.. त्यामुळे इशांत सामी आणि बिन्नी यांनी बळी घेण्याची जवाबदारी घ्यावी.. आजच्या दिवसात २-३ विकेट्स जर भेटले तर........ इंग्लंड बॅकफुट वरच जाणार
Pages