Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता कशासाठी पाहायचे क्रिकेट?
आता कशासाठी पाहायचे क्रिकेट? >>. काय सांगता राव. मला माझे वडील \आठवले, सुनिल गावस्करांनंतर क्रिकेट संपले म्हणत होते ते. आणि आता टि २० मॅचचे अपडेट पण फोन करून अमेरिकेत देतात!
युवी २७ बॉल्समध्ये ५९.....
युवी २७ बॉल्समध्ये ५९..... जबरदस्त खेळतोय
ऑस्सम चेस. जिंकलो. जय युवी !
ऑस्सम चेस. जिंकलो. जय युवी !
युवराज नि धोनी ने २००८
युवराज नि धोनी ने २००८ बहुधामधे पाकिस्तान नि लंकेच्या विरुद्ध अशाच ODI matches काढल्या होत्या ते आठवले. खलास एकदम.
धवन गंभीर किंवा उथ्थपा अंगात आल्यासारखा प्रत्येक स्पिन बॉलला down the pitch का येत होता ? रोहितला अजून IPL/ICL सुरू आहे असे सांगून MIचा शर्ट घालून खेळायला पाठवता येईल का ?
का माहित नाही, पण मला आपली
का माहित नाही, पण मला आपली खात्रीच होती की शेवटी अटीतटीला येऊन धोनीच सामना जिंकेल. बरेचदा असे झाल्यासारखे वाटते. मागे एकदा सुद्धा बराच वेळ स्वतः स्ट्राईक न घेता इतरांना खेळू देत होता, नि शेवटी अगदी गळ्यापर्यंत आल्यावर जिंकला!
हा भारताचा संघ इतका बलवान वाटतो की कुठल्याहि प्रकारच्या क्रिकेटमधे भारतच जिंकेल असे वाटते.
आज मी ओझरते पाहिले की २०-२० मधे पहिला नंबर श्रीलंका व दुसरा बहुतेक पाकीस्तानचा नि मग तिसरा भारताचा. हे कुणि ठरवले? गेल्या एक दोन वर्षातले सामने बघितले नाहीत का या लोकांनी?
कसली जबरी मॅच ! कोहोली आणि
कसली जबरी मॅच !
कोहोली आणि धवननी फोडलचं.. पण रोहित शर्मा अतिशय क्लासी इनिंग खेळला.. त्याने शेवटच्या काही फोर मारल्या ते फटके कसले महान होते !
लय भारी.. वर्ल्ड कप फायनलचा फील आला अगदी..
काहिच्या काहि प्रकार होता आज.
काहिच्या काहि प्रकार होता आज. खल्लास. कोहलीने short pitch balling ploy च्या पुरा बोजवारा उडवला आज. पहिल्या काहि पुल shots नंतर half volleys मिळायला लागले.
बॉलिंगचे काहि खरे नाही राव. इशांत नि विनय कुमारचे नशिब जोरावर आहेत.
जबरी बॅटिंग! वर्ल्ड कप
जबरी बॅटिंग!
वर्ल्ड कप फायनलचा फील आला अगदी>>> २००३ च्या फायनल ला ऑसीज नी आपल्याविरूद्ध ३५९ च मारले होते बरोबर
असाम्या आगरकरला विसरू नकोस. विकेट्स कोणीच काढत नसेल तर हा निदान फिल्डिंग तरी करतो
असाम्या आगरकरला विसरू नकोस.
असाम्या आगरकरला विसरू नकोस. विकेट्स कोणीच काढत नसेल तर हा निदान फिल्डिंग तरी करतो >> विकेट्स काढायचा कि तो. फक्त १-२ बॉल अतिशय वाईट टाकत असे प्रत्येक ओव्हरमधे हा problem होता. fielding reliable होती हे खरय.
आगरकर रिलायेबल असतात हे तर
आगरकर रिलायेबल असतात हे तर खरंच
असामी, सहमत. मिलिंदा
असामी, सहमत. मिलिंदा
मिलिंदा
मिलिंदा
मलाही कधी काळी आगरकर आवडत
मलाही कधी काळी आगरकर आवडत असे. तो आला म्हणजे विकेट मिळायची खात्री असे. हळू हळू आपली बॅचच रिटायर होतेय.
ते जाऊदे ! वानखेडेवर सचिनचा
ते जाऊदे !
वानखेडेवर सचिनचा सामना बघायला कोण कोण येणार आहे? एकत्र तिकिट काढायचे का? (मला एकट्याला बोअर होईल हे ही कारण आहेच.)
सामना बघायला कोण कोण येणार
सामना बघायला कोण कोण येणार आहे? > तारखा काय आहेत?
केदार , मला नक्की बघायची
केदार ,
मला नक्की बघायची आहे.
तुला तिकेट मिळत असेल तर मलाही सांग. माझा नं ९४२०४३५०४४
न सांगता काढलस तरी चालेल
इंद्रा १४ ते १८ नोव्हे. आपण
इंद्रा १४ ते १८ नोव्हे.
आपण एखाद दोन दिवस जाऊ शकतो. आपली बॅटिंग असताना.
केदार चालेल. मी नं लिहून घेतो.
अरे काल आगरकर बद्द्ल लिहीले
अरे काल आगरकर बद्द्ल लिहीले तेव्हा त्याने निवृत्ती जाहीर केल्याची बातमी पाहिली नव्हती. या सीझनलाही खेळणार नाही असे दिसते. मागची २-३ वर्षे मुंबईच्या यशात त्याचा बराच हात होता.
अरे काल आगरकर बद्द्ल लिहीले
अरे काल आगरकर बद्द्ल लिहीले तेव्हा त्याने निवृत्ती जाहीर केल्याची बातमी पाहिली नव्हती. >> हो मी पण फेसबूकवर पाहिली. cricinfo ने आत कुठे तरी बातमी टाकली आहे, खास शोधायला लागतेय.
Faulkner take a bow. Look at
Faulkner take a bow.
Look at the bright side, Ishant and Vinay Kumar will be out of the next matches. Or so I hope.
ऑस्ट्रेलिया प्रत्येक मॅच
ऑस्ट्रेलिया प्रत्येक मॅच मध्ये आपली पिसं काढत आहे. ३४५ अॅन्ड काउंटिंग!
जडेजा आणि अश्विन टीम मध्ये का आहेत? जडेजाने दोनदा आउट केले आणि दोनदाही नो बॉल!
भारत -२६९-२ [४० षटकं] नॉट बॅड
भारत -२६९-२ [४० षटकं] नॉट बॅड !
सचिनने रणजी मॅच जिंकून दिली
सचिनने रणजी मॅच जिंकून दिली मुंबईला.
http://www.espncricinfo.com/ranji-trophy-2013-14/content/story/683881.html
भारत जिंकला ३५१-४ !! <<
भारत जिंकला ३५१-४ !!
<< सचिनने रणजी मॅच जिंकून दिली मुंबईला. >> सचिनची काल-आजची संपूर्ण खेळी पाहिली. तंत्र, तंदुरूस्ती, नजाकत व एकाग्रता - कोण म्हणेल सचिन निवृत्त होतोय !!!!
रोहित शर्माचे पदार्पणात शतक
रोहित शर्माचे पदार्पणात शतक !!!
रोहित कसला जबरी खेळतोय ह्या वर्षात.. आयपीएल आणि चँपियन लिगमध्ये कॅप्टन असताना विजय.. दोन सेरिजमध्ये मॅन ऑफ द सिरीज, वन डे त २००.. आणि आता पहिल्याच कसोटीत शतक..
एक मुंबईकर जातो आहे.. त्याची जागा दुसरा घेतो आहे..
एक मुंबईकर जातो आहे.. त्याची
एक मुंबईकर जातो आहे.. त्याची जागा दुसरा घेतो आहे.. > अगदी अगदी. सुंदर फॉर्मात आहे.
<< एक मुंबईकर जातो आहे..
<< एक मुंबईकर जातो आहे.. त्याची जागा दुसरा घेतो आहे.. >> रोहितचा फॉर्म गायब झाला होता आणि त्याची करिअरच संपायच्या बेतात होती, तेंव्हा त्याची खरी गुणवत्ता ओळखून सचिनच न बोलतां त्याची पाठराखण करत होता !! आजची रोहितची खेळी कसोटीच्या निकषांवरही बिनतोड होती. अश्विनही आज ' ऑल राऊंडर' संज्ञेला शोभेसा खेळला.
वे.इंडीजच्या या संघात सुनील नरैन नाही ? चंद्रपॉल मात्र अनादी-अनंताचं रूप घेवूनच वे.इंडीज संघात आपलं स्थान पक्कं करून आहे !!
सुनिल नरेन नाही घेतला....ही
सुनिल नरेन नाही घेतला....ही सर्वात मोठी चुक वेस्ट इंडीज ने केली
रोहितचा फॉर्म गायब झाला होता
रोहितचा फॉर्म गायब झाला होता आणि त्याची करिअरच संपायच्या बेतात होती,
माझ्या मते ..
रोहित मध्ये टेक्निक आहे. कुठल्याही मुंबईकर बॅटसमन सारखे. पण रोहित प्रत्येक फॉर्मॅट हा टि २० सारखा खेळत होता. विकेट वर नांगी टाकून बसणे त्याला जमत नव्हते. २०१३ मधील त्याच्या इनिंग पाहिल्या, अगदी टि २०च्या ही तर त्यात त्याने वेळ घेऊन मग आपला जम बसवला आहे. तेच ऑस्ट्रेलिया मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि हा बदलच (तिथे थांबून खेळपट्टी जोखण्याचा) त्याचे करियर घडवत आहे.
रोहित, धोणी आणि सचिन हे असे फलंदाज आहेत की ते गिअर कधीही बदलू शकतात. खूप कमी लोकं असे असतात, रोहितने ते आता ओ़ळखले आहे.
अर्थात पहिल्या टेस्ट मॅच मध्ये १०० तर रैनानेही मारले आहे पण त्यात टेस्ट प्लेअरची क्वालिटी आहे असे वाटत नाही. ( तो मला आवडतो तरीही) रोहितचे टेक्निक भारी असल्यामुळे तो कदाचित तरेल. आणि तसे व्हावे ही इच्छा!
रहाणेला खूप वेळ बसावे लागत आहे. होप सचिन गेल्यावर जी जागा रिकामी होईल तिथे ( ४ नंबर वर नाही) त्याचा नंबर लागेल. आणि केवळ एक रिझर्व्ह ओपनर म्हणून त्याकडे पाहण्यात येणार नाही.
सध्याच टीम मध्ये तीन ओपनर आहेत. रोहित, शिखर आणि मुरली.
रोहित मला नाही वाटत ऑपनर
रोहित मला नाही वाटत ऑपनर टेस्ट मॅच मधे होईल.. होउ सुध्दा नये त्याने..
ऑपनर म्हणुन शिखर धवन आणि मुरली विजय सध्यातरी बेस्ट आहेत.. परदेशी खेळताना मुरलीविजय ला काही मॅच आणि रहाणेला काही मॅच द्याव्यात.. रहाणे परदेशी विकेट्स वर हुकमाचा एक्का ठरेल जर त्याला योग्य वापरले तर..
सचिन ची जागा रिकामी झाल्यावर
शिखर धवन
मुरली विजय
चेतेश्वर पुजारा
विराट कोहली
रोहित शर्मा
रैना / युवराज / जाडेजा
धोनी
अश्विन ( आजच्या खेळीने तरी त्याची ही जागा पक्की अहे
Pages