Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40
क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
न्यूझीलंड जिंकली.... वॉर्म अप
न्यूझीलंड जिंकली.... वॉर्म अप मॅच
आज भारत श्रीलंका..........
आज भारत श्रीलंका.......... मॅच ........... श्रीलंकेने धुतल्यामुळे ३३३ रन्स केले .... आता आपली पाळी... धुवायचे .. की धुत बसायचे....:)
जिंकले.... सराव सामन्यात
जिंकले.... सराव सामन्यात श्रीलंकावर 5 विकेट राखून विजय...
333 चा पाठलाग करताना 3 विकेट गेल्यावर रैना.. विराट...कार्तिक.. मस्त खेळले...कोहली आणि कार्तिक चे शतक .. दोघांमधे 190 ची भागीदारी...
जबरदस्त खेळ चालु आहे आधी
जबरदस्त खेळ चालु आहे
आधी भारताने ५-५५ वरुन ३०८-६ केले ......कार्तिक फुल्ल फॉर्म मधे... १४५ नाबाद... आणि धोनी ९१
पुर्ण कलटणी मॅच ला
आता ऑस्ट्रेलिया २८-५ विकेट.. पाच ही विकेट उमेश यादव ने घेतले..
एका बाजुने भुवी ने रन्स रोखले आहेत तर दुसर्या बाजु ने यादव विकेट घेत आहे........:)
ऑस्ट्रेलिया 65 वर ऑल आउट...
ऑस्ट्रेलिया 65 वर ऑल आउट...
चाचणी परीक्षेतला पहीला नंबर
चाचणी परीक्षेतला पहीला नंबर वार्षिकपर्यंत टिको म्हणजे मिळवली
पासिंग मार्क्स मिळाले तरी
पासिंग मार्क्स मिळाले तरी पुरे... असे ही आयपीएल खेळल्या नंतर नेहमी दिवेच लागलेले असतात ...त्यापेक्षा इथे चांगलेच खेळत आहेत
.
ऑस्ट्रेलिया ८-९ बॅट्समन घेउन खेळत होती सराव मॅच मधे... तरी सुध्दा ६५ वर ऑल आउट झाली ...:खोखो:.
.
आपल्या बॉलर्सनी कमालच केली आहे
<<.....पहीला नंबर
<<.....पहीला नंबर वार्षिकपर्यंत टिको म्हणजे मिळवली >> मोठ्या स्पर्धेआधीं जिंकण्याची संवय होणं , चटक लागणं म्हणूंया हवं तर, याचा फायदा तर होतोच. शिवाय, इंग्लीश वातावरणात रुळून आपले फलंदाज बहरूं शकतात व तेज गोलंदाज त्या वातावरणाचा पुरेपूर फायदा उठवताहेत या गोष्टी केवळ चँपियन लीगसाठीच नाही तर दूरगामी फायद्याच्याही आहेत !
भारतीय संघाला शुभेच्छा.
अरे धागा तर उघडा ?
अरे धागा तर उघडा ?
या इंटरव्ह्यूमध्ये गांगुली
या इंटरव्ह्यूमध्ये गांगुली फॉर अ चेंज आवडला मला
https://www.youtube.com/watch?v=V3BF5wGKeHc
ऑलरेडी ब्लॉक केलाय व्हिडीओ
ऑलरेडी ब्लॉक केलाय व्हिडीओ किंवा येथे उसगावात दिसत नसेल.
आयसीसी कसोटी अजिंक्यपद
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जून, जुलै २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे २०२१ मध्ये ही स्पर्धा भारतात घेण्यात येईल. आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन म्हणाले की चॅम्पियन्स ट्रॉफीऐवजी आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेताना ४ वर्षात सदस्य देशांनी १६ कसोटी सामने खेळणे अपेक्षित आहे.>>>>>>>>>>>>>
.
.
.
म्हणजे "कसोटी" सामने २०-२० ओव्हर चे होणार ..:खोखो:
<< म्हणजे "कसोटी" सामने २०-२०
<< म्हणजे "कसोटी" सामने २०-२० ओव्हर चे होणार ..>> तसं नसावं. सचिनने अजूनही खूप कसोटी क्रिकेट खेळावं या उदात्त हेतूनेच आयसीसीने ही शक्कल लढवली असणार; पण इथली मंडळी हें थोडंच मान्य करणार !!!
वेस्ट ईंडिज मधे चालू असलेल्या
वेस्ट ईंडिज मधे चालू असलेल्या तिरंगी सामन्यातला अंतिम सामना बराचसा बघितला. विशेषतः भारतीय संघाच्या फलंदाजीतील शेअटच्या पाच ओव्हर्स. अगदी हार्ट अटॅक येईल अशी परिस्थिती. बराच वेळ धोनी नॉन स्ट्रायकर एंड ला, विनयकुमारचा वेडावा़कडा फटका, शेवटी पुनः शेवटच्या ओव्हरपर्यंत धोनी नॉन स्ट्रायकर एंड ला, नि शेवटच्या तीन चेंडूत दोन षट्कार नि एक चौकार मारून धोनीने सामना जिंकला!!!
हे सामने महत्वाचे नसतील, पण फारसे समजत नसताना केवळ क्रिकेट बघायचे, मग ते गल्ली क्रिकेट का असेना, एव्हढे ज्याला क्रिकेट आवडते, त्या मा़झ्यासारख्याला आनंद झाला.
<< त्या मा़झ्यासारख्याला आनंद
<< त्या मा़झ्यासारख्याला आनंद झाला.> > झक्कीजी, तशाच माझ्यासारख्याला पण !
]
धोनी हें एक वेगळेच रसायन आहे याची अधिकाधिक जाणीव प्रत्येक 'कठीण समय येतां ' होतेच; केवळ शेवटच्या षटकातल्या त्याच्या अफलातून खेळामुळेच नव्हे तर ज्या तर्हेने संघ सहकार्यांवर विश्वास दाखवून तो त्याना सर्वोत्तम कामगिरी करायला प्रेरीत करतो ,त्यामुळेही. [ झक्कीजी, हें आपलं जनरल निरीक्षण, क्रिकेट समजायचा त्यांत भाग नाही व आव तर नाहीच नाही .
भाऊ, झक्की... क्रिकेट
भाऊ, झक्की... क्रिकेट जाणकरांनाही धोनीने वेळोवेळी तोंडात बोटं घालायला लावली आहेत... सध्या हे काम तो नित्य नियमीत करतोय याचचं अजब वाटतय.
शेवटच्या षटकाच्या आधी धोनीने
शेवटच्या षटकाच्या आधी धोनीने आपली बॅट बदली होती..जास्त वजनाची बॅट वापरली .... त्याचा प्रत्यय दुसर्याच बॉल वर आला. जो बॅटीच्या खालच्या भागाला लागुन सुध्दा. खुपच उंच जाउन स्टेडिअम च्या छताला लागला..
जबरदस्त मॅच झाली.....जशी जाडेजाने मॅच ला कलाटणी दिली त्याच प्रकारे हेरंगा ने ४ विकेट घेउन मॅच ला दिली...
दोन्ही संघांमधे एकच मुख्य फरक होता...श्रीलंका कडे मॅथ्युस होता... ज्याने तब्बल ३-४ षटक बाकी असताना आत्मघातकी फटका मारुन विकेट बहाल केली
आणि .. भारता कडे धोनी होता जो शेवटच्या ओव्हर पर्यंत थांबुन खेळला आनि मॅच जिंकुन दिली
अरे तिकडे अॅशेसमध्ये तो अगर
अरे तिकडे अॅशेसमध्ये तो अगर काय जबरी खेळतोय.. पदार्पणात ११ नंबरवरून ९८ धावा.. लैच भारी
शिखर धवन ची धमाकेदार इनिंग
शिखर धवन ची धमाकेदार इनिंग
२४८ रन्स फक्त १५० बॉल्स मधे ३० चौकार ७ षटकार
थांब रे, मॅच सम्पू दे. ह्याच
थांब रे, मॅच सम्पू दे. ह्याच पिचवर मागे आफ्रिकेने ४००+ केलेले aus ला हरवताना
अरे मला विश्वास आहे आपल्या
अरे मला विश्वास आहे आपल्या बॉलर्स वर
इंग्लंड जिंकले हो एकदाचे
इंग्लंड जिंकले हो एकदाचे चौथ्या कसोटीत (७४ धावांनी)! सुरवातीचे मोहरे पडल्यावर कांगारू पार लुडखले!!
-गा.पै.
कपिल देवचा ऑल टाइम संघ बघितला
कपिल देवचा ऑल टाइम संघ बघितला का?
जडेजा आहे आणि द्रवीड नाही?..... आश्चर्य आहे ना!
आणि चक्क अझरुभाई संघात?
http://www.dailymail.co.uk/sp
http://www.dailymail.co.uk/sport/cricket/article-2402084/The-Ashes-2013-...
अॅरॉन फिंचला पुढच्या लिलावात
अॅरॉन फिंचला पुढच्या लिलावात १मिलीयन नक्की, आयपीएलला.
गेलचे रेकॉर्डही तोडले सिक्सेस चे - १४ सिक्सेस! अजून काही वर्षांनी २०-२० मधे फोर्/सिक्स मोजण्यापेक्षा फोर्/सिक्स न मारलेले बॉल्स मोजतील बहुधा
अॅरॉन फिंचला पुढच्या लिलावात
अॅरॉन फिंचला पुढच्या लिलावात १मिलीयन नक्की, आयपीएलला. >> पुणे warriors कडून खेळला न दोन सीझन्स. फार काही केले नव्हते त्याने.
>>फार काही केले नव्हते
>>फार काही केले नव्हते त्याने.
गेल्या सीझनमध्ये बरा खेळला होता की तो पुण्याकडून!
राहुल द्रवीडचा अजुन एक मस्त
राहुल द्रवीडचा अजुन एक मस्त इंटरव्ह्यू
http://www.youtube.com/watch?v=ctKTtXr50-Y
तिन्ही भाग छान आहेत.... खासकरुन ३ रा भाग ज्यात TCS employees नी प्रश्न विचारलेत
निवृत्ती जाहीर केली आता
निवृत्ती जाहीर केली
आता कशासाठी पाहायचे क्रिकेट?
"All my life I have had a dream of playing cricket for India. I have been living this dream every day for the last 24 years. It’s hard for me to imagine a life without playing cricket because it’s all I have ever done since I was 11 years old. It’s been a huge honour to have represented my country and played all over the world. I look forward to playing my 200th Test Match on home soil, as I call it a day.
I thank the BCCI for everything over the years and for permitting me to move on when my heart feels it's time! I thank my family for their patience and understanding. Most of all, I thank my fans and well-wishers who through their prayers and wishes have given me the strength to go out and perform at my best."
फेसबुक पेजवरून
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/45739
सचिन च्या निवृत्तीचा धागा ... आपले मनोगत कृपया लिहावे
Pages