क्रिकेट - २

Submitted by मास्तुरे on 10 November, 2011 - 11:40

क्रिकेटचा ह्या जुन्या धाग्याचा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे तो लोड व्हायला वेळ लागतोय. म्हणून हा नवीन धागा. इतर काही धागे काही विशिष्ट मालिका संबंधातच आहेत (उदा. विंडीजचा भारत दौरा - २०११). त्या विशिष्ट मालिका सोडून क्रिकेटविषयीच्या इतर गप्पांसाठी हा धागा वापरता येईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< बाहेर आपले बॅट्समन तर चालतील,>> आपल्या फलंदाजांची प्रतिभा खरंच वादातीत आहे. फक्त आपल्या सहजसुंदर फटकेबाजीला त्यानी थोडी मुरड घालून जपून खेळणं अत्यावश्यक आहे.
<< पण आपण २० विकेट काढू का?>> खरंय. आमलाचा खेळ व टेपरॅमेंट पाहिल्यावर तर ती एक विकेट मिळवणंही महाकठीण वाटतंय !
<< त्यामुळे आपले स्पिनर्सच तिथे चाचपडणार. >> कदाचित, ओझासारखे चेंडूला उंची देणारे स्पीनर्स तिथं कांहीसे अधिक यशस्वी होतील असा आपला माझा अंदाज.
एरॉन व उमेश यादव याना हिरो बनण्यासाठी द. आफ्रिकेचा दौरा एक सुवर्णसंधी ठरूं शकते, हेंही खरंय.

जगातील बहुतेक हवामान व खेळपट्ट्या यांची सांगड घालण्याची सुविधा का उत्पन्न केली जात नाही?

पण कश्शाला उग्गीच्च एव्हढे कष्ट करायचे? मिळताताहेत ना पैसे, हरले काय नि जिंकले काय, पैसे तर मिळताहेतच ना!! खेळाडूंची काही तक्रार आहे का? त्यांना थोडे जास्त पैसे देऊ.
आता कुणि बाहेरच्या माणसांनी येऊन करून देतो स्वस्तात म्हंटले तर बघू. पण आपण काम करायचे नाही. खरे साहेब पूर्वीच गेले, आता आपणच साहेब. आपण ही असली कामे करत नाही. आपण बसणार नि चैन करणार.
Proud

<< बाहेर आपले बॅट्समन तर चालतील,>> - मला वाटते कि द. आफ्रिकेच्या खेळ्पट्ट्या व बोलर्स समोर, नवीन बॅट्समनना ते तितकेसे सोपे नाही.
<< पण आपण २० विकेट काढू का?>> ते पण शक्य वाटत नाही, पण खेळ्पट्ट्या मदतीला असल्यामुळे बोलर्स(स्विंग करणारे) काहितरी करुन दाखवू शकतात.

उपाय एकच. Adapt. उमेश यादवला सध्या आपण विसरलो आहोत. पण तो सा अ साठी फिट असणार आहे. आणि जर त्याने त्याच्या पेस आणि विवधते मध्ये शॉर्ट बॉल वर सराव केला तर एक डेंजर बॉलर नक्कीच तयार होईल. सोबत इशांत शर्मा असेल पण भूवनेश्वर कुमारचे काही खरे दिसत नाही. (टेस्ट साठी वनडेत तो जबरी बॉलर आहे.) केवळ एका इनिंग मध्ये ( आठापैकी) त्याने नीट टाकली त्यामुळे हि इज डाऊटफुल.
>> मी उलत म्हणेन, आफ्रिकेमधे line and length ह्यावर control असलेले स्विंग बॉलर्स उपयोगी येतात. फिलँडर हे आदर्श उदाहरण आहे. येत्या काहि महिन्यांमधे स्टेन मॉर्केल्सारखे बॉलर्स तयार करता येणे शक्य नाही तेंव्हा आहे त्या talent चा योग्य उपयोग करणे अधिक जरुरी आहे. अ‍ॅरॉन injured होता नि तोवर तयार होईल कि नाही माहित नाही पण पुरेशा सरावाअभावी त्याला पाठवू नये असे मला वाटते. इशांत पण कुठल्यातरी surgery साठी जाणार होता. अर्थात आयपील नंतर जाणार असेल तर तो कितपत match ready असेल हे देव जाणे.

. त्यामुळे आपले स्पिनर्सच तिथे चाचपडणार. >> मला भाऊंसारखे वाटतेय, left hand orthodox spin can be effective in RSA. आत्ता जाडेजा कि ओझा हा कळीचा प्रश्न असेल. मी पहिल्याला पसंती देईन.

सद्य परिस्थितीवरून असे दिसते की बाहेर आपले बॅट्समन तर चालतील, पण आपण २० विकेट काढू का? >> Happy अमलाचा purple patch सुरू होईल अशी आशा धरून चालू Wink कोहली , पुजारा नि विजय ह्यांच्या साठी खरी परिक्षा असेल. धवन surprise package ठरू शकतो. राहाणे व्यक्तिरिक्त, गंभीर ला middle order backup or opener म्हणून घेऊन जावे.

असो सध्या, ४-० enjoy करूया Happy
ह्या दौर्‍याची सर्वात defining inning धोनीचे २०० होते. It wrestled momentum out of aussies and gave generated tremendous initiative for indians to win. निव्वळ ह्या कारणास्तव माझ्यासाठी तो man of the series आहे. आत्ता होऊन जाऊ दे Wink

>>चॅपेल-द्रविड ते करतील असे वाटले होते पण त्यांना ते जमले नाही
द्रविडच्या कॅप्टन्सीची चर्चा करताना लोकांना फक्त २००७चा विश्वचषकच लक्षात रहातो हे खरच दुर्दैव Sad
खर म्हणजे द्रवीडच्या काळात भारतीय संघाने खरच छान परफॉर्म केले!
द्रवीडच्या संघाची वनडे मधील विजयाची सरासरी ५३ आहे (अझर-५४ आणि गांगुली-५४ पेक्षा फक्त एकने कमी)
१९७१ नंतरचा वेस्टइंडीजच्या धरतीवर २००६ मध्ये मिळवलेला पहीला कसोटी मालिका विजय, १७ सलग एकदिवसीय विजय, द. अफ्रिकेच्या मातीत त्यांच्यावर मिळवलेला पहीला कसोटी विजय, २१ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २००७ मध्ये इंग्लंडमध्ये मिळवलेला कसोटी मालिका विजय, इरफान पठाण आणि धोनीचा पिंच हिटर म्हणून केलेला यशस्वी उपयोग, आरपी, श्रीशांत सारख्या तरुण गोलंदाजांवर दाखवलेला विश्वास आणि त्यांच्याकडून कडून करुन घेतलेली इन्स्पायर्ड कामगिरी अश्या अनेक मौल्यवान भेटी त्याने भारतीय क्रिकेटला दिल्या

हे सगळे म्हणजे भारतीय क्रिकेटला पुढे नेणे नाही असे म्हणायचेय तुला फारेंड मित्रा?

>>या सिरीज मधले विजय हे १९९३ सालापासून पुढची काही वर्षे अझर च्या टीमने 'घरी' मिळवलेल्या विजयांसारखेच वाटले. तेव्हा कुंबळे, राजेश चौहान व व्यंकटपथी राजू होते आता जडेजा, आश्विन व ओझा/भज्जी. त्यामुळे वीस वर्षांपूर्वीचा 'सध्या घरी जिंका, बाहेरचे नंतर बघू' फॉर्म्युला पुन्हा वापरलेला दिसतो.>>
या बाबतीत मात्र १०० टक्के सहमत!

उमेश यादव तर आहेच पण भुवनेश्वर कुमार त्याच्या अचुकतेमुळे आणि स्विंगमुळे आफ्रिकेत जास्त प्रभावी ठरेल... श्रीशांत आयपीलमधून परत फॉर्मात आला तर त्याच्यासाठी पण आफ्रिकेचा दौरा ही चांगली संधी असेल Happy

हो त्या वरच्या मुद्द्याबाबत सहमत आहे स्वरूप. मी लिहील्यानंतर तोच विचार करत होतो, की खूप 'अनुदार' झाली ती कॉमेंट. २००७ च्या वर्ल्ड कप मुळे ते सगळे झाकोळले गेले. विंडीज व इंग्लंड मधले मालिका विजय नक्कीच क्रेडिटेबल होते.

मात्र खेळाडूंबाबत जरा मी साशंक आहे. ह्यूमन अँगल या दोघांच्या दृष्टीने कधीच महत्त्वाचा वाटला नाही. किंबहुना इरफान पठाण चॅपेलमुळेच वाया गेला असे मला अजूनही वाटते.

एकूण त्यांनी संघ पुढे नेला, नक्कीच. पण त्याच काळात संघातील वाद बरेच वाढले. कारण चॅपेल चे लोकांचे हॅण्डलिंग सचिनसकट इतर बर्‍याच जणांना आवडले नाही. चॅपेल ऑस्ट्रेलियन पद्धत येथे राबवू पाहात होता (Results matter, people don't) ते भारतात सध्यातरी चालणार नाही.

भारतात ज्या लेव्हलचा फॅन बेस आहे त्याला क्रिकेट म्हणजे एक स्टोरी लागते व किमान एक हीरो लागतो. तसे नसेल तर अनेक मॅचेस जिंकल्या तरी प्रत्यक्षात बघणारे तेवढे मिळणार नाहीत. भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तो आपण त्यात स्वतः इतकी emotional investment केलेली आहे म्हणून आपल्यासाठी जिंकावा असे वाटायचे तितकेच तो सचिनच्या कारकीर्दीत जिंकावा असेही जवळजवळ प्रत्येकाला वाटायचे. जणूकाही हा सगळा एक चित्रपट असून सचिन निवृत्त होण्याआधी त्याचे लक्ष्य त्याला मिळावे असे बहुतेक सर्व फॅन्सना वाटायचे.

मला तर द्रविडच काय पण चॅपेलचा हेतू अजिबात चुकीचा वाटायचा नाही, पण खेळाडू ही माणसेच असतात आणि त्यांचे इगो, भावना वगैरे सगळे गृहीत धरून निर्णय घ्यावे लागतात हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांचे "Systems, methods and processes" राबवायला जेवढा पब्लिक व बोर्ड पेशन्स हवा तेवढा दोघांनाही (पब्लिक व बोर्ड) नव्हता. ऑस्ट्रेलियाने साधारण अशाच पद्धतीने त्यांचा संघ ८५ नंतर वर आणला होता. पण सध्याच्या भारतात तसे होणे फार अवघड आहे.

भारती क्रिकेटमधे सत्तेचा क्रमांक घसरत्या स्केलवर BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, BCCI, दौर्‍यावरचे administrative पित्तू, निवड समिती, खेळाडू, कोच असा आहे. ह्यातले BCCI हे universal constant सारखे आहे हे चॅपेलला (गांगूली नि द्रविडलाही) कळले नाही.

आता भारतात खेळपट्ट्या करण्याच्या उपद्व्यापापेक्षा सोप्पा मार्ग आहे. बक्कीच्या खेळाडूंना दर वर्षी सहा महिने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया वगैरे ठिकाणी पाठवायचे. नंतर केन्या, झिंबाब्वे, कॅनडा अश्या संघांना भारतात बोलावून धू धू धुवावे, म्हणजे काय, परदेशात हरले तरी भारतात जिंकले म्हणजे भारतातले लोक बक्कळ पैसा देऊन बघायला येतीलच. त्या खेळाडूने मनावर घेतले तर तो शिकेल नवीन तंत्र. मग एकदा तो संघात आला वीसेक वर्षे नक्कीच संघात रहातोच. म्हणजे पैसे वसूल.

आजकाल भारतातल्या आय टी वाल्यांना नाही का वर्षे च्या वर्षे परदेशी रहायला लावतात.

म्हणजे काय, परदेशात हरले तरी भारतात जिंकले म्हणजे भारतातले लोक बक्कळ पैसा देऊन बघायला येतीलच. >> अहो भारतीय म्हणजे तुम्हाला world series मधे खूश होणारे अमेरिकन वाटले का ? Lol

http://www.espncricinfo.com/blogs/content/current/story/626650.html >> हे रत्न चुकवू नका Happy

या तुमच्या यादीत कुठे क्रिकेट खेळाचा दर्जा उंचावणे हे येत नाही का?>> सत्तेच्या क्रमांकाच्या यादीत ? नाही येत Happy

आत्तां 'क्रिकइन्फो'वर बॉयकॉटची मुलाखत ऐकली. त्याने भारत वि. ऑस्ट्रेलिया व आगामी भारत वि. द. आफ्रिका मालिकांसंदर्भात मांडलेले मुद्दे -
१] ऑसीजना सदैव जिंकत रहायची कांही दैवी देणगी नाही. पण गेले आठ-दहा वर्षं जिंकत असताना त्यानी जी मग्रुरी [ अ‍ॅरोगन्स] दाखवली त्यामुळे आतां त्यांच्या पडत्या काळात त्याना सहानुभूति मिळणं कठीण आहे; आपण त्यांच्या या पडत्या कालखंडाची मजाच लुटायला हवी !
२] द. आफ्रिका दौर्‍यासाठी मुख्य म्हणजे भारतीय फलंदाजानी उसळते चेंडू खेळण्याचा मिळेल तेवढा सराव करत राहिलं पाहिजे. द. आफ्रिकेत खेळण्याची तीच खरी कसोटी आहे.

ह्या धाग्यावर माबोकरानी तरी वेगळं काय म्हटलंय !!! Wink

बॉयकॉट वाचत असेल मायबोली!
नाहीतरी भारतीयांनीच जगाला सर्व ज्ञान दिले. आता प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी सुद्धा ते आजकाल परकियांकडे पहातात असे वरवर दिसत असले तरी शेवटी हे ज्ञान त्यांचेच होते ना! मग खरे तर तेच ज्ञान - परदेशात काय नि भारतात काय?
Wink

<< मग खरे तर तेच ज्ञान - परदेशात काय नि भारतात काय?>> झक्कीजी, ऑसीजची वृत्ती सर्वज्ञात असली तरी एका गोर्‍याने उघडपणे तीची टर उडवणं , हें कांहीसं आगळं ! Wink

द्रविडचे अभिनंदन! बघतो मुलाखतही!

परवाच त्याने ते इंग्लंड मधे २०-२० ला अचानक निवड झाल्यावर एका मॅच मधे मारलेले ३ सिक्सर्स आठवले Happy
http://www.youtube.com/watch?v=sqa5bH-WjC0

द्रविडचं मनापासून अभिनंदन.
खेळातच नव्हे तर जगण्यातही इतकं आदर्शवत असणं कसं काय जमतं एखाद्याला !
स्वरुपजी, धन्यवाद मुलाखतीच्या लिंकबद्दल.

कालच्या दिल्ली विरुध्दच्या मॅच मधे उत्कृष्ट फलंदाजी केल्यावर क्षेत्ररण करताना राहुल जायबंदी झाला. त्यानंतर ब्रॅड हॉजने अटतटीच्या सामन्याची सगळी सुत्र हलविली. सामना जिंकल्यावर आभार प्रदर्शनच्या वेळी राहुलने ब्रॅड हॉजला सोबतीला बोलवून त्याचा योग्य सन्मान केला. असे प्रसंग क्रिकेट मधे फार दुर्मिळ.

चॅम्पीअन लीग चा धागा काढा.....
.
.न्युझीलंड ची जर्सी बदलली... नेव्ही ब्लू.... छान डीझाईन ... इंग्लंड ची बदलून.. लाल रंग जर्सीचा केला

>>.न्युझीलंड ची जर्सी बदलली... नेव्ही ब्लू.... छान डीझाईन ... इंग्लंड ची बदलून.. लाल रंग जर्सीचा केला
अरेरे.... न्युझीलंडची चांगली होती की ब्लॅक कलरची
इंग्लंड एकदम लाल का म्हणे?

Pages