बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिर्‍याचा केक नव्हता का? रव्याचा होता का मग? तू असंच काहीतरी नाव सांगितलेलं आठवतंय मला.

मी केलेल्या शाही बिर्याणीला हा मामा फो भा म्हणत होता.
>>
आज्जे, तू बहुतेक भरपूर काजू-बदाम-बेदाणे घातले नव्हतेस त्यात. म्हणून मला फोभा वाटला Proud

मी गेल्या आठ दिवसात भरवां करेला, आलू-भिंडी-तिल, व्हेजिटेबल विंदलू, शहाजानी कुर्मा, कच्च्या टॉमेटोची भाजी, अळंबी मसाला अश्या अनेक भाज्या .... शिजवून खाल्या आहेत.. Happy

>>शिजवून खाल्या आहेत..
कच्च्या भाज्या, मसाल्यांत मिसळून, फ्रीजर किंवा फ्रिजात- डब्यात भरून कुणी ठेवल्या होत्या?? (एवेएठीला प्रात्यक्षिक द्या. तर विश्वास ठेवता येईल. :P)

चवीला पण फो भा होता का?
>> ऋतं वच्मि करू का सत्यं वच्मि करू? Proud

शहाजानी कुर्मा
>>
अरे वा, म्हणजे त्याकाळी मुमताजची चंगळ होती म्हणायची. सुगरण नवरा, खायला कुर्मा, नंतर रहायला ताजमहाल!

एवेएठीला देसाई आणि शोनूचं आयर्न शेफ बारा जुगलबंदी करा. बुवा : अ‍ॅल्टन ब्राउन-(कमेंट्रेटर), भाई : मार्क डेकास्कोज (?) ऊर्फ चेअरमन.
सी. इं. : व्होडका. (सीक्रेट असल्यामुळे कोण्णाला कळणार नाही.)
जजेस : झक्की, मैत्रेयी
स्पेशल क्रिटिक : सिंडी.

स्पेशल क्रिटिक : सिंडी
>>
अरे बापरे. देसाई, तुमच्या कुर्म्यात भरपूर काजू-बदाम-बेदाणे घालायला विसरू नका.. Proud

(बास, काजू बदामावर शेवटची पोस्ट. आज्जी चिडेल नाहीतर माझ्यावर.)

मामा, पुढल्या वेळी आलास की चहा सुद्धा विचारणार नाही, तू माझ्याकडून नेलेले सर्व डबे परत आणलेस तरी Proud

स्वेटरानं काय होतंय? आता ऑक्टोबरात आलं तरी विंटर जॅकेट घालावं लागेल तुमच्या बारात. थंडीची सवय नाही राहिली.

नाही हो भाई. जमलं तर अगदीच ऐनवेळी सांगेन. सध्या तरी नाही.

मामाआताइकडेसटकलंकानायतुम्हीउगाचट्यँवट्यँवकरताबघा. Proud

जमलं तर अगदीच ऐनवेळी सांगेन. सध्या तरी नाही. << चला या निमित्ताने न येण्याची कारणं सुरू झाली Proud
कुर्म्यात भरपूर काजू-बदाम-बेदाणे <<< शहाजहान काही म्हणाला नाही, मी त्याशिवाय केला तेव्हा.
पण आपण असा कुर्मा करू की चव घेताच तो कुर्मा वाटेल (फो भा नाही). Proud

यावेळी विशेष काय आणावे त्यावर विचार करतोय.. पापलेट/व्हेज मान्चुरियन्/कोलंबी/बिर्याणी झालेली आहे... स्वाती नाही तेव्हा काहीतरी विशेष आणलं(च) पाहिजे.. Happy

अर्थाचा अनर्थ सगळा.. स्वाती (येत) नाही, तेव्हा (तिच्याऐवजी मी) काहीतरी विशेष आणलं(च) पाहिजे (म्हणजे लोकांना चांगलं खायला मिळेल.. असं वाच ते.. Proud

झक्की,फचिन्,सिंडरेला,पन्ना,बिल्वा, प्रज्ञा, नांव नोंदणी करा.
केली ना नाव नोंदणी. मी १२ ता.ला येणार आहे. वैद्यबुवा सांगतील, तिथे, सांगतील त्या वेळी हजर राहीन. माझ्याबरोबर कुणाला आणायचे असेल तर सांगा.

झक्की,
वरती नावनोंदणी मधे तुमच नाव दिसत नाहीये.

फॉल २०११ साठी नांवनोंदणी च्या लिंक वर टिचकी मारा.
तुमच्या बरोबर कुणाला आणायच ते तुम्हीच ठरवा Happy

झक्की वरती नांव नोंदणी करण्यासाठी वेगळा Tab आहे..

... मायबोलिकर जाणार आहेत.. च्या वरती..

भाई कोलंबी आधीच झालेली आहे.. आणि स्वातीला ती चालत नाही Happy

अहो पण स्वाती येत नाहीये ना! जे येतायत त्यांना चालेल की कोलंबी. Proud
रंपा तर नायच नाय पण साला चखण्याची पण बोंब, हत्त्त! थुत्त आमच्या जिंदगानी वर... Proud

इथून पुढे प्रत्येक पोस्टची सुरुवात 'स्वाती येत नाही......' अश्या वाक्यापासून करावी!
स्वाती येत नाही त्यामुळे गाणे म्हणणार्‍यांच्यात एक कमी. मला आजपासून १२ तारखेपर्यंत शिकायला वेळ नाही, नाहीतर मी म्हंटले असते!

(माझे गाणे इतरांना ऐकायला लागेल या भीतीने तरी स्वाती ठरवतील, की त्यापेक्षा "मी जातेच बै"!, अशी आशा आहे)

Pages