बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रद्दीकरण! Lol
शिटं वाढवा रे आता!

सायो, हो नेहमीसारखं कारपूलच करुयात.
झक्की, तुम्ही काळजी करु नका. मी घ्यायला येइन तुम्हाला.

गटग सकाळी १०.३८- ५.३८ ह्याच वेळात का असणारे? <<<

कमी उपस्थिती आणि वेळेच्या बंधनामुळे हे ए.वे.ए.ठि. १०:४३ - ५: ३६ या वेळात करणेत येईल याची नोंद घ्यावी.
प्रत्येकी किमान एक कार्यक्रम (गाणे, नकला, एकपात्री, दोरीवरच्या उड्या, लंगडी, मलखांब, उणीधुणी ) अपेक्षित आहे..

हुकूमावरून Proud

>> कमी उपस्थिती आणि वेळेच्या बंधनामुळे हे ए.वे.ए.ठि. १०:४३ - ५: ३६ या वेळात करणेत येईल
या वेळेच्या आधी किंवा नंतर हजेरी लावणारे खोखो या पारंपारीक खेळाचे प्रात्यक्षिक दाखवतील. Proud

५:३६ नंतर काळोख पडतो, आणि काही लोकांना काळोख चढतो देखील.. म्हणून बंधन..
बाकी या ठिकाणी रंपा वर पूर्ण बंदी आहे.. तेव्हा 'करोना प्यार' बरोबर आणू नये..

>> बाकी या ठिकाणी रंपा वर पूर्ण बंदी आहे..
Proud

(मॅगी, रॅप्स आणि फ्रूट पंच जीटीजीला हार्दिक शुभेच्छा! :P)\

बुवा, आता तुम्ही बिन्धास्त सोडा पाजा सगळ्यांना. काही फॅन्सी नाव द्यायची गरज नाही. Proud

कोणीची मुंज वगैरे करायची असेल तर उरकून घ्या. फारच सात्विक ठिकाण आहे. ओट्या बिट्या भरायच्या असतील तर ते हे करुन घ्या. Proud

रंपा नसल्याने हळदीकुंकु करता येत नाही. नाईलाज को क्या इलाज Proud

कोणीची मुंज वगैरे करायची असेल तर उरकून घ्या >>>> Biggrin

एवढे कमी लोक येणार असतील तर सरळ जानेवारीमध्येच करूयात की गटग. तेव्हा बारातले सगळे असतील, डीसीवाले पण येतील. आत्ता नोव्हेंबरात केला की मग हिवाळी गटगला कोणी येणार नाही.

सत्यनारायण घाला तिथे >> मागच्या वेळी शिर्‍याचा केक आणला होता प्रज्ञा९ यांनी. त्यांना यावेळी प्रसादाचा शिरा आणायला सांगा.. Proud

अरेरे. आम्ही एवढ्या लांबून खास पहिल्या वहिल्या बारा गटग साठी येणार आणि मेन्यू काय तर मॅगी आणि व्हेजी रॅप Sad हेच का अगत्य बाराकरांचं Proud

शिर्‍याचा केक >>> Uhoh

प्रज्ञा९ यांनी>>>> हा आदर वाटायचं कारण?

अजून कशातच काही नाही माझं गटगचं, नाहीतर तुझ्यासाठी मुद्दाम एखादी रेसिपी बिघडवून आणली असती! Proud Light 1

सत्यनारायण??? मै, तुला येणं कॅन्सल करायला सबळ कारण आहे बघ!! Proud छे छे!! काय दिवस आलेत बारा एवेवएठीवर!!! अगदीच तूप-मीठ-भात, साय-साखर-भात एवेएठी वाटतंय. हॉलात नाही तर कुणाच्या मोटारीत बसून पानसुपारी/ हळदीकुंकू जमतंय का बघा. Proud मग बाकी करमणुकीचे कार्यक्रम हॉलात.

ए बिल्वा, तू माझ्याकडे ये गं! Wink
तू, मी आणि बाई तिघी मिळून विद्रोही गटग करू! तू असलीस की बाईंना दुपारी चहापण देशील. माझ्याकडे सामान आहे चहाचं, तू कर. मी आपली !!! घेईन हो! Proud

काय दिवस आलेत बारा एवेवएठीवर!!! >>> काय तर! ते रसभरीत वृत्तांतच्या वृत्तांत वाचून कधी यायला मिळेल असं वाटायचं. एवढ्या लांब गाडी हाकत दही भात खायला यायचं?? Uhoh

बाई का म्हणे विद्रोही गटग करताहेत?

तू असलीस की बाईंना दुपारी चहापण देशील.>> हुश्शार हो तू Happy

इतक्या लोकांची दृष्ट लागतेय ना आमच्या गटगला.
विनय, प्लीज हॉलच्या दरवाज्यात चामडी चप्पल, काळी बाहुली वगैरे काहीतरी बांधाच. Proud

एवढ्या लांब गाडी हाकत दही भात खायला यायचं??>>> ओ बिल्वाबाई, तुम्ही येताना वाटेत न्यूयॉर्कातून काही पिकप केलंत तर चालेल की. फक्त थोडं जास्त आणा Proud

शिर्‍याचा केक >>> प्रज्ञा, मी केलेल्या शाही बिर्याणीला हा मामा फो भा म्हणत होता. त्याचं फार मनावर घेऊ नकोस. यंदा तुझा तो भरपूर काजु-बदाम-बेदाणे घातलेला शिराच आण कसं Happy

Pages