निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी, खरे तर हि झाडे कोकणात ठिकठिकाणी आहेत. त्याच्या शेंगाही असतात. इथे फोटो आहेत. दिसायलाही सुंदर असतात हि फुले.

साधना डोंन्ट वरी. मी तुला परत देईन तोंडलीचा वेल. माझ्याकडचे जगले आहेत.

ब्रम्हकमळा साठी शुभेच्छा Happy

मग जागू वेल देताना साधनाला कोणते गाणे म्हणेल?

तोंडल्याचा वेल लाव ग साधना लाव ग साधना, मग लाग कामाच्या साधनेला साधनेला,
कळिचे फुल होउ दे ग साधना होउ दे ग साधना मग जा तुझ्या कोकणला, कोकणला Happy

माझ्याकडे बाग करायला जागा नसल्यामुळे, आम्ही ग्रिलमध्येच कुंडया ठेऊन बागेची हौस भागवतो. याच आमच्या बागेत माझ्या वडिलांनी, एका पिशवीत, चाफा, भोपळा, आणि सरकी(कापूस) बिया लावल्या. त्यातल्या चाफ्याला आमच्याकडे येण आवडलं नाही. Uhoh
पण कापूस आणि भोपळा मात्र मस्त झालाय. (वेल) भोपळ्याचा वेल, सगळं ग्रिल आपल्या एकट्याच्याच मालकिचं असल्यासारख सगळीकडे पसरलाय. आणि आमची बाकीची रोपे, जीव (की गळा)मुठीत घेऊन जगतायत. कारण, हा वेल जाता जाता जे वाटेत भेटेल, त्याला गळामिठी मारत चाललाय.
DSCN0356.jpg

काही दिवसापूर्वी, लिलीच्या रोपट्याला त्याने पकडले होते. Wink पन आमच्या घरातील सजग नागरिकानी तिला त्याच्या तावडीतून सोडवले.
ही पहा त्याने ओव्याला मारलेली गळामिठी. Lol
DSCN0378.jpg

शोभा, भोपळ्याचा वेल इतर कुठल्याच रोपट्याला जगू देणार नाही. त्याचे कोवळे कोवळे तुरे खुडून त्याची पालेभाजी करता येईल. जर वरच्या दिशेने बांधून वाढवता आला तर उत्तम. भोपळा धरला तर मात्र खाली आधार देऊनच वाढवावा लागेल.

सगळ्या निसर्गप्रेमींचे अभिनंदन.

शोभा ओव्याच पण झाड आहे तुझ्याकडे. भोपळ्याच्या कोवळ्या कोंबांची भाजी कर.

शोभा, मोनाली Proud Happy

शोभे, आता तुच मला पार्टी दे १००० व्या पोस्टबद्दल.

शांकली, "मासे" आणि "कल्ला" उद्या कल्लेल Proud

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जागू!!!!

25052011480.jpg

अशीच सोनेरी सकाळ तूझ्या आयूष्यात वर्षानूवर्षे येवो.

नाजुक इवले सान सानुले
मोती ओंजळी धरले गं......
रंग गर्द सृजनाचा लेऊन
तुझ्याचसाठी सजले गं..........

motee.jpg

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.............जागूतै ..........

अरे, जागू आज काय बड्डे वाट्टं!
जागू तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! हे घे तुला माझ्या बागेतली मस्तपैकी फुलं!

DSCN1009.JPGDSCN1008.JPGDSCN1007.JPGDSCN1006.JPG

अशीच सोनेरी सकाळ तूझ्या आयूष्यात वर्षानूवर्षे येवो.>>> + १

जागु मग आज कोणता मासा कापणार? बाकिच्याना कोणता केक असे विचारते तुला कोणता मासा असे विचारले Proud

वाढदिवसाच्या शुभेच्छा. Happy

जागु,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे आणि येणारी सगळी वर्ष तुला खुप खुप माशांची नव नवीन पदार्थांची आणि खुप खुप पाना फुलांची जावो Happy

वाव.. जागु हॅपी बर्थ्डॅ ग..

जिप्सीने दिलेली फुले मीच दिलीत असे समज.. त्याच्या, मानुषीच्या नी दिनेशच्या इतक्या सुंदर फुलांच्या नजराण्यावरुन तुझी नजर हटायचीच नाही. Happy

(मासे पाळलेले आहेत म्हणुन जागुला विश करताहेत, समुद्रात असते तर त्यांनी असले काही उच्चारलेच नसते Happy )

शशांकचे पानही खुप छान आहे.

(मासे पाळलेले आहेत म्हणुन जागुला विश करताहेत, समुद्रात असते तर त्यांनी असले काही उच्चारलेच नसते )>>>>>:फिदी:

पणजीला खास गोवन मासे नी इतर पदार्थ कुठे मिळतील कुणी सांगेल का?????>>>>पणजीतच Proud Wink

साधना, मोठ्या हॉटेलमधे न जाता छोट्या हॉटेलमधे जा. पणजीला जेटी जिथून सूटते त्याच्यासमोर एक छोटे हॉटेल आहे. पणजी गावात बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूला एक आहे. साई सर्व्हीसच्या (पणजीच्या आधीचा स्टॉप ) समोर एक छोटे हॉटेल आहे. तिथून पणजीचे विहंगम दृष्यही दिसते.

माहित आहे... Angry
(जिप्स्या, तु भेटच आता... )

दिनेश, धन्यवाद. मागे मोठ्या हाटेलात चिकन झाकोटी नावाचा भयानक पदार्थ खाल्ल्याची बेक्कार आठवण आहे अजुन. म्हणुन ह्यावेळी काळजी घेतेय.

Happy

साधना, आंबोलीबरोबरच गोव्याचापण प्लान आहे वाटतं. Happy
गोव्याला गेलीस तर (आणि सीझन असेल तर) "रतन अबोलीचा" फोटो काढ आठवणीने. Happy

Pages