निसर्गाच्या गप्पा (भाग-३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2011 - 01:40

निसर्गाच्या गप्पांचा तिसरा भाग चालू होत आहे त्याबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे अभिनंदन. व त्यांच्यासाठी हे शंभर पाकळी कृष्णकमळाचे फुल.

निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या खुप छान आहेत फोटो.

आपण एकटे कुठेच नसतो रे, आजूबाजूचा निसर्ग नेहमीच सखासोबती असतो, उलट शहरातल्या गर्दीतच एकटेपणा जाणवतो. Happy

ह्याचे नाव काय आहे| माझ्या ऑफिसच्या आवारात भरपुर आहेत ही झाड. मी जेंव्हा नविन लागले तेंव्हा ही झाडेही लहान होती आणि अधीक आकर्षक दिसायची. ह्यांची जेंव्हा पालवी येते ना मधून अगदी मधे कमळासारखी दिसते.

जागू ह्याला सायकस म्हणतात. पानं काटेरी असतात याची. हात लावायला गेलं की चांगलेच टोचतात ते!
फोटो मस्त आलाय..

ज्यापासून साबुदाण्यासारखे सॅगो पर्ल्स करतात ते झाडही असेच असते.
जागू, परवाच्या मुहुर्तावर नि.ग. चा चौथा धागा उघडावा लागणार !

काय "परवा" काय विशेष ......?>>>>>बुधवार आहे Wink सगळे "मासे" एकत्र येऊन "कल्ला" करणार आहे. Proud

मस्त जागा आहे ही. आणि आपण एकटे कुठेच नसतो रे, आजूबाजूचा निसर्ग नेहमीच
सखासोबती असतो, उलट शहरातल्या गर्दीतच एकटेपणा जाणवतो.>>>>अगदी खरं.
योगेश, मस्त फोटो.
दिनेशदा, नेपती, प्रथमच पहतेय. छान आहेत याची फुले. Happy

<<सगळे "मासे" एकत्र येऊन "कल्ला" करणार आहे>> हे गौडबंगाल काही कळत नाहीये.... असो का नुसते "सो"...

मध्यंतरी पुण्याच्या आसपास फिरायला गेलो असताना ही फुले दिसली - नाव शोधायचे राहून गेले - कोणी सांगू शकेल का ?

unknown.jpg

फिन्लँडची मुंगुसे पण गोरी आहेत... Wink

दिनेश, ही नेपती हे माहित नव्हते. माझ्याकडे आहे तो फोटो वेगळा. इथे टाकेन.

(सध्या घरी सॉल्लीड प्रोब्लेम्स चालु आहेत. डेंग्युने होलसेलमध्ये हल्ला केलाय Sad त्यामुळे वेळ मिळत नाही )

पानावर खुप वाहुन गेलं होतं, पण आज सगळं वाचुन काढलंच ...!

आजूबाजूचा निसर्ग नेहमीच सखासोबती असतो, उलट शहरातल्या गर्दीतच एकटेपणा जाणवतो.
अनुमोदन !
दिनेशदा,
अशा शहरातल्या गर्दीत 'निसर्गाच्या गप्पा' यासारखं एखाद पान असेल तर एकटेपणा दुर पळुन जातो, या गप्पांच्या माध्यमातुन अगदी निसर्गाच्या जवळ गेल्याचा आनंद तर सगळ्यांना हमखास मिळतोच ..

हे पान, यापुढचं येणार पानही, आपल्यासारख्या अनेक अभ्यासु,अनुभवसंपन्न लोकांच्या योगदानामुळे, असंच भरभरुन वाहत राहील (आणि आम्हाला आणखी नवीन शिकायला मिळेल) यात शंका नाही ..
Happy

आपण सगळे मिळून निरोप समारंभ करूया ना! एकाच वेळी आपण सगळे ऑन लाईन गप्पा पण मारू. काय मजा येइल ना! कल्पना करु की आपण संभाजी पार्क मधे आहोत. दिनेशदांनी आणलेला खाऊ ओळखण्यासाठी पराकाष्ठा चाललेय्..................:)

साधना, बरे व्हा सगळे लवकर.
शशांक हि फूले आता सगळीकडे दिसतात. यात अनेक छटा पण दिसतात.
प्रज्ञा, नक्की.

आमच्याकडे या दिवसात थोडा उन्हाळा जाणवायला हवा, पण भारतातल्याप्रमाणेच
पाऊस पडतोच आहे. रस्त्याच्या कडेला हा भरभरुन फूललेला कांचन. वेळ साधारण
सकाळी सव्वासातची. पण ढगाळ हवामानामूळे उजेड नव्हताच.

साधना.....get well soon...........
जिप्सी, मासे, कल्ला काही कळाले नाही............
दिनेशदा, कांचनाचा फोटो मस्त....
होय गं प्रज्ञा दिनेशदांनी आणलेला खाऊ कितीतरी वेळ ओळखताच आला नव्हता......सर्वांना ते रंगीत 'खडेच' वाटत होते!

साधना, काळजी घे, औषधे घेऊन सगळ्यानी लवकर बररे व्हा.
शशांक, ही फुले मला फार आवडतात. पण नाव आठवत नाही. Proud
दिनेशदा, कांचन छानच. Happy

<<<होय गं प्रज्ञा दिनेशदांनी आणलेला खाऊ कितीतरी वेळ ओळखताच आला नव्हता......सर्वांना ते रंगीत 'खडेच' वाटत होते!>>>>हो ना! काय मज्जा आली होती ना? आता दिनेशदा आले की 'निसर्ग गटग' नक्की. (वाट पाहाणारी बाहुली.)

साधना, काळजी घ्या.
जरा मुंगुसावरून घुशीवर येऊ का? वैताग आणलाय त्या घुशींनी. अंगणात माझ्या लेकाने खूप कष्ट घेऊन अंगणात एका कडेला लॉनचा एक मोठा चौकोन तयार केला होता.
या घुशींनी त्याची वाट लावलीये. मोठी मोठी खोल बिळं करून ठेवलीत.
कुणी तरी उपाय(१) सांगितला म्हणून त्यात पाण्याचा पाईप टाकून किती वेळ पाणी चालू ठवलं तरी ती बिळं भरतच नाहीत. या घुशी म्हणे जमिनीखालूनच ये जा करतात असंही ऐकलं!!!!!
रात्री आवारात खुडबुड करतात ते वेगळंच.
उपाय(२): बल्ब, बाटल्या कुटून(खरं म्हणजे मला त्या घुशींनाच कुटायचंय!!) त्या काचा बिळात घालणे, हा अघोरी उपायही करून पाहिला. आता मला कुठेही गेलेला बल्ब, जुन्या बाटल्या दिसल्या की कधी ते तावडीत घेते आणि कुटून बिळात घालते असं होतं. (मनावर परिणाम???????)
तर उपाय सुचवा.

१) सांगितला म्हणून त्यात पाण्याचा पाईप टाकून किती वेळ पाणी चालू ठवलं तरी ती बिळं भरतच नाहीत.

अग मी पण लहानपणी असले उद्योग करायचे. तू ते आता मोठे पणी करतेस. Lol

मानुषी त्या काचांचे उपाय नको ग करू. चुकुन आपल्यापैकीच त्या बिळाजवळ पुढे मागे माती वगैरे काढायला गेलो तर हाता-पायाला लागतील.

मानुषी - बाजारात उंदीर - घुशी मारण्याकरता झिंक ऑक्साईड ( ऑक्साईडच का अजून काही हे नीट आठवत नाहीये) मिळते ते भज्यांमधे टाकून अशी भजी पसरवून ठेव बागेत (सायंकाळी). इतर पक्षी वा प्राणी खाणार नाहीत याची काळजी घेणे. आमच्या बागेतला घुशींचा त्रास पूर्ण गेला यामुळे. झिंक ऑक्साईड घरी कायम आणून ठेवलेलेच असते. त्या काचा वगैरेंचा काही उपयोग होत नाही असा माझा अनुभव आहे.

<<आता मला कुठेही गेलेला बल्ब, जुन्या बाटल्या दिसल्या की कधी ते तावडीत घेते आणि कुटून बिळात घालते असं होतं. (मनावर परिणाम???????)>>>मानुषी, Lol जागूला मोदक.

सर्वांनी दाखवलेल्या सहानुभूतीबद्द्ल धन्यवाद.
हो जागू, कुणाला तरी लागण्याचीच शक्यता.....अगदी बरोबर!
गिरी, पेस्ट कंट्रोलवाल्यांना विचारते.
शशांक झिंकचा उपाय आमच्या लुई(आमचा कुत्रा)मुळे करता येत नाही. कारण दिवसातले काही तास तो मोकळा असतो.
घर तसं सगळ्या बाजूंनी बंदिस्त आहे पण गेट खाली अर्ध्या फुटाची जागा आहे. तीही बंद करून टाकू असा विचार होता. पण "त्यां"चा वावर जमिनीखालूनच असतो म्हटल्यावर काही उपयोग नाही.

उंदरांसाठी हा ऊपाय मागे चित्रलेखात वाचला होता. निकामी झालेल्या ट्यूबलाईटस बागेत ठिकठिकाणी उभ्या करुन ठेवायच्या. त्या अंधारात चमकतात. उंदरांना त्याचे आकर्षण वाटते आणि त्यावर चढायचा ते प्रयत्न करतात पण ते त्यांना शक्य होत नाही. असे करण्यात सगळी रात्र निघून जाते.
पण घुशींवर हा उपाय चालेल का त्याची कल्पना नाही. परदेशात एक ग्लू पण मिळतो. तो विषारी नसतो पण त्यावर उंदिर चिकटून बसतात.

आणखी एक उपाय, आपल्याला ब्रुफेन सारख्या झोप आणणार्‍या ज्या गोळ्या असतात त्या वापरता येतात.

केवळ उंदरानाच ऐकू जाईल, असा आवाज करणारी काही यंत्रे असतात पण त्याचा त्रास लुईला पण होऊ शकतो.

उंदीरमारीची झाडे (ग्लिरिसिडीया) कुंपणाजवळ लावायची, हा पण एक उपाय आहे.

हां - उंदीरमारीची झाडे (ग्लिरिसिडीया) - यांच्या फांद्या, फुले आणून टाक अंगणात - काही दिवस. माझ्या एका मित्राचे शेत आहे - त्याच्या अनुभवानुसार उंदीर-घुशी मरतात या उंदीरमारीमुळे.

भज्यांचे वाचुन मागे एक विनोदी गोष्ट वाचलेली ती आठवली. बायको उंदरांसाठी भजी करते, बिचारा नवरा त्या भज्यांत विष आहे म्हणुन कसाबसा स्वतःच्या जीभेवर ताबा ठेऊन घरभर भजी पसरवतो. दुस-य दिवशी सगळी भजी उंदिर गायब करतात आणि मग बायको भज्यांमध्ये विष घालायला विसरले हे शुभवर्तमान जाहिर करते Happy

घरची मंडळी बरीच बरी आहेत आता Happy

जागु, तुझ्याकडुन आणलेल्या ब्रम्हकमळ उर्फ एपिफिलमच्या पानाल एक मोहरीएवढी कळी आलीय. आता तिला मोठी व्हायला किती दिवस लागतील देव जाणे. पंकजच्या मते दिड दोन आठवडे जातील (त्याच्या घरीही फुले फुलली होती या पावसाळ्यात). मी पुढच्या आठवड्यात गावी जातेय. मी नसताना कळी फुलु नये एवढीच त्या कळीला विनंती करतेय रोज. Happy

तु दिलेली तोंडली मात्र मी संभाळू शकले नाही. आणुन घरी ठेवली नंतर लावते म्हणुन. त्या पिशविला बहुतेक भोके नव्हती. पावसाच्या पाण्यात वेल कुजुन गेली. (पुढच्या वेळेस कोणा आळश्याला रोप देताना रोप ८ दिवस टिकेल अशी काळजी घेऊन दे Wink )

Pages