सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याशिताने जे काही केले सेम तेच माउली ने केले होते सल्लु एपिसोड मधे , पण याशिता फारच डोक्यात जा१ते

एलोएल -- पब्लीक मस्त लिहितय ड्रामा झालेला.. कधी चुकला पहायला तरी आता काळजी नाही Happy

वैशाली व कौशीक - सर्वात आवडले ह्या वेळी पण.
सारा - नाही आवडली

असमा - नो कॉमेंट, पण मी असे ऐकले की ती 'क्यों की सांस..' मधे तुलसी ची डुप्लीकेट म्हणून कधीकधी येइल, कारण तुलसीसारखीच दिसते ती.
शुजात - पहिल्यांदा बराच आवडला

देबो - जोर चांगला होता गाण्यात पण त्यामुळे त्याचे गाण्याकडे दुर्लक्ष झाले की काय असे वाटले. आवडले नाही गाणे विशेष. अमर नसले तरी अवघड गाणे आहे ते. तो कशात कमी आहे माहीत नाही पण ते 'सिमरन' प्रकरण वाढवु नये त्याने आता.

याशिता - खरे म्हणजे ती चांगली आहे पण कुठेतरी काहीतरी खटकतेय. मला नीट सांगता येत नाहीये पण मला असे वाटते की ती जरूरीपेक्षा जास्त सहजतेने गाणे म्हणायला जाते त्यामुळे एखाद्या गाण्याला जितका ऍटीट्युड-नखरा दाखवायला पाहिजे त्या पेक्षा जास्त तिच्या गाण्यात दाखवला जातो आणि म्हणुन मला तरी जास्त समाधान होत नाही तिचे गाणे ऐकुन. . थोड संयम केला तर बरे. पण कदाचीत वयाने लहान आहे म्हणुन असेल.

अय्या.. बाकी कोणी काय म्हटले ते आठवतच नाहिये, की मी पाहिलच नाही?? नयना होती का? ती नाटके सुरु झाली की माझी मनाची व कानाची कवाडं आपोआप बंद होतात नी म्हणुन डोके शांत रहाते. Happy

मैत्रेयी, माझी पण आधीपासुनची ही तक्रार आहे.. तीच तीच गाणी का म्हणतात प्रत्येक वर्षी? कदाचीत ऑर्केस्ट्रावाल्याना नवीन नवीन गाण्यासाठी जास्त मेहनत करायला लागु नये म्हणुन असेल.
दीपंजली, मी पण वैशाली साठीच रेश्मियाचा जय हो करणार आहे. Happy

याशिताबद्दल सहमत! पण ज्या प्रकारे झीने हा इम्रानबरोबर चा ड्रामा प्रमोट केला, तिला लास्ट (अन बेस्ट?) ला ठेवले, त्यावरून नेक्स टायमाला ती टॉप ला असण्याची एक शक्यता वाटत आहे पण मला !
नैना होती की , तिने 'जाने तु मेरा क्या है' म्हटले जाने तू या जाने ना मधले.
कौशिक अन देबो दोघांनी ते मेरी 'वो' वगैरे बावळट्ट पणा बस करा म्हणावं आता! कुणाला त्यात इन्टरेस्ट असेल देव जाणे!! Uhoh

अगं पब्लिकला असेल इंटरेस्ट असला पांचटपणा बघण्यात. म्हणून तर झी प्रमोट करते ना हे सगळं. Angry

याशिता पेक्षा ती दोन पडजीभा असणारी मुलगी बरी गायची.
मैत्रेयीशी सहमत, याशिताला बहुतेक स्टेज एक्स्पोजर जास्ती असावे म्हणून तिच्यात खूप सहजपणा आला आहे. आणि तिचा आवाज आणि गाण्याची स्टाईल पण चांगली आहे, काहीतरी खटकले म्हणजे बहुतेक तिचा पुढे पुढे करण्याचा स्वभाव असेल. आपण बेस्ट आहोत अशी भावाना तिच्यात कुठेतरी रुजल्यासारखी वाटते.

ए.भो.प्र.
पडजिभा म्हणजे काय? तू कोणाबद्दल म्हणतियेस दक्स?
मला देबो आवडायचा पण आता अति करतोय तो, हावभाव आणि उगिच मेरी हम्सफर वगेरे विषय काढायचे आणि जजेसनी काहि म्हटले की क्या सर जाने दिजिये ना नाटकं नुसती.
नैना मॅचुअर वाटते मला. बाकि मुलिंमधे वैशालिच बेस्ट.

कोणितरी शहा होती ना? तिच्याबद्दल बोलतेय मी.
जाऊ दे झालं, गेली बाहेर... आता ही याशिता आहे, तिलाच सहन करावं लागणार.

नैना चांगली आहे, वैशालीही आहेच. प्रतिभाही मला 'down to earth' वाटते.
त्या देबोचे काय शेर सांगण्यापूर्वी अचकट विचकट हावभाव चालले होते?
ते गर्लफ्रेंड प्रकरण नेहमीच असतं. २००५ मध्ये विनितचं होतं, गेल्या वर्षी अनिक आणि सुमेधा टाईमपास झाला आता ह्यावेळी देबोजित सापडला त्यांना.
कौशिकचं जाडेपणा/पोट मोजणं वगैरे जे बॅकस्टेज कमेंट्स केले तरुणने त्याचा परिणाम दिसतोय.

वैशाली छान सुरात गाते, पण मला तिचे उच्चार थोडे अशुध्द वाटतात काही ठिकाणी, तिने त्यावर थोडे लक्ष दिले तर अजुन छान वाटेल तिचे गाणे..
आणी ती नैना इंडियन आयडॉल मधे पण पुढच्या राऊंड ला सिलेक्ट झालिये.
बाकी देबोजीत, यशिता ची ड्रामेबाजी खूप डोक्यात जाते.

येस्! थंब्ज डाऊन फॉर देबोजीत. त्याचे ते असभ्य चाळे पाहून दोन लगवाव्याश्या वाटतात.
वैशालीचे उच्चार अशुद्ध असतात हा मुद्दा बरोबर आहे. पण सुरात पक्की आहे. नैना आणि प्रतिभा दोघी चांगल्या गातात. बघू काय होते पुढे.

सगळ्याचं भांडवल करुन विकण्याचा जमाना आलाय त्याला काय करणार? मग ती स्वत:ची कमतरता असली तरी.

मी सारेगम च्या फीडबॅक अन जनरल रिस्पॉन्स ला देबोच्या मूर्ख चाळ्यांबद्दल एक खरमरीत ईमेल टाकली! हे म्हणजे 'पंतप्रधानांनी सोरटी सोमनाथ येथे झालेल्या भषणात अमेरिकेला खडसावले' अश्या छापाचे आहे पण जरा तेवढीच मनातली चिड चिड कमी झाली Happy

>>>>'पंतप्रधानांनी सोरटी सोमनाथ येथे झालेल्या भषणात अमेरिकेला खडसावले' अश्या छापाचे आहे
Lol सही. उत्तर आलं तर कळव.

स्पर्धकांच्या सुरात गाण्याला महत्त्व न राहता इतर गोष्टींनाच महत्त्व दिले जाते हल्ली. मी तर फक्त स्पर्धकाचे गाणे ऐकते आणि गाणे संपले की चॅनल बदलुन दुसरे काहीतरी बघते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गझ्या असण्याचा अंशअंश
तु माझ्या नसण्याचा मधुर दंशगाण्य्चह्या

मैत्रेयी Happy उत्तर येइतोवर तीच तीच इमेल टाक त्याना. Happy

उत्तर येइतोवर तीच तीच इमेल टाक त्याना>> अगदी अगदी Lol
हैराण झाले पाहीजेत.
खरंच झी वाल्यांना किती मजे-मजेशीर इमेल्स येत असतील नाही? Happy

मी झी ला वैशाली ची गाणी आवडल्या बद्दल इमेल टाकली होती, मला परवा झी टी.व्ही कडून रीप्लाय आली आहे कि वैशाली साठी जे काही संदेश, शुभेच्छा, रिक्वेस्ट असतील ते आम्ही सारेगमप टिम पर्यंत पोचवू म्हणून :).

अरे वा चांगलंय. मैत्रेयीला आला का रिप्लाय? Wink

नाही! मला नाही आले उत्तर ! मी कौतुक न करता नावं ठेवली फक्त, त्यामुळे बहुधा रिप्लाय करायची गरज भासली नसणार त्यांना Happy

रिप्लायची अपेक्षाच करु नकोस. त्यांनी कंटेस्टंट्सना सुधारणा करायला लावली तरी खूप.

हे काय? एक तास व्हायला आला सारेगम संपून पण कुणीच काही लिहिलं नाही आज.
वैशाली सही गायली आज. सगळ्यांच्या वरचढ ठरली ती.

बाकी सगळेच मला सोसो वाटले.कुणाचाच परफॉर्मन्स दाद देण्यासारखा वाटला नाही.
शुजात आणि फराजच्या गाण्यांमध्ये एनर्जी मिसिंग होती.

पुन्हा एकदा आस्मा सेफ आणि बाकीची चांगली गाणारी डेंजर झोन मध्ये.

वैशालीचे गाणे लाजवाब! आजचे सगळ्यात सही गाणे. मस्त सुरात गायली, उच्चार स्वच्छ होते आणि आवाज स्पष्ट होता. तिने शेवटी घेतलेल्या काही जागा तर फार सुरेख होत्या. त्या ऐकून शंकर महादेवनचे डोळे आणि चेहरा कसा खुलला होता ते पाहिलंत का? Happy प्रतिभा आणि नैना पण जोरदार टाळ्या वाजवत होत्या. थोडक्यात आज वैशालीने बाजी मारली.
"चार दिनो का प्यार ओ रब्बा" गाण्याचं हे वर्जन आधी ऐकलं नव्हतं. छान आहे!

शुजात परत आपल्या मूळ पदावर आला. साराचे गाणे खास झाले नाही. देबोजितचे अजिबातच नाही.

गो वैशाली!! मस्त च गायली आज!! बाकी कुणीच नाही खास. याशिता पण, ते गुरु लोक हिस्टरी वगैरे बोंबलले तरी अतिसामान्य वाटली आज!
शुजात - त्याला चाफ्याची नजर लागलीये आताशा Happy
देबो ,अन त्या निमित्तने प्रीतम चं नाटक, ते ध्रुतराष्ट्र वगैरे प्रकार डोक्यात जाण्यासारखेच होते!! देबो बद्दल इतर कंटेस्टन्ट्स नी बोलणे हे तर इतके म्हणजे इतके ऑबव्हियसली 'स्क्रिप्टेड' वाटत होते की बस्स Uhoh

वैशाली झक्कास, बाकी सगळॅ अति सामान्य !
सर्वात वाईट याशिता, आणि असे विदुषका सारखे कपडे दिले होते तिला फंकि नाव अखाली, केवढे लठ्ठ आणि विनोदी दिसत होती !
चाफ्या,
ते वैशालीने गायलेले गाण्याचं व्हर्जन आहे त्याची situation ' Pole Dancing ' आहे... LOL
कांटे मधल्या "माही वे" सारख् हे पण Pole वर !

वैशाली झक्कास, बाकी सगळे अति सामान्य !
सर्वात वाईट याशिता, आणि असे विदुषका सारखे कपडे दिले होते तिला Funky नावा खाली, केवढी लठ्ठ आणि विनोदी दिसत होती !
चाफ्या,
ते वैशालीने गायलेले 'जन्नत' मधलं गाण्याचं व्हर्जन आहे त्याची situation ' Pole Dancing ' आहे... LOL
कांटे मधल्या "माही वे" सारख् हे पण Pole वर..
रिचा शर्माची दोन्ही एवढी सुंदर गाणी पोल वर का टाकली काय माहितः)) !
हे पहा:)
[video:http://www.youtube.com/watch?v=wnkihoTA7eA&feature=related]

अगं ती याशिता तशीही लठ्ठ आहेच. आणि काल खरंच दिसत होती फनी.. फंकी कसली आलिये.
तिचंही गाणं मला मुळीच नाही आवडलं.
मला वाटतं खूप झालं ते देबोजितचं 'स्पेशल नीडस' असण्याचं भांडवल करणं. डोक्यात जायला लागलंय आता.
चाफा, तू वैशालीचं गाणं चालू असलं की शंकर महादेवनचाच चेहरा बघत असतोस बहुतेक Wink

तसंही ते हम्मा हमा गाणं आपण सुद्धा इतपत कोकलून गाऊ शकतो !! काय त्या गुरुंना इतकं कौतुक वाटलं!! उगीच चढवतात एखाद्याला Angry
तिच्या ओवर्कॉन्फिडन्स अन ऍरोगन्स चे पण वा वा क्या कॉन्फिडन्स है म्हणून गुणगान करतात! Uhoh
आणि कंटेस्टन्ट्स चे कपडे कोण डिझाइन करतं हे एक कोडं च आहे Happy काय ते इनोदी कपडे सग्ळ्यांचे विचित्र टोप्या काय, गुलाबी पिवळ्या पॅन्ट्स काय!साराला पण कै च्या कै विचित्र कपडे होते, मॅटर्निटी फ्रॉक सारखा तिचा टॉप होता Biggrin अन याशिता जोकर कम भिकारीण!

सायो, इथे २:०९ ला वैशालीने घेतलेली सुरेख जागा ऐक आणि त्यानंतर शंकर, प्रतिभा आणि नैनाची रिऍक्शन पहा. आणि २:२८ ला गाणं संपल्यावरचा शंकर महादेवनचा चेहरा पहा.

सकाळपासून १० वेळा तरी वैशालीचं गाणं ऐकून झालं! Happy

http://www.youtube.com/watch?v=SmQew97y66w

>>>अन याशिता जोकर कम भिकारीण!

अगदी अगदी. त्या आदीचे कपडे कुणी नरेंद्रकुमार म्हणून डिझायनर आहे तो डिझाईन करतो. बाकीच्यांचे कपडे कोण करतं द्देवच जाणे. पण ९५% टाकाऊ वाटतात मला. especially इंडियन कपड्यांवर त्यांना जी घाटीछाप जुलरी दिली जाते ती.
त्यातल्या त्यात वैशालीचा सलवार कमीज चांगला होता काल.

बघितली. छान घेतली तिने ती जागा. मी बघताना नोटिस केलं होतं ते.

Pages