कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !
सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.
या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )
सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना
The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.
ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos
..
..
अग काय
अग काय सांगतेस काय!!!!!!! धक्का बसला.. आणि सारा राहिली?
सारा तर
सारा तर आहेच, ती आस्मा पण आहे अजून!!
श्या सारेगम ने अगदीच अपेक्षाभंग करायचं ठरवलंय!!
आस्मा ला
आस्मा ला आणलं आहे म्हणजे इतक्या लवकर नाहीच जाणार ती
सारा च जाईल असं वाटलं होत कारण तिच्या आईनी पाकिस्तान च्या जनते बद्दल फार काही चाम्गले उद्गार नाही काढले !
आस्मा आता
आस्मा आता सारेगमचं नाही तर साबणातून पण दिसायला लागेल हळूहळू. मला एक कळत नाही जर चॅनल ठरवतं की कोण रहाणार नी कोण जाणार तर मग वोट्स चं नाटक करायचंच कशाला?
सायो, पण
सायो,
पण पब्लिक खरच आस्मा ला करतही असेल व्होट, लोकांना कोण कशा साठी आवडेल याचा काही नेम नाही, दिसायला गोड आहे, जोक्स करते म्हणून लोकंना ती गाण्याच्या स्पर्धेत सुध्दा हवी आहे बहुतेक
>>>>पण
>>>>पण पब्लिक खरच आस्मा ला करतही असेल व्होट, लोकांना कोण कशा साठी आवडेल याचा काही नेम नाही,
अग माझा राग त्या आस्मावर नाही तर चुकीच्या वोटींगमुळे आणि चॅनलच्या हस्तक्षेपामुळे होणार्या अन्यायावर आहे. तिचं गाणं चांगलं असतं तर वोटसही काही वाटलं नसतं पण तिला आणल्यामुळे चांगले गायक मागेच पडले त्याला काय करायचं?
असो, मला काही वाटून काय उपयोग?
वैशाली
वैशाली तिच्या मुलखतीत म्हंटली त्या प्रमाणे स्पर्धे पेक्षा हा 'शो' आहे ज्यात सामान्य लोकांची करमणुक करणे हे चॅनल चं पहिलं कर्तव्य आहे आणि भाग घेणार्या प्रत्येका ला स्पर्धेत उतरण्या पूर्वी याची कल्पना असली पाहिजे , कुठलेही निर्णय मान्य करयाची तयारी असायला हवी
हं, मितिका
हं, मितिका गेली.
आणि शुजात / आस्मा सारखे ठोकळे सुखेनैव मागे राहिले! 
अंतरा चांगलाच अनुनासिक स्वरात होता. सुरात पक्की असली (तिने घेतलेल्या स्वतःच्या नवीन जागा) तरी मूळ गाण्यात जसा "स्वच्छ" आवाज आहे तसा तिचा नाही. बघूया काय होते.
पण मला वैशालीचे गाणेही एवढे काही चांगले झाले असे वाटले नाही.
वैशाली
वैशाली बॉटम ३ मधे!:( काय हे ! अन खर तर तो शौमेन काही मला फारसा खास वाटला नाही अजून तरी !! अन तो टॉप ला?!!:अओ: देबोजित ऐवजी त्याला धरलं का काय नॉर्थ ईस्ट वाल्यांनी??!!
देबोचं गाणं छान झालं आज.
हो ना.
हो ना. मलाही तो शोमेन अजिबात खास वाटला नाही. वैशाली त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली आहे.
मला आज
मला आज देबोजितचं गाणं आवडलं नाही. माझ्यामते त्याने सोनूच्या गाण्यांना हात न लावता किशोरची गाणी म्हणावीत. ती जास्त हिट होतील.
वैशालीचं गाणं आवडलं आज. पण तिचाही आवाज सगळ्या गाण्यांना सूट होईल असं वाटत नाही मला. लावणी टाईपची गाणी मस्तच जमतील तिला.
>>>हं, मितिका गेली. अरेरे आणि शुजात / आस्मा सारखे ठोकळे सुखेनैव मागे राहिले!
मला तर विनर म्हणून आस्माला निवडून दिलं तरी त्याचं आश्चर्य नी दु:ख वाटणार नाही.
पुन्हा
पुन्हा बंगाल फॅक्टर टपकलाच !
शौमेन आल्या आल्या टॉप मधे :(??
मला आज वैशाली सोडून कोणाचीच गाणी आणि सिलेक्शन्स आवडली नाहीत, अगदी माझ्या अत्ता पर्यंतच्या आवडत्या देबोजीत चे गाणे ही नाही आवडले आज
प्रतिभा नेहेमी चांगली गाते पण तिनी पण बेक्कार सिलेक्शन केलं आज, मला गेल्या भागात 'छोटा शहर्-बडा शहर' ड्रामा पाहिल्या पासून याशिता आणि प्रतिभा दोघीं चा राग यायला लागलाय !
पण सध्या तरी असं दिसतय कि या दोघी टॉप ५ पर्यंत जाणार च :(.
वैशाली च भवितव्य काय माहित नाही पण हिमेश भाय बरोबर डायरेक्शन नी चाल्लाय , मुलगी विनर बनवा, परफॉर्मन्स मधे कमी असली तरी स्टुडिओ मधे चांगला असणारा आवाज निवडून द्या अशी अवाहनं सुरु केली आहेत, हिमेश च काही तरी करु शकतो अता वैशाली साठी !!
हिमेश बाबा,
स्वतः च्या पंख्यांना अवाहन कर, साहानुभुति मिळव किंवा अजुन काही, पण वैशालीला ढकल रे टॉप पर्यन्त !!!!
जय माता दि लेट्स रॉक !!
वैशाली,
वैशाली, प्रतिभा, शौमेन्,आणि देबोजित हे तर असणारच आहेत टॉपला. गेल्या वर्षी सारखीच (अनिक-राजा) त्यांच्यातही काँम्पिटिशन असेल यावर्षीही.
पण मला असं
पण मला असं वाटलं की हिमेस ने वैशालीकडे फार अटेन्शन दिले नाही काल
याशिता अन प्रतिभाच्या ड्रामा मधे जास्त लक्ष होते त्याचे.
शिष्याने गुरुचे आभार मानण्याऐवजी पब्लिसिटीबद्दल गुरुच शिष्याचे आभार मानत होता 
गेल्या वेळी कसे अनिक सोडून काही बोलायचाच नाहे तो. अन पब्लिक काय वोट करणार ते दिसतच आहे!!
btw आदेश भलताच एक्साईट झाला अनपेक्षित रित्या शोमेन टॉप ला आला म्हणून, त्या नादात शोमेन ला थॅन्क्स पण म्हणाला
LOL हो का? ते
LOL हो का? ते मिस केले वाटते मी! पण डीजे म्हणते तसा हिमेश बरोबर दिशेनी चाललाय.
मुलगी विनर व्हावी म्हणताच आदेश चवताळला होता. 
मलाही देबोचे कालचे गाणे सुमार वाटले. शोमेनचेही सुमार होते. खरे तर मितिकाचेही (शेवटचे आलाप सोडले तर). प्रतिभाचे चांगले झाले पण तिने पट्टी थोडी खालची निवडायला हवी होती. आता आज पाहू काय होते.
काल हिमेश
काल हिमेश वैशाली बद्दल बोलला नाही पण वैशालीला रीऍलिटी शो मधे रहाण्या साठी ज्या प्रकारचे फुटेज लागते , ते झी च्या टिम ने भरपूर दिले काल !
या वर्षीची पूनम बनवण्याचा विचार दिसतोय त्यांचा टी आर पी साठी.
वैशालीला सहानुभूतिची गरज नाही पण पब्लिक व्होटिंग मधे टॉप वर रहाण्या साठी एक तर पूनम नाही तर माउली बनाव लागत हे ही खरच आहे !
हिमेश काही झालं तरी फायनल ३ परयंत जाणार हे नकी, अता तरुण ला , जाहिर ला नेतो कि वैशालीला हे पहायचे, पण मला तरी वाटतय कि मुलींना निवडून द्या असं अवाहन करतोय त्या अर्थी तो आस्मा किंवा वैशालीला घेउन टॉप मधे येणे पसन्त करेल आणि इतरांचे पाय खेचायला हळु हळु सुरवात केलीच आहे त्यानी, काल शौमेन ला त्यानी एकट्यानीच सर्वात कमी मार्क्स दिले, इन फॅक्ट देबो -मितिका आणि अर्थात च वैशाली सोडून सगळ्यांनाच निगेटिव्ह प्रतिक्रिया दिल्या त्यानी!
लगे रहो हिमेस भाय
जय माता दि लेट्स रॉक !!:)
शंकर महादेवन किती खुष असतो पाहिलं का वैशाली गात असताना?
>>>>खरे तर
>>>>खरे तर मितिकाचेही (शेवटचे आलाप सोडले तर)
सहमत. मला तिचं गाणं न आवडण्याचं कारण तिचा आवाज. जो अगदी वेगळा आहे आणि सरसकट सगळी गाणी खपू शकत नाहीत. पण एनीवेज, ती गेलीच त्यामुळे नो कमेंट्स.
शौमेनचं गाणं मी अजून नीट बसून ऐकलं नाहीये. आज ऐकेन.
>>>वैशालीला सहानुभूतिची गरज नाही
बरोबर. मला काल जाणवली ही एक गोष्ट की ज्या प्रकारे तरुण ने भांडवल केलं त्याच्या परिस्थितीचं त्यात नी वैशालीच्या ऍप्रोच मध्ये खूप फरक होता.
दिपाली, तुला एक रिक्वेस्ट करायची होती की पुढच्या आठवड्यात तुला कोण एलिमिनेट झालं हे कळलं तरी प्लीज इकडे टाकू नकोस. त्याने उत्सुकता संपते.
आज कौशिक आहे बॉटम लाईनला म्हणालीस ना तु? बघुया, काय होतंय ते.
नाही , आता
नाही , आता या आठवड्यात परत एलिमिनेशन किंवा बॉटम वगैरे प्रकार नाही, कौशिक काल सांगितल्याप्रमाणे मिडल ऑर्डर मधे होता.
गाण्यांच्या सिलेक्शन बद्दल मात्र खरच नवल आहे, तीच ती गाणी जी गेल्या सीझन ला ऐकून कंटाळा आला तरी तीच ती गाणी यावर्षी रिपीट का करतायत?! तडप तडप के, जुदा होके भी, असली गाणी ऐकवत नाहीत अगदी आता!
ओके, मी
ओके, मी कालच सारेग... नीट बसून पाहिलेलं नाही. मधे मधे मिस केलंय. त्यामुळे कौशिकचं नक्की काय झालं ते कळलं नाही मला.
बरोबर, आता आजच्या परफॉर्मन्सवर पुढच्या आठवड्यातली एलिमिनेशन्स होतील.
सायो, अग हो,
सायो,
अग हो, म्हणून स्पॉयलर च वेगळं पान सुरु केलय , इथे नाही लिहिणार.
हं चाफ्या,
हं चाफ्या, कसा वाटला शुजातचा परफॉर्मन्स?
मी सगळ्यांची गाणी बसून ऐकलेली नाहीत आज. तरीही कौशिक चांगलं गायला असं वाटतंय. पण याशिकाने सगळ्यांची दांडी गुल्ल केली.
आस्माचं गाणं म्हणजे नव्यानेच गाणं शिकायला लागलेल्या लहान मुलीसारखं वाटलं मला. पण तिच्या गप्पांनी टाईमपास झाला.
आज
आज सगळ्यांची चांगली झाली गाणी.
कौशिक मस्त गायला. याशिता, सारा आणि आस्मासुद्धा चांगल्या गायल्या.
ते सिंपथी व्होट बद्दल प्रीतम बरोब्बर म्हणाला. काय एकेक नाटकं असतात दरवेळी?
शुजात छान गायला.
आता तो देबोजित आणि तरूण माझ्या डोक्यात जायला लागलेत.
lol MT आपण
lol MT आपण एकाच वेळी इथे आलेलो दिसतोय. आज चांगला गायला हो शुजात.
केवढा
केवढा ड्रामा शो मधे
आधी तरुण मग शुजात्-मनिशा आणि सर्वात याशिताचा राग आला.
"मुझे शरम आती है, वोह कितने क्युट है" किती डेस्परेट वागत होती स्टेज वर, सॉरी पण तिच्या कृत्रिम पणा पाहून माझ्या ब्लॅक लिस्ट मधे आली ती आज पासून !
मला शुजात पण नाही आवडला, सुरवातीला किती श्वासाचा आवाज येत होता !
येस, मी पण
येस, मी पण नोटिस केलं त्याचं ब्रिदिंग, आय मीन आवाज...
ड्रामा मी मिस केलेला दिसतोय...:(
हो, आज मिडल
हो, आज मिडल लायनर्स ची गाणी टॉपर्स पेक्षा चांगली झाली!!तेवढ्यात तो किडनॅप चा पथेटिक ड्रामा केलाच आदि ने!!
तो एक मंद असेल तर बाकीच्यांनी असल्या वेडपटपणाला उत्तेजन कशाला द्यावं!!
अन देबोजित ते शेर सांगताना असे काय अंगविक्षेप करतो
बाकी इम्रान कूल दिसत होता हां पण
सोनीवर
सोनीवर इंडीयन आयडॉल ची 'कॉमेडी सर्कस' चालु झाली. अन्नु मलिकचा वैताग फुल्ल स्विंग मधे चालु आहे.
अन्नु मलिक शिवाय इतर जज्जेस् : जावेद अख्तर, कैलास खेर आणि सोनाली बेंद्रे
अभिजित कोसंबीचा भाउ प्रसन्नजीत कोसंबी हा मुंबई मधल्या ऑडीशन राउंड मधुन सलेक्ट झाला. कोल्हापुर मधुन आलेल्या स्पर्धकांवर हे सगळे परिक्षकगण भलतेच खुश होते.
सारेगमावर कौशिक देशपांडेला दिलेल्या सायकल चे आणि स्टेजवर मोजमाप करणे हे नविन नाटक काय चालु झाले? संदर्भ कळाला नाही. तो देबोला जरा 'ग' ची बाधा झाली आहे असे वाटते.
ती याशिता
ती याशिता तर माझ्या डोक्यात जाते. तिचा आवाज चांगला आहे, पण स्टेजवर वावरताना आपण म्हणजे किती 'ग्रेट' आणि बाकीचे 'कःपदार्थ' असाच भाव असतो तिचा. आणि इम्रान क्युट आहे म्हणून् तिने चक्क त्याला मिठी मारण्याची इच्छा प्रदर्शित केली. तो बिचारा १ मिनिट असाच पहात राहीला, मग त्याच्याकडे काही इलाज उरला नाही. असा बावळटपणा लि'ल चॅम्प्स पण करणार नाहीत.
सहज कुणी
सहज कुणी कुणाला हग केले तर हल्ली काही वाटेनासं झालंय!! पण याशिताने जो काही आधी ते लाजणे अन नन्तर ऑक्वर्ड हग प्रकार केला तो म्हणजे ... यक्स्स्स!
आयडॉल मधे टीपी सुरु आहे. सोनाली मस्त दिसते! आलिशा नाहिये ते बरेय. चँग अन दीपली पण छान दिसतात.
Pages