सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरुण आणि सन्विंदर ला मिळाले म्हणे ब्रह्मास्त्र , ते दोघे तर गेलेच हिमेश कडे पण झी बंगाली चा शौमेन पण हिमेश कडे च गेला:(((((, म्हणजे पुन्हा हिमेश स्ट्राँग :((((((((
वैशाली याचा अर्थ आदेश कडेच जाणारः(, शंकर महादेवन किंवा प्रीतम मिळायची शक्यता कमीच Sad

तुला कसं कळलं ग इतक्या लवकर? सन्विंदर....ह्म्म. त्याला मिळायची अजिबात गरज नव्हती यावेळी. Sad
हिमेश दरवेळीच स्ट्राँग असतो. काय कारण आहे त्यामागचं देवजाणे. आधीच तो फार पुशी आहेच. Angry
वैशालीला शंकर किंवा प्रीतमचं घराणं मिळायला हवं होतं.

शशी सुमन नाहीच आला का Sad
त्या सुन्विन्दर ला उगीच चढवलं त्या हिमेश ने Angry

हिमेश नी चढवलय कारण चॅनल ला तो हवाय, व्होटिंग साठी !
लुधियाना च्या लोकांना इश्मित ची उणीव भासू नये म्हणून सुनविन्दर ला निवडून द्या म्हणून व्होट्स मागायची पॉलिसी झालीच एकदा बोलून Sad
आपल्याला जे निर्णय मेंटर्स किंवा गायक घेतात वाटतं, ते सगळे निर्णय चॅनल घेत असतं, अगदी ज्या साँग सिलेक्षन ला स्पर्धकांना ओरडतत ति गाणीही चॅनल च निवडते, जे निवडतात त्यांना संगीताची काही एक बॅकग्राउंड पण नसते, इतक्यातच मी तरुण सागर , मुस्सर्रत आणि बर्‍याच लोकांच्या मुलाखती वाचल्या ( माझ्या मैत्रेणीने घेतलेल्या), सगळ्यांच्या बोलण्यात चॅनल बद्दल नाराजी दिसली, सगळी फक्त पॉवर चॅनल च्या टिम कडे असते.

तरी नशीब आस्मा नाही आली , नाही तर कॉमेडी सर्कस च झाली असती सगळी!!

म्हणजे मेंटॉर्स नी महागुरु वगैरे नुसता देखावा असतो तर!!! सगळ्या कठपुतळीच्या बाहुल्या Sad

आधीच्या बातमी प्रमाणे छोटा सरदार आणि तरुण होते पण नुकत्याच माझ्या मैत्रीणीला मिळालेल्या तरुण च्या मुलाखती वरून आस्मा आणि तरुण हिमेश कडे गेले आहेत :((((((((((((((((((((((((((((((
चला , अता कॉमेडी सर्कस पहा उरलेले भाग !!

आस्मा सिलेक्ट झालीये? हाईट आहे मूर्खपणाची...:राग:

अरे देवा !! आस्मा कसा आला ? मला नाय कळली Sad

सायो,
आस्मा कि जबान मे , 'वो वापस अगया है, ऐसा नकुल बोल रही थी !:)'

बापरे, आस्मा अणी तो सरदार येणार ब्रह्मास्त्र मधून Sad
मला या वेळचे कोणीच स्पर्धक मागच्या वर्षी च्या राजा, अमानत च्या तोडीचे नाही वाटले अजून तरी..
आजपासून, 'इंडिअन आयडॉल' सुरु होतय. त्यात परत तो अन्नु मलिक आहेच जजं म्हणुन Sad
बरं, कोणी सोनी वर लागतो तो कार्यक्रम 'के फॉर किशोर' पाहतं का?
त्याचा कालचा भाग छान झाला.
त्यात काल मिलिंद ईंगळे (च्युई मुई सी तुम,गारवा फेम) स्पर्धक म्हणुन आलाय, छान झाल त्याच गाणं.

के फॉर किशोर कधीच संपले की. रिपिट एपिसोड्स आहेत का आता?
आस्मा बरोबर तो सरदार नाही, तरुन सागर आला आहे.

'के फॉर किशोर' आधी झालय का? मला माहीत नाही कारण आधी सोनी नव्हते.
रिपीट आहे का नवीन काही कल्पना नाही, त्यात कालच्या भागात इंडिअन आयडॉल आधीच्या सिझन मधल्या आंकिता, पूजा, प्राजक्ता शुक्रे, आदिती पॉल वगैरे पण होत्या.

मैत्रेयी, कोण जिंकलय त्या के फॉर किशोर मधे? उत्कंठा Happy

आणी सारेगामापा मधे तो तरूण सागर आलाय का आस्मा बरोबर?
ठिक ठिक, त्या सरदार पेक्शा बरा आहे.

अर्णव चक्रवर्ती जिंकला. फायनल ला अर्णब, चेतन, आणि बहुतेक चिंतन पण होता. मला हा शो त्याच्या संकल्पनेवरून अपेक्षित होता तितका काही खास नाही वाटला.

ए त्या साराचे काय नाटक होते ते अचानक? वोट्स मिळवण्यासाठी होते की काय?
(आणि असले तर अस्माला आलेली पाहून पब्लिकच्या वोट्स वर काहीही अवलंबून नसते हे तिला अजून कळले नाही का? :P)

दर वेळी काहीतरी ड्रामा टाकल्याशिवाय त्यांना चैन पडत नही! मला साराचं गाणं आवडलं नाही फारसं. जास्तच नाकात गात होती. फार कृत्रिम वाटलं ते!आस्मा बद्दल न बोललेलं च बर Happy

काहीतरी फालतू ड्रामा घुसडायचा प्रत्येक वेळी. साराचं पण तेच. तिचा 'मम्मा, मम्मा' वाला बालिशपणा माझ्या इतका डोक्यात जातो ना Angry

माझा 'सारेगम' पाहण्याचा इंटरेस्ट आता कमी होत जाणार असं वाटायला लागलंय. कारण जर टॅलंटच्या जोरावर कुणी निवडून येत नसेल तर अर्थच काय राहिला? आणि अस्माला आणून झी ने ते सिद्धच करुन दाखवलं. आता बघायचा डोंबार्‍याचा खेळ. Sad

वैशाली ला भरघोस व्होट्स द्या प्लिज !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
आज तिचं 'निमोडा' गाणं आहे म्हणे:)

मैत्रेयी, मी खाली लिहिलेले वाचू नकोस. Proud

---------------------------------------------------------------
शुजात किती बेक्कार गायला! त्याला ताबडतोब बाहेर काढला पाहिजे. Angry Lol
माझ्या आवडत्या गाण्याची अशी टोट्ल वाट लावली त्याने. चक्क मुखड्याचे शब्द चुकीचे! पहिल्यांदा चूक म्हटला तेव्हा वाटले की झाले असेल चुकून. पण शेवटपर्यंत "आरजू झुके"! Uhoh अरे तुझ्या आवडत्या गायकाचे गाणे म्हणतोय तर शब्द तर नीट ऐक आधी!

दुसरे म्हणजे मुखडा पूर्ण म्हटलाच नाही! आणि गायकीबद्दल तर बोलायलाच नको. कुठे शफाकत अली खान आणि कुठे हे! नसेल पेलवत तर कशाला घ्यायचे गाणे! Angry याच्यापेक्षा आस्मा बरे गायली असे वाटतेय आता! Proud

---------------------------------------------------------------
DJ, वैशालीच्या घराण्याबद्दलचा तुझा अंदाज खरा ठरला. Wink

lol चाफ्या, त्याने 'ते' गाणं सिलेक्ट केलं तेव्हा वाटलंच मला तू इथे टायपणार लग्गेच!! Happy काही पण म्हण, पण तुझी अन शुजात ची आवड सॉलिड जुळली हां Biggrin

हिमेश ला सगळी पापं धून काढण्याची संधी आहे, जसे विनित आणि अनिक ला टॉप पर्यंत नेलं, तस वैशालीला ने म्हणावः)
काही म्हणा स्वत: च्या गायकांना पुढे पुढे करून इतर घराण्याच्या स्पर्धकांची पाय खेचण्यात आणि त्याच्या गायकांना बरोब्बर प्रमोट आणि मार्केट करण्यात हिमेश चा हात कोणी धरणार नाही:)
अता काहीही करून वैशालीला टॉप ३ पर्यंत न्यावं त्यानी, इमोशनल ड्रामा करा, किंवा अजुन काही, वैशाली टॉप पर्यंत गेलीच पाहिजे Happy
जय माता दि, लेट्स रॉक :))

DJ, वैशाली बद्दलचा माझा अंदाज अगदी खोटा ठरला. काल छान गायली ती. आणि असंच प्रत्येक वेळेला गाईल अशी आशा करु. तशी सगळ्यांचीच गाणी चांगली झाली. एक शुजात सोडून. तो 'सो सो' गायला. फराजने माझं आवडतं गाणं म्हणून माझ्या 'दिला'वर कब्जा केला. Wink
आता आपण एक काम करु. इकडे हिमेशचा फोटो टाकून पोस्ट टाकण्यापूर्वी त्याला नमन करु. म्हणजे वैशाली जिंकायला मदत होईल. Proud

हो, आज पासून हिमेश ला कोणी काही म्हणू नका:), मी त्यालाच सपोर्ट करतेय :))
जय माता दि लेट्स रॉक !!

या वेळी मितिका, याशिता, प्रतिभा, नैना, अन आता वैशाली अशा बर्याच चांगल्या गायिका आहेत, मुलींनी डॉमिनेट केलं पाहिजे या वेळी!
लुगडं ब्रिगेड रॉक्स , जय हो !! Happy

आता त्या प्रतिभाचा नी याशिताचा काय नवीन ड्रामा चालू करतायत? मोठं शहर नी छोटं शहरावरुन?

'छोटा पॅकेट बडा धमाका' बघतंय का कुणी? मी आजच पहिल्यांदा पाहिलं. कुणाल कोहलीने जे सांगितलं कोरिओग्राफर्सना ते आवडलं.

सॉरी, विषयांतर करायला नको होतं इथे.

आता त्या प्रतिभाचा नी याशिताचा काय नवीन ड्रामा चालू करतायत? मोठं शहर नी छोटं शहरावरुन?

'छोटा पॅकेट बडा धमाका' बघतंय का कुणी? मी आजच पहिल्यांदा पाहिलं. कुणाल कोहलीने जे सांगितलं कोरिओग्राफर्सना ते आवडलं.

सॉरी, विषयांतर करायला नको होतं इथे.

वैशाली छानच गायली. शाबास!!

सायो ,
अग ते छोटं शहर मोठं शहर परवडलं, इथे तरुण आणि कौशिक देशपांडेच बघ काय चाल्लय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Sooooooo cheap for TRP, तरुण काहीही बोललाय !!!!
[video:http://www.youtube.com/watch?v=MUtY8p3FHBU]

काहीही चीप. Angry
तुला कुठे मिळाला हा ब्याक स्टेज ड्रामा? म्हणजे झीवर अजूनतरी चालू झालेला नाहीय.

Pages