सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशिषेक आज स्मार्ट दिसत होता , 'हिप हॉप' पण चांगला गायला पण अजुनही एकदम बुजराच आहे अभि !:)
बापाचा आवज घेतलाय अभि नी त्यामुळे तो बोलताना ऐकायला छान वाटते बाकी:)
आज पण सगळेच सामान्य वाटले:(
तरुण नी सुरवात छान केली पण पुढे फ्लॉप.. पण शंकर महादेवन नी काय सुरेख म्हंटलं 'झुम बराबर झुम्'!!
शंकर रॉक्स् !! हर हर महादेवन Happy
जाहिर तसा चांगला च गायला पण गुरु मधलं हे माझं आवडतं गाणं माझ्या आवडत्या राजा हसन नी गाउन ऑलरेडी हिस्टरी बनवलीये, ती मोडण्या इतका जाहिर चा आवज नाही आवडला !!
राजा ची आठवण ताजी करत, हे घ्या राजा चं "तेरे बिन बेसुवारी रतीया'.. आवाज जो दिल को छुती है..:)
[video:http://www.youtube.com/watch?v=1PNlVqV1Azg]

हं , सामान्य पर्फॉर्मन्सेस! Uhoh यावेळी गुणवत्तेनुसार वैशाली टॉप ला यायला हवी! पण बहुधा देबोजित येणार Sad

चाफा, गेल्या वर्षीचं सारेगमप बघितलं नसलंस तर ही लिंक बघायलाच हवीच. सुपर डुपर हिस्टरी आहे.
http://www.youtube.com/watch?v=ymQ3nl1XFOw

सायो,
खरच, राजा च 'वन्दे मातरम ' जबरदस्तं हिस्टरी आहे:), मला तर रेहमान च्या गाण्यात बरेचसे शब्द समजले नव्हते, ते राजा मुळे समजले).

मला ते गाणं आधी खूप आवडत नव्हतं पण राजामुळे आवडायला लागलं.
आज बघितलं सारेगम. अभिषेक खूप ऑकवर्डला होता स्टेजवर. जाणवत होतं ते. याशिता त्यालाही मिठ्या मारतेय कीकाय ह्याकडे बारीक लक्ष ठेवून होते मी. Wink पण सावरलं तिने स्वतःला.
तरुणचं गाणं सोसो वाटलं मला.कौशिक कडून अपेक्षा होती पण त्याच्या गाण्यात एनर्जी टोटली मिसींग वाटली. आणि आस्मा तिच्या कुवतीच्या मानाने बरं गायली.
कधी कधी जजेसच्या बोलण्यात बोलणं नसतं. एकदा ते कंटेस्टंट्सना सांगतात की तुमच्या नेहमीच्या स्टाईलच्या बाहेर पडून गाणी म्हणा तर एकदा म्हणतात की आता ह्या स्टेजला नवीन काही ट्राय न करता तुमची स्टाईल पकडून चाला.

>>याशिता त्यालाही मिठ्या मारतेय कीकाय ह्याकडे बारीक लक्ष ठेवून होते मी>>>> अगदी अगदी, मला पण हेच वाटले. तरी नशिब तिने सावरले. बहुधा ती मनात चुकचुकत असेल, इम्रान च्या वेळी स्वतःला आवर घातला असता तर आज अभिषेक माझ्या कवेत असता... इत्यादी इत्यादी.. Proud

बाकिच्यांची गाणी ठिक झाली.

पण आस्माँचं ते अरबी सिनेमा मिळाल्याचं नाटक आता फार बोर वाटायला लागलंय. Sad

याशिताला झी टिम ने मागच्या एपिसोड मधे मोकळीक दिली असेल आणि या एपिसोड मधे प्रतिभाला Happy
नैना आणि वैशाली मॅरिड असल्याने अशा ड्राम्या पासून दूर असतात !
वैशाली तर जास्तच मागे रहाते जरा Sad

वैशाली तर जास्तच मागे रहाते जरा>>> तेच बरे आहे! ड्रामेबाजीमुळे सारेगमप जिंकता येईल एखादवेळेस पण जेव्हा त्यापेक्षा बाहेरच्या जगात जाणार तेव्हा उत्तम टॅलेन्टच उपयोगी पडेल. पुढे जाऊन या ड्रामेबाजीचा अर्थ वेगळ्याच पद्धतीने घेतला एखाद्या संगितकाराने/निर्मात्याने/दिग्दर्शकाने तर करीअर बरबाद पण होऊ शकते. वैशालीचा जो प्रोमो विडियो आहे त्यात ती अगदी मराठमोळं हसतांना खूपच बरं वाटतं!

मागचा तो ऑनिक धर 'कश्यात ना मश्यात अंधं घोडं तमाश्यात' याच प्रकारचा होता!
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

हो यावेळी प्रतिभाने ती जबाबदारी उचलली होती. मध्ये मध्ये आस्मा ती बॅटन देत होती. Proud
गेल्या आठवड्यात इम्रान आला होता त्यावेळी वैशाली तिथे नव्हतीच. नशीब यावेळी स्टेजवर होती. हो, बरोबर. जरा मागे मागेच असते ती. काय करणार स्वभावातच नसेल तर!!!

तिकडे स्पॉइलर यायच्या आत आकडे लावा बघू इथे! टॉप ला कोण ,बॉटम ३ कोण, अन कोण आउट होणार Happy
टॉप ला देबो ला आणण्यात येईल बहुधा
बॉटम ३ मधे शुजात, तरुण्,सारा ?

मला वाटतं बॉटम ३ असतील
कौशिक
सारा
शुजात

बहुदा सारा जाईल या वेळी.

टॉप ३ मधे बहुदा
देबो
याशिता
वैशाली

हं, सारा जाईल असं मलाही वाटतंय यावेळी. कौशि़क जायचे चान्सेस वाटत नाहीयेत आत्तातरी.
टॉपला वैशाली किंवा याशिता असेल. वैशालीच असावी खरंतर.

टॉप ला वैशाली, दुसर्‍या नंबर वर योशिता

.ती ओमान ची आस्मा जाणार ...
पुढच्या वेळी सारा, मग तो दिल्लीवाला तरुण

अहं, मला नाही वाटत आस्माला घालवतील इतक्यात. आणखीन एक २ राऊंड तरी ठेवतील तिला. आणि मग पाठवतील परत जर इथे काही काम नसेल तर.

मला वाटतं सारालाही नाही घालवणार एवढ्यात. हिमेशभाईच्या पैजेसाठी ड्रामा हवा ना काहीतरी? Proud

जे कोण जाईल शंकर किंवा हिमेश कडच्म जाणार या वेळी कारण अजुनही त्यांच्या कडे ४ गायक आहेत !
सारा नाही गेली तर कोण बरं जाईल??
कौशिक ??

कौशिक चांगला गातो तसा.
फक्त स्वतःच्या आकारमानाप्रमाणे एनर्जी वापरीत नाही. Proud

सर्वांशी सहमत.

सारा फार जास्त हसते नाही?

वैशाली मस्त. याशिताने कहर केला ह्यावेळेस. चक्क हंबरत होती Sad

कौशीक जाऊ नये.

सुनिधी
कोण गेलं ते पहायला स्पॉयलर वाच Happy

हा स्पॉयलर बीबी कुठे आहे?? मला दिसत नाही कधी.. Uhoh

मला त्या उपग्रह वाहिनी बीबी चा मेंबर नाही व्हायचय.. अजून वाचायचय मधे उगीच भरमसाठ पोस्टा दिसत रहातात..
तो बीबी पब्लिक करता येईल का???

कारण मला फक्त रीझ्ल्ट्स मधेच interest आहे.. ते पण वैशाली आहे म्हणून.. Happy

अडम, वर दिलीय ती लिन्क पहा की Happy

ती लिक पहाण्यासाठी ग्रुप मेंबर असावं लागतं नाहितरी परवानगी नाकरली जाते.. म्हणूनच तर तो पोस्ट लिहिलाय ना.. पब्लिक करण्यासाठी.. Happy

लोक हो, ३ दिवस मी बाहेरगावी जात आहे तेव्हा ह्या आठवड्याच्या गमती-जमती तुमच्याकडुन मिळु देत Happy

अडम, प्रत्येक पानाच्या वरती 'नविन लेखन खरेदी हितजुग आम्ही कोण' असे ऑप्शन्स दिसतील, त्यात नविन लेखन ह्या दुव्यावर गेलास तर गृपचा मेंबर नसतानाही सगळे वाचायला मिळेल.

नाही.. त्यात पण नाही दिसत हा बीबी..

हो का?? मला दिसतो त्यात. Uhoh

माझा तो 'अजुन वाचायचंय'चा ट्रॅक कधीच सुटला.

Pages