सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदी सारेगमप मध्ये आशा भोसले "महागुरु" बनुन येत आहेत असे ऐकले. आजचा एपिसोड बघितला पाहिजे.

आशा ताई आलेल्या आहेत already !
हिमेश आशा वाद सुरु पण झाला :))
अत्ता पर्यंत मला जय हो घरान मधला बिहार चा 'शशि', लाहोर चा 'फराज' आवडले.
हिमेश च्या रॉक मधला सरदार चांगला वाटला.
शंकर च्या 'लक्ष्य' घराना मधली लाहोर ची 'सारा रझा खान' चांगली वाटली.
एकलव्य घराना मधला झी बंगाली चा विनर ' शौमेन नन्दी'' पण छान गातो.
आपाली वैशाली भैसने माडे काही medical problem मुळे participate करणार नाहीये :((((

झी टी.व्ही. यु एस ए वाल्यां साठी खुष खबर !
एकदाचे ते बेकार सारेगमाप यु एस ए संपून एक ऑगस्ट पासून चॅलेंज २००९ सुरु होत.
१ ते १० ऑगस्ट रोज एक तास असेल,( जुने एपिसोड्स) आणि मग पंधरा तारखे पासून भारताच्या बरोबरीला आल्यावर रेग्युलर एपिसोड्स शुक्र्वार शनिवार सुरु.

वा वा दीपान्जली मस्तच बातमी दिलीस. वेळ काय आहे प्रसारणाचि?

अरे वा सही. कसलं टुकार होतं सारेगमप यु.एस.ए. आणि आशा, हिमेश वाद म्हणजे आणखीनच धमाल!!!! Proud

पण आशा ताई कधी कधी चुकीचे निणय देतात असं वाटत खरं !
ज्यांना online episodes बघायचे आहेत त्यांच्या साठी भारतात अत्ता पर्यंत झालेले एपिसोड्स
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

अशा ताईंनी अत्ता पर्यंत निवडलेल्या ' अर्शद' आणि 'जाहीर' ची निवड काही पटली नाही मला तरी !
फराझ किंवा तरुण चांगले होते जास्त !

मला शंकर आणि प्रितम आवडतात, आदेश ची कोणती गाणि आहेत? मला तर त्याचे एकहि गाणे ठाउक नाहि.

मला अत्ता पर्यंत आवडलेले सारेगमप चॅलेंज २००९ चे पर्फॉर्मन्सेसः

फराझ बट्ट, लाहोर- Pakistan
जग सुना लागे
[video:http://www.youtube.com/watch?v=aK9OlEHUyf8&feature=related]
तरुण सागर:
मेरी जिंदगी
[video:http://www.youtube.com/watch?v=J-iUIsffgbc]
सावन मे लग गयी आग
[video:http://www.youtube.com/watch?v=cSI594Tu_ZE&feature=related]
मितिका कंवर: Punjab
मेरी जा मैने कहा
[video:http://www.youtube.com/watch?v=vANsWeNaS50]
सारा रझा खान,लाहोर Pakistan
तेरे इष्क नचाया तत थैय्या
[video:http://www.youtube.com/watch?v=tT4pJ3SCv_4]

झालं एकदाचं सारेगमप चालू. आता दर शुक्रवार आणि शनिवार मेजवानी असणार आहे. हिमेश च्या घराण्यातला सरदार छान वाटला मलाही आणि त्या प्रतिभाचंही गाणं मस्त झालं.
पहिलीच इंट्रोडक्टरी राऊंड असूनही सगळे खूप तयारीत आले होते आणि कॉन्फिडंटली गायलेही.
आदेशच्या घराण्यातली ओमानची अस्मा मधे मधे मजेशीर हिंदी बोलून चांगला टीपी करेल अशी आशा आहे. Proud

सायो,
काल ४ तास होतं सारेगमप !
आजही बहुदा तसेच आहे, पुढच्या आठवड्या पर्यंत त्यांना भारताच्या बरोबर आणायचे आहेत एपिसोड्स.
आस्मा खूप विनोदी आणि निरागस आहे पण जास्त पुढे नाही जाणार ती, बेसूर आहे एकदम Happy

हो हो, मी बघितलं चार तास. आज असेल तर आजही नक्की बघणार.
बघुया, आता कोण टिकतंय आणि कोणाची दांडी गुल्ल होतेय ते.

काल आशा एकदम सिरियस मूड मध्ये होती. भडकलेलीही वाटत होती. नंतर नंतर जरा खुललेली वाटली.
यावेळी जसं इस्माईल दरबारला घेतलेलं नाहीये तसंच त्या हिमेशला का उडवत नाहीत कळत नाही. पात्र आहे एकदम. त्याऐवजी विशाल-शेखरही चालले असते की.

दिपांजली.... मस्तच... या वर्षी चॅलँज २००५ सारखे सा रे गा मा पा.. चे महायुद्ध सुरु झाले आहे माहीतच नव्हते.. आता पाहीनच...२००५ मधे मी ते पाहीले होते... मनापासुन आवडले होते तेव्हा. तेव्हा माझा सर्वात आवडता गायक होता हैदराबादचा हेमचंद्रा... तेव्हा जिंकलेला देबु वाइट होता असे मी म्हणत नाही पण विनित किंवा हेमचंद्रा जिंकले असते तर उचित झाले असते असे मला तरी वाटते... पण तेव्हा गाणार्‍यांचे टॅलंट मस्तच होते.. खासकरुन टॉप ६... मुंबईची निहिरा व हरयानाची हिमानी पण चांगल्या गाणार्‍या होत्या... तसेच इंग्लंडवरुन आलेला तो..नाव आठवत नाही पण त्यानेही जस्ट चिल चिल... जस्ट चिल.. हे गाणे मस्तच म्हटले होते. पण विनितने गायलेली परदा है.. परदा है.. ही कव्वाली व बार बार हां.. हे लगानमधले गाणे व हेमचंद्राने म्हटलेले वंदे मातरम हे ए आर रेहमानचे गाणे व दिल चाहता है मधले तनहाइ...... हे गाणे.. या चार गाण्यांना तोड नव्हती....

असो.. मला माहीत आहे हा २००५ विषयीचा बीबी नाही.. पण तरिसुद्धा त्यांची आठवण आल्याशिवय राहिले नाही... निहिरा,हेमचंद्रा व विनित सध्या काय करत आहेत? त्यांचे भविष्य खरच प्रॉमिसिंग वाटत होते...

आणि हो... शानच या वर्षीही कम्पेअरर आहे का? २००५ मधे अर्धी मजा त्यानेच आणली होती... स्टेज प्रेझेंस मस्त आहे त्याला आणि त्याच्या आवाज व गाण्याबद्दल तर वादच नाही....

नाही ह्यावर्षी शान नाहीये. गेल्या वर्षी पण नव्हता. गेल्या वर्षीपासून आदित्य नारायणने ती जबाबदारी पेलली आहे.
तो यूके हून आलेला परेश होता. हेमचंद्रा मस्तच होता. त्याचं ते ताल मधलं 'नही सामने' कसलं पॉवरफुल झालेलं . तुम्ही गेल्या वर्षीचं चॅलेंज मिस केलेलं दिसतंय. यु ट्युब वर कुठे मिळाले विडिओज तर नक्की पहा. अनिक, मुस्सरत, राजा , अमानत ,मौली चांगले गायक होते. पण त्यांना ज्यामाने प्लॅटफॉर्म मिळाला/किंवा त्यांनी तो वापरला तेवढे लकी निहिरा, हेमचंद्रा, विनित, देबोजित ठरले नाहीत.

हेमाचन्द्रा तलगु सिनेमा प्ले बॅक मधे बर्‍या पैकी बिझी आहे , आणि आगामी तेलगु लिट्ल चॅम्प्स चे तो होस्टिंग पण करणार आहे.
मुकुन्द,
सायो ने म्हंटले तसे गेल्या वर्षी पासून उदित नारायण चा मुलगा 'आदित्य नारायण' होस्टिंग करतो आणि माझ्या मते शान पेक्षा ही जास्त चांगला करतो !
ड्रामेबाज 'गजेन्द्र सिंग' अता स्टार प्लस कडे गेल्याने गेल्या वर्षी पासून 'झी सारेगमप 'चा फॉरमॅट पण जास्त चांगला झालाय आणि या उलट गजेन्द्र चा 'स्टार व्हॉईस ऑफ इंडीया' अगदीच फिका पडतो सारेगमप पुढे. त्यातत शान होस्टिंग करतो पण मुळात च शो , मेंटर्स आणि येणारे गायक च खास नसतील तर शान तरी काय करणार !
झी सारेगमप मधले मेंटर्स, गायकांच अदर्जा खूपच चांगला आहे, अर्थात इथेही ड्रामा आहेच पण गजेन्द्र चा जरा अतिच असायचा !
गेल्या वर्षी पासून इंटरनॅशनल स्पर्धक आल्याने दर्जा अजून सुधारला आहे झी सारेगमप चा !
मागच्या वर्षी पाकिस्तान चे मुस्सर्रत अब्बास, अमानत खूपच चांगले गायक होते.
मुस्सर्रत अब्बस कोणत्याही प्रोफेशनल सुफी गायकाला मागे टाकू शकेल इतका सुरेख गातो.
गेल्या वर्षी चा फायनलिस्ट राजा हसन पण छान गातो.
निहिरा ला काही गाणी मिळाली पण खूप नाही, विनित ला हिमेश नी जी काही गाणी दिली तीच !
पण अता स्टार प्लस च्या ' आजा माही वे' प्रोग्रॅम चे तो आणि इंडियन आयडऑल चा राहुल वैद्य होस्टिंग करत आहेत.
देबोजीत छान गातो, अत्ता झालेल्या जो जीता वही सुपरस्टार मधे तो अजुन च प्रोफेशनल वाटला.
विशाल शेखार ने एत्याला काही तरी ऑफर केलय खरं बाकी माहित नाही.

गेल्या वर्षीच्या सारेगम मध्ये आदित्य नारायण पहिल्यांदाच होस्ट झाल्याने नवशिकेपणाचा छाप त्याच्यावर होता. पण आता त्याला छान कॉन्फिडन्स आल्यासारखा वाटतोय.
अस्माची डाळ काही शिजली नाही. तिच्या गाण्यापेक्षा निरागसपणाला आणि हिंदीला मिस करेन.

हो, आदित्य अता जास्त च प्रोफेशनल झालाय.
मला त्याची इतर स्पर्धकां बरोबर केमिस्ट्री आणि वागणं आवडतं.
शान चं स्टार व्हॉईस ऑफ इंडीया मधे त्या 'श्रध्दा' ला सारखं लठ्ठ म्हणणं चुकीचं वाटतं !
ती लिट्ल चँप्स मधे असतानाही तिला शान आणि अलका याग्निक सारखे लठ्ठ पणामुळे शेरेबाजी करायचे Sad

स्टार व्हॉईस ऑफ इंडिया दिसत नाही आमच्याकडे. कोणत्या लिट्ल चँप्समध्ये होती ती? संचिता वाल्या?

स्टार माझ्या कडेही नाहीये, ऑनलाईन पाहिले होते कुठे तरी !
हो, श्रध्दा दास संछिता च्या लिट्ल चॅम्प मधेच होती, तिला सगळे 'गोलु' म्हणायचे, आठवली का?
छान गायची तिथे पण.

मी ते लिट्ल चँप्स फार फॉलो करत नव्हते. पण बघितल्यासारखी वाटतेय ती. अर्थात नाव लक्षात नाही आता.

केली, मी पण कॅचिंग अप करायला सुरुवात केली! Proud
आशाची एंट्री कसली सही दाखवली ना. आणि DJ, मला पटले आशाताईंचे सगळेच निर्णय (अर्थात त्यांनी एखाद्या मुक्यालापण पुढच्या राऊंडमधे पाठवले असते तरी ते मला पटलेच असते ही गोष्ट वेगळी. :P)
शिवाय त्या बोलतात पण अगदी बरोब्बर आणि मुद्द्याचं. त्या उद्दाम माकडचाळे करणार्‍या हिमेशला चांगल्या पुरुन उरतात. मला वाटतं शो चा TRP वाढवण्यासाठीच त्याला घेत असावेत. आणि त्यालाही ते माहित असणार. त्या मल्लिकाची कॉमेंट होती ना की या शो मधे कंटेस्टंटस आपले शांत असतात आणि जजेस मधेच काहीच्या काही नोक-झोक सुरु असते. Lol
आणि त्या जजेस चे तेच तेच एका साच्यातून पाडलेले कमेंटस ऐकून तर आत्ताच कंटाळा आला. अक्षरशः काहीही नवीन सांगत नाहीत. नुसती एकमेकांची री ओढणं सुरु असतं. मग आशा टोमणा मारते चांगला!

अगदी अगदी चाफा. मला त्या हिमेशला त्याची जागा दाखवतात ते खूप आवडतं. गेल्या वेळी हिमेशवर इस्माईल दरबार फ्री होता. यावेळी तसा काही बोनस नाही. Proud
मला त्या कंटेस्टंट्सना किती सहजतेने समजावून सांगतात ते बघायला खूप आवडतं.
मला पाकिस्तानातून आलेला एक कंटेस्टंट आवडला नाहीये. नाव लक्षात नाहिये त्याचं पण यू.एस सारेगम मध्ये पिंक कुर्ता वाला. फार काही पोटेंशियल नाहीय त्याच्यात. जेफ्रीही ठीक ठीक आहे. पण फार काळ टिकू शकणार नाही

हो, टी आर पी साठी तरी हिमेश हा पाहिजेच असतो सारेगमप मधे , तो नसला तर वाद कसे होतील?:)
हिमेश दुसर्‍या चॅनल वर गेला तर सगळी टी आर पी तिकडेच जाणार, तेंव्ह हिमेश हा हवाच Lol
आशा ताईं बद्दल बोलायचं झालं तर त्या बोलतात नेहेमीच नेमकं पण त्यांचे काही निर्णय पटले नाहीत हे पण तेवढच खरं , म्हआण्जे निवड एकाची करायची आणि Performer of the day दुसर्‍यालाच, चॅनल चा हात असेल कदाचित!
परवा शुजात ला न निवडता शायन ला निवडले त्याचं तर फारच आश्चर्य वाटलं !
शुजत चं 'सावन बीतो जाये' सुरेख झालं होतं.

या वीकेन्ड ला थीम होती हिप हॉप , रॅप. अन सारेगमप च्या क्रिएटिव्हज नी त्या थीम ला साजेसे जजेस कोण आणले असावेत! तर सुरेश वाडकर आणि गुलाम अली !! Proud रॅप ऐकताना बिचार्‍या त्या दोघांचे कंटाळलेले चेहरे अन द्याव्या लागताय्त म्हणून दिलेल्या कमेन्ट्स , बघवत नव्हतं अगदी!! धन्य!!
सगळ्या गुरुंची लहान मुलासारखी कट्टी होती! एकेक नाटकं नुस्ती Happy

मैत्रेयी.. अगदी बरोबर Happy
मितीका छान गायली. दिसते पण छान.. डोळे श्रुती सडोलिकर सारखे आहेत, अर्धेवट मिटलेले, म्हणुन मला अजुनच आवडली. Happy . बाकी मला हॉप्-हॉप गाणी विशेष आवडत नाहीत.

मितिका मला पण आवडते, मस्त आहे.
परवा ते ऍवॉर्ड त्या याशिताला कसे काय गेले म्हणे ?, देबोजीत दत्ता बेस्ट होता !

याशिताला दिले कारण म्हणे की तिच सूर अन आवाजाचे texture जजेस ना जास्त आवडले. सांगितले की तसे त्यांनी.
तसे माझे फेवरिट्स मितिका, शशी, देबोजित आहेत च पण गेल्या वेळच्या राजा, मुसर्रत इतके कुणी अजून नाही आवडलेय.

Pages