सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण मुस्सर्रत- राजा च्या लेव्हल इतकं अजुन तरी कोणी नाही वाटलं!
देबो, मितिका, शशि, जाहिर, फरीद, कौशिक देशपांडे, तरुण, फराज, प्रतिभा, सारा, शुजात , याशिता , नैना हे सगळे चांगले गातात.
पण घरान्यां मधे 'धूम 'घराना सर्वात स्ट्रॉन्ग आहे , आणि मुख्य म्हणजे प्रीतम स्वतः सध्याचा बॉलीवूड चा सुपरहिट संगीतकार आहे!
मितिका-शुजात्-देबोजीत्-याशिता सगळे चांगले गायक धूम कडेच आहेत !
२००५ मधे नेमके निहिरा आणि हेमचन्द्राला चांगले असूनही घराना बेकार मिळाल्याने लवकर जावे लागले !
निहिराचा इस्माईल आणि हेमु चा आदेश, दोधांकडे मुळात काही काम नासते, ते कुठुन या स्पर्धकांना पुढे आणणार होते :)?
असो, या वेळी ब्रम्हास्त्र मधून परत येणार्‍या मधे सर्वात स्ट्राँग गायक तरुंण च आहे, किंवा सायन !

ती चुडैलोसे प्यार वाली गेली ते बरं झालं! त्या इन्ट्रो चा कंटाळ आला होता अगदी. तसेच ते अनुपमा - जिसे प्यार करती है उनकी सासूमाँ!! कित्ती बोर!! Uhoh

अगदी अगदी. त्या अनु्पमाची सासू मा पण कंटाळली असेल ते इंट्रो ऐकून.

माझे आवडते गायक सुनविंदर, प्रतिभा, शुजात, देबोजित,कौशिक. सगळ्यांची नावं ही आठवत नाहीयेत आत्ता.
त्या जेनिसचा मेलोड्रामा कसला इरिटेटींग होता. अगदी २०१२ ची जगबुडी आत्ताच आल्यासारखी करत होती. Proud

LOL MT त्या इंट्रोज बद्दल अगदी सहमत. एकूणच त्या इंट्रोज आणि हिमेश-आदेश-प्रीतम या त्रयीचे कॉमेंट्स "तेच तेच तेच तेच तेच तेच तेच तेच तेच तेच तेच तेच तेच" असतात. काहीही म्हणजे काहीही नवीन नसतं त्यात. Uhoh

पण ती अनुपमा पण चांगलं गाते. ती आशाच्या वेळेस "प्यार तो होना ही था" हे जसपिंदर नरूलाचं अवघड गाणं छान गायली होती.

मला सारा आवडत नाही. तिचं लक्ष गाणं गाण्यापेक्षा ते गाताना स्माईल करत राहण्यावर जास्त असतं असं माझं मत आहे. Proud (हे मुशर्रफच्या कौतुकाचा परिणाम म्हणून असेल!) मला शुजादही आवडत नाही. कविताने शयनच्या ऐवजी शुजादला काढायला हवा होता. असो.

हो, ती सासू मा कि लाडली, चालु सरदार, चुडैल से प्यार , फराज फटाफट बट, या सगळ्या इंट्रो फालतु आहेत !
जजेस मधे आदेश इतरांनी बोललेलच रिपिट करतो बहुदा !
शंकर महादेवन सर्वात सेनसिबल बोलतो, पण नेमके त्याचा घराना फारसा स्ट्राँग नाहीये !

हो ना. तेच रटाळ इंट्रो आता जानेवारी पर्यंत ऐकायचे आहेत. गेल्या वर्षीच्या चॅलेंजलाही वीट आणला होता 'छत्तिसगढ की बार्बी डॉल सुमेधा करमाहे' ऐकून मला त्यांचे कपडे नी घाटीछाप दागिनेही बघवत नाहीत अजिबात. त्यापेक्षा स्वत:चे घातलेले परवडले.

अरे सा रे ग म प मराठीची विजेती.. वैशाली भैसने-माडे नाही आहे का ह्यात गेल्या वेळेस जसा अभिजीत होता....
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

नाहीये. दिपालीने सुरुवातीच्या पोस्ट्स मध्ये लिहिलं होतं की काही मेडिकल प्रॉब्लेम्समुळे ती नसणार आहे.

कपड्याचं विचारायला नको अगदी!! त्या आदी ला लाज कशी वाटत नाही पिवळ्या, गुलाबी पँट्स वगैरे घालताना Biggrin

शशी सुमन ला का घालवलं काल Sad खरं तर काल त्या याशिकाचं गाणं अजिबात नव्हतं आवडलं मला! मला वाटलं तीच जाणार.
यांनी दर आठवड्यात ४-४ लोक घालवण्याचा कै च्य कैच फॉर्मॅट केलाय आता Uhoh
फास्ट फॉरवर्ड केल्यासारखं वाटतेय!!

बरं आहे की.. नाहीतर फार लांबत जातं. मला प्रतिभाचं गाणंही काही खास वाटलं नाही. शुभा मुद्.गलचं गाणं निवडणं म्हणजे रिस्कच आहे! शशी जायला नको होता हे मात्र खरं. आणि आता कोणी निघालं की American Idol सारखं बॅकड्रॉपला गाणं वाजवायला लागलेत वाटतं. यावर्षी शफाकत अली खानचं "ये हौसला" वाजवतायत. गाणं अर्थात सुंदरच आहे त्यामुळे आय ऍम नॉट कंप्लेनिंग. Happy

btw फरहान अख्तर बोलत होता तेव्हा इतका जावेद अख्तर चा भास होत होता! जावेद साहेबांचा आवाज अन लहेजा तसा युनिक आहे , तो त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभतो अगदी, त्यामुळे फरहान च्या तोंडी तोच आवाज ऐकून जरा गंमत च वाटली Happy

शशि सुमन काल उगीच गेला :(, ब्रम्हास्त्र मधून येण्याची शक्यता पण कमीच दिसतेयः(, कारण आज हिमेश चा छोटा सरदार पण गेला !
मला तो सन्विन्दर आवडत नाही फारसा पण पब्लिक नक्की त्याला आणणार !

अत्ता पर्यन्त तरी मुलां मधे देबोजीत दत्ता का जवाब नही , जबरी गातो तो!!:)
मुलीं मधे मितिका च आवडते अजुनही, नैना पण छान गायली आज !

हिमेस मग आता नि:शस्त्र झाला का Happy त्याच्याच घराण्यात होतायत सगळी एलिमिनेशन्स!!

हो, देबोजीत, मितीका आणि नैना मस्त. नैना चा आवाज खूप सुंदर लागला होता ह्या वेळी. देबो स्पर्धा जिंकून हॅटट्रीक करणार वाटते. आपला देशपांडे पण छान गातोय. साठे ठीक ठीक. सुरेश वाडकारांच्या कॉमेंट्स कधी कधी ऐकण्यासारख्या असतात :). मला वाटते साठेलाच ते म्हणले, 'और वर्क आऊट करो बेटा, ठीक है?' मग ती हो म्हणाल्यावर त्यानी दंडातली बेडकी दाखवताना जशी ऍक्शन करतात तशी केली आणि म्हणाले 'गाने में '. Happy
फार साधी व्यक्ती.

त्या आस्माला कशाला बोलावलय परत :(?
ब्रम्हास्त्र मधून येण्याची लायकी नाहीये तिची पण middle eastern votes साठी , funny hindi साठी, थोडक्यात टी आर पी साठी लायकी नसताना तिला आणण्याचा झी चा काही तरी प्लॅन दिसतोय !!

>>यावर्षी शफाकत अली खानचं "ये हौसला" वाजवतायत. >>
चाफा, मला सांगू शकाल का हे गाणं कोणत्या चित्रपटातलं/अल्बममधलं आहे ते?

डोर सिनेमा मधलं आहे...

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट

शशी सुमन उगाच गेला. त्या ऐवजी साठेची दांडी गुल्ल झाली असती तरी चाललं असतं. सो सो आहे ती.
ब्रम्हास्त्र मधून किती जणं येण्याचा चान्स आहे?

२ येतात वाटते ब्रह्मस्त्र मधून. शशी, शयन हे यायला हवेत! तो चालू सरदार नको! आस्मा ची काय भानगड मला पण कळली नाही Uhoh

ओमानचे नी भारताचे संबंध दृढ करायचा प्रयत्न असेल झी चा. आणखी काय!!!विकेंडला मौलीचं 'तू नील समंदर' ऐकायला नी पहायला मिळालं. मस्त म्हटलं. पहिल्या वेळेसारखंच पावरफुल...

काल शुजाद, प्रतिभा दोघे सही गायले. प्रतिभा छान गातेच पण शुजात चीही गाणी हल्ली मला आवडतात. चाफ्या उगाच त्याच्या मागे लगू नकोस Proud
आणि त्या देबोजित च्या जरा मंद असण्याची इतकी जाहिरात कशाला केली Uhoh
हिमेस ची दयनीय अवस्था आहे एकूण Happy १ च क्यांडिडेट उरला त्याचा!!

lol MT, मी आत्ता इथे हे लिहायला आलो की अनुपमा ऐवजी शुजातला का काढलं नाही म्हणून! Angry पण तू म्हणतेस तर नाही म्हणत. Proud अनुपमा या वेळी चांगलं गायली नाही हे खरं पण तिची तब्येत बरी नव्हती ना! Sad

प्रतिभा आणि याशिता चांगलं गायल्या.

मला काल शुजात, प्रतिभा आणि याशिताही आवडली !
फराज ची गाणी पण मला नेहेमीच आवडतात ..जजेस काहीही म्हणोत, फराज रॉक्स Happy
देबोजीत दत्ता ला 'भगवान ने आपको अधुरापन' दिया है कशाला म्हंटले:(??

आणि हो, एकदाची 'सासू मा कि लाडली' गेली बरं झालं , आधीच जायला हवी होती जेंव्हा शशि गेला !

कशाचीही जाहिरात करतात. काय गरज होती देबोजितच्या व्यंग(?)मधे आणायची?
त्याचं आणि प्रतिभाचं 'duet' मस्तच झालं. शुजातचा पण सही ' performance'.
याशिता मला त्या नऊवारीत एकदम मोलकरणीसारखी वाटत होती. जरा विचित्रच नेसली होती साडी.:फिदी:

आपण इथे शुक्रवारी आणि शनिवारी कोण एलिमिनेट होणार ह्यावर बेटिंग करायला हरकत नाही.
आज कोण जाईल असं वाटतंय? माझ्यामते साठेबाई नंबर लावतील आज.

काल दिपाली साठेऐवजी साराचा नंबर लागायला हवा होता. दिपाली तिच्यापेक्षा पुष्कळ चांगलं गायली.
कौशिकचे दोन्ही परफॉर्मन्स मस्तच झाले. कैलाश खेरचं 'तेरी दिवानी' म्हणायला अजिबातच सोप्पं नाहीय पण छान निभावून नेलं त्याने.

एकंदर शुक्रवार ची बॅच कालच्या बॅच च्या तुलनेत वरचढ आहे. पुढ्च्या वेळी या बॅच मधून २ करा म्हणावे एलिमिनेट!! Uhoh
कालचे तसे खास नव्हते पर्फॉर्मन्सेस. कौशिक तसा तयारीने गातो पण ओरिजिनॅलिटी / प्लेबॅक पोटेन्शिअल वाटत नाही मला तरी. क्व्हर वर्जन्स, ऑर्केस्ट्रा वगैरे टाईप्स! आणि काल काय ग्रह तारे अन टॅरो कार्ड्स?!! काहीच्या काही.सारेगम च्या creatives ना झाले काय! Angry
त्यातल्या त्यात दुसरी फेरी चांगली झाली. त्यातही पुन्हा सारा अन दीपालीच्या कॅट्फाइट ची नको इतकी चर्चा !!

Pages