सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैशाली-हिमेश पंख्यां साठी गुड न्युज!
हिमेश नी वैशाली कडून आगामी चित्रपटा साठी तब्बल ३ गाणी गाउन घेतली आहेत, १ बहुदा सोलो साँग आहे Happy
ही बातमी श्री. अनंत माडेंनी दिली, वैशालीशी बोलल्यावर बाकीचे अपडेट्स लिहिते:)

********** स्टाइल मे रहनेका !! ************

अरे वा!!! चांगली बातमी.. ती गाणी आता गाजली की झाले.. तु बोलणार आहेस का तिच्याशी?

बोलले मी काल, हिमेश बरोबर तिन्ही गाणी डुएट आहेत , चित्रपटाचे नाव : इश्क अनप्लग्ड !
अजुन काही अपडेट्स आहेत Happy
बप्पी लहिरी च्या ' चोर पे मोर' साठी पण प्ले बॅक दिलाय नुकताच:)
मराठी मधे :
जावै बापु झिंदाबाद ( संगीतः सलिल कुलकर्णी)
बेलगाम (संगीतः निलेश मोहरिर )
नवरा माझा भवरा
आणि अजुन एक अनिलेश मोहरिर च्या अगामी चित्रपटात ३-४ गाणी गायलीये वैशाली Happy
यु एस -कॅनडा मधे वर्ल्ड टुर पण होत आहे मे जुन मधे .
तारखा समजल्या कि लिहिन अपडेट्स.

अभिनंदन वैशालीचं. हिमेशने तिला सारेगम संपल्यानंतरही साथ दिली म्हणून त्याचेही आभार. विनीत आणि अनिकला त्याने एवढी संधी दिल्याची वाचनात तरी आलेली नाही.

सायो,
विनित ला दिली होती हिमेश नी गाणी, रॉकी आणि नन्हे जैसलमेर मधे.
हिमानी, अभिजितसावन्त ला पण दिली संधी, अर्थात मेल व्हॉइस ची चांगली गाणी हिमेश स्वतः च गातो, त्यामुळे विनित ला दिलेली गाणी साइडी होती अगदीच.
वैशाली म्हंटली कि तिला दिलेली सगळी गाणी मात्र तिच्या आवाजाला सुट, तिला स्कोप असलेली आणि स्वतः चे स्किल्स दाखवता यतील अशी आहेत Happy
चला, हिमेस भाय ने चांगली कामं केली या वर्षी !

********** स्टाइल मे रहनेका !! ************

ती नूज खरी आहे काय? ह्म्म. खरी असेल तर पूनम मुर्ख होती मग.

>>>चला, हिमेस भाय ने चांगली कामं केली या वर्षी !
आत्तापर्यंतची पापं फिटली त्याची. Proud

दिल दिया है मधे तर हिमेस नी चक्क मिथुन साठी विनीत चा प्लेबॅक वापरला होता....
तसं वैशाली च्या बाबतीत होऊ नये....
_______
धागे तोड लाओ चाँदनी से नूर के...

सुमेधाचा आवाज छान वाटतोय, अगदी नाजुक. राजाचा तर प्रश्न च नाही. कुणाचं आहे संगीत?

संगीतकार बप्पी लाहिरी बहुदा !
'तेरे संग' चे संगीतकार शोधायचा प्रयत्न केला , 'सचिन्-जिगर' हे नवीन नाव आणि १ बप्पी लाहिरी च गाणं आहे असं वाचल !
मागे बप्पी लाहिरी म्हणला होता न कि राजा-सुमेधा कडून डुएट गाउन घेतल, हेच असाव :).
छान मेलोडियस आहे गाणं !

.

लिंक मधे काहीतरी गडबड आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=775...

आणि "एम एन एस' जॉइन करत आहे" नाही "मनसे मधे प्रवेश" Happy मराठी बोल नाहीतर राजगडावरुन तुझ्या नावाने फतवा निघेल Happy

वैशाली पाठोपाठ अनेक मान्यवर मंडळी(सचिन, पाडगावकर, यशवंत देव, खळे) मनसे च्या मार्गावर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5009072.cms

Pages