सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं, नैना जाणार हे कळलं होतंच आधी पण ती जायला नको होती. आवाज चांगलाय तिचा. शंकर महादेवन म्हणाल्याप्रमाणे 'फक्त' गुणी गायिका आहे ती. जोक्स क्रॅक करायला जमत नाहीत .

वैशाली गायली चांगलं पण जजेस म्हणाल्याप्रमाणे एनर्जी कमी पडली तिची. झहिरचं गाणं आवडलं मला. देबो ओके ओके वाटला. मूड खराब वाटत होता त्याचा आज.

याशिताचे परत तेच फडतूस कपडे. कौशिक नी तरुणचा ड्रामा छान झाला. तरुण डोक्यात जातो माझ्या. खूप ऍटिट्युड वाटतो त्याला.

प्रतिभाचा आवाज बसलेला कळतच होता. ठिक झालं तिचंही गाणं. पण हिमानीची सर नव्हती .
ज्यांनी हिमानीचं 'नी मै यार मनाना' ऐकलं असेल त्यांना प्रतिभाचं गाणं विशेष आवडणार नाही.
दिपाली हिमानीच्या त्या गाण्याची लिंक आहे का तुझ्याकडे? यू ट्युब वर सापडत नाहीये.

जाहिर रॉक्स , मस्त गायला आज , हळु हळु या स्पर्धे पधे त्याचं पारड् जड होतय असं दिसतय!!
वैशाली साठी हा आठवडा थोडा अवघड जाणार व्होट्स मिळायला, तिला सगळी पंजाबी टाईप नेसल टोन वाली गाणी का देत आहेत कळत नाही , ती श्रेया टाईप गाण्यांना जास्त सुट आहे !
नैना छान गायली !

असो, तरुण चांगला गायला पण माझ्याही डोक्यात जातो तो !
मला देबोजीत चं गाणं आवडलं !
मुलांनी गाण्यांची निवड चांगली केली जास्त!

बघा, मी म्हटलं होतं ना सारा नाही जाणार म्हणून? Wink उलट सारा छान गायली आज.

व्हाय इज शुजात स्टिल अराऊंड? Uhoh Proud

सारा खरच छान गायली!
चाफ्या,
शुजात जाउ दे पण आस्मा अजुन ही आहे आणि तिला सगळ्या गुरुं कडून हिस्टरी मिळाली त्याच काय ???
मला डोळ्या पुढे सहन होत नाहीये आता ती, एक तर ती इतकी लठ्ठ असताना असे विनोदी कपडे देतात तिला आणि तिचे सो कॉल्ड गायन(!) आणि व्यवस्थित हिंदी येत असतानाही हिंदी न येण्याच तिचं नाटक अति होत चाललय अता !
मागच्या आठवड्याथी इतकी लठ्ठ असताना पांढरी जिन्स दिली होती तिला आणि लठ्ठ पणा अजुन हायलाइट होईल असे क्लोज अप घेतात आस्मा चे !

मला आज सारा च सर्वात जास्त आवडली, बाकी याशिता आणि शौमेन ला पण उगीच च इतकं डोक्यावर घेतल!

यावेळी झहीर अन सारा बेस्ट! या दोघात कोणालातरी संगीत चक्र यावेळी नक्की Happy
वैशालीचं गाणं काही वाईट नाही झालं, चांगलं गायली की ती. देबो ऍव्हरेज.
आस्मा हा प्रकार असह्य आहे खरंच Angry हाकला आता तिला Uhoh

मै-दी, कोणती गाणे गायली वै-सारा-जहीर नी?

जाहिर बेस्ट च.. त्यानी सिंग इज किंग मधल् 'जि करदा' गायलं, जाहिर चं सिलेक्शन पण चांगलं असतं:)
वैशाली'नी मन समुंदर डोल गया' गायलं पण तिच्या कडून जितकं आपेक्षित असतं तेवढ् सुरेख नाही:), मला कळत नाही कि तिला पंजाबी थाटाची थोडी नेजल टोन मधली गाणी का देत आहेत, तिच्या गायकी मधे परफेक्शन आहे, आवजात गोडवा आहे, पण पंजाबी गाण्यां साठी लागणारी पॉवर नाहीये, श्रेया , लताजी, साधना सरगम, महालक्ष्मी यांची गाणी ती जास्त छान गाईल !नैना सुट होती तशा गाण्यांना !

साराने गायलेलं हिमेश चं ते मूळ गाणं मी आधी ऐकलं नव्हतं! नन्तर ऐकलं पण मला साराचं व्हर्जन च छान वाटलं! तिच्या आवाजाला सूट झालं ते.

झहिर रॉक्स !!
वैशाली नंतर माझा दुसर्‍या नंबर वरचा आवडता स्पर्धक Happy
जय माता दि लेट्स रॉक :)!!

साराने गायलेलं गाणं मी आधी कधी ऐकलं नव्हतं त्यामुळे नो कमेंटस. सगळ्यांनी कौतुक केलं त्याअर्थी चांगलंच असावं.
झहिरचं गाणं मस्तच झालं. मागे ही त्याने अशाच टाईपचं गाणं म्हटलं होतं ते ही मस्त झालं होतं.(move your body)
याशिता आणि आस्मा एकदम डब्बा.
एकंदरीत मला असं वाटायला लागलंय की वैशाली ऐवजी याशिता ला पुढे आणतील की काय कारण कितीही फडतूस गायली तरी कमेंटस चांगल्या मिळतात आणि वोटसही. आणि वैशालीला तिच्यासारखं पुढे पुढे नाचायला जमत नाही ते तिला नडू शकेल असं दिसतंय.

झी ला मुळात गाण्यापेक्षा इतर गोष्टींमधे रस आहे. काही ना काही ड्रामा असल्या शिवाय टीआरपी मिळणार नाही असा विचार दिसतोय त्यांचा. त्यातून मग आस्मा, तरुण, देबो, याशिता असले लोक सोकावतात! त्या आदि चे माकडचाळे पण त्यातलेच Uhoh
वैशालीचं इथे भवितव्य त्यामुळेच अवघड वाटतेय मला Sad

अगदी बरोबर. 'टॅलंट' वगैरे गोंडस नाव देऊन असले ड्रामा करण्यापेक्षा आणि ते करणार्‍यांना पुढे आणण्यापेक्षा तमाशा सुरु करावा झीने. Angry

पण मला सांगा ती उर्मिला स्टेजवरती आली होती तेव्हा वैशाली होती कुठे? स्टेज वर तमाम पब्लिक दिसत होतं पण वैशाली दिसलीच नाही! पुढे पुढे करत नाही ते ठीक पण ही गायबच होती की काय!
सायो, मी पण नव्हतं ऐकलेलं ते गाणं. पण तरीही सारा छान गायली त्यामुळे आता लक्षात राहील.

तुम्ही सगळे आस्मा वर एवढे का चिडताय? Proud तिचे गाणे इंप्रूव होते आहे दिवसेंदिवस. ~~D

चाफा, वैशाली खूप वेळा शनिवारी स्टेजवर नसते. शुक्रवारी तिचा परफॉर्मन्स असतो त्यामुळे तिला असावंच लागतं. कदाचित तिची मुलगी लहान आहे म्हणूनही असेल पण त्यातच तिचा तोटा आहे.:(

बरं शुजात बद्दलचं तुझं मत तू दिलंस का यावेळी? Proud

उर्मिला छान दिसते अजूनही. तिचा दुपट्टा मला आवडला जरी तो ड्रेसवर मिसमॅच दिसत होता तरीही. Wink

चाफा,
वैशालीची तब्येत खूप बिघडली होती म्हणून ती दुसरा एपिसोड पूर्ण पणे झोपून होती, Sad

आणि आजकाल प्रत्येक एपिसोडमध्ये सेलेब्रिटीनी स्टेजवर धुमाकुळ घालायचा का ठरवलाय? Uhoh हिमेश तर नुसता पेटला होता . सारखा बाजू सावरून धरण्यासाठी ऋषि कपूर इज ग्रेट यार मुझमें उसको मत ढुंढना वगैरे. Proud
'आपका सुरूर' डब्यात गेला तसा हा जाऊ नये म्हणून हा प्रयत्न(?) 'कर्ज' बघा म्हणून अक्षरश: पब्लिकच्या डोक्यावरच बसला होता, आणि सिक्रेटही होल्ड करू शकला नाही बिचारा, घाईघाईत सिनेमामध्ये एक ट्विस्ट आहे हे ही सांगून मोकळा.

<'आपका सुरूर' डब्यात गेला तसा हा जाऊ नये म्हणून हा प्रयत्न(?)<>

'आप का सुरूर' हा एक सुपरहिट चित्रपट होता.

आप का सुरुर हा सुपरहिट आहे. हिमेश आवडो न आवडो हे सत्य आहे. त्याच नशिब जबरा आहे. कर्ज पण चालेल.

हो, आप का सुरुर जबरदस्त हिट होता:)
हिमेश जितक्या लोकांना आवडत नाही त्याच्या पेक्षा किती तरी जास्त लोकांना आवडतो:), हिमेश चे फॅन्स सगळ्या क्लास मधे आणि मास मधे आहेत त्यामुळे कर्ज हिट सुध्दा होणार यात काही वाद नाही !
हिमेश कसाही असो, पण त्याचा पॉझिटिव्ह ऍटिट्युड आणि कॉन्फिडन्स ला तोड नाही!

>>हिमेश चे फॅन्स सगळ्या क्लास मधे आणि मास मधे आहे>> त्यात मी पण आहे, पण त्याचा अभिनय पाहिला नाही कधी. इथे अ.आ. मध्ये आपका सुरूर ची चिरफाड पाहून तो 'डब्यात्'ला असावा अशी धारणा करून होते मी. असो...
कर्ज पहावा काय मग?

दक्षिणा,
अर्थात बघ :), आवडला नाही तर अचाट आणि अतर्क्य म्हणून पहायचा:))

दिप Lol
ए पण हिमेशच्या हेअर स्टाईलची काय भानगड आहे? तो विग घालतो का? Uhoh
(हा विषय या बी बी चा नाही पण राहवलं नाही म्हणून विचारलं.)

सारेगमपमध्ये कर्ज प्रमोट करत होते की कर्जच्या प्रमोशनमध्ये सारेगमप घुसडलं होतं हे न कळण्याइतपत गोंधळ सुरु होता स्टेजवर.

आणि ते आस्माच्या अरेबिक मूव्हीचे काय मूर्ख फॅड आहे ते!! Angry ती काय लहान आहे का आता असले बोबडे बोल टाईप्स इनोद करायला!! अन हिमेश ला शुभेच्छा देताना बरे पोपटासारखे बरोब्बर हिन्दी बोलली! Uhoh

अग तिच्या विनोदाचं करण्याचं सोड, पण ते विनोद आवडणारे लोक ही आहेतच की.
जोवर आहे तोवर तिला सहन करावंच लागणार. Angry

Pages