सारेगमप चॅलेंज २००९ : गप्पा आणि videos !

Submitted by दीपांजली on 17 July, 2008 - 01:52

कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !

सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.

या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्‍या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )

सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना

The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.

ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपांजली थँक्स.. जहीर आणि सारा ची गाणी चांगली झाली. जहीर चे खुपच चांगले झाले. सारा चे शब्द मला समजत नव्हते पण भावना चांगल्या दाखवल्या तिने. मुळ गाणे मी पण ऐकले नाहीये परंतु मैत्रेयी म्हणते तसे हिमेश पेक्षा तिचे चांगले असेल असेच वाटते Happy
वैशाली, पुढच्या वेळेस कमाल कर गं!!

सुनिधी,
स्पॉयलर पहा वैशालीच्या अगामी परफॉर्मन्सेस बद्दल आणि एलिमिनेशन्स बद्दल वाचायचे असेल तर :).

सकाळ मधली आस्मा बद्दल बातमी पहा :

"सारेगमप या कार्यक्रमातील ओमानच्या आस्मा मोहंमद रफी या मुलीच्या वाट्याला अशाप्रकारची दुःखदायक घटना आली आहे. आईचा विरोध डावलून तिने या कार्यक्रमात भाग घेतला. त्यामुळे तिच्या आईने वडिलांकडे घटस्फोट मागितला आणि वडिलांनी तो दिला आहे. त्यामुळे आस्मावर आसमान कोसळले आहे. "

आता काही खरं नाही रे बाबा! आता या दर्द भर्‍या कहाणीची हृदयद्रावक रेकॉर्ड वाजणार सारेगमप मधे!! Uhoh

बाप रे काय नाटक? Uhoh
हा अजुन एक ड्रामा तर नव्हे? Sad

नाटक नाहीतर दुसरं काय?आस्माला भारतात लोकप्रिय करण्याचा झी ने विडा उचललेला दिसतोय.

याच आठवड्यात लगेच दाखवणार आहेत हा आस्मा का दर्द भरा ड्रामा सारेगमप मधे :))

हाहा! आणि दुबईच्या सारेगमप मधे जेव्हा गेली होती, तेव्हा का नाही घटस्फोट झाला म्हणे? खरंच अशा कारणासाठी घटस्फोट दिला असेल तर इटस फॉर गुड!

या लोकांना काय लागतय घटस्फोट घ्यायला, कोर्ट कचेर्‍या थोडीच लागतात त्यांना , तो शब्द ३ वेळा म्हटला की झालं!! Proud

अगं ते झालंच. पण आस्माच्या आईला घटस्फोट घ्यायची मोकळीक आहे हे बघून आश्चर्यमिश्रित आनंद वाटला.

चाफ्या,
दुबई चालतं तिच्या आईला, त्या प्रोग्रॅम मधे ती हिजाब वगैरे घालयाची, भारत ''हिंदुस्तान' का चालत नसेल एखाद्या कट्टरपंथीय बाईला ते सांगायची गरज नाही, सारेगमप टिम ला म्हणावं मोकळं करा आता आस्मा ला तिथे जाउन आई वडिलांचा समेट करायला ,:))

अगदी अगदी, त्या अस्मा ला खरच आता बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे..
बेसुरं गाऊन अस्मा अजुन टिकलिये आणी मितिका, नैना बिचार्‍या तिच्या आधी बाहेर पडल्या Sad

नुसती टिकली नाहीये तर 'हिस्टरी'ही मिळवतेय.

असल्या कारणासाठी घटस्फोट? कमाल झाली. Uhoh

आज् अगदी खर्र खर्र सांगते, आस्मा माझ्या लिस्ट मधे बॉटम ला नाहिये! बॉटम पर्फॉर्मन्स मला याशिताचा वाटला!! Angry
मुळीच चांगलं झालं नाही ते गाणं Uhoh काय उगीच सगळे तिला चढवत होते वावावा करत!! आस्मा या अली... बरच बरं गायली तिच्याहून!!
जहीर , सौमेन , प्रतिभा मस्त! सारा पण चांगलं गायली. देबो, शुजात ऍव्हरेज.

मला पण सर्वात बेकार याशिता वाटली, सुफी गाणं आयर्टम साँग सारख् गायली..शंकर ला झालय काय.. मागे याशिताची तुलना सुनिधीशी केली, आणि आज पण भरभरून स्तुति...अता अजुन एकदा जरी त्यानी याशिताची स्तुति केली तरी माझ्या रँकिंग मधे या वर्षीचा सर्वात वाईट जज....शंकर माझ्या ब्लॅक लिस्ट मधे !!

आज खरच टॉप ३ स्वतःच्या पदाला साजेसे गायले, एकदम मस्त !!

माझ्या दृष्टीने आजचे रँकिंग
१.जाहिर
२.प्रतिभा
३. शौमेन
४. तरुण
५.सारा
६.वैशाली
७.कौशिक
८.शुजात
९.आस्मा
१०.याशिता

याशिताचा आवाज चांगला आहे खरंतर. पण तिच्या ऍटिट्युडमुळे आणि पुढे पुढे नाचण्याने माझा डोक्यात जायला लागलीये. प्रतिभाचा परफॉर्मन्स मी गेल्या वर्षी मौलीने गायलेल्या ह्याच गाण्याशी कंपेअर केल्याने आवडला नाही. वैशाली, तरुण, सारा,देबो ओके ओके होते. झाहिर छान गायला. आस्मा आपल्या कुवतीला शोभेलसं गायली.
जजेसचं ज्याला त्याला हिस्ट्री देत फुक्कट वा वा करणं काही नवीन राहिलेलं नाहीये मला. त्याच्यावर माझा उपाय म्हणजे आस्माच्या गाण्यानंतर मीच तिची स्तुती करायला सुरुवात झाली आणि जजेसच्या कमेंट्सनंतर नेहमीपेक्षा वाईट जरा कमी वाटलं.
somehow मला गेल्या वर्षीच्या मानाने ह्या कंटेस्ट्समध्ये एवढी अटॅचमेंट वाटत नाहीये. कुणीही राहिलं/गेलं तरी त्याचं काsssssssssssहीच वाटत नाहीये.

कौशिक गेला. Sad सारा डिझर्व्ड टू बी इन टॉप थ्री. आज पण सारा चांगले गायली. वैशाली अगदीच सो सो. प्रतिभा फार सुरेख गायली आणि जहीरही. तरूण चे गाणेही छान झाले. शौमेन ओके. आस्मा आणि याशिताही छान गायल्या. याशिताने कैलाश खेरचे गायलेले गाणे खूप अवघड आहे. ते तिने पेलवले, फक्त एका ठिकाणी सुरात गेली. सगळ्यात वाईट परफॉर्मन्स शुजातचाच होता. गाण्यात कुठेच आत्मा नाही आणि सूर तर विचारायलाच नको. Sad

शंकर महादेवन च्या कमेंटस एकदम अचूक असतात. त्याने बरोब्बर शुजातला काय चुकले ते सांगितले. याशिताच्या बाबतीत थोडी जास्त तारिफ केली ते खरेय पण मला याशिताचे गाणे काही वाईट झाले असे वाटले नाही. माझे रँकिंग असे:

१. प्रतिभा / जहीर
२. जहीर / प्रतिभा
३. तरूण
४. सारा
५. शौमेन
६. देबो
७. कौशिक
८. याशिता
९. वैशाली
१०. आस्मा
११. शुजात

चाफ्या, त्या याशिता चा सूर चुकला असं नाही पण तिने ते सूफी गाणं आयटेम साँग टाईप गायलं अन त्या गाण्याचा फील च गेला पार!
असो तूही तिला ८ नंबर वर टाकलयस मग ठीक Happy

ह्म्म माझ्या मते कालचा एपिसोड मोस्टली 'बोरिन्ग'!! कंटाळवाणी घीसीपीटी गाणी होती कुठली तरी. वैशालीचं तरी छानच झालं.
देबो अन आस्माचे माकडचाळे सुरूच आहेत. मला राहून राहून तिची ती 'सॅड ष्टोरी' आठवून नवल वाटत होतं, की असे असताना हे 'इनोदी' चाळे करायला सुचतं बरं हिला!! Uhoh

lol MT हो ना. आणि तू म्हणतेस तसा कालचा तसा बोरच होता एपिसोड.

काल परवा पेपर मध्ये काय बातमी होती कि वैशाली नी कोणाला तरी चॅलेंज दिल की भारतच जिंकेल.... ह्यात पण भारत पाकिस्तान आणतात की काय?

कुठल्या पेपर मधे बातमी होती ही सुरभी?

मला जाहिर, वैशाली , शौमेन आवडले शंकर महादेवन-प्रीती च्या एपिसोड मधे!
बाकी अति सामान्य !

असामान्य कोणीच नव्हते. बाकी सगळे ठिक-ठिक. वैशाली मराठी म्हणुन तिला पाठींबा नाहीतर तिचे गाणे इतके काही उच्च नव्हते.
मागच्या आठवड्यासाठी, चाफाने दिलेल्या रँकींगशी सहमत.

वैशालीला मराठी म्हणून पाठिंबा नाही, खरच सुरेख गाते आणि प्ले बॅक साठी परफेक्ट आवाज आहे म्हणून मी तिला सपोर्ट करतेय)
निहिरा , वैशाली सारख्या मुलींना फक्त मराठीच नाही तर जग भर सगळेच सपोर्ट कार्तील अशा गायिका आहेत दोघी !
अभिजित कोसंबी किंवा कौशिक देशपांडे ही मराठीच होते पण त्यांना केवळ मराठी या एका कारणानी मला तरी कधी त्यांना सपोर्ट करावस वाटलं नाही !
वैशालीने झी मराठी इतके चांगले अजुन इथे नाही दिले पण तरीही सारेगमप चॅलेंज'०९ मधे वैशाली इज द बेस्टः !!)
जय माता दि लेट्स रॉक Happy

मराठी म्हणुन तिला पाठींबा >> हे माझ्याबाबतीत सांगतो आहे.

हे पहा मुम्बई मिरर मधली आस्मा च्या आई बद्दल ची बातमी !

Asma, one of the top 10 finalists of Zee TV's show Sa Re Ga Ma Pa, is facing flak from her mother for pursuing her dream of singing. Ameena Rafi is dead against her daughter's decision to be part of the show and makes no bones about it.

When contacted, Ameena was initially reluctant to talk, but after a lot of convincing said, "We are from Oman and it is not in our custom to do such a public display of any talent by a girl. Asma is no more for us. I do not want to meet her or see her. I have even severed ties with her father for supporting her decision."

When we asked her, if she would change her stance if Asma did well for herself, Ameena disconnected the call and did not pick up the phone in spite of several attempts.

Mohammad Rafi, Asma’s father, sounding shattered said, “Yes it is true that Asma's mother is against Asma's participation in Sa Re Ga Ma Pa. She said, 'Wo jism ki numaish karti hai'. I divorced my wife two months ago to support Asma. She is not doing anything wrong. I know she will win. I have complete confidence in her. She is a good singer and she has the right to fulfill her dreams.”

When we spoke to Asma, initially she said only good things about her experience. However, when we revealed to her that we knew about her personal trauma, she opened up and said, “I do not know why my mother is doing this to me. I like singing but she is forbidding me to do what I like to pursue. I know she loves me a lot.

All my siblings (three sisters and two brothers) are supporting me, then why not her? But I am thankful to Allah that I was able to reach this level in the contest. Even if I don’t win, I will still not give up singing. I plan to stay in Mumbai to complete my studies.”

Pages