कृपा करुन इथे भारत पाकिस्तान तणावा सारखे स्फोटक विषय आणु नका , healthy discussion please !
सारेगमप चॅलेंज २००९ : संगीत का द्वितिय महायुध्द सुरु होत आहे
त्या साठी हे गप्पांचं पान !
आज 'ऐलान ए विश्वयुध' म्हणजे झलक आहे, actual प्रोग्रॅम ४ जुलै ला सुरु होणार आहे.
या वेळी विशाल शेखर नाहीयेत पण शंकर महादेवन आणि प्रीतम या दोन सुपर्हिट आणि जबरदस्त music directors ना menotrs team मधे सामील केलय , मजा येइल
इस्माईल दरबार आणि बप्पी लाहिरी ना काढलं ते फार बरं झाल !
आपल्या झी मराठी ची विनर ' वैशाली भैसने माडे' ला डायरेक्ट एंट्री आहे म्हणे, आजच्या एपिसोड मधे दिसेलच काय काय नवीन आहे या वेळी ते !
पाकिस्तान मधून या वेळी खुद्द गुलाम अलींनी निवडलेले ६ गायक येणार आहेत असं वाचलं, गेल्या वर्षी च्या मुस्सर्रत - अमानत सारखे कोणी जबरी गायक आले तर छान होईल स्पर्धा !
हिमेश दर वर्षी प्रमाणे पुन्हा चर्चेत असाणार नक्की !
त्याचा कर्ज चा रीमेक येतोय, त्यामुळे आणि जानेवारी मधे होणार्या grand finale ला bare chest performance देण्या साठी अत्ता पासून हिमेश 6 pack ab बनवायच्या तयारीला लागला आहे म्हणे )
सारेगमप चे mentors:
हिमेश : 'Let's rock' घराना
प्रितम : ' धूम मचाले' घराना.
शंकर महादेवन : ' हर हर महादेव' घराना .
आदेश : ' जय हो' घराना
The war starts from 4 th of July, ending around January first week !
Timings : Fri-Sat 10 p.m. Zee t.v.
ज्यांना झी टी.व्ही. पहाता येत नाहीत त्यांनी ऑन लाइन भाग इथे पहा,
http://saregamapashow.com/category/saregamapa-challenge-2009-videos
हीहीही, ती
हीहीही, ती कॅटफाईट मी मिस केलीय काल. त्यामुळे आज परत बघणार आहे.
ह्म्म्म, तरीही कौशिक आवडतो मला. आणि त्या दुसर्या पाकिस्तानीचा आवाज सुरेश वाडकरांसारखा आहे.कालच्या गृपमधली मितिकाही चांगलीय.
बरोबर, शुक्रवारची टिम जास्त पोटेंशियल असलेली आहे.
अगं झी वाल्यांना यायलाच हवं ना काही ना काही नवीन थीम्स घेऊन. नाहीतर किती बोअर होईल तेच ते तेच ते.
सगळे मेंटॉर्स एकमेकांशी बोलत नव्हते तेच चांगलं झालं. जास्तक्रुन हिमेश. तो बोलायला लागला की मला कान बंद करुन घ्यावेसे वाटतात.
डिजे: तुझ्या ऑर्कुटवर 'हिमेस' का नाही?
ह्या वेळेस
ह्या वेळेस शंकरच्या घराण्याकडे विश्वविजेतेपद जाईल. विश्वविजेती मुलगी असेल म्हणजेच प्रतिभा जिंकणार.
देबोजित चांगला आहेच, त्याच्या अधुरेपणाची का जाहिरात करतात काय माहिती? तो आणि त्याचे कुटुंबीय का चालवुन घेतात? तो असाही चांगला गाणे म्हंणु शकतो त्याला सहानभुतीच्या भिकेची गरज नाही.
यशिता, कौशिक,शुजात वगैरे चांगले आहेत. ती पाकिस्तानी सारा जायला पाहिजे. फालतुचे पाक गुणगान करत असते. हिमेस भाय की टोपी गेल्यापासुन त्याचा आवज बंद आहे. ह्यावेळेसचे गुरु चांगले आहेत. मागच्या वेळी विशाल-शेखर सोडले तर सगळे नुसते वैताग आणत होते. शंकर महदेवन प्रत्यक गाण्याला अभिप्राय मनापासुन देतो.
ह्यावेळेच
प्रतिभा
प्रतिभा छानच गाते. पण वोट्स मिळवण्याचा ऍटिट्युड/ अदा नाहिये तिच्याकडे. साधी वाटते बिचारी. निहिरा सारखं होणार तिचं!
(अन नॉर्थ ईस्ट्ची पण नाहिये ना
) अन पाकिस्तानी कोणीही कितीही पुढे गेले तरी जिंकणार नक्की नाहीत. त्यामुळे देबोजित ला जास्त चान्सेस आहेत असं वाटतं.
हो , ती सारा जाऊ द्यात आता पुढच्या वेळी!
हं! आणि
हं! आणि त्या पाठोपाठ शुजात आणि जहीर अब्बासही.
हाणा या
हाणा या चाफ्याला!
फटाफट बट ला जाऊ दे फार तर 
झहीर
झहीर अब्बासचं माहित नाही राहिल की जाईल ते. पण तू 'शुजात'वर का खार खातोयस?
सारालाही चंबू गबाळं आवरायला लागायला हरकत नाही. शेवटच्या ५,६ जणात टिकाव धरण्याएवढी काही ग्रेट नाहीय.
मितिकाने गाणी चांगली निवडली तर राहू शकण्याची योग्यता आहे तिची.
ह्म्म, आहे खरं साधी प्रतिभा. गेल्यावेळेची पूनम ही तशी साधीच होती पण तिला 'गरिबी' होती भांडवल करुन वोट्स मिळवायला. प्रतिभा कशाच्या जोरावर मिळवेल? (विचार करणारा स्मायली)
हो, सारा
हो, सारा जायला हवी, पण शुजात आणि फराझ नको........................:(
पब्लिक व्होटस मधे नैना प्रतिभा दोघीही जातील, मितिका ला मात्र स्कोप आहे
पण देबोजीत दत्ता च जिंकायला हवा !!:)
देबोजीत चे
देबोजीत चे जय जय शिवशंकर काय जोरदार झाले. मजा आली एकदम. ह्या वेळी मी सर्व पाहिले नाही पण हो, साठे च्या ऐवजी सारा गेली तर बरे झाले असते. पण पाकिस्तान की एकच बेटी आलीये ना, मग व्होट्स कशी मिळतील तिकडून.
गुरु लोकं एकमेकांशी बोलत नव्हती का काल? हिमेश ला म्हणावे स्वत:शी पण बोलु नको म्हणजेच त्याचा आवाज बंद राहील.
देबोजीत जिंकला तर छान. मितिका-नैना-प्रतिभा पण चालतील. निदान पाश्वगायनाची संधी तरी मिळावी त्यांना.
हम्म,
हम्म, नैनाची खात्री नाही मला. पण मितिका आणि प्रतिभा (लंबी रेसच्या घोड्या वाटतायत मला). देबोजित छान आहे.. प्रश्नच नाही.
गुरु लोकं दोन आठवड्यापूर्वी बोलत नव्हती एकमेकांशी. आता परत बट्टी झालेली दिसतेय त्यांच्यात.
मायबोली
मायबोली गणेशोत्सव २००८
****************************************************************
चारोळी म्हणजे नसतात
नुसत्याच चार ओळी
ती असते .... ummmm .... ती असते
शी : काहीच कस सुचत नाहिये
हां तो असतो
अर्थाचा धागा विणणारा कोळी
(ओळी ला कोळी... जुळतय जुळतय! ) ... पण काय म्हणता मजा नाही?
बर मग... ती असते
मनातल्या भावनांची जळती-पेटती होळी ..... (नको नको हे उगीचच विद्रोही साहित्यासारख वाटतय!)
मग हे बघा.... ती असते
सुळावरची पोळी
का अफुची गोळी .... (अरे वा! दोन्ही जुळतय )
का हे लिहू...
ती असते
अनुभवाच्या लाकडांची
एकसंध मोळी .... (वा वा! हे कस जरा साहित्यिक वाटतय)
अरे एव्हढा विचार करत बसलात तर स्पर्धेची मुदत संपुन जाइल ना! ..... तुम्हाला मदत करायला आहोत ना आम्ही.... चित्र टाकलीत तिकडे ती बघा म्हणजे शब्द आपोआप सुचतील
लै भारी बक्षिस है ..... लवकर लवकर लिहा....
कुठे काय?.... मायबोलीच्या गणेशोत्सवात
इथे टिचकी मारा :
http://www.maayboli.com/node/3280/contests
****************************************************************
ब्रम्हास्
ब्रम्हास्त्र कसली फालतु राउंड झाली !
काय ही गाण्यांची सिलेक्शन्स ... 'मै हू डॉन, कोई हीरो यहां, बादशाह हो बदशाह' ही काय गाणी झाली का अशा लेव्हल च्या स्पर्धेला ??
फरीद, तरुण, सुन्विन्दर आणि शशि सुध्दा अगदीच किरकोळ गायले:!
त्यातल्या त्यात चुडैल मनिशा आणि एकलव्य मधली नवीन मुलगी बरे गायले !
पण झी ने आस्मा ला च आणायच ठरवलय हे नक्की, तिला का एवढे फूटेज म्हणे, लोकांच्या करमणुकीला , तिची एंट्री पण हिमेश ने आदित्य च्या कानत सांगून स्पेशल का केली??
नक्कीच आस्मा आणि तो सरदार येणार स्पर्धा खराब करायला आणि चांगल्या गायकांना उडवायला:(
आणि शायन, अर्शद, दीपाली हे किती तरी चांगले होते कि आस्म अपेक्षा... त्यांना का नाही बोलवल??
अत्यन्त
अत्यन्त फडतूस! काय ते अदालत अन बयान ! अत्यत बोरिन्ग वाटत होती आदि ची बडबड ! आस्मा?! ridiculous
अगं आज आहे
अगं आज आहे ना सेकंड राऊंड. त्यात येणार असतील बाकीची.
खरंच तरुण, शशी, सुनविंदर 'फडतूस' गायले. अस्माचा नी गाण्याचा, ताला,सुराचा विशेष संबंध नाहीच. तिला नुसत्या टाईमपासकरता झी ने पुढे आणलं तर चांगल्या गाणार्यांवर अन्याय होईल हे नक्की.
पूर्वी सोनू निगमच्या वेळी ह्या असल्या थीम्स नसायच्या पण तेही ब्लँडचं वाटायचं नी ह्या थीम्सपण कंटाळवाण्या व्हायला लागल्यात. ह्याचा सुवर्णमध्य काय?
आणखीन एका गोष्टीचा मला वैताग येतो तो म्हणजे येताजाता सगळ्यांच्या पाया पडणं.
हो ना! कसला
हो ना! कसला खुळचटपणा होता! काय ती अदालत आणि कटघरा! वाटोळं करतात अक्षरशः! आणि तेच ते रेकॉर्डेड हशे आणि टाळ्या दाखवून ते मूर्ख समजतात का प्रेक्षकांना?
सायो म्हणते तसं उरलेल्यांना आज आणणार असावेत. नसेल तर मात्र कहर आहे. माझा तर शो बघण्याचा इंटरेस्ट दर आठवड्यागणिक कमी होत चाललाय!
काल तसं
काल तसं त्यांच्या बोलण्यात आलं. नाहीतर बाकीचे एलिमिनेटेड कंटेस्टंट्स चं काय? शायान, जेनिस वगैरे ही यायचेत अजून.
ब्रम्हास्त्रला वोटिंग ऐवजी महागुरुंनी निवडायला हवं होतं असं मला वाटतं. कारण लोकं कुणालाही डोक्यावर बसवू शकतात आणि चांगलं गाणारा मागे पडू शकतो. पण मला वाटून काय उपयोग म्हणा!!!
सायो, नाही!
सायो, नाही! आपल्याला वाटलं तसं नाहिये! इतर कोणालाच बोलावलं नाही. त्यातल्याचं दोघांना पब्लिक निवडणार! अनुपमा येणार नाही
हिमेश 
मनीषा सुरेख गायली. बाकी सगळं "कालचा गोंधळ बरा होता" अश्या टाईपचंच!
पण एक आनंदाची गोष्ट अशी की मराठी सारेगमप विजेती वैशाली भैस्ने माडे हिला डायरेक्ट एंट्री दिली आहे फायनल फोर्टीन मधे! त्यामुळे आता परत बघावे लागेल सारेगमप.
यस्स्स्स्
यस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स वैशाली ..वैशाली वैशाली ..वैशाली वैशाली ..वैशाली वैशाली ..वैशाली वैशाली ..वैशाली !!
बापरे
बापरे वैशलीने बरच वजन वाढवलय, ओळखता येत नव्हती, पण असो, बहुतेक ती गेले काही दिवस अजारी होती म्हणून तिचा चेहरा असा दिसत होता.
वैशाली नी इथे पण विनर बनावं अशी आशा, गाणी नीट निवडावीत तिने, घराना पण चांगला मिळावा!
पण चान्सेस जास्त ती आदेश कडे जाण्याचे दिसत आहेत कारण त्याच्या कडे फक्त फराज च राहिलाय
शंकर्-प्रीतम जे सर्वात चांगले आहेत त्यांच्या कडे आधीच ४ आहेत आणि हिमेस भाय कडे ३ होतील, राहिला फक्त आदेश, तेंव्हा तिकडेच जाणार बहुदा हे दोघं !:(((
chafa,
तो कोलकाता चा झी बंगाली विनर शौमेन पण सुरेख गातो, हा पहा एक व्हिडिओ
[video:http://www.youtube.com/watch?v=40qhPFsw6XQ]
काल तरुण
काल तरुण अन शशी ची गाणी चांगली झाली.सरदार पुन्हा काही खास नाही वटला. त्या सौमेन आणि वैशाली ला जरा गायची संधी द्यायला हवी होती!
btw त्या सौमेन चा चेहरा कसला सॉलिड चौकोनी आहे
सरदारमध्य
सरदारमध्ये काही दम नाही राहिलेला. शशीकडून ज्या गाण्याच्या अपेक्षा होत्या त्यामानाने त्याचं गाणं दोन्ही दिवस सुमारच झालं. परवाच्या मानाने फरीद काल चांगलं गायला. मनीषा ही दोन्ही दिवस चांगलं गायली.
मराठी सारेगमप मी भारतात असताना थोडं पाहिल होतं पण फार कुणी आवडलं नाही खरंतर. किंवा मराठी गाण्यांशी फार संबंध राहिला नाहीये म्हणूनही कंटाळवाणं वाटलं असेल मला..:(
हो, काहीच्या काहीच जाडी झालीये वैशाली भैसने माडे. बघुया, कशी गातेय ते.
माझा समज होता सगळे एलिमिनेटेड कंटेस्टंट्स येणार ब्रम्हास्त्र राऊंडला. अजूनही तसंच वाटतय मला. तो शायान वगैरेही चांगला होता की. त्याला का नाही देणार एक चान्स?
तसं नसतं
तसं नसतं गं सायो
ब्रह्मास्त्र राउंड ला फक्त सिलेक्टेड ६ लोक बोलावतात त्यातले २ परत येतात पब्लिक वोटिन्ग ने. गेल्या वेळी पाहिलं नव्हतंस का तू !
शायन ला का नाही बोलावलं खरच कळले नाही.झी ने त्याऐवजी चीप पब्लिसिटी साठी आस्माला बोलावलं!
अरे वा,
अरे वा, मैत्रेयी , तू विकेंडच्या स्टँडर्ड्सनी लवकर उठतेस तर!!!!:)
पाहिलं होतं मी गेल्यावेळी. पण विसरले आहे.
चीप पब्लिसिटी साठी बोलावलं इथवर ठीक आहे. चांगला टीपी झाला तिचं हिंदी ऐकून. पण आता भरपूर वोट्स मिळून सिलेक्ट न होवो म्हणजे झालं.
चाफा, हिमेश
चाफा,
हिमेश आहेच सरफिरा, पण मला वाटत हे ब्रह्मस्त्र ला जे कोणी बोलावले ते झी टीम ने च ठरवले असेल कोणाला बोलवायचं, नाही तर शायन ऐवजी आस्मा ला बोलवायची चूक अगदी बिनडोक मेंटर पण करणार नाही !
शिवाय ब्रह्मास्त्र साठी आवडत्या घराना ला व्होट करा , हे पण खोटं च आहे !
गेल्या वर्षी विशाल्-शेखर कडे कमी गायक उरले होते म्हणून त्यांना दिलं आणि या वेळी हिमेश कडे एक च राहिला म्हणून त्याला दिलं !
अता आदेश कडे एकटा फराझ उरला आहे म्हणजे वैशाली- शौमेन त्याच्या कडे जाणार बहुदा !
सायो,
वैशाली मस्तं गाते ग, तिची हिन्दी गाणी पण मस्तं झाली होती !
हो, गात
हो, गात असेल वैशाली हिंदी गाणीही छान. मी काही मुंबईत असताना मराठी सारेगमप फार इंटरेस्ट घेऊन पाहिलं नाही. आता इथे ऐकायला मिळेलच तिला.
ह्म्म.. मी
ह्म्म.. मी पाहिले नाहे ह्या वेळी.. फक्त शेवटी वैशाली ने गायलेली गाणी १-२ दाखवली ती पाहिली आणि खूप आवडली. वैशाली जिंक बाई. छुट्टी कर सगळ्यांची ..
ह्म्म,
ह्म्म, जिंकेल की नाही काही सांगता येत नाही. तिच्यापेक्षा जास्त तयारीची मंडळी आहेत माझ्यामते. पण बघुया, काय होतंय ते.
सायो, तयारी
सायो,
तयारीला कोण विचारत रिऍलिटी शो मधे ??
प्रेक्षकांच्या मतां वर आणि चॅनल च्या लुडबुडी नंतर विनर ठरतो.. वेस्ट बंगाल फॅक्टर असला तर तुलनेने प्रवास जरा सोपा होतो !
म्हणून च त्या कौशिक देशपांडेनी आधीच सांगून टाकल, कि जरी मी देशपांडे असलो तरी माझी आई 'दासगुप्ता' आहे हे लक्षात असू द्या
वैशाली कडे या सगळ्यां ना भारी पडायची क्षमता नक्कीच आहे !!
ती भारी
ती भारी पडली तर आनंदच आहे गं. फॉर अ चेंज म्हणून येऊ देत महाराष्ट्रातून विनर. सगळ्याच रिऍलिटी शोजचे विनर वेस्ट बेंगॉलचे आहेत.
तेव्हा बघुया काय होतंय ते.
आता पुढच्या आठवडयात काय असणार आहे? बाकी कंटेस्टंट्स करताही वोटिंग सुरु होऊन महायुद्ध चालू होणार कां?
अभिजीत
अभिजीत सावन्त एकटाच असा आहे कि मराठी आणि मुंबई चा असून खरच सगळी कडे पॉप्युलर आहे आणि सगळी कडून व्होट्स मिळतात त्याला !
आयडॉल आणि 'जो जीता ' दोन्ही कडे तो टॉप पर्यंत गेला !
Pages