युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण जितकं धान्य घेतो, ते दळलं की तितक्याच वजनाचं पीठ होतं का, की कमी / जास्त होतं?>>>
मला असं वाचल्याचं आठवतय कि ७०० ग्राम घट पिठात होते..

सारिका, पुर्वी इथे विरजण कसे लावावे यावर खुप चर्चा झाली आहे. जून्या मायबोलीवर ती आहे. छान संकलन झाले होते.

अवनी, ७०० ग्रॅम किती किलो धान्याला ? घट झालीच तर ती केवळ बाष्पामूळे (आणि थोडी सांडलवंड) होईल, बाकी काही कारण नाही.
सोयाबीन सारखी काही धान्ये दळताना, त्यातल्या तेलामूळे ते पिठ गिरणीत चिकटून बसते. पण एरवी नाही.

सारिका,
खूप गरम दूधात विरजण लावल्यामुळे किंवा दही लागल्यानंतरही फार काळ फ्रिजच्या बाहेर राहिल्याने दही फाटल्याप्रमाणे दिसू शकते.
थंडीच्या दिवसात किंचित जास्ती गरम दूध घ्यावे व उन्हाळ्यात रूम टेम्प्रेचर.. त्यात चमचा भर दही घालून ते दुध चक्क रविने घुसळावे, छान घट्ट दही लागते.

दुध उकळवताना फाटलय(नासल नाहिय) पनीरसारख दिसतय, तुप काढण्यासाठी सायीच दहि विरजुन ठेवलय त्यात हे दुध टाकल तर चालेल का? तुप बिघडणार तर नाहि ना? तुपाची चव बिघडेल का?

चव बिघडेल की नाही कल्पना नाही, पण आपण जे दूध मुद्दाम फाडलेलं नाही असं नासकं दूध वापरण्याचा मोह टाळलेला बरा.

नासल्यासारखा वास येत नाहीय, दुध उकळवल्यावर जसा वास येतो तसाच येत आहे, अर्धा ली. आहे, पनीर कोणाला घरात आवडत नाही, काय करु?

साक्षी, ते दूध वापरू नये असं माझंही मत आहे. मीपण एकदा पूर्ण १ गॅलन दुधाचं आपोआप पनीर झालं म्हणून पनीर पराठे करायला घेतले. २-३ पराठे झाले, पण मग नासका वास आला म्हणून साडेतीन लिटर दुधाचं पनीर चक्क फेकून दिलं!

चव बिघडेल की नाही कल्पना नाही, पण आपण जे दूध मुद्दाम फाडलेलं नाही असं नासकं दूध वापरण्याचा मोह टाळलेला बरा.
>> हा मोह कुठल्याही खराब झालेल्या वस्तू बाबत सोडायला हवा. कुठलीही बुरशी आलेलं/नासका वास येणारे/खराब झाल्यासारखे वाटणारे पदार्थ सरळ फेकून द्यावेत. खास करून डेअरी प्रॉडक्टसारखे नाशिवंत पदार्थ तर आधी.

आमच्या ओळखीतल्या एका काकूनी असाच काटकसरपणा केला होता आणि खराब दुधाचं साखर घालून मिठाई बनवली होती, घरातल्या पाच जणाना फूड पॉयजनिंगने अ‍ॅडमिट करावे लागले होते.

बरं मला एक सांगा. माझ्याकडे पाच सहा फोडलेले नारळ आहेत. (नवरात्री देवदर्शनाचा प्रसाद) आणि मला खोबरे खवणायचा प्रचंड वैताग येतो. या ओल्या खोबर्‍याचे न खवणता काही प्रकार करता येतील का?

सुग्रणींनो,

काल अष्टमीसाठी म्हणून पूरण केलं पण ते जरा कोरडं वाटतय.. (इथल्या थंडीमुळे असेल काय?)... काय करु ते परत नरम व्हायला? कट घालू का परत आणि सारखं करू का? (पण त्याची आज आमटी करायची आहे Happy )

सुग्रणींनो,>>>> मला एकदम झाडावर लटकलेल्या खोप्यावर बसल्यासारखं वाटलं Proud

लाजो, दूध शिंपडून मावेतून काढ एकदा.

प्राची +१

नंदिनी नारळाचे तुकडे करुन मिक्सरमधुन काढ. जेव्हडा किस भरेल तेव्हडी किंवा जरा कमी साखर, एका एका नारळाला पाव लिटर दुध आणी थोडी वेलची पावडर टाकुन गॅसवर आटव. चांगला गोळा झाला की वड्या कर Happy

सहिच एकदम रेसिपी Happy
नंदिनी वर्षीने सांगितल्याप्रमाणे तु वड्या किंवा ते सारण भरून पोळी करू शकतेस. पोळी फार मोठी वाटली तर साटोरी सारखा प्रकार करू शकतेस, एखादा गुलकंद किंवा गुलाब इसेन्स घाल, छान लागेल Happy

दुधीहलवा करायला ३ दुधी आणले, पण खूपच कोवळे आहेत. किसायला घेतला तर कीसाचा पाण्यातला गोळा लागतोय. १ दुधीचा १ वाटी कीस निघालाय. ३ दुधीचा ३ वाट्या निघेल आणि आळून आला की १ वाटीच हलवा होईल.
पण तरी हलव्यासाठीच वापरायचा तर काही करता येईल का? भाजी/ कोफ्ते वगैरे अजिबात नकोयत.

मस्तपैकी जिर्‍याची फोडणी घालून, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून परतून भाजी कर. हळद घातली नाहीस तर जास्त छान दिसते. आणखी थोडा उत्साह असेल तर सांडगे तळून घेऊन थोडे चुरडून घेऊन उतरवायच्या आधी ५ मिनिटे घाल. थोडे शिजलेले थोडे कुरकुरीत मस्त लागतात...

सॉरी हं, भाजी नकोय हे आधी दिसलंच नाही.. Sad पण एवढी लिहिलीये तर डीलीट नाही मारत..

Lol

काय ते मलाच सुचत नाहिये! कारण मलाच कंटाळा आलाय भाजी/ तिखट प्रकाराचा. हलवाच करायचा होता. आता दोघांसाठी १ वाटी हलवा पुरेसा होणार असला तरी माझा मूड गेला! Proud
असो. बहुतेक खीर करीन.

दुधीचं भरीत छान होतं. दुधी वाफवून घ्यायचा, त्यात सावर क्रीम, किंवा गोडसर घट्ट दही, मीठ, चवीप्रमाणे साखर, दोन-तीन चमचे मेतकूट,हिरवी मिरची वाटून, कोथींबीर असं सगळं मिक्स करुन थंड करायला तास दोन तास रेफ्रीजरेट करायचं.

तर..हितल्या बी सर्व मंडळींसाठी योक सवाल...(पुपुवर पण टाकला हे पण वाहून गेला तर काय घ्या म्हणून खबरदारी!)

ऐक्का...म्हणजे त्येचं असं हाय बगा. दिवाळीसाठी औंदा शंकरपाळ्या कराव्या म्हणतो. मायबोलीवर्च्या सर्व पाकक्रूती वाचून काढल्यात. तर सवाल असा हाये की, शंकरपाळ्या पाणी टाकून कराव्यात की दूध? म्हणजे दोन्ही पद्धतीने होतील जरुर. पण सरस कोणत्या पद्धतीने होतील?

Pages