युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अके, धन्यवाद!

अवनी, आपल्यालाही धन्यवाद!!! शंकरपाळ्यांसारख्या खूसखूशीत प्रतिसादाबद्दल!!! Happy

मी अक्कीच्याच रेसिपी प्रमाणे करते. फक्त तुपा एवजी तेल वापरते. आणी लाटताना पोळीसाठी करतो तशा एक दोनदा घड्या करते. यामुळे लेयर्स दिसतात आणी खुसखुशीत होतात.

मीठ घालुन दुध फाटत नाही का? १/२ टीस्पु तरी टाकलंय तरी नाहीच. Uhoh

लिंबु/व्हिनेगार घरात नाहीये.. आता वैतागुन चिंच/कोकम आरळ टाकावसं वाटतंय. Angry

अगं ही स्वतंत्र पोस्ट आहे.. जुन्या पोस्टीचा संबंध नाही.
मला दुध नासवुन, मग ते आटवुन मिठाई करुन खायचीये.. भूक लागलेय आणि ते मेलं दूध फाटतच नाहीये.

भ्यां..
घडाभर दुधात एक मीठाचा खडा टाकला तर ते नासते, त्याप्रमाणे एका अवगुणामुळे बाकी सर्व सद्गुण व्यर्थ होतात!!! कैच्याकै!

आता गपचुप मॅगी खावी झाले.
धन्यवाद. Happy

मी हेच लिहीणार होते, भूक लागली आहे ना, मग आधी काहीतरी खा, पोट भरल्यावर सगळ नीट सुचेल.

चिवडा कर. नाहीतर पास्ता/ मॅक अँड चीज बेक्ड करायचे. बेक करायला ठेवायच्या आधी वरतून एक ह्या चुर्‍याची लेयर द्यायची.

पावाचा चुरा संपवायचा आहे, काय करता येईल?>>>>

यावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत असे मला वाटते. (अर्थातच, अजून तो चुरा संपलेला नसला तरच)

१. फोडणीची पोळी करतात तसा पावाचा चुरा करता येतो. - एक गंभीर उत्तर

२. कुत्र्याला द्या - एक पुणेकर उत्तर

३. झालाच कसा पावाचा चुरा? - एक कोकणी प्रश्न

४. मला द्या. मी काहीही करेन - एक ठाणीय उत्तर

५. चहात बुडवून संपवून टाका - एक पेन्शनर उत्तर

६. पावाचा चुरा करणार्‍या बिहारींना राज्याच्या बाहेर हाकलून द्या - एक शिवाजी पार्कीय उत्तर

(दिवे)

-'बेफिकीर'!

धागा उत्तम आहे.

सिंडरेला Proud

डबाभर चुरा पावाचा
उरवून पैटिसं संपली

पुडिंगची वगैरे रेस्पी द्या की...

अविकुमार , इथे मी लिहिलेली शंकरपाळी रेसिपी आहे. सोपी आहे एकदम. बघा.
http://www.maayboli.com/node/30052

चिंगी , पनीर मिठाईसाठी हव असेल तर "दही" च घालायच. जास्त चांगली होते मिठाई. (अस माझ मत)

हां, तेच म्हंटलं, नुसताच स्मायली कसा काय येईल! Proud Happy

(शंकरपाळ्यात दूध?)

नवीनच प्रश्न समजला! जगात कितीतरी प्रश्न असतात!

मंजू,

ब्रेडच्या कडा काढून चुरा केला असेल तर दूध उकळव. जरासं आटलं की त्यात चुरा टाक. १ कपाला १ कडा काढलेला स्लाईस एवढा चुरा. १/८ कप कंडेन्स मिल्क ( ते नसेल तर जरा जास्त आटवून साखर) टाक. केशर, वेलची किंवा मसाला दूधाचा मसाला टाकायचा. मस्त रबडी तयार होते अगदी थोडया वेळात.

पावाच्या चुर्‍यात चीज, मीठ, हिरवे तिखट्/भरडलेले मिरे घालुन चीझ बॉल्स बनवायचे - अप्पे पात्रात शॅलो फ्राय करायचे आणि कुठल्याही ग्रेव्हीत घालुन गट्टम करायचे. नुसतेच चीझ बॉल्स सॉस बरोबर पण मस्त लागतात.
अश्या चीझ बॉल्सचे कांदा वगैरे घालुन चाट पण मस्त लागेल.. करुन बघायला हवे Happy

मला फ्रीजमध्ये एका हवाबंद डब्यात कांदा चिरुन ठेवायची सवय आहे. काहीही करताना पटकन हाताशी येतो. फ्रीजला वास लागू नये म्हणून माझ्या बहिणीने मला डब्यात कांदा ठेवताना पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवण्यास सांगितले होते. ही युक्ती आधी काम करत असे. पण नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून फ्रीजला भयंकर वास लागतोय कांद्याचा. फ्रीज उघडला की भपकारा स्वयंपाकघरातही पसरतोय आणि तिथेही वास राहतोय. फ्रीजला वास लागू नये म्हणून इथल्या पाऊंड शॉपमध्ये एक छोटी डबी मिळते ती फ्रीजमध्ये ठेवलेली आहेच. टिश्श्यू पेपरचा बोळा करुन त्यात वास शोषला जावा म्हणून ठेवला आहे. डबे बदलून पाहिले. पण उपाय होत नाही. काय करता येईल ?

अगो, अगोदर फ्रीज साफ करुन घे. नंतर आत लिंबाच्या फोडी एखाद्या भांड्यात ठेवून दे. भांडे झाकायचे नाही.
किंवा बेकिंग सोड्याचा ओपन केलेला पुडा ठेव.

अगो. अकुने सांगितलय तसं आधी पूर्ण फ्रीझ साफ कर. पूर्ण सुकेपर्यंत उघडा ठेव. नंतर त्यामधे एका वाटीत बेकिंग सोडा घालून ठेवून दे. कशाचाच वास् कशाला लागणार नाही.

अगो, कांदा जर भाजी आमटीत वापरायचा असेल तर तेलात परतून ठेवायचा. तश्या कांद्याची पेस्टही करता येते. कांदे नूसते उकडून त्याचीही पेस्ट करुन ठेवता येते. (या दोन्ही हवाबंद डब्यात किंवा बाटलीत ठेवायच्या)
पण कांदा जर कच्चा वापरायचा असेल तर तो आयत्यावेळीच कापावा. कांदा कापण्यासाठी व्ही स्लाईसरसारखे साधन असेल तर फार मेस न होता, सुबक बारिक कांदा कापून होतो.
नुसता जेवताना घ्यायचा असेल तर घरात पांढर्‍या कांद्यांचा माळा ठेवायच्या आणि आयत्यावेळी हाताने फोडून तो खायचा.

बाकी फ्रिजचा वास जायचे उपाय वर आहेतच पण परत त्यात कांदा असा ठेवला तर वास लागणारच.

डबे बदलून पाहिले. पण उपाय होत नाही. काय करता येईल ?
>>
साधं खडे मीठ जरी ठेवलंस काचेच्या बशीत तरी चालेल. स्टील/मेटलच्या भांड्यात मीठ ठेऊ नकोस. खुप दिवस मीठ तसंच राहील्याने भांड्याला भोक पडतं.

Pages