..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना....नोप ?

अरे !! मग 'जयललिता' चे एक आहे, ते बसत्ये का ?

"रुक जा जरा हा, किधर को चला हा
रुक जा जरा किधर को चला, मैं सदके तेरे पे
बाबू रे बाबू रे बाबू रे हे..."

~ बहुधा नसेलच...कारण तुला "जया अम्मा"ने हिंदी चित्रपटात अगदी जंगल की बेटीचे काम केले होते हे कदाचित माहीतही नसेल...तरीही हे गाणे गरमधरमला म्हटले होते, गाजलेही होते.

हे नसेल तर हिंटव थोडेसे....!

अगं स्निग्धा.....लोक तुझे वरील गाणे "स्वप्ना" साठी म्हणतील....बाबा रामदेवासाठी कशाला म्हणतील ?

स्निग्धा, स्पॉट ऑन, तुला बाबा रामदेवचं पोस्टर पाहिजे का मोतीचूर लाडू? Happy

बाबा रामदेव ह्यांनी अ‍ॅग्रीमेन्ट फाडलं ना....मग सिब्बल आणि सहाय बे'करार' नाही का झाले? Wink

माधव, तुमचं गाणंही बसलं असतं हं.....

कोडं ३६:
बाबा रामदेव, कपिल सिब्बल आणि सुबोधकांत सहाय वाटाघाटीला बसले होते. चर्चा फलद्रूप होईल अशीच चिन्हं दिसत असल्याने सारे खुशीत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडचे मुद्दे मांडलेलं अ‍ॅग्रीमेन्ट बनवायचं कामही सोबत चालू होतं. पण एकाएकी काही मुद्द्यावरून चर्चा फिसकटली. बाबा रामदेव भयंकर संतापले. रागाच्या भरात त्यांनी अ‍ॅग्रीमेन्ट फाडून टाकलं आणि त्याचे तुकडे सिब्बल आणि सहायच्या अंगावर भिरकावून देऊन ते तरातरा बाहेर पडायला लागले. सिब्बल आणि सहाय बाबांना परत बोलावायला काय गाणं म्हणतील सांगा पाहू?

उत्तरः
बे'करार' करके हमे यू ना जाईये
आपको हमारी कसम लौट आईये

लोक आता मला जोड्याने हाणणार बहुतेक Proud

हे....बाबा राम राम राम राम....!

म्हणून तू तिथे 'अ‍ॅग्रीमेन्ट' वर जोर दिला होतास का ?

बरं झालं....आता स्निग्धा घेऊन बसेल बाबा रामदेवाचे पोस्टर आपल्या घरात...!

कोडे क्र.३८

~ २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकलेल्या आपल्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्यासाठी काल अनिल अंबानी तिहार जेलमध्ये गेले होते....त्यांच्याशी सुटकेसंदर्भात बराच वेळ बातचितही झाली असे वृत्त आले आहे.

नियत वेळेनंतर ज्यावेळी अनिल अंबानी मुंबईला परतण्यासाठी निघाले त्यावेळी ते दोन अधिकारी कोणते गाणे म्हणतील??

प्रतीक, अकेले अकेले कहा जा रहे हो, हमे साथ ले लो जहा जा रहे हो? किंव ओ जानेवाले हो सके तो लौटके आना?

३९: एका बरणीत सुकामेवा भरलेला असतो. एका काजूला एक जर्दाळू आवडू लागते. सुदैवाने ती जर्दाळू सिंधी पण नसते. मग तर तो तिच्या प्रेमातच पडतो. तिच्यासाठी तो कुठले गाणे गाईल?

टीपा
१: कोड्याच्या सोईसाठी जर्दाळूचे लिंग बदलण्यात आले आहे. उगाच 'ती जर्दाळू नाही तो जर्दाळू' असे प्रतिसाद देउ नयेत. दिल्यास अनुल्लेख केला जाइल.
२. कोडे जरी सुकामेव्याचे असले तरी उत्तर बरोबर आल्यास बक्षीस म्हणून सुकामेवा मिळणार नाही. (आयडीची हार्दिक माफी मागून) तशी प्रथा विशिष्ट बाफवरच आहे. Happy
३. गाणे सुवर्णकाळातले असल्यामुळे स्वप्नागट आणि दिनेशगट या दोन्ही गटांना वाव आहे.

मी उल्लेख करायची सोय केलेली आहे. प्रतीकने त्याचा क्रमांक बदलला की तुझ्या कोड्याचा जाहीर उल्लेख होइल.

रच्याकने ते काका प्रतीकसाठीच वापरले आहे ना? Happy

राम....उप्प्स....सॉरी सॉरी....क्रमांक बदलला....झाले असे की त्या स्वप्नाच्या रामदेव बाबाच्या जपामुळे ३६ नंतर मी ३७ घेतला...अन् तुमच्या कोड्याचा तो क्रमांक मागील पानावर गेल्यामुळे तसे झाले...

योग्य ते करेक्टले आहे.

माधव, खुबानी वगैरे आडनावाची गायिका होती का कोणी? मग आपण आऊट बाबा. आपल्याला ही अशी गायिकांवरून गाणी नाही येत.

>>मी "अ‍ॅग्रीमेन्ट" चित्रपटातील गाणं आठवतं होतो.
हरे राम! हया नावाचा पिक्चर होता?

प्रतीक, मी जप करतेय काय? तुला आता शाप, आज रात्री तुझ्या स्वप्नात बाबा रामदेवच येतील. हीहीही...
** बाबा रामदेव ह्यांच्या अनुयायांनी क्षमा करावी.

स्वप्ना....हुर्यो....तिन्हीही ना...ही...त...!! बरं झालं...माझी बाबाची तिन्ही गाणी तू नापास केली होतीस, नाही का !

कोडे ३७
माया चे आणी श्रीहरी चे प्रेमप्रकरण तिच्या घरी कळाल्यावर एकच गहजब उडाला.. तिच्या आईवडीलानी तिला घराबाहेर पडायची बंदी केली... तिला तीच्या रुममध्ये बंदीवासात टाकले.. तर ती कुठले गाणे म्हणेल..

~ या कोड्यासाठी हे गाणे सूट होईल ?

"कैद मै है बुलबुल, सैंयाद मुस्कुराये, कहा भी ना जाये, छुप रहा भी ना जाये..."

>>मी "अ‍ॅग्रीमेन्ट" चित्रपटातील गाणं आठवतं होतो.
हरे राम! हया नावाचा पिक्चर होता?>>>>>येस्स स्वप्ना Happy गायक शैलेन्द्र आणि रेखा अभिनित चित्रपट. Happy (शैलेन्द्रने "दो जासूस" मध्येही काम केले होते)

त्यातील
"जाने क्यु मुझे अब युं लगे प्यार के बिना जिना भी है सजा,
ओ मेरे साथी मौसम हंसी है, आजा सनम तुझे कसम सुन ले दिल के सदा"
हे माझे, लताच्या आवडत्या गाण्यांपैकी एक. Happy

प्रतीक... नाही..

३८ नं... झुट बोले कौवा काटे... हे पण सुट होते आहे.. Happy
रच्याकने... माधव मी प्रतीकला काका बोललो तर तो तुम्हा सर्वांचा आजोबा होइल.. Wink

वेल...भरत....कु.पटवर्धन यांचा याच नावाचा एक टुकार चित्रपट आला होता...पण मी दिलेले वरील गाणे मात्र 'बेदर्द जमाना क्या जाने?" या १९६० च्या अशोककुमार निरुपा ऱोय अभिनित चित्रपटात होते....त्यावेळी कल्याणजी हेच एकटे "कल्याणजी वीरजी शाह" नावाने संगीत देत असत.

काका म्हणा, मामा म्हणा, दादा म्हणा आजोबा म्हणा किंवा अगदी बाळ्या म्हणा.....पण या धाग्यातून बाहेर काढू नका म्हणजे झालं.

"झूट बोले...." नही सूट होता है भाय !!!

कोडे क्र. ४०

संतासिंग परीक्षेत पुन्हा नापास होतो. पण रिझल्टकार्ड घरी दाखवल्यावरही त्याचे पालक त्याला ओरडत नाहीत. मित्र त्याला त्यामागचं रहस्य विचारतात. तेव्हा संतासिंग त्याने वापरलेली ट्रिक सांगतो. कोणते गाणे म्हणून?

ए मागच्या पानावर तुम्ही कित्ती खात होतात. बटाटेवडे काय, बुंदीचे लाडू काय! मला पण द्या की.
रच्याकने, कोणती कोडी पेंडिंग आहेत?

मामी तुम्ही दिलेली कोडी वाचताना दाट शंका येतेय की खिचडी मधल्या प्रफुलला तुम्ही तुमचा मेंदू उधार द्यायचात की काय. हंसाला विंग्रजी शब्दांचे अर्थ सांगताना तो अशाच प्रकारचं तर्कट लावायचा. Happy

Pages