..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भरत मी खिचडी पहात नाही. त्यामुळे ही काँप्लीमेंट आहे की माझ्या मेंदुचं भरीत बनवलय काही कळायला मार्ग नाही हं. Proud

जाण्यापुर्वी माझ्या ३७ नं कोड्याचे उत्तर सांगुन टाकतो.. एक क्लु.. हे गाणे शास्त्रीय संगीतावर आधारीत आहे.. आणी अगदी खात्रीने तुमच्या माझ्या सर्वांच्या फेवरीट गाण्यांपैकी एक आहे.... Happy

मामी,

कोडं ३७ - माया आणि श्रीहरी
कोडं ३८ - अनिल अंबानी
कोडं ३९ - सुकामेवा
कोडं ४० - संतासिंग

ऑल पेंडींग

आणि तुम्ही प्रतीकने दिलेलं मॅगी विसरलात. टू मिनिटस!

>>शास्त्रीय संगीतावर आधारीत आहे

ठार मी! शेवटचा खडा - 'जुलम सहे नारी, जनक दुलारी, अजब तेरी लीला ओ गिरिधारी"? पण हे ऑल टाईम फेव्हरेट नसणार Sad

अंबानीसाठीचे गाणे (३८)

आजकी मुलाकात बस इतनी
कर लेना बाते कल चाहे जितनी..

किंवा

ओ जानेवाले हो सके तो लौटके आना

स्निग्धा....'अभी ना जाओ..." छान आहे...पण आता उत्तर जाहीर करतोच :

~ २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकलेल्या आपल्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्यासाठी काल अनिल अंबानी तिहार जेलमध्ये गेले होते....त्यांच्याशी सुटकेसंदर्भात बराच वेळ बातचितही झाली असे वृत्त आले आहे.

नियत वेळेनंतर ज्यावेळी अनिल अंबानी मुंबईला परतण्यासाठी निघाले त्यावेळी ते दोन अधिकारी कोणते गाणे म्हणतील??

अनिल अंबानीना तुरुंगातून जाताना पाहून कैदेतील अधिकारी म्हणतील :

"वहाँ कौन है तेरा, मुसाफ़िर, जायेगा कहाँ
दम लेले घडी भर, ये छैयां, पायेगा कहाँ"

भरत मी खिचडी पहात नाही. >>> मामी भारतातच आहे ना??

>>> हो राम. पण मला मालिका वगैरे बघायला खूप बोअर होतं. मी फार क्वचित टिव्ही बघते. फारतर हॉलिवूड मूव्हीज. फारच शाणपट्टी दाखवतेय असं नको वाटून घेऊ हं. Happy

वक्के मामी... आम्हाला घरच्यांच्या कृपेने संध्याकाळी ७.३० ते ११ रोज मराठी/हिंदी मालीकांचे दर्शन होते.. पण खिचडी जरुर बघा... या मालीकेवर त्यातल्या पात्रांसहीत एक शिनुमा सुद्धा आला होता.. Happy

राम तुमच्या कोड्याचा क्रमांक ३७ आहे ..माया श्रीहरी.

मामी ती काँप्लिमेंटच आहे. आता तेवढ्यासाठी खिचडी, इन्स्टंट खिचडी नाहीतर खिचडी द मुव्ही बघा.

रामचं कोडं
कोडे ३७
माया चे आणी श्रीहरी चे प्रेमप्रकरण तिच्या घरी कळाल्यावर एकच गहजब उडाला.. तिच्या आईवडीलानी तिला घराबाहेर पडायची बंदी केली... तिला तीच्या रुममध्ये बंदीवासात टाकले.. तर ती कुठले गाणे म्हणेल..

माधव, तुमच्या कोड्याचं उत्तर 'ओ मेरे शाहे खुबा, ओ मेरी जाने जनाना, तुम मेरे पास होते हो, कोई दुसरा नही होता' हे तर नाही ना? जर्दाळूला हिंदीत 'खुबानी' म्हणतात, हे साधारण सिंधी आडनावासारखं आहे, आणि जर्दाळू स्त्रीलिंगी म्हणजे 'जाने जनाना'. ह्या गाण्यावर मी आधी कोडं घातलं होतं म्हणून सांगितलं नाही. हे आहे का?

कोडे ३७
माया चे आणी श्रीहरी चे प्रेमप्रकरण तिच्या घरी कळाल्यावर एकच गहजब उडाला.. तिच्या आईवडीलानी तिला घराबाहेर पडायची बंदी केली... तिला तीच्या रुममध्ये बंदीवासात टाकले.. तर ती कुठले गाणे म्हणेल..

उत्तर.. मन तडपत हरी दरशन को आज.. Happy

अरेच्या....रफीसाहेबांच्या आवाजात ? मी "माया" गाणे म्हणेल म्हणून स्त्री आवाजातीलच गाणी शोधत बसलो की...?

राम यांचा तीव्र तीव्र तीव्र निषेध !!!!

स्वप्ना क्रेक्ट है जी Happy

३९: एका बरणीत सुकामेवा भरलेला असतो. एका काजूला एक जर्दाळू आवडू लागते. सुदैवाने ती जर्दाळू सिंधी पण नसते. मग तर तो तिच्या प्रेमातच पडतो. तिच्यासाठी तो कुठले गाणे गाईल?

उत्तरः ए मेरी शाहे खुबा ए मेरी जाने जानाना

माबोवर 'खुबानी का मिठा' अशी एक पाककृती आली होती पूर्वी. तोपर्यंत मला जर्दाळूला खुबानी म्हणतात हे माहित नव्हते. म्हणून ते नाव वाचल्यावर मला हे गाणेच आठवले होते Happy

सदतिसाव्या कोड्याने एक फलाट रिकामा केलाय तर मी माझी गाडी लावु का?

कोडे ४१ : याला स्टार प्लसवरच्या साथिया मालिकेचा संदर्भ आहे. गरजूंनी आज संध्याकाळी ७चा एपिसोड पहाच.

गोपीवहुला तिची मामेबहीण कम जाऊ राशीवहु घरात भूत असून ते तिच्याच(गोपीच्या) मागे लागले आहे असे भासवून घाबरवून सोडते. उगाच तिच्या खोलीची दार उघडायची, इकडून तिकडे फिरायचे असे उद्योग करते.
यामुळे गोपीला रात्र रात्र झोप लागत नाही.
तर अशा परिस्थितीत गोपी कोणते गाणे म्हणेल?

<<माबोवर 'खुबानी का मिठा' अशी एक पाककृती आली होती पूर्वी. तोपर्यंत मला जर्दाळूला खुबानी म्हणतात हे माहित नव्हते. म्हणून ते नाव वाचल्यावर मला हे गाणेच आठवले होते <<

बाप्रे...कोडे अवघड करण्यासाठी काय काय करता तुम्ही लोक्स!!! Uhoh

Pages