..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४७ मामींच्या गाण्यात जीना मरना बस में नही असं काहीतरी असेल. पण असं कोणतंही गाणं मला माहीत नाही. कदाचित पॅरलल युनिव्हर्समधलं असेल Happy

जिप्सीचं बरोबर वाटतय. खजिना वगैरे जमतय. मी 'तू नही तो और सही' टाईपचं कोणतं गाणं आहे का ते शोधत होते. Happy

कोडं नं. ४७
एक माणुस चुकुन पॅरॅलल युनिव्हर्समध्ये जातो. तिथे बघतो तर काय. समुद्र म्हणजे चिकट पाणी असतं. तिथल्या बसेस डब्बल डेकर असतात पण वर जायला जीनाच नसतो. वैतागून तो बसमध्ये आत्महत्या करायचा प्रयत्न करतो. पण कंडक्टर त्याला तसं करून देत नाही. बसमध्ये आत्महत्याबंदी असते. हताश होऊन तो कोणतं गाणं म्हणेल?

उत्तर :
जिंदगी क्या है, गम का दरिया है
न जीना यहां बस में, न मरना यहां बस में
अजब दुनिया है

स्वप्ना...

"सुबह और शाम काम ही काम....ऐसे सजना से मेरी कुट्टी कुट्टी..."

असे काहीसे लडिवाळपणाचे पडद्यावर सुलक्षणा पंडितचे गाणे आहे...गायले आहे मात्र लतादिदीनी...."उलझन" मधील.

हे आहे ?

पण गाणं त्याच पिढीतल्या लोकांनी ऐकलं पाहिजे असं कुठे आहे? Happy आणि मी काही टिनएजर कॅटॅगरीतली नाहिये.

चला, उत्तर सांगून टाकते.

कोडं ४६:
'सर, सर, लवकर चला. अजयला बघा खोदताना काय सापडलं"
प्रोफेसर बक्षी नोटसमधून डोकं वर काढून बघतात. सहाय्यकाचा फुललेला चेहेरा बघून लगेच त्याच्याबरोबर निघतात. बघतात तर काय, त्यांचा दुसरा मदतनीस अजय एका ढीगाजवळ उभा असतो, त्या ढीगात जुने मडक्यांचे तुकडे, मणी आणि काय काय पडलेलं असतं.
"सर, इथे बरंच काम करावं लागणार आहे आपल्याला'
'अरे वा! खरंच की" प्रोफेसर बक्षी आनंदाने म्हणतात. पण दुसर्‍याच क्षणी त्यांना कसलीतरी आठवण होते. ते लगेच आपला मोबाईल काढतात "हॅलो, मधू, अग, तुझा विश्वास बसणार नाही. इथे आज घबाडच मिळालंय म्हण ना. निदान ५-६ दिवस तरी मला इथे थांबावं लागेल असं दिसतंय. हो, हो, मी कबूल केलं होतं पण काय करू तूच सांग"
फोनच्या दुसर्‍या टोकाला असलेली मिसेस मधू बक्षी खट्टू होते. एव्हढ्या निगुतीने अरेन्ज केलेली पार्टी आणि नवराच नाही म्हणजे काय? मग ती एक गाणं म्हणते आणि प्रोफेसर बक्षी लगेच पार्टिला हजर होतात. काय असेल ते गाणं?

उत्तरः
जो वादा किया वो निभाना पडेगा
रोके जमाना चाहे रोके खुदाई तुमको आना पडेगा

धन्यवाद जिप्सी. लोक्स, चला माझी जायची वेळ झाली, आता सोमवारी भेटू. विकेन्डला आणखी कोडी शोधायचा यत्न करेन Happy

४८: भारतीय अंतराळविरांना मंगळावर सजीव सापडतो. अगदी मानवासारखाच दिसतो तो फक्त अंगात रक्तवाहिन्या नसतात. ते त्याला पृथ्वीवर घेउन येतात. तो प्रचंड बुध्दीमान असतो काही मिनिटातच सगळे आत्मसात करत असतो. लोक त्याला भारत वि लंकेच्या सामन्याला घेउन जातात. नेमका तेंव्हाच सचीन दुखापतीमुळे खेळू शकत नाही म्हणून धोनी मंगळ्याला संघात घेतो. पण त्याला काही खेळता येत नाही आणि भारत सामना हरतो. सगळे प्रेक्षक काय गाणे म्हणतील?

४८ : मंगल भवन अमंगल हारी?>>>>मी पण हेच लिहणार होतो, लंचला गेलो म्हणुन उशीर झाला. Happy

स्निग्धा, ते दो आँखे बारह हाथ मधले गाणे, माझेही आवडते. शिवाय दो बीघा जमीन मधले, धिन तक तक ढोल बजाता आया.
पण ऑल टाईम फेव्हरीट... ओ सजना बरखा बहार आयी.
तक्षक मधल्या, तब्बूच्या गाण्याने पण मला त्याच गाण्याची आठवण झाली होती..

<<पण ऑल टाईम फेव्हरीट... ओ सजना बरखा बहार आयी.<<
अगदी अगदी दिनेशदा! आज इतक्या वर्षांनंतरही या गाण्याची गोडी अविट आहे. माझी कॉलरट्युन असते ती दर पावसाळ्यात. Happy

माधव भरतनी दिलेले कोड्याचे उत्तर बरोबर आहे का???
लोक्स ,पावसाच्या फेवरीट गाण्यात अजुन दोन गाडी अ‍ॅड करतो आहे.. घनन घनन घन घीर आए बदरा.. लगान.. आणी बरसो रे मेधा मेधा बरसो रे... आपली ऐशुबेबी इन गुरु.. Happy

ही राहिलेली फेव्हरिट
रिमझिम के तराने लेके आयी बरसात याद आयी किसी से वो पहली मुलाकात
एक लडकी भीगी भागी सी सोती रातों में जागी सी

जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात (भाभू रेडिओवर गातो आणि मधुबाला ऐकून रिअ‍ॅक्ट करतेय).
असंच आनखी एक गाणं आहे. हिरो रेडिओअवर गाणं म्हणतेय आणि ते जिच्याबद्दल आहे ती हिरवीण ते ऐकतेय.

कोडं ४९:

मुंडेच्या मैत्रीणीला काही गुंड पळवून नेतात. तिला एका ठिकाणी डांबून ठेवतात. ते आपली सर्व शक्ती पणाला लावतात आणि तिची सुटका करून तिला गुंडाच्या तावडीतुन बाहेर काढतात. मुंडेंनी आपली सुटका केली हे समजल्यावर तिला खुप आनंद होतो आणि तिच्या डोळ्यात प्रेमाची भावना निर्माण होते. अशावेळी मुंडेची बायको त्यांना उद्देशुन कोणते गाणे म्हणेल?

Pages