..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं ३४:
श्रीलंकेत भारताविरुध्द मालिका सुरु होती. पण ह्या वेळी का कोण जाणे मुथय्याचा प्रभावच पडत नव्हता. कॅप्टनने अनेक वेळा सांगूनही तो त्याच्या एका खास अस्त्राचा प्रयोगच करत नव्हता. सगळी टीम वैतागली होती. जनमत प्रक्षुब्ध झालं होतं आणि वर्तमानपत्रांनी तर त्याच्याविरोधात टीकेची झोड उठवली होती. शेवटी शेजारीपाजारी, मैत्रिणी ह्यांच्या टोमण्यांमुळे हैराण झालेल्या त्याच्या बायकोने त्याला त्याचं कारण विचारलं. काय बरं म्हणाला असेल मुथय्या?

३४ : मुरली आहे म्हणून
सुर ना सजे क्या गाऊं मैं
हे आहे की सकाळी सांगितलं तसं उट्ट काढायला २१व्या शतकातलं गाणं आहे?

कोडे क्र. ३५

बबन नी रतन एकमेकांचे शेजारी, सामने दुकान पिछे मकान टाईप मारवाडी. दुकानामुळे दोघांमध्ये छुपी दुश्मनी होती. ही छुपी दुश्मनी त्यांच्या मुलांमध्येही उतरली पण मुलांनी ती छुपी ठेवली नाही. जेव्हा जमेल तेव्हा एकमेकांवर कुरघोडी करायची संधी सोडली नाही. एकदा दोघांना जातीच्या कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते व बबनचा मुलगा मन्नु नी रतनची मुलगी मधु यांच्यावर दुकानाची जबाबदारी येते. दोघेही सकाळपासुन दुकानात ठिय्या मांडुन आपला सेल शेजा-यापेक्षा जास्त कसा होईल यावर जातीने लक्ष देतात. अगदी एकमेकांच्या गि-हाईकांना फुस लावुन आपल्याकडे ओढायलाही ते कमी करत नाहीत. गाण्यातुन ते आपले दुकान कसे काय चालवतील???

३५ : जाता कहां है दीवाने
सब कुछ यहां है सनम
बाकी के सारे फसाने
झूठे हैं तेरी कसम
फीफी कुछ तेरे दिल में फीफी
कुछ मेरे दिल में फीफी
जमाना है बुरा
दोघे वित्तीय सल्लागार आहेत का? Happy

ते फीफीच आहे ना? गुगललं तर कुठे फिफ्टी कुठे सिफ्टी दिसतंय.
मला तर बुवा फीफी ऐकू येतं.

राईट यू आर स्निग्धा! अटरिया हा मुंबईच्या एट्रीया मॉलचा अपभ्रंश!

>>>> हे लै भारी. Rofl माझा ड्रायव्हर त्याला अटारिया मॉलच म्हणतो. Happy
अजून वाचतेच आहे.

कोडे क्र.३५

साधना....किशोर+मधुबाला च्या "झुमरू" मध्ये अशा सिच्युएशनवर एक गाणे आहे :

बाबू आना, सुनते जाना, महंगा सौदा है इस का
लुट ना जाना
ये सब है जाल इस का, मालूम है हाल इस का
चोरी का है माल इस का, धोखा न खाना..."

हे चालेल तुला ?

(पावसामुळे आमच्याकडे नेटराव भिजल्येत....लई हळुहळू चालत आहेत)

गाणे ओळखणे कठिण आहे तुम्हा लोकांसाठी, बहुतेकांनी कधीही ऐकले नसेल, मी चित्रपट एकदाच पाहिलाय पण असले काही गाणे त्यात आहे हे माहितही नव्हते. परवा संध्याकाळी १००.७ एफेमवर पहिल्यांदा ऐकले.

प्रचंड धमाल गाणे आहे. असले काही केवळ किशोर नी आशाच करु जाणे....

राम, रस्ता बरोबर पकडला होतात.

कोडं ३४:
श्रीलंकेत भारताविरुध्द मालिका सुरु होती. पण ह्या वेळी का कोण जाणे मुथय्याचा प्रभावच पडत नव्हता. कॅप्टनने अनेक वेळा सांगूनही तो त्याच्या एका खास अस्त्राचा प्रयोगच करत नव्हता. सगळी टीम वैतागली होती. जनमत प्रक्षुब्ध झालं होतं आणि वर्तमानपत्रांनी तर त्याच्याविरोधात टीकेची झोड उठवली होती. शेवटी शेजारीपाजारी, मैत्रिणी ह्यांच्या टोमण्यांमुळे हैराण झालेल्या त्याच्या बायकोने त्याला त्याचं कारण विचारलं. काय बरं म्हणाला असेल मुथय्या?

उत्तरः

ओ मेरे शाहेखुबा, ओ मेरी जाने जनाना
तुम मेरे साथ होती हो, कोई 'दुसरा' नही होता

अरेच्या.....साधना....काय सांगतेस काय तू ? माझे गाणे अचूक निघाले ????

व्वा व्वा....चल, त्या स्वप्नाला चुकवून आपण दोघेच त्या दुकानातील माल फस्त करू !

(पडद्यावर किशोर आणि मधुबाला....आणि तिची धाकटी बहीण चंचल, हे धमाल गाणे म्हणतात....यू ट्युबवर असेल बहुतेक...जरूर पहा...!)

ह्या बीबीचं एव्हढं वेड लागलंय की काल रात्री बिछान्यावर पडल्यावर कोडी सुचली म्हणून उठले आणि मोबाईलात नोट करून ठेवली सगळी. Happy

>>व्वा व्वा....चल, त्या स्वप्नाला चुकवून आपण दोघेच त्या दुकानातील माल फस्त करू !

प्रतिक, पचणार नाही हो तुला. Happy

आज रात्री शोधायला पाहिजे तुनळीवर.. Happy

स्वप्ना, खरेच व्यसन.. मी तर हल्ली गाणे ऐकले की सिच्युएशनचाच विचार करते. कोडे ३५ परवाच विचार करुन ठेवलेली पण इथे यायला मिळत नाही. इथे एकदा आले की अडकलेच.... Happy

मी परवा इथे दिवसभर पडिक होते नी ऑफिसातले सगळे काम राहिले, नोकरी जाईल माझी अशाने..:)

>>स्वप्ना... मला अर्धा बटाटेवडा चालेल..

अर्धा का? एक अख्खा घ्या की, भरतने मला २ पाठवले विपूतून मगाशी - बरोबर तेलात तळलेली मीठ लावलेली मिरची - दादरच्या श्रीकृष्ण वडेवाल्याकडची. यम्म Happy

स्वप्ना.....अगं तुलाही त्या दुकानातील दोन मॅगी पॅकेट्स मी देणारच आहे....कारण?

कारण काल तू इथे एक गाणे दिलेस उत्तरासाठी :

"क्या जानू सजन होती है क्या गमकी शाम
जल उठे सौ दिये जब लिया तेरा नाम"

~ माझ्या एका मैत्रिणीच्या मोबाईलची ही "कॉलर ट्यून" आहे. अगोदर तिच्याशी मी काही कारणास्तव भांडलो होतो, पण ज्यावेळी तिला फोन केला आणि वाट पाहताना हेच गाणे ट्यून म्हणून तिने सीलेक्ट केले आहे असे ऐकायला मिळाले, त्यावेळी तिच्याविषयीचा सगळा सगळा राग विरघळून गेला.....फार सुंदर गाणे आहे...आशा पारेख दिसलीही आहे मस्तच, या गाण्यात.

प्रतीक....खरंच मस्त गाणं आहे हे....:-)

चला आता,कोडं ३६:
बाबा रामदेव, कपिल सिब्बल आणि सुबोधकांत सहाय वाटाघाटीला बसले होते. चर्चा फलद्रूप होईल अशीच चिन्हं दिसत असल्याने सारे खुशीत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडचे मुद्दे मांडलेलं अ‍ॅग्रीमेन्ट बनवायचं कामही सोबत चालू होतं. पण एकाएकी काही मुद्द्यावरून चर्चा फिसकटली. बाबा रामदेव भयंकर संतापले. रागाच्या भरात त्यांनी अ‍ॅग्रीमेन्ट फाडून टाकलं आणि त्याचे तुकडे सिब्बल आणि सहायच्या अंगावर भिरकावून देऊन ते तरातरा बाहेर पडायला लागले. सिब्बल आणि सहाय बाबांना परत बोलावायला काय गाणं म्हणतील सांगा पाहू? अचूक उत्तर देणार्‍यास बाबा रामदेव ह्यांचं एक पोस्टर फ्री देण्यात येईल Proud

अचूक उत्तरास बाबा रामदेव ह्यांचं एक पोस्टर फ्री देण्यात येईल>>>>>या कोड्यातुन माझी विनाशर्त माघार Proud

स्वप्ना....

"आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं
मेरा सूना पड़ा रे संगीत तुझे मेरे गीत बुलाते हैं"

~ बरोबर असले तरी रामदेव बाबाचे पोस्टर तुझ्याजवळच ठेव...!

कोडे ३७
माया चे आणी श्रीहरी चे प्रेमप्रकरण तिच्या घरी कळाल्यावर एकच गहजब उडाला.. तिच्या आईवडीलानी तिला घराबाहेर पडायची बंदी केली... तिला तीच्या रुममध्ये बंदीवासात टाकले.. तर ती कुठले गाणे म्हणेल.. Happy

प्रतीक, नोप.....

>>~ बरोबर असले तरी रामदेव बाबाचे पोस्टर तुझ्याजवळच ठेव...!
नहीऽऽऽऽऽऽऽ

दिल के टुकडे टुकडे करके, मुस्कुराके चल दिये
जाते जाते ये तो बता जा, हम जियेंगे हिसके लिये ????

Pages