..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय लोक्स Happy ..... माझ्या कडुन एक सोप कोड:

कोड ४५: रीनाचे डोळे खुप छान असतात, बर्‍याच मुलांना तीच्या डोळ्यांच आकर्षण असत.....रीनापण बर्‍याच मुलांबरोबर डोळे मीळवत असते आणी त्यांना फसवत असते... जय नावाच्या मुलाची रीनाशी नजर भेट होते आणी त्याला हि ती आवडु लागते....रीना बाबत जय च्या मीत्राला माहित असत म्हणुन तो जय ला रीनाच्या मागे जाऊ नको सांगु ईच्छितो तर तो हे कोणत्या गाण्यातुन सांगेल?

भरत, दिलेल्या वेळेत मामींकडुन ५ बाकरवड्या घेऊन जा Happy (गुगलुन पाहिल्यामुळे ५ बाकरवड्या वजा :फिदी:)

कोडं ४३

रीमाचे तिच्याच कॉलेजातील अजयवर प्रेम असते. पण अजयला याबद्दल काहिच माहित नसतं. रीमाला/अजयला गाण्याची आवड. तिचा आवाजही सुंदर. रीमाच्या मैत्रिणी, दोघांची हि आवड लक्षात घेऊन त्यांचे सुत जमवण्याचा प्रयत्न करत असतात. एके दिवशी एका गाण्याच्या कार्यक्रमाला तोही येतो तेंव्हा तिच्या मैत्रिणी तिला, त्याला गाण्यातुन इम्प्रेस करायला सांगतात. पण तिला आयत्यावेळी कुठलं गाणं गायच हेच सुचत नसतं आणि तिच्या मैत्रिणी तिला गाणं गायचा आग्रह करत असतात. अशावेळी ती कोणंत गाण म्हणेल?

उत्तर:
मै कौनसा गीत सुनाऊ क्या गाऊ
जो पिया बस जाये मेरे तनमन में
खिल जाए सोयी कलिया
और बहारे आये सुनी बगियन में Happy

ये कैसे अचानक बिना कोई आहट
चले आए हो तुम मेरी जिंदगीमें
तुम्हे आज पाकर मै सबकुछ भुलाकर
मगन हो गयी हू तेरी हर खुशी मैम
कितने हि रंग सलोने हाय सलोने
भर गये है मेरे खाली दामन में

चित्रपट : दिल्लगी
स्वर: लता मंगेशकर

(रच्याकने, या गाण्यात धर्मेद्र, हेमामालिनी आणि असरानी सोबत जी हिर्वीन आहे (हे गाणे तीच म्हणते) तीच असरानीची खर्रीखुर्री बायको आहे का?)

मस्त आहेत कोडी एकेक... Happy

बा.व. आं.व. इकडेही धाडा...

आज तुफान पाऊस आहे नव्या मुंबईत आणि एफेमवर पाऊसगाणी... Happy हल्ली गाणी ऐकली की सिच्युएशन्चा विचार करायला लागते Happy

आज तुफान पाऊस आहे नव्या मुंबईत आणि एफेमवर पाऊसगाणी... हल्ली गाणी ऐकली की सिच्युएशन्चा विचार करायला लागते >>>>>साधना, मीही आता ऑफिसला येण्यापूर्वी घरी आशाची "फिरसे आईयो बदरा बिदेसी" आणि "बरसे पुहार, काच कि बूंदे बरसे जैसे" हि दोन गाणी ऐकत होतो. Happy

@ आर्या, स्निग्धा बरोबर Happy ..... मी खुपच सोपी कोडी टाकते ना Sad

कोड ४५: रीनाचे डोळे खुप छान असतात, बर्‍याच मुलांना तीच्या डोळ्यांच आकर्षण असत.....रीनापण बर्‍याच मुलांबरोबर डोळे मीळवत असते आणी त्यांना फसवत असते... जय नावाच्या मुलाची रीनाशी नजर भेट होते आणी त्याला हि ती आवडु लागते....रीना बाबत जय च्या मीत्राला माहित असत म्हणुन तो जय ला रीनाच्या मागे जाऊ नको सांगु ईच्छितो तर तो हे कोणत्या गाण्यातुन सांगेल?

ओमकारा: अजय देवगण , करीना कपुर : "नैनो कि मत मानिये, नैनो को मत.... नैना ठगते वे...."

>>फिरसे आईयो बदरा बिदेसी

सह्ही गाणं! त्यातल्या 'तेरे जानेकी रुत मै जानती हू, मुडके आनेकी रीत है के नही' आणि 'छूके जाईयो हमारे बगिचे, मै पीपल के आडे मिलूंगी' वर मी कुर्बान आहे अगदी Happy

....अन मी नंदाचे 'पती पत्नी' मधील 'कजरे बदरवा रे, मर्जी है तेरी क्या बालमा !" हे 'आरडी' च्या पठडीतील नसलेले, पण अतिशय सुमधुर गाणे यूट्यूबवर पाहात आहे. गाण्यात अर्थातच पाऊस बरसत आहे....पण या क्षणी बाहेरही !

लतादिदींचा काय आवाज लागलाय...! वेडच लागते.

आणखी एका गाण्यात पावसाचा छान आवाज आहे - 'अभिनेत्री' मधलं 'ओ घटा सावरी, थोडी थोडी बावरी'....मला हे गाणं ऐकायला लागलं की उन्हाळ्यात पण एकदम गार गार वाटतं. Happy

त्यातल्या 'तेरे जानेकी रुत मै जानती हू, मुडके आनेकी रीत है के नही' आणि 'छूके जाईयो हमारे बगिचे, मै पीपल के आडे मिलूंगी' वर मी कुर्बान आहे अगदी>>>>स्वप्ना तुला आंबावडी Happy

'अभिनेत्री' मधलं 'ओ घटा सावरी, थोडी थोडी बावरी'....मला हे गाणं ऐकायला लागलं की उन्हाळ्यात पण एकदम गार गार वाटतं>>>>हे गाणं ऐकायलाच आवडतं Happy इतक्या सुंदर पावसाच्या गाण्यावर नायिका व्यायाम करतेय Sad

मी नंदाचे 'पती पत्नी' मधील 'कजरे बदरवा रे, मर्जी है तेरी क्या बालमा !" >>>>प्रतीक, हे गाणं नाही रे ऐकलयं :(. आज घरी जाऊन बघतो/ऐकतो. Happy

धन्स जिप्सी! Happy लोक्स, माझ्या कोड्याचं उत्तर सांगून टाकते

कोडं ४४:
सुहासचा ड्रायव्हिंग लायसन्स एक्स्पायर झालेला असतो. पण ऑफिसमध्ये काम एव्हढं असतं की त्याला रिन्यू करून घ्यायला वेळ मिळत नसतो. त्यात बायकोने नवी गाडी घेऊ यात, हा खटारा विकून टाका बघू असा धोशा लावल्यामुळे जुनी गाडी कशीबशी विकून नवी कोरी गाडी कशीबशी घेतलेली असते. एका संध्याकाळी बायको नव्या गाडीतून बाहेर पडायचा हट्ट धरते. 'अग, लायसन्स एक्स्पायर झालाय, कुठे पोलिसाने धरलं तर महागात लागेल तुझा ड्राईव्ह' असं तो दाताच्या कण्या करून सांगतो. पण स्त्रीहट्टापुढे कधी कोणाचं काही चाललंय? शेवटी दोघं गाडीतून बाहेर पडतात. आणि त्याला ज्याची भीती वाटत असते तेच होतं. बायकोशी बोलण्याच्या नादात सुहासमहाशय सिग्नल तोडून पुढे जातात आणि पोलिसमामा धरतात. गाडी बाजूला घेता घेता सुहास काय गाणं म्हणेल?

उत्तरः
राहमे उनसे मुलाकात हो गयी, जिससे डरते थे वोही बात हो गयी
पिक्चर: विजयपथ, पडद्यावर - अजय देवगण आणि तबू

पावसाच्म मला आवडणारं गाणं : भीगी भीगी रातों में, ऐसे बरसातों में, कैसा लगता है?

आणि सदाबहार : रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन .......

नमस्कार लोक्स. गेले कित्येक दिवस तुमच्या कृपेनं हा धागा सतत पहिल्या पानावर आहे. Happy

मामी .. :)...मलाही पावसाचे सर्वात आवडणारे गाणे म्हणजे.. रिमझीम गिरे सावन.. दोन्ही व्हर्जन.. अरारा परत आठवण...मौसमी ..दिवस खल्लास.. Wink

कोण गप्पा मारतय? अंगठे धरून उभं रहायचय का? चला उत्तर सांगा पटापट Proud

स्व्प्ना हो सही गाणं आहे - माझं पावसातलं सगळ्यात लाडकं गाणं. भर उन्हात ऐकलं तर मनाचं घामोळं लगेच जातं. त्यातलं "क्यू रे बादल तूने छुआ मेरा हाथ क्या?" वर अगदी शिरशिरी येते अंगावर - पहिल्या पावसाने येणारी !

पती पत्नी हा चित्रपट आणि हे लताचं गाणं कधी ऐकलं नाही. माझ्याकडे ट्रिब्युट टु आर डी या कॅसेट्स्च्या कलेक्शन मध्ये मार डालेगा दर्देजिगर कोई इसकी दवा कीजिये हे आशाचे आहे. याव्र एक कोडं दिलं होतं मी. http://www.youtube.com/watch?v=eRWRAs-oo9Q
इथे अशी माहिती दिलीय की आशाने आरडीकडे गायलेलं हे पहिलं गाणं.
१९६१ छोटे नवाब ते १९६६ पती पत्नी आरडी ला पिक्चर्स मिळाले नव्हते का? आशाकडे यायला ५ वर्षे लागली?

माझं आजचं लास्ट कोडं..सोप्पं आहे......दुपारी इथे यायला जमणार नाही. Sad

कोडं ४६:
'सर, सर, लवकर चला. अजयला बघा खोदताना काय सापडलं"
प्रोफेसर बक्षी नोटसमधून डोकं वर काढून बघतात. सहाय्यकाचा फुललेला चेहेरा बघून लगेच त्याच्याबरोबर निघतात. बघतात तर काय, त्यांचा दुसरा मदतनीस अजय एका ढीगाजवळ उभा असतो, त्या ढीगात जुने मडक्यांचे तुकडे, मणी आणि काय काय पडलेलं असतं.
"सर, इथे बरंच काम करावं लागणार आहे आपल्याला'
'अरे वा! खरंच की" प्रोफेसर बक्षी आनंदाने म्हणतात. पण दुसर्‍याच क्षणी त्यांना कसलीतरी आठवण होते. ते लगेच आपला मोबाईल काढतात "हॅलो, मधू, अग, तुझा विश्वास बसणार नाही. इथे आज घबाडच मिळालंय म्हण ना. निदान ५-६ दिवस तरी मला इथे थांबावं लागेल असं दिसतंय. हो, हो, मी कबूल केलं होतं पण काय करू तूच सांग"
फोनच्या दुसर्‍या टोकाला असलेली मिसेस मधू बक्षी खट्टू होते. एव्हढ्या निगुतीने अरेन्ज केलेली पार्टी आणि नवराच नाही म्हणजे काय? मग ती एक गाणं म्हणते आणि प्रोफेसर बक्षी लगेच पार्टिला हजर होतात. काय असेल ते गाणं?

गाणं जुनंच आहे.

कोडं नं. ४७

एक माणुस चुकुन पॅरॅलल युनिव्हर्समध्ये जातो. तिथे बघतो तर काय. समुद्र म्हणजे चिकट पाणी असतं. तिथल्या बसेस डब्बल डेकर असतात पण वर जायला जीनाच नसतो. वैतागून तो बसमध्ये आत्महत्या करायचा प्रयत्न करतो. पण कंडक्टर त्याला तसं करून देत नाही. बसमध्ये आत्महत्याबंदी असते. हताश होऊन तो कोणतं गाणं म्हणेल?

कोण गप्पा मारतय? अंगठे धरून उभं रहायचय का? चला उत्तर सांगा पटापट>>>>>चला मामा आले (माधव मास्तर हो :फिदी:) पटापट पुढचे प्रश्न विचारा Happy

आपली आवड सुरु आहे, मग माझही आवडत पाऊसगाण - नन्ही नन्ही बुंदनीयो की झनन झनन झन झांजरी बजाती आयी देखो भाई बरखा दुल्हनिया...... ओ उमड घुमड कर आयी रे घटा.....

माधव्,जिप्सी...स्वप्नाच्या कोड्यामध्ये खजाना आहे त्यामुळे मला तुमची गाणी सुट होत आहेत असे वाटत नाही.. Happy

"...रिमझीम गिरे सावन.. दोन्ही व्हर्जन...."

~ राम १००% अनुमोदन....वैशिष्ठ्य म्हणजे अमिताभ त्यावेळी 'बिग बी' बनले नव्हते, त्यामुळे गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात या गाण्याचे भर पावसात अगदी ईझी असे शूटिंग करण्यात आले....दोघानीही त्या पावसाचा मनमुराद आनंद लुटला होता हे त्या गाण्याच्या दरम्यानची त्यांची देहबोली सांगतेच.

(कथेत अमिताभची नोकरीऐवजी लहानसहान उद्योग करण्याची धडपडदेखील वाखाणण्यासारखी चितारली आहे, दिग्दर्शकाने...)

Pages