..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोक्र. ४१ :

टीव्हीकडे तरी जाणार नाही...तरीही थीमवरून

"ओ नींद न मुझ को आए, दिल मेर घबराए
चुप के चुप के, कोई आ के, सोया प्यार जगाए"

हे एक सदाबहार (पो.बॉ.९९९) गाणे आठवते...लताचे

दोन पानांपूर्वी भर्पूर खाणे हादडून झाले आहे. तेंव्हा उगाच वजन वाधू नये म्हणून गाणे ओळखले तरी स्वप्नाला बक्षीस देण्यात येणार नाही Happy मामी तुम्ही उत्तर न आल्याचे वाईट वाटून घेऊ नका..

प्रतीक बराबर छे.

४१ : गोपीवहुला तिची मामेबहीण कम जाऊ राशीवहु घरात भूत असून ते तिच्याच(गोपीच्या) मागे लागले आहे असे भासवून घाबरवून सोडते. उगाच तिच्या खोलीची दार उघडायची, इकडून तिकडे फिरायचे असे उद्योग करते.
यामुळे गोपीला रात्र रात्र झोप लागत नाही.
तर अशा परिस्थितीत गोपी कोणते गाणे म्हणेल?

नींद न मुझको आए
दिल मेरा घबराए
चुपके चुपके कोई आके
( भीतीने तिची बोबडी वळल्याने पुढची ओळ म्हणत नाही :D)

कोडं ४२ : कथा कादंबरीवाचनाची आवड असलेल्या एका बाईंना मायबोलीचा शोध लागला आणि इथल्या कादंबर्‍या त्यांना प्रचंड आवडल्या. इतक्या की यापुढे फडके-खांडेकर-कदम-काकोडकर-पाटील इ. सगळे जुनाट वाटू लागले. त्या माबोकर कथा-कादंबरीकाराची नं १ फॅन आपणच आहोत असं त्यांनी घोषित केलं . तर ती वाचक आणि तो कादंबरीकार कोणतं द्वंद्वगीत म्हणतील?
(वरील कोड्यातील सर्व व्यक्ती, प्रसंग, संवाद पूर्णपणे काल्पनिक असून प्रत्यक्षातील वा जालावरील कोणत्याही व्यक्तीशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास हा केवळ्म योगायोग समजावा)

हम तो तेरे आशिक है सदीयो पुराने,
चाहे तू माने, चाहे ना माने ( हे आप्ले यम्कं जूळ्वण्यासाठी )
//
लिखा है तेरी आँखोंमे किसका अफसाना
अगर इसे समझ सको, मुझे भी समझाना !!!!???????????

भरत या ४२ नं सिच्युएशन ला मला शिल्पा शेट्टी आठवली..;)
किताबे बहुतसी पढी होगी तुमने मगर कोई चेहरा भी तुमने पढा है...

कोणी सोडवायचा प्रयत्नही करू नये ना? खाऊन खाऊन सुस्ती आली की असंच होतं. Proud

कोडे क्र. ४०
संतासिंग परीक्षेत पुन्हा नापास होतो. पण रिझल्टकार्ड घरी दाखवल्यावरही त्याचे पालक त्याला ओरडत नाहीत. मित्र त्याला त्यामागचं रहस्य विचारतात. तेव्हा संतासिंग त्याने वापरलेली ट्रिक सांगतो. कोणते गाणे म्हणून?

उत्तर :
कर दी rub rub, कर दी मैने कर दी rub rub ..........

सुप्रभात राम आणि लोक्स Happy

कोडं ४३

रीमाचे तिच्याच कॉलेजातील अजयवर प्रेम असते. पण अजयला याबद्दल काहिच माहित नसतं. रीमाला/अजयला गाण्याची आवड. तिचा आवाजही सुंदर. रीमाच्या मैत्रिणी, दोघांची हि आवड लक्षात घेऊन त्यांचे सुत जमवण्याचा प्रयत्न करत असतात. एके दिवशी एका गाण्याच्या कार्यक्रमाला तोही येतो तेंव्हा तिच्या मैत्रिणी तिला, त्याला गाण्यातुन इम्प्रेस करायला सांगतात. पण तिला आयत्यावेळी कुठलं गाणं गायच हेच सुचत नसतं आणि तिच्या मैत्रिणी तिला गाणं गायचा आग्रह करत असतात. अशावेळी ती कोणंत गाण म्हणेल?

काल माधवने लिहिलेल्या "नियमा"वरून प्रेरणा घेऊन हे आमचेही काहि नियम Proud

१. आज गाणे ओळखणार्‍याला दहा बाकरवड्या बक्षिस देण्यात येतील. सदर बाकरवड्या सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ६ यावेळेतच मामींच्या विपुतुन घेऊन जाणे. दुपारी १ ते ३ दरम्यान वामकुक्षीसाठी विपु बंद असेल याची प्लीज"च" नोंद घेणे.

२. बाकरवड्या घरी नेऊन खाणार असल्यास येताना पिशवी घेऊन येणे. विपु कार्यालयात मिळणार नाही.

३. रीमा, अजय, कॉलेज हे सगळं काल्पनिक आहे. तेंव्हा उगाचच गुगलवर सर्च करण्यात वेळ घालवू नये.

४. सदर गाण्यासाठी फक्त दोनच क्लु देण्यात येतील. तिसरा क्लु विचारल्यास थेट उत्तरच सांगण्यात येईल. त्यातील एक क्लु नियम ३ मध्ये दिला असल्याने तुमच्याकडे आता फक्त एकच क्लु उरला आहे.

५. सदर कोडे चालु असताना इतर कुणी दुसरे कोडे दिल्यास आणि या कोड्याचा "अनुल्लेख" केल्यास विजेत्याला मिळणार्‍या बक्षिसामधुन ५ बाकरवड्या वजा करून देण्यात येतील.

सर्वांना सुप्रभात! कालचा वचपा काढायचा आहे ना? तो सक्काळी सक्काळीच काढून घेते Proud

कोडं ४४:
सुहासचा ड्रायव्हिंग लायसन्स एक्स्पायर झालेला असतो. पण ऑफिसमध्ये काम एव्हढं असतं की त्याला रिन्यू करून घ्यायला वेळ मिळत नसतो. त्यात बायकोने नवी गाडी घेऊ यात, हा खटारा विकून टाका बघू असा धोशा लावल्यामुळे जुनी गाडी कशीबशी विकून नवी कोरी गाडी कशीबशी घेतलेली असते. एका संध्याकाळी बायको नव्या गाडीतून बाहेर पडायचा हट्ट धरते. 'अग, लायसन्स एक्स्पायर झालाय, कुठे पोलिसाने धरलं तर महागात लागेल तुझा ड्राईव्ह' असं तो दाताच्या कण्या करून सांगतो. पण स्त्रीहट्टापुढे कधी कोणाचं काही चाललंय? शेवटी दोघं गाडीतून बाहेर पडतात. आणि त्याला ज्याची भीती वाटत असते तेच होतं. बायकोशी बोलण्याच्या नादात सुहासमहाशय सिग्नल तोडून पुढे जातात आणि पोलिसमामा धरतात. गाडी बाजूला घेता घेता सुहास काय गाणं म्हणेल?

हे गाणं गोल्डन इरातलं नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.

जिप्सी, ह्या बाकरवड्या मिनी बाकरवड्या नाहीत ना? असतील तर १० ही संख्या फार कमी आहे Happy

भरत - 'हम तुम्हे चाहते है ऐसे' बसलं असतं पण ते गोल्डन इरामधलं नाही आणि द्वंद्वगीतही नाहिये.

<<आज गाणे ओळखणार्‍याला दहा बाकरवड्या बक्षिस देण्यात येतील. सदर बाकरवड्या सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ६ यावेळेतच मामींच्या विपुतुन घेऊन जाणे. दुपारी १ ते ३ दरम्यान वामकुक्षीसाठी विपु बंद असेल याची प्लीज"च" नोंद घेणे.<< Lol

<<भरत - 'हम तुम्हे चाहते है ऐसे' बसलं असतं पण ते गोल्डन इरामधलं नाही आणि द्वंद्वगीतही नाहिये.<<
स्वप्ना.. भरतजींचं गाणं द्वंद्वगीत नाहीये ना? त्यांनी फक्त 'ती' म्हणतेय असं म्हटलय!

४३:
तु शायर है, मै तेरी शायरी
तु आशिक है, मै तेरी आशिकी
तुझे मिलने को दिल करता है
ओ मेरे साजना.... ????

हे जरा नविनच गाणं आहे नै का ??

कोडं ४२ : कथा कादंबरीवाचनाची आवड असलेल्या एका बाईंना मायबोलीचा शोध लागला आणि इथल्या कादंबर्‍या त्यांना प्रचंड आवडल्या. इतक्या की यापुढे फडके-खांडेकर-कदम-काकोडकर-पाटील इ. सगळे जुनाट वाटू लागले. त्या माबोकर कथा-कादंबरीकाराची नं १ फॅन आपणच आहोत असं त्यांनी घोषित केलं . तर ती वाचक आणि तो कादंबरीकार कोणतं द्वंद्वगीत म्हणतील?
(वरील कोड्यातील सर्व व्यक्ती, प्रसंग, संवाद पूर्णपणे काल्पनिक असून प्रत्यक्षातील वा जालावरील कोणत्याही व्यक्तीशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास हा केवळ्म योगायोग समजावा)
उत्तर : तोता मैना की कहानी तो पुरानी पुरानी हो गयी
अब तो सबके लबोंपर है ताजा खबर इक लडकी दीवानी हो गयी
तुझसे मिलके जिंदगानी हाय कितनी सुहानी हो गयी
मिलते ही नजर हुआ ऐसा असर मैं फकीरे की रानी हो गयी.

शुभप्रभात मंडळी (इकडे तुफान पाऊस पडत आहे.....! तरीही थॅन्क्स पर्जन्यराजे, नेटरावांना सर्दी झालेली नाही.

जिप्सी कोक्र.४३ चे आर्याने दिलेले उत्तर फिट आहे असे वाटतेच, पण जर ते नसेल तर मग याचा विचार करा :

"तुम्हें और क्या दूँ मैं दिल के सिवा
तुमको हमारी उमर लग जाए...."

बहुधा नसेलच...! पण तरीही दिवसाची सुरूवात लतादिदींच्या सुरांनी करावीशी वाटले म्हणून...!

४३ मैं कौनसा गीत सुनाऊं क्या गाऊं जो ...
पुधचं आठवत नाहीए. पण बाकरवडीसाठी एवढं लिहितो.
पुधलं गुगलून शोधलं
मैं कौनसा गीत सुनाऊं क्या गाऊं जो
पिया बस जाए तेरे तन मन में

जिप्सी, गीत तेरे प्यारका तेरीही आवाज हू, तू भी मेरा साथी बन जा, मै तेरी दमसाज (हा शब्द बरोबर आहे ना?) हू?

४४ अमिताभ मीनाक्षी शेषाद्रीचं
दोनो जवानी के मस्ती में चूर
न तेरा कुसूर न मेरा कुसूर
न मैंने सिग्नल देखा न तुमने सिग्नल देखा
अ‍ॅक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा
हे का?

जिप्सी बाकरवडी आणायला गेला की काय चितळ्यांकडे? आंबावडी पण आण रे बरोबर Happy

नाही भरत, त्याहीपेक्षा नवं आहे. त्याचं म्युझिक निदान मला तरी आवडतं. उत्तर सांगेन तेव्हा नेटवर कुठे असेल तर निदान एकदा तरी ऐकून पहा असंच सांगेन.

Pages