..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्ल्यू काही डोक्यात येईना....तरीही हे गाणे होऊ शकेल ?

"मेरे ऐ दिल बता, प्यार तूने किया, पाई मैंने सज़ा
क्या करूँ, मेरे ऐ दिल बता..."

वर साधनाने या संदर्भात केलेल्या टिपणीला १००% मोदक.

पाणी अडवा, पाणी जिरवा >> जिप्सी हा गाण्याचा बाफ आहे, निसर्गांच्या गप्पांचा नाही Happy त्यामुळे हा क्लू बाद. चल दुसरा क्लू दे Happy

कोडं ३१
तुम्हें देखती हूँ तो लगता है ऐसे
के जैसे युगों से तुम्हे जानती हूँ
अगत तुम हो सागर, मैं प्यासी नदी हूँ ?

ओक्के!

जिप्सी हा गाण्याचा बाफ आहे, निसर्गांच्या गप्पांचा नाही >>>>> माधव Proud

चला मीच उत्तर देतो Happy

कोडं ३१
सरीताचे लग्न सागरशी ठरतं. तिला तो बिलकुल पसंत नसतो. तिचे दुसर्‍याच एका तरूणावर प्रेम असते. पण घरचे तिच्या मनाविरूद्ध तिचे लग्न लाऊन देण्याचे ठरवतात. त्याच्याशी संसार केल्यास तिचे जीवन बर्बाद होणार असे तिला वाटत असते. अशा वेळी ती तिच्या प्रियकाराला उद्देशुन कोणते गाणं म्हणेल?

उत्तर:
नदिया बहती है तुमसे कहती है
सागर से मुझको मिलना नही है
सागर से मिलके मै खारी हो जाऊंगी
रोक लो मुझे, थाम लो मुझे
मै तुम्हारी हो जाऊंगी

चित्रपट: नई इमारत
नायिका: विद्या सिन्हा
पाणी अडवा, पाणी जिरवा: या चित्रपटाची/गाण्याची थीम "धरण" बांधण्यावर आहे. Happy

आता २९ स्वप्नाचे : संजीव कपूर शाम सवेरा
आणि ३० माझं : धार्मिक ट्रॅक सोडून रोमँटिक झालेली नायिका एवढी दोनच उरली आहेत ना?

च्यामारी....ह्या "नई इमारती' च्या.....पहिल्यांदाच नाव ऐकतोय...असाही चित्रपट होता?

बाकी "सागर से मिलके मै खारी हो जाऊंगी" या ओळीतील भावना मारू आहे.

भरत माझं २२ पण उरलयः

२२. नवाझ शरीफ पूर्वी उत्तम सारंगी वाजवायचे. त्यांच्या बायकोला सारंगी खूप आवडायची. घरी आले की आधी बायकोला सारंगी ऐकवायचे मग दोघे प्रेमाचे गुफ्तगू करत. एक दिवशी मात्र त्यांनी सारंगी ऐकवली आणि ते काम असल्यामुळे निघून गेले - प्रेमाचे गुफ्तगू न करताच. सौ. शरीफ कुठले गाणे म्हणतील?

क्लू १: कृष्णधवल जमान्यातले आहे. ऐकायला तसेच बघायला पण अप्रतिम आहे (अर्थात नायिका सुंदर असणारच Happy )

च्यामारी....ह्या "नई इमारती' च्या.....पहिल्यांदाच नाव ऐकतोय...असाही चित्रपट होता?>>>>>हो प्रतीक. विद्या सिन्हा, परीक्षित सहानी, सारीका अभिनित हा चित्रपटा Happy

चित्रपट पाहिला नाही पण सगळी गाणी भन्नाट आहेत. (संगीत: बप्पी लहरी)

१. नदिया बहती है तुमसे कहती है - लता मंगेशकर
२. प्यार का पारस पास तुम्हारे, छू के इसे तुम कंचन कर दो - येसुदास
३. आज को सवार लो कल को तुम निखार लो - महेन्द्र कपूर
४. आंचल कि छावमें ठंडी हवाओमें, ढूंढो ढूंढो प्यार मिलेगा तुम्हे गावं में - ??

इति सुंदर सुंदर गाणी आहे Happy

भरत बरोबर Happy

२२. नवाझ शरीफ पूर्वी उत्तम सारंगी वाजवायचे. त्यांच्या बायकोला सारंगी खूप आवडायची. घरी आले की आधी बायकोला सारंगी ऐकवायचे मग दोघे प्रेमाचे गुफ्तगू करत. एक दिवशी मात्र त्यांनी सारंगी ऐकवली आणि ते काम असल्यामुळे निघून गेले - प्रेमाचे गुफ्तगू न करताच. सौ. शरीफ कुठले गाणे म्हणतील?

उत्तरः चल दिए बंदा नवाझ छेडकर मेरे दिल का साझ (पडद्यावर मधुबाला आणि गुरुदत्त चित्रपटः Mr & Mrs 55)

भरत, सांझ सवेराचंच गाणं आहे Happy

जिप्सी, मी कोडं वाचण्यात गडबड केली. मला वाटलं तिला सागरशीच लग्न करायचं आहे. छ्या! माठ आहे मी अगदी!

कोडं २९:
संजीवकपूरकडे जेवायला पाहुणे आले. त्यांनी त्याला त्याची एक अत्यंत आवडती आणि लोकप्रिय डिश बनवायची फर्माईश केली. डिनरच्या वेळी ती डिश पाहुण्यांना खूप आवडली. पाहुण्यांत एक गायिका होत्या त्यांनी तर त्या डिशचं नाव गुंफून एक छानसं गाणंच म्हटलं. काय असेल ते गाणं?

उत्तरः
यही है वो सांझ और सवेरा, यही है वो सांझ और सवेरा
जिसके लिये तडपे हम सारा जीवनभर
यही है वो सांझ और सवेरा

<<आंचल कि छावमें ठंडी हवाओमें, ढूंढो ढूंढो प्यार मिलेगा तुम्हे गावं में -<<
हे मस्त गाणं 'नई इमारत' चं आहे हे माहित नव्हतं!

कोडं ३२:
डॉक्टर मेघश्याम बादल कॉन्फरन्ससाठी मुंबईत येतात खरे पण त्यांना लक्षात येतं की त्यांनी टायच आणलेला नाहिये. घाईघाईने जवळच्याच एका मॉलमध्ये शिरतात. दारावरच्या सेक्युरिटीवाल्याशी त्यांची खडाजंगी उडते. शब्दाने शब्द वाढतो आणि दोघे हमरीतुमरीवर येतात. हा गोंधळ ऐकून मॉलचा मॅनेजर धावत येतो. एकंदरीत प्रकार ऐकल्यावर त्याला चूक डॉक्टर बादलांची आहे हे कळतं. तो त्यांना कडकपणे समजावणी देतो पण एका गाण्यातून. सांगा बरं ते गाणं.

स्वप्ना, सारखं तेच सांझ और सवेरा आठवत होतं मला.असो.

आता हे एकच राहिलेय ना?

कोडं ३० : एका तरुणीचं आपल्या परिसरात राहणार्‍या एका तरुणावर मन जडलं. याच्याशीच लग्न करायचं असं तिनं ठरवलं. मग त्याची इत्यंभूत माहिती काढली. तर तो आपल्या मातेच्या अर्ध्या वचनात आहे आणि माताश्री अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आहेत असं दिसलं. झालं. आपल्या नायिकेने बरोबर भावी सासूबाई जातील त्या त्या वेळी त्या त्या देवळात जायचा नेम लावला. सासुबाईंना पण असं देवाधर्माचं करणारी सूनच हवी होती. आणि बाकी नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं. सगळे देव प्रसन्न झाले आणि तिचं त्याच्याबरोबरच लग्न झालं. लग्न होताच तिने आपला धार्मिक, देव देव करायचा गेटअप सोडून एकदम रोंमँटिक अवतार धारण केला. त्यामुळे नवरा एकदम गोंधळून गेला. तर नवर्‍याला समजवायला ती कोणतं गाणे म्हणेल?

क्लु : कोडं क्रमांक २७ फायरब्रिगेडवाल्याच्या प्रेयसीचे '`फोन'वरील गाणे ओळखताना
आलेल्या गाण्यांपैकी एका गाण्यात या गाण्यातलेच हिरो हिरॉइन आहेत. दोन्ही गाणी ऑल टाइम हिट.

कोडं ३३
मायबोलीच्या एका आयडीने सगळीकडे असंबंध पोस्टी टाकुन सगळ्यांना हैरान केले. शेवटी अ‍ॅडमिनने तिचा आयडी ब्लॉक केला. तीने डुआय घेऊन परत सगळ्या बाफ/बीबीवर जाऊन तोच उद्योग सुरू केला. अ‍ॅडमिनने पुन्हा तिचा दुसरा आयडी बंद केला. तिने परत डुआय घेतला. शेवटी अ‍ॅडमिनने कंटाळुन तिलाच विचारले, तु अजुन किती वेळा डु आय घेणार आहेस? यावर ती मायबोलीकरीन कोणतं गाणं म्हणेल?

क्लु: मराठी गाणे अपेक्षित Happy

राईट यू आर स्निग्धा! अटरिया हा मुंबईच्या एट्रीया मॉलचा अपभ्रंश!

कोडं ३२:
डॉक्टर मेघश्याम बादल कॉन्फरन्ससाठी मुंबईत येतात खरे पण त्यांना लक्षात येतं की त्यांनी टायच आणलेला नाहिये. घाईघाईने जवळच्याच एका मॉलमध्ये शिरतात. दारावरच्या सेक्युरिटीवाल्याशी त्यांची खडाजंगी उडते. शब्दाने शब्द वाढतो आणि दोघे हमरीतुमरीवर येतात. हा गोंधळ ऐकून मॉलचा मॅनेजर धावत येतो. एकंदरीत प्रकार ऐकल्यावर त्याला चूक डॉक्टर बादलांची आहे हे कळतं. तो त्यांना कडकपणे समजावणी देतो पण एका गाण्यातून. सांगा बरं ते गाणं.

उत्तरः
कारे कारे बादरा जा रे कारे बादरा
मेरी अटरिया ना शोर मचा

भरतला १० पैकी १० बटाटेवडे Happy

कोडं ३३
मायबोलीच्या एका आयडीने सगळीकडे असंबंध पोस्टी टाकुन सगळ्यांना हैरान केले. शेवटी अ‍ॅडमिनने तिचा आयडी ब्लॉक केला. तीने डुआय घेऊन परत सगळ्या बाफ/बीबीवर जाऊन तोच उद्योग सुरू केला. अ‍ॅडमिनने पुन्हा तिचा दुसरा आयडी बंद केला. तिने परत डुआय घेतला. शेवटी अ‍ॅडमिनने कंटाळुन तिलाच विचारले, तु अजुन किती वेळा डु आय घेणार आहेस? यावर ती मायबोलीकरीन कोणतं गाणं म्हणेल?

उत्तर:
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
लहरेन मी, बहरेन मी क्षितीजातूनी उगवेन मी Happy Happy

बटाटेवडे दिल्याबद्द्ल जिप्सी ला स्पेशल क्लु. माझे गाणे ओलखण्यासाठी
फायरब्रिगेड्->जलते हैं जिसके लिए=कोडं क्रमांक ३०.

>>भरतला १० पैकी १० बटाटेवडे

जिप्सी महादुष्ट प्राणी आहे. Happy भरत, १० बटाटेवडे खाणं प्रकृतीला अत्यंत हानीकारक आहे. त्यामुळे २ बटाटेवडे कृपया विपूतून पाठवावे ही विनंती Proud

स्वप्ना Proud
भरत, जीएस यांचे विपुबद्दल नियम पहावे Proud

कोडं ३० >>>>तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा??

कोडं ३० : एका तरुणीचं आपल्या परिसरात राहणार्‍या एका तरुणावर मन जडलं. याच्याशीच लग्न करायचं असं तिनं ठरवलं. मग त्याची इत्यंभूत माहिती काढली. तर तो आपल्या मातेच्या अर्ध्या वचनात आहे आणि माताश्री अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आहेत असं दिसलं. झालं. आपल्या नायिकेने बरोबर भावी सासूबाई जातील त्या त्या वेळी त्या त्या देवळात जायचा नेम लावला. सासुबाईंना पण असं देवाधर्माचं करणारी सूनच हवी होती. आणि बाकी नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं. सगळे देव प्रसन्न झाले आणि तिचं त्याच्याबरोबरच लग्न झालं. लग्न होताच तिने आपला धार्मिक, देव देव करायचा गेटअप सोडून एकदम रोंमँटिक अवतार धारण केला. त्यामुळे नवरा एकदम गोंधळून गेला. तर नवर्‍याला समजवायला ती कोणतं गाणे म्हणेल?

तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा तुम्ही देवता हो

बरोबर जिप्सी. ओळखल्याबद्दल चार बेक्ड समोसे.
कृपया पुढल्यावेळी डीप फ्राइड पदार्थ वगळल्यास मंडळ आभारी राहील:)

Pages