Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लीना ओ लीना दिल तुने छिना
लीना ओ लीना दिल तुने छिना ???
>> बरोबर वाटतय जिप्स्या. आणि अमीर ते बदलून रीना ओ रीना बोलेल.
२०६ अमीर खान एकदा जुना हिंदी
२०६ अमीर खान एकदा जुना हिंदी चित्रपट पहात होता. त्यात चंदावरकरांची लीना होती. तिच्यावर चित्रित झालेलं एक गाणं अमीरला भारीच आवडलं. दिवसभर तो तेच गुणगुणत राहिला. पण त्याच्याही नकळत गाण्याचे शब्द आणि चाल बदलले.
कोणती ही दोन गाणी.
लीना चंदावरकरचे गाणे : जाने क्यों लोग मोहब्बत किया करतें है..
चित्रपट : मेहबूब की मेहंदी
अमीर खानचे गाणे : जाने क्यों लोग प्यार करतें हैं
चित्रपट : दिल चाहता है
माझं कोडं ओळखा की.... कोडं
माझं कोडं ओळखा की....
कोडं २०७.
हे कदाचित कोणीतरी (किंवा मीच!) पोस्ट केलं असेल आधी. तसं असल्यास क्षमस्व. स्मित
'कुणाल, बंद कर बघू हा अगोचरपणा. तुझ्या आईला नाव सांगेन हं ती आल्यावर." सुनिलाबाई नातवावर ओरडल्या.
"काय ग आई, काय केलंय तुझ्या लाडक्या नातवाने?' सुलभाने, कुणालच्या आईने, आत येत आपल्या आईला विचारलं.
'आई, मी सांगतो, मी सांगतो" कुणाल खिदळत म्हणाला.
'काही नको, गप्प बैस. चहाटळ कुठला.' सुनिलाबाईनी दटावलं.
'अग पण तू सांगितलं नाहीस तर कळणार कसं मला?' सुनिलाबाईंचा गोरामोरा चेहेरा पाहून सुलभाला आता जास्तच उत्सुकता वाटत होती.
'मी सांगतो, सक्काळी सक्काळी तुझ्या चिरंजीवांनी गोल्डन इरामधलं एक गाणं ऐकलं आणि तेव्हापासून तुझ्या आईला माझ्यावरून ते गाणं म्हणून चिडवतोय." सुलभाच्या वडिलांनी हसत म्हटलं.
'कुठलं गाणं बाबा?'
सुलभाच्या वडिलांनी ते गाणं म्हटलं तेव्हा 'काहीतरीच तुमचं' म्हणत सुनिलाबाई आत गेल्या आणि सगळे हसायला लागले. ओळखा गाणं
ओ मेरी जोहरा जबी ?
ओ मेरी जोहरा जबी ?
सुनिला यावरून काही आहे का?
सुनिला यावरून काही आहे का?
माधव, भरत नाही.....क्लू -
माधव, भरत नाही.....क्लू - नातीगोती.
ना ना करते प्यार तुम्हीसे कर
ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे?
आईच्या वडिलांना नाना म्हणतात.
येस्स भरत कोडं २०७. हे
येस्स भरत
कोडं २०७.
हे कदाचित कोणीतरी (किंवा मीच!) पोस्ट केलं असेल आधी. तसं असल्यास क्षमस्व. स्मित
'कुणाल, बंद कर बघू हा अगोचरपणा. तुझ्या आईला नाव सांगेन हं ती आल्यावर." सुनिलाबाई नातवावर ओरडल्या.
"काय ग आई, काय केलंय तुझ्या लाडक्या नातवाने?' सुलभाने, कुणालच्या आईने, आत येत आपल्या आईला विचारलं.
'आई, मी सांगतो, मी सांगतो" कुणाल खिदळत म्हणाला.
'काही नको, गप्प बैस. चहाटळ कुठला.' सुनिलाबाईनी दटावलं.
'अग पण तू सांगितलं नाहीस तर कळणार कसं मला?' सुनिलाबाईंचा गोरामोरा चेहेरा पाहून सुलभाला आता जास्तच उत्सुकता वाटत होती.
'मी सांगतो, सक्काळी सक्काळी तुझ्या चिरंजीवांनी गोल्डन इरामधलं एक गाणं ऐकलं आणि तेव्हापासून तुझ्या आईला माझ्यावरून ते गाणं म्हणून चिडवतोय." सुलभाच्या वडिलांनी हसत म्हटलं.
'कुठलं गाणं बाबा?'
सुलभाच्या वडिलांनी ते गाणं म्हटलं तेव्हा 'काहीतरीच तुमचं' म्हणत सुनिलाबाई आत गेल्या आणि सगळे हसायला लागले. ओळखा गाणं
उत्तरः
ना ना करते प्यार तुम्हीसे कर बैठे (नाना = आईचे वडिल)
असाच भिरकावलेला दगड चक्क
असाच भिरकावलेला दगड चक्क लक्ष्यावर लागला
या बाफाचा भाग ३ सुरू करायला
या बाफाचा भाग ३ सुरू करायला हवा. उघडत नाही कधीकधी लौकर.
कोडं २०८: "खिलाडियोंका
कोडं २०८:
"खिलाडियोंका खिलाडी" च्या शूटिंग दरम्यान अक्षय कुमार आणि अंडरटेकर ह्यांची फाईट सुरु होती. अक्षयने अंडरटेकरला एक जबरदस्त ठोशा मारून जमिनीवर पाडलं. अंडरटेकर बिचारा दमून गेला होता. अक्षयने त्याला उठायची खूण केली. तरी तो उठेना. मग अक्षयने त्याला दोन्ही हातांनी आपल्या डोक्यावर उचललं. त्याला वाटलं की आता अंडरटेकर घाबरून दयेची भीक मागेल. तर अंडरटेकरने चक्क गोल्डन इरातल्या एका गाण्याची ओळ म्हटली. आणि अहो आश्चर्यम! त्या गाण्याची दुसरी ओळ तिथे असलेल्या रविना टंडनने अक्षयकडे बघत म्हटली. ओळखा गाणं.
जमीं से हमें आसमां पे उठा के
जमीं से हमें आसमां पे उठा के गिरा तो न दोगे
अगर हम ये पूछे के दिलमें बसाके भुला तो न दोगे
भरत कोडं २०८: "खिलाडियोंका
भरत

स्वप्ना आणि भरतकरता एकदा
स्वप्ना आणि भरतकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
मस्त होते कोडे आणि उत्तर.
स्वप्ना, मस्त घातलं होतस
स्वप्ना, मस्त घातलं होतस कोडं.
सर्व यशस्वी कलाकारांचे मनापासून अभिनंदन!
इतकी कोडी झाली तरी दरवेळी नव्याने कल्पनाशक्ती लढवून मस्त कोडी बनवणारे आणि ती ओळखून दाखवणारे या सर्वांना सलाम! चालू द्या, चालू द्या ......
तिसरा भाग उघडला आहे. http://www.maayboli.com/node/29961
(ही १९९५ वी पोस्ट आहे .. लोक्स २००० पूर्ण करा आणि मग ३र्या भागाकडे वळा.)
स्वप्ना, भरत __/\__ सह्हीच
स्वप्ना, भरत __/\__
सह्हीच कोडं
धन्स माधव, मामी आणि जिप्सी
धन्स माधव, मामी आणि जिप्सी
ह्या बीबीवर खरंच खूप मजा आली. कोडी सोडवायला फारशी जमली नाहीत पण कोडी घालताना जाम धमाल आली. धन्यवाद मामी. माझ्याकडून ह्या मावळत्या बीबीला सलाम.
२०९: कलीपूरला भूकंप होतो.
२०९: कलीपूरला भूकंप होतो. राज्याचे मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे पाहणी-पथक पाठवतात कलीपूरला. पथक दिवसभर पहाणी करते. सुदैवाने फारशी पडझड झालेली नसते. रात्री पथक प्रमुख श्रीकांत हेड-ऑफीसला फोन करून ही माहिती देतो पण एका गाण्यातूनच. कोणते ते गाणे ?
माधव - यहॉ SSS सब ठीक
माधव - यहॉ SSS सब ठीक है......
धन्यवाद मंडळी. आता या
धन्यवाद मंडळी. आता या धाग्याला बाय-बाय!
ही २०००वी पोस्ट होती.
स्निग्धा असं खरच काही गाणं
स्निग्धा असं खरच काही गाणं आहे का?
असले तरी ते उत्तर नाही.
उत्तर नाही तरी हरकत नाही, पण
उत्तर नाही तरी हरकत नाही, पण असे गाणे आहे, विविधभारती वर नवीन गाणी लागतात त्यात बरेचदा ऐकल आहे.
Pages