..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग २)

Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अ‍ॅनेटचा उल्लेख आल्यावर "हॅलो इन्स्पेक्टर" या मराठी मालिकेचे शिर्षक गीतच पटकन आठवते (तीनेच गायलंय).

हे नव्हतं माहित मला. धन्स जिप्सी

>>येस्स्स स्वप्ना, हे गाणं मलाही आवडतं.
अरे सह्ही! मी ३-४ वेळा सलग ऐकू शकते हे गाणं इतकं आवडतं मला.

आरेच्या......आता स्वप्नाची मर्सिडिझ "प्रभात", 'शालिनी' आणि 'जयप्रभा" स्टुडिओत शिरली की !!

तुझा संजूबाबा गाणे मराठी म्हणेल की हिंदी ते तरी आम्हा "पामरां"ना सांग !!

>>तुझा संजूबाबा

माझा संजूबाबा? ईईईई! त्या ध्यानाला पाहिलं आहेस का तू प्रतीक? पहा ७:३० ला टीव्ही लावून. जनता मर्‍हाटी असली तरी गाणं हिंदी आहे.

कोडे क्रमांक २४:
अण्णा हजारे, बाबा रामदेव आदी प्रश्नावरून पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग अतिशय चिंतातुर झाले आहेत. संध्या़काळी अगदी पडेल चेहर्‍यानेच ते घरी परततात. त्यांची वाढती काळजी पाहून सौ.सिंग गाणे म्हणतात :

"बदले बदले मेरे सरकार नज़र आते हैं
घर की बरबादी के आसार नज़र आते हैं"....."

~ "चौदहवी का चाँद..." लता....आणि पडद्यावर वहिदा रेहमान....व्वा !!!

गॉश्श.....मी टीव्हीकडे मुळातच कमी जातो...त्यातूनही मराठी सीरिअल्स ??? डेव्हिल टेक देम.

त्यामुळेच मी स्वतःला 'पामरा'त गणले होते.

कोडं २३:
ऐन दिवाळीच्या दिवशी मुघलांच्या राजधानीतले वीजटंचाईमुळे दिवे गेले त्यामुळे प्रजा दु:खी होती. पण तानसेनच्या बायकोला काही चिंता नव्हती. का बरं?

>>>>> दिल मे किसी के प्यार का जलता हुआ दिया .......

आर्या तेच गाणे.

आता माझ्या डोक्यात एक कट शिजायला लागलाय. कोडे बघून आपणच एक गाणे रचायचे. आणि चित्रपट, नायक, नायिका पण दडपून देऊन टाकायच्या ! जास्तीत जास्त काय, लोक गुगलून बघतील. मग म्हणायचे गुगल म्हणज काही सर्वज्ञ नै कै !!

कोडं २३:
ऐन दिवाळीच्या दिवशी मुघलांच्या राजधानीतले वीजटंचाईमुळे दिवे गेले त्यामुळे प्रजा दु:खी होती. पण तानसेनच्या बायकोला काही चिंता नव्हती. का बरं?

उत्तरः
क्या जानू सजन होती है क्या गमकी शाम
जल उठे सौ दिये जब लिया तेरा नाम

कोडे क्रमांक २५:
झी मराठीवरची 'भाग्यलक्ष्मी' ही सिरियल पहाणार्‍यांसाठी हा प्लॉट परिचयाचा आहे. बाकी पामरांसाठी थोडक्यात स्टोरी अशी: संजय आणि काशीचं एकमेकांवर भारी प्रेम. घरी बाळ येणार म्हणून दोघेही खूष. पण दैवाला बघवलं नाही. एका कार अपघातात काशी मरण पावली. त्या धक्क्यातून संजय सावरतो न सावरतो तोच एक अनोळखी बाई एके दिवशी त्याच्यासमोर उभी राहिली. 'मी तुमची काशी' तिने असं म्हटलं मात्र संजयने एक किंकाळी मारली आणि 'तू काशी नाहीस' असं वेड्यासारखं ओरडायला लागला. भाऊकाकां आणि गोदात्याने काय झालं म्हणून विचारल्यावर तो काय म्हणाला असेल?

उत्तरः
सामने ये कौन आया दिलमे हुई हलचल
देखके बस एकही झलक हो गये हम पागल

कोडं नं २६.

नेहमी हसतमुख असणारे श्री. तारे आज विशेष खुशीत होते. आज त्यांची पत्नी करवा चौथ करत होती. संध्याकाळी पत्नीने आकाशाकडे पाहिले तर सारे आकाश ढगांनी भरून गेले होते. काळजी वाटून तिने तिच्या पंजाबी आणि त्यामुळे क.चौ. या विषयावर अधिकार असलेल्या मैत्रिणीला विचारले. तर तिनं सागितलं की, जर चंद्र दिसला नाही तर चांदण्या बघूनही व्रत सोडता येतं. तर श्रीमती तारे तिला मराठी बाण्याने काय उत्तर देतील?

कोडं क्र. २६ :
चंद्रिका ही जणू ......
हे गाणं आहे का ??
कारण या गाण्यात एका ठिकाणी
"नभमंडळ मेघांनी वेढले" अशा स्वरूपाचे शब्द आहेत असं आठवतंय

२७ एक तरुणी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍याच्या प्रेमात पडली. त्यालाही ती आवडली. पण तिने भेटायला बोलवल्यावर तो काही यायचा नाही. डेटिंग बिटींग काही कळायचंच नाही त्याला. तर अशा वेळी ती त्याला फोन करून कोणतं गाणं म्हणेल?

मामी, २६चं उत्तरः

घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे.

२७:
आओ ना गले लगालो ना, लगी बुझा दो ना ओ साजना...

करेक्ट श्रध्दा, अंजली_१२.

कोडं नं २६.
नेहमी हसतमुख असणारे श्री. तारे आज विशेष खुशीत होते. आज त्यांची पत्नी करवा चौथ करत होती. संध्याकाळी पत्नीने आकाशाकडे पाहिले तर सारे आकाश ढगांनी भरून गेले होते. काळजी वाटून तिने तिच्या पंजाबी आणि त्यामुळे क.चौ. या विषयावर अधिकार असलेल्या मैत्रिणीला विचारले. तर तिनं सागितलं की, जर चंद्र दिसला नाही तर चांदण्या बघूनही व्रत सोडता येतं. तर श्रीमती तारे तिला मराठी बाण्याने काय उत्तर देतील?

उत्तर :

घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे, मी पाहू कशाला नभाकडे......

भरत, 'टिप टिप बरसा पानी...' का मग? Proud त्यात 'आग लगी दिल मे तो दिलको तेरी याद आई' अशा अग्निशमन दलातल्या कर्मचार्‍याला सूट होणार्‍या ओळी आहेत.

भरत, कोडं २७

कोशिश कर के देख ले, दर्या सारे, नदियां सारी
दिलकी लगी नही बुझती, बुझती है हर चिंगारी
सोला बरस की बाली उमर को सलाम .........

भरत कोडे क्र २७... आग लग रही है बुझाओ.. आओ पास आओ... असे काहीतरी गाणे आहे .. कु. ममता कुलकर्णी होती त्या गाण्यात.. Happy हायला सकाळी सकाळी ममता ची आठवण.. थॅन्क्यु भरत.. Wink

Pages