बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावभाजी म्हणजे पाव आयत्यावेळि भाजून द्यावे लागतील.
पुलिहोरा किंवा कोकोनट राइस, दहीवडे , सामोसा चाट किंवा रगडा पॅटीस असे ठेवता येईल.
छोट्यांसाठी पीनटबटर , जॅम, चीझ सॅंडविचेस ठेवता येईल . किंवा पिझ्झा.

रगडा पॅटीस मागच्या वर्षी केल होत.
छोट्यांसाठी बाहेरुन चिझ पिझ्झा मागवायच्या विचारात आहे.
पावभाजी ,रगडा पॅटीस सारखे अजुन काही पदार्थ असतिल सांगा.
वाढदिवसाला अजुन ३ आठवडे वेळ आहे. त्यामुळे व्यवस्थीत विचार करुन ठरवता येईल.

मिसळ बनव Happy
सगळ आधी करुन ठेवता येइल. फक्त कांदा टॉमॅटो कापायचा आणि उसळ्-कट गरम करायचा... ऑल रेडी. सगळ टेबलावर मांडायच आणि ज्याला हव त्या प्रमाणात जो तो आपली आपली मिसळ बनवुन घेइल. सोबत पाव असतिलच.

कच्छी दाबेली हा पण एक ऑप्शन आहे. हे तर मुलांना पण चालेल Happy

छ्या, इथे नुसत लिहुनच तोंडाला पाणी सुटलय... या विकांताला केलाच पाहिजे या पैकी एक बेत Wink

देशी, अमेरीकेत असाल तर ओव्हन मधे भाजता येतात. एकावेळी १६. ओव्हन ३५०फॅ ला ब्रॉईलवर ठेवायचा. पावावर बटर स्प्रेने बटर लावुन घ्यायचं. २ मि १६ पाव होतात. मस्त क्रिस्पि होतात. मी तर तव्यावर करणं सोडुनच दिलय.
हे पाव करताना पुलाव (सोबत केला असल्यास) आणि भाजी खालच्या रॅकवर ठेवता येतिल. पाव सोबत भाजी पण गरम Happy

कॉस्टको मधे फलाफल कोणत्या सेक्शन मधे आणि काय नावाने मिळतात?

पी एफ चांग मधे जे टोफु वापरतात ( सही लागतात Happy ) त्याची रेसिपी माहिती आहे का कोणाला? ( मी बरेच वेळा ओव्हन मधे बेक करुन, ब्रॉईल करुन सगळे करुन पाहिले पण तसे होत नाहीत)

पे वे मधे पण तसलेच टोफु असतात दिश मधे....

व्हेज स्टार्टर सुचवाल का कोणी? कॉर्न/व्हेज पॅटिस, सुरळीच्या वड्या, मूगवडे, भजी खूप वेळा झालेयत.
पनीर जाल्फ्रेझी, मिरची का सालन या २ भाज्या आहेत, त्यामुळे पनीर चा स्टार्टर नकोय. गुलाब्जाम, करी-राइस असा बाकीचा मेनु अहे. लवकर होईल अस असेल तर छानच...१५ लोकन्सठी हवाय.
आणि हो, इडली, पाटवड्या वगैरे पण झालय बर्याच वेळा....
आम्ही बाकरवडी चाट चा विचार करतोय्...प्न इथे एन जे (जर्सी सिटी) मधे मिनि बाकरवड्या छान कुठे मिळतात माहिती आहे का कोणाला? आमचा १-२ वेळचा अनुभव चांगल नव्हता.

सोलकढी बरोबर भाताचा काय प्रकार करता येईल? हिरव्या मुगाची खिचडी असा आधी विचार होता पण मूग भिजवायलाच विसरले Sad
आज संध्याकाळीच करायचा आहे. बाकी भाज्यांमध्ये भरली वांगी आणि मेथीचं पिठलं आहे.

थोडं उशीरा सांगतेय पण सोलकढी बरोबर गोळा भात खूप छान लागतो. चणा डाळ भिजवून निथळून आलं,लसूण,मिरची सह मिक्सर मधून वाटायची. त्यात चवीला मीठ, तिखट,हळद,जिरेपूड घालायची आणी भात शिजत आला की त्यात थोडा खळगा करून हे गोळे शिजवायचे. भाता वर हा गोळा फोडून घ्यायचा. वरून चुरचुरीत मोहोरी हिंगाची फोडणी आणी जोडीला सोलकढी. खूप छान लागतो हा प्रकार.

दिवाळीनिमीत्त काही शेजारी पुढच्या रवीवारी संध्याकाळी फराळासाठी बोलावले आहेत. सगळे अमेरिकन आहेत, साधारण १५ मोठी माणसे , ७ लहान मुले. त्यांना आवडेल आणि करायला सोपा पडेल असा मेनु सुचवा प्लीज.
सामोसे, मॅंगो लस्सी..अजून काय किंवा वेगळा पण चालेल.

मीपुणेकर
फराळासाठी येणार आहेत म्हणजे जेवण नाही ना, जेवण नसेल तर मग भेळ, इडली सांबर, ढोकळा, (पाणीपुरीच्या पुर्‍या विकत मिळत असतील तर) पाणीपुरी, समोसा चाट, शेव पुरी दही पुरी, कच्छी दाबेली, पाव भाजी यातला हवा तो एक पदार्थ करता येईल.

कमी तिखट हिरवी चटणी करुन त्याचे सॅन्डविचचेस, समोसे , कचोरी, केळ्याचे चिप्स - देशी दुकानातले, चिकन कबाब, चिली पनीर, लहान मुलांना पीनट बटर सॅंडविचेस, इडली , मेदुवडे, भजी, कटलेट / पॅटिस असे प्रकार करता येतील.

महाराष्ट्रीयन बेत करायचा असेल तर बटाटेवडे, साबुदाणा खिचडी/ स्प्राऊट भेळ/ आंब्याची डाळ, खोबरा वडी/ साजूक तुपातील ड्रायफ्रूट्स वगैरे घातलेला शिरा/ खीर/ हलवा असा मेनू ठेवता येईल. पेय म्हणून लस्सी/ मठ्ठा/ मसाला ताक/ मिल्क शेक/ मसाला दूध किंवा केशरी दूध किंवा अजून कोणती सरबते/ ज्यूस इत्यादी ठेवता येईल. मुखवासही वेगवेगळ्या प्रकारचे ठेवता येतील.

रुनी,मेधा,अकु धन्यवाद!
समोसे, रवा ईडली/ढोकळा, मँगो लस्सी/कुल्फी ठरवते मग
अकु, मराठी मेनु म्हणजे आपला दिवाळी फराळ आहेच Happy

गोड केशरी रंगाचा शिरा वर एकेक काजू लावून मूद पाडायच्या.
पायसम किंवा खीर.
फ्रूट सलाड केव्हाही आवड्ते

डिश द्यायची असेल तर इड्ली वडा सांबार, केशरी शिरा असे इंडिविज्युअल प्लेट मध्ये मस्त दिसेल. जमल्यास केळीच्या पानांना गोल कापून त्यावर सर्व केले तर अगदी चेन्नै इस्पेशल.

स्वीट कॉर्न सूप, बुंदी रायता, गुलाबजाम (पाकातले), पोळ्या, भाजणीचे वडे, तवा पुलाव आणि नंतर आईस्क्रीम हा बेत कसा वाटतोय? याला साजेशी भाजी सुचवा प्लीज. पंजाबी / ग्रेव्ही असलेली कशी वाटेल? ८ जणांसाठी. खूप पिट्ट्या पडायला नकोय तयारीतच. Happy

Pages