.

लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

Submit to kanokani.com

करडई सारखी दिसते आहे. छान आहे रेसेपी.

अंजली करडीची भाजी मस्त मऊ, आणि तेलकट दिसते. भाजी केल्यावर मिळून येते तसे चंदनबटव्याचे होत नाही.

मिनोती , मी रविवारी गेले होते फार्मस मार्केट मला नाही मिळाल्या काही अरेरे किंवा मला ओळखता नाही आल्या

मस्तच दिसतेय कृती. मेथीची किंवा पालकाची करुन पहाणार

मेथी ,पालकाची अशी भाजी खाल्ली आहे. कोरियन दुकानांत मिळते का पहायला हवी ही भाजी.

आमच्याकडे असे पालेभाज्यांचे आळण करतात, त्यात ताक पण असते..

छान आहे ही पाकृ, करुन बघायला हवी! आमच्याकडे चंदनबटव्याची राजगिरा, माठासारखी फोडणीत कांदा, ठेचलेला लसूण (तोही नसतो कधीकधी), हिरवी मिरची (फोडणीच्या वेळी वर टांगून डोळा मारा) घालून करतात भाजी. आई सांगते ही भाजी पथ्याची असते, म्हणून सपकच खायची फिदीफिदी आता तिला सांगते, पथ्याची भाजीपण जरा चविष्ट करुन खाता येते! मुळात चंदनबटव्याला स्वतःची अशी वेगळी चव असते. त्यामुळे ती भाजी साधी जरी केली तरी रुचकर लागते! भाकरीबरोबर तर अहाहा!

अरुंधती, भाजी पथ्याची म्हणजे नक्की काय?

मिनोती, कृती छान आहे.

बी, चंदनबटवा शीत असतो ना गुणधर्माने, मग जेव्हा त्याच्या ह्या गुणधर्मासाठी खास भाजी केली जाते तेव्हा त्या भाजीत उष्णता वाढवणारे लसूण, मिरची वगैरे पदार्थ माझ्या आईच्या मते बाद ठरतात! कारण त्यामुळे त्या भाजीचा गुणधर्म बदलतो, मूळ उद्देशाला फाटा असे तिचे मत! पण तरी ती कधी कधी घालते मिरची त्यात लोकाग्रहास्तव! फिदीफिदी

मिनोती पाकृ छानच.
एका पानाचा वेगळा फोटो टाकशिलका परत कधी मिळेल तेंव्हा म्हणजे भाजी नीट ओळखता येईल.

आई सांगते चंदनबटव्याची ही भाजी पथ्याची असते,
अरुंधती, "पथ्याची" म्हणजे नेमकी काय असते ते क्रुपया सांगा ...
एका पानाचा वेगळा फोटो टाकशिलका परत कधी मिळेल तेंव्हा म्हणजे भाजी नीट ओळखता येईल.
अगदी जमीनीला लागुन वाढते तीच भाजी का ही ?
साधारण ४-५ पाने असतात ...

कांद्याच्या पातीचे पिठले असेच करतात ना ? त्यात गोडा मसाला नसतो.

मिनोती. माझ्या आईची पण हीच सेम कृती.

माझी आवडती पालेभाजी. आता पाऊस सुरू झाला की आठवडा बाजारात कोल्हापुरकडून यायला लागते ही भाजी.

http://en.wikipedia.org/wiki/File:6H-Lambs-quarter.jpg

जागू इथे बघ ग भाजी अशी दिसते.
सिडरेला. मला कल्पना नाही ग कशी करतात याची.

मिनोती,
ती भाजी मला वांगी सारखी दिसली !!

मिनोती धन्स मी नाही पाहीली कधी ही भाजी.
मलाही ति भाजी वांग्याच्या रोपासारखी दिसतेय.

अरेच्च्या !!! शीर्षक वाचून मला वाटले की ग्रेसचा एखादा नवा कवितासंग्रह आला आहे की काय स्मित
हरकत नाही, एका भाजीचे नाव कळले स्मित

जीएस हसून हसून गडबडा लोळण