बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालकाच्या पराठ्या बरोबर टोमॅटो सूप आणी सोलापुरी स्टाईलने केलेली दाण्याची चटणी + दही किंवा तेल, कांदा , कोथिंबीर +दाणा चटणी असं काँबो छान लागतं. खारातली मिरची पण चांगली लागेल दह्यात कालवून.
एक वेगळा प्रकार करून पहावासा वाटला तर.. पालकाच्या पराठ्याच्या कणकेत आलू पराठ्याचं स्टफींग घालून आलू पालक पराठा. वरच्या पैकी एखादं तोंडीलावणं.टोमॅटो सार,खडा मसाला आणी भाज्या घालून केलेला पुलाव, स्टार्टर साठी मुगाचे पकोडे,गोडाला गाजर हलवा.पालकाच्या पराठ्यामुळे इतर भाजीची गरज नाही. सावनीला अनुमोदन.

धन्स गं मैत्रिणींनो Happy
फायनल बेत असा - पालक पराठे
टोमॅटो सार
गाजराची कोशिंबीर
दही घालून सोलापुरी चटणी
मसाला पापड + मूग भजी
भाज्या घालून पुलाव
ड्रायफ्रुट्स घालून फिरनी

अगं रिमा, सोलापुरी स्टाईलने दाण्याची कोरडी चटणी करायची नि मग ती दह्यात मिसळायची. कोणत्याही पराठ्यासोबत मस्त लागते अशी दह्यात मिसळलेली चटणी. Happy

रिमा सोलापूरी चटणी म्हणजे दाण्याची चटणी पण दाणे भाजताना अख्या सुक्या लाल मिरच्याही छान भाजून घ्यायच्या. आणि दाण्याची टरफलं काढून मग हवा असेल तर लसूण नाहितर जिरे, हिंग घालून खलबत्त्यात कुटायची ..मिक्सरम्धे केलीस तर फार बारीक होऊ द्यायचे नाही.आताचा मोसम खूप सही आहे बघ ह्या चटणीसाठी Happy नाहितर माझ्याकडे कधीही ये मी देइन तुला Happy

माझ्याकडे ही चट्णी आली होती . मी परवा मैद्याच्या पोळीत घातली. व मस्त भाजले चांगला चट्णी पराठा झाला. एकाच पोळीचे पीठ उरले होते. माझी थोडक्यात मजा झाली. सोलापूर दाणे चटणी रॉक्स. दही घालून तर फारच.

मैत्रिणींनो , मी हळदी कुंकु कार्यक्रमासाठी १५ बायकांना बोलावलय, संध्याकाळची (५.३०) वेळ आहे, तर काय बेत करावा. खुप पसारा न मांडता, एक हाती मॅनेज होईल असे काहितरी सुचवा प्लीज. सोबत मसाला दुध नक्की आहे.

मटकी/चना/बरबटी(रेड चोरी) ह्याची गरम उसळ बाऊलमधे त्यावर फरसाण शेव घालुन, बाजुला लिंबु/कांदा ऐच्छिक.

चंचल, मस्त ड्रायफ्रूट्स - केशर वगैरे घालून गोडाचा सत्यनारायण स्टाईल शिरा - त्याची छान मूद पाडून सर्व्ह करावा. त्यासोबत तिखटामध्ये समोसा/ टिक्की/ वडा/ ढोकळा / कचोरी असा काहीतरी प्रकार ठेवावा. सोबत तिळगूळ आणि मसाला दूध तर आहेच!

@ प्रीती , अरुंधती
तत्पर प्रतीसादाबद्दल धन्स.
अगं , प्रसादाचा शिरा मला प्रचंड आवडतो पण गणपतीत केला होता, आणि ऊसळ उद्या एका मैत्रिणीकडे ठेवलीये, सो अजुन काहीतरी काय करावे?

चंचल उडीद वडे - चटणी - सॉस हाही कमी वेळात होणारा झटपट पर्याय आहे. किंवा कटलेट्स. आलू टिक्कीही करता येईल.

पाव-भाजी. आधी करून ठेवता येते. पोटभर होते. तळंण करत बसावं लागत नाही.>>>>>>>>>>>< हो,आणी शिळी पावभाजी जास्त चविष्ट लागते. Wink पाव भाजताना पण कुकरमध्ये एकावेळी जास्त पाव १-२ मिनिटात भाजले जातात.

चंचल, हो, तेच वडे. आधी तळून ठेवायचे. आयत्या वेळेला तव्यावर / मावेमध्ये गरम करायचे.

मस्त काजू, डाळिंबाचे दाणे वगैरे घालून अमिरी खमण, त्याबरोबर समोसा/कचोरी/अळूवडी वगैरे देता येईल.

हो चालेल... ढोकळा करून तो चुरून त्यात खमंग फोडणी घालून, चवीप्रमाणे मीठ, साखर, लिंबाचा रस आणि मग डाळिंबाचे दाणे, काजूचे तुकडे घालून शेव पेरून देता येईल.

पाव भाजताना पण कुकरमध्ये एकावेळी जास्त पाव १-२ मिनिटात भाजले जातात.>>>>

कुकरमध्ये पाव कसे भाजतात ... जरा माहीती देणार का ?
आमच्याकडे नेहमी तव्यावर भाजतो, पण खुप वेळ जातो...

मंगेश, सगळे पाव आधी तव्यावर भाजून ठेवायचे. आयत्यावेळी देताना पाव कूकरमध्ये एका डब्यात ठेवून त्यात पाणी पडणार नाही अशा बेताने झाकण ठेवून कूकरची शिटी काढून सात-आठ मिनिटं वाफ येऊ द्यायची. आणि गरम गरम पाव वाढायचे.

Pages