बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईच्या दोन मैत्रिणी -तिघी ७५ च्या पुढे वय--आणि त्यांची फॅमिली.. यांच्यासाठी वसंत-पंचमी ला केलेला मेनु--
रबडी--घरी दुध आटवुन केली,पुरी,भरली भेंडी.फ्लोवर-बटाटा-मटार कोरडी भाजी,सालीची मुग-डाळ भिजवुन वाटुन त्यात खडबडीत वाटलेले धणे-जिरे,बडीशोप घालुन तळलेले मंगोडे.ओल्या लसुण पातीची चटणी.ढोकळा.टोमॅटॉ -सुप्,शिमला-मिरची,मटार्,गाजर घालुन मसालेभात..

सुलेखाताई, तुम्ही एकट्याने केलेत एवढे? ९ प्रकार?
लोकं एवढे प्रकार करतात एका वेळी?आमच्या मातोश्री करतात(करायच्या आधी तब्येत ठिक असताना पण कश्या करायच्या हे जाणवून घेतले नाही) पण अस्मादिक कधीही करु शकतच नाही हि खात्री आहे.

हाय..
आमच्याकडे ३५ जण येणार आहेत.. एका मुंज मुलाच केळवण आहे तसेच एकाच लग्नासाठी केळवण आहे.
५ पक्कवानच जेवण करणार आहोत. मेनु खालील प्रकारे आहे
१.पनिरटिक्का मसाला
२.फुलके
३. वरण-भात, अळुची पातळ भाजी
४. का.को., चटणी
५. बटाटा भाजी
६. गुलाबजाम
७.आम्रखंड
८.जिलेबी
तर मला आता २ डेसर्ट हवी आहेत लहान मुलासाठी.. कारण बाकीचे पदार्थ .. मोठ्यांसाठी आहेत. पण लहान मुलासाठी काहीतरी वेगळ म्हणुन हव आहे.जे मी ३५ जणाना देवु शकेन..पण काहीस गंमतीच अस..

चिरलेल्या फळांवर जेलीचे तुकडे, आईसक्रिम किंवा कस्टर्ड वगैरे घालून सजवून देता येईल.
वॅनिला आईसक्रिम विथ चॉकलेट सॉस हे तर सगळ्या लहान मुलांना भयंकर आवडतं.
गरम गाजरहलव्यावर थंडगार कुल्फी हे पण एकदम हिट पार्टी डेझर्ट आहे.

उद्या संध्याकाळसाठी पुरणपोळी करायची आहे. विचार असा आहे की आजच रात्री करून ठेवाव्यात कारण उद्या भरल्या वांग्याची भाजी, काकडी कोशिंबीर, चित्रान्न, साधी पोळी आणि जमल्यास भेंडीची कोरडी भाजी पण करणार आहे. त्यामुळे पु.पो उद्यावर नको आणि समजा आज नाही जमल्या तर आयत्यावेळी मेनू तरी बदलता येईल Happy Happy (दलियाची खीर एक ऑप्शन म्हणून कसे वाटते वरच्या गोष्टींबरोबर) आता मला प्रश्न असा पडलाय की आज पुरण शिजवले तर त्याचा कट फ्रिजमध्ये टिकेल का? कारण कटाची आमटी हवीच आहे. ती आज करून ठेवली तर शिळे खायला घातल्या सारखे नको Happy
अजून एक, आशिर्वाद च्या पिठाच्या पोळ्या चांगल्या मऊ होतात ना?
सुगरणींनो, पटकन मदत करा प्लिज. अजून बरीच कामे बाकी आहेत.

आशिर्वाद च्या पिठाच्या पोळ्या चांगल्या मऊ होतात ना?>>> हो.
आज पुरण शिजवले तर त्याचा कट फ्रिजमध्ये टिकेल का? >>> अगदी व्यवस्थित. आज पुरण करून उद्या पोळ्या करता येतील, पण बाकीच्या सगळ्या पदार्थांबरोबर पुरण पोळीपण कराताना गडबड होईल.

अजून एक, आशिर्वाद च्या पिठाच्या पोळ्या चांगल्या मऊ होतात ना?
>>>>>>>< हो, खास पुरणपोळीसाठी म्हणुन जास्त तेल टाक आणि जरा सैल मळ पीठ. मस्त होतात पोळ्या.

धन्स अंजली आणि भान. खूपच लवकर उत्तर दिलंत Happy
रच्याकने, तुम्ही मैदा घालता का थोडा पीठ मळताना? आणि जर पुरणयंत्र नसेल तर मिक्सरवर पण पुरण चांगले वाटले जाईल ना?

मेधा, पीहू धन्यवाद. हा व्हिडीओ मस्तच आहे की. सुधा कुलकर्णी आहेत बहुतेक. मी पण असेच पुरण शिजवून बघते. चांगलं मऊ पुरण होईल असं वाटतंय. थॅन्क्स हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल. Happy

मी आजवर एकदाही पुरण मिक्सर/पुरणयंत्रातून काढलं नाहिये. पण खूप छान मऊ झालंय. मी डाळीच्या दुप्पट पाणी घालून (जास्त पाणी चालतं) मोठया आंचेवर १ शिटी करते. मग सर्वांत कमी आंचेवर ४५ मिनिटं ठेवते. कूकर उघडल्यावर १-१ प्रमाणात किसलेला गूळ. गरम असतानाच गूळ्-डाळ एकत्र करून शिजवते परत. २ वाट्या डाळीला २ वाट्या तूप घातलं तर मस्त खमंग होतं पुरण. ढवळताना डावाने घोटलं तरी एकजीव होतं.

कालच्या टीप्स आणी व्हिडीओप्रमाणे पुरण अगदी मऊसुत मस्त झालंय आणि पोळ्यापण. खूप खूप धन्यवाद सुगरणींनो Happy

मला कटाची आमटी नीट जमत नाही Sad
एकदा प्रयत्न केला, पण नाही जमली. आता आईकडून/ साबांकडून शिकेन. माझ्या माहेरी ही आमटी जवळजवळ नाहीच करत! पुपो बरोबर तूप आणि दूध असतं. सासरीही असतं.
खरंतर त्यामुळे आमटीची गरजही नाही पडत!
इथे मी एका वेळी फक्त २ वाट्या डाळीचं पुरण करते. लहान कूकरमुळे जास्त पाणी घालता येत नाही. मग जेमतेम कट निघतो डाळीचा.

mala 15 jana sathi swaypak karaycha ahe....stater...main menu and sweet...swayapak karayla me ektich ahe ...tymule kami velat bharpur honare option have ahe

mala koni suggestion deil ka kahi...
me tharavlela menu
puri,batatychi bhaji,masale bhat,koshimbir,basoondi/shrikhand
yat kahi badal karu ka?

पूनम, सर्वात आधी बेस्ट लक. टोमॅटो सार पण कर जमल्यास. मसालेभात बरोबर चांगले जाते. मुगाची भजी किंवा सुरळी वड्या बास आहेत की स्टार्टर म्हणून पण एकटीने म्हणजे खूप काम पडेल. काहीतरी एक विकत आणावे. ( दीपचे सामोसे? इथे फेवरिट आहेत Happy )

पूनम, चांगलाय मेनू. अश्विनीमामींना अनुमोदन. कोशिंबिरीऐवजी बुंदी रायता ठेवलेस तर हव्या त्या प्रमाणात कमी/ जास्त करता येते व झटपट होते. स्वीट आदल्या दिवशी करून फ्रीजमध्ये ठेवता येईल. आयत्या वेळी करायचे पदार्थ कमीत कमी ठेव. बेस्ट लक! Happy

me sobat ajun ekhadi bhaji thavacha vichar karat hote.....koni suggestion deil ka?

पूनम, बेस्ट लक! Happy
माझं सजेशन : ओल्या खोबर्‍याचं वाटण लावून चवळी/मटार उसळ. (कांदा-लसूण चालणार असेल तर सुकं खोबरं, कांदा, लसूण आणि गरम मसाला. नाहीतर ओलं खोबरं, काळा मसाला, मिरच्या, थोडं जिरं, धने एकत्र वाटून.)

पुढच्या महिन्यात माझ्याकडे ३०/३५ जण येणार आहेत जेवायला. पैकी बरेच जण ४० च्या पुढ्चे, डायबेटिक आहेत.
४/५ १० ते १२ वर्षे वयोगटातील आहेत.आणि विशेष म्हणजे मेजॉरिटी नॉर्थ इंडियन्स आहेत. पोटभर पण काहितरी वेगळे बनवायचे आहे.केटररला ऑर्डर द्यावी असा विचार सुरु आहे (भारतात ही ऐंश असते नाही) . प्लीज मेनू सुचवा म्हणजे केटररला सांगायला सोपे जाईल .तसेच मुलाच्या वाढदिवसाला साधारण ४० जणांसाठी स्नॅक्स ठेवायचे आहे. सध्या व्हेज पफ, आईस्क्रीम, केक असा बेत आहे .
अजून आयडियाज सुचवा प्लीज

साध्या रोट्या (त्या पण कणकेच्या, मैद्याच्या नाहीत ) आलू रस्सा भाजी, जमल्यास एखादी पालेभाजी, बूंदी रायता, गोडासाठी फ्रूट सलाद (त्यात साखर नाही, नूसत्या फळांच्या फोडी. कलिंगड, पपई वगैरे ), जिरा राइस, प्लेन दाल, भरपूर कच्चे सलाद.

स्टार्टर साठी खाकरा (त्यावर मसाला पापड प्रमाणे कांदा वगैरे घालून), पॉपकॉर्न, डायबेटीक चिवडा, रोष्टेड चिप्स वगैरे.

मूलांच्या पार्टीसाठी दाबेली, (कमी तिखट, भाजीत केळे घालून) किंवा पावभाजी.

स्वप्ना,
नॉर्थ इंडियन्स येणारेत.... मग

जर चार ठाव जेवणाचा प्लॅन असेल तर
छोले/राजमा/ मसूर, पनीरवाली किंवा इतर कोणतीही ग्रेव्ही असणारी भाजी, रायते, राईसचा एखादा प्रकार (ग्रीन पीज पुलाव/ टोमॅटो राईस, रोटी/ नान/पोळ्या, दाल हवी असल्यास, स्टार्टर म्हणून कोथिंबीर वडी/ सुरळीची वडी / ढोकळा, स्वीटमध्ये शुगर फ्री आईसक्रीम असा मेनू ठेवता येईल का बघ. ते पण खुश, तूही खुश आणि केटरर पण खुश! Wink

मुलांसाठी पावभाजी व नेहमीचे आईसक्रीम.

स्वप्ना, लेकाच्या वाढदिवसासाठी मिनी इडल्यांचं चिली इडली/मसाला इडली/ दही इडली/ इडली मंचूरीयन बघ आवडतंय का..

उत्तर भारतियांसाठी : बिर्याणीचा कुठलाही प्रकार आणि दही वडा (किंवा दही वापरून तत्सम प्रकार). म्हणजे तिखट/ मसालेदारच्या बरोबरीने थंड/गोड आणि दोन्ही पोटभरीचं Happy

किंवा मराठी काही मेनू आवडत असेल तर भाजणीचे वडे, दही-मिरची आणि कुठलातरी छान हलका मसालेदार नसणारा पुलाव (व्हेज पुलाव/ काश्मिरी पुलाव)

धन्यवाद दिनेशदा, अ.कु आणि मंजुडी इतक्या तत्पर प्रतिसादाबद्दल मी हे नोट करून ठेवलयं. ठरल्यावर कळवते.
पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना Happy

भारतातच का ? इथे पण एवढी मोठी पार्टी असली की लोक केटरर कडून करुन घेतात. ४० न ५० लोकांचा स्वयंपाक म्हणजे खूप होतो.

Pages