बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव, आशू मला बोलवतेयस का जेवायला? छान आहे मेन्यू एकदम.
या मेन्यू बरोबर पंजाबी भाजी छान वाटेल. सायो ने लिहीलेली पनीर मखनी बघ. अगदी कमी त्रासाची, झटपट होणारी आणि चवीला पण मस्त. आपल्या इकडे हॉटेल मध्ये मिळते तशीच वाटते.

ही लिंक
http://www.maayboli.com/node/2658

कोरडी भाजी हवी असल्यास पनीर भुर्जी किंवा ग्रेव्ही स्टाईलमध्ये पनीर बटर मसाला देखील मस्त वाटेल ह्या मेन्यूबरोबर. सह्ही मेन्यू आहे! Happy
डुबकीवाले गंगाकिनारेवाले आलू देखील छान वाटतील ह्या मेन्यूबरोबर.

मंजूडे, २-३ जुड्या मेथी आणा रे, निवडा रे, धुवा रे, वाळवा रे, चिरा रे... Proud
स्वाती, एनीटाईम! Happy
धन्यवाद मंजू, सावनी, स्वाती, अरुंधती. ७३ ते १५ असा वयोगट कव्हर करायचा असल्याने पनीर माखनी करायचाच विचार करते. Happy

मंजूडे, २-३ जुड्या मेथी आणा रे, निवडा रे, धुवा रे, वाळवा रे, चिरा रे>>>> ह्या ऐवजी कसुरी मेथी वापरून पण चांगली होते ती भाजी.

शनीवारी तीन मुली येणार आहेत. चार मुलींसाठी पावभाजी व हाका नूडल्स रात्री जेवायला करणार आहे.
रविवारी ब्रेफा काय करता येइल? लंच करून त्या आपल्या घरी निघून जातील. लंचला त्यांना समोर एक बर्गर चिकन टाइप जागा आहे तिथे नेऊ की घरीच करू? छोले पुरी ? मटार घालून पुलाव दही रायता सोपे पडेल. Our first pajama party/ sleep over. Girls have planned to buy lots of books from nearby store and read under the covers in flash lights Happy

अश्विनी, ब्रेफाला मफिन्स, पॅनकेक्स वगैरे आवडेल का?

मुलांना बाहेर नेलेलं आवडतं पण तुम्हाला जे सोईस्कर पडेल तेपण बघायला हवं. स्लीपओव्हरनंतर मुलीं दमलेल्या असतात रात्री दंगामस्तीकरून त्यामुळे आळसटलेल्यापण असतात. त्यांनाच रात्री विचारायचं काय आवडेल दुसर्‍या दिवशी लंचला म्हणून. आणि घरीच म्हणल्या तर पुलावाला जास्त तयारीपण लागणार नाही.

ब्रेफासाठी पर्याय :

  • फ्रेंच टोस्ट
  • कोणतीही भाजी घालून केलेले अथवा साधे पराठे - दही
  • कॉर्नफ्लेक्स
  • डोसे / आप्पे/ उत्ताप्पा/ इडली व चटणी

जेवण (लंच) :

  • बिर्याणी/ पुलाव, सूप, सॅलड/ रायते, स्वीट डिश.
  • पास्ता, सूप, सॅलड, स्वीट डिश.

या शुक्रवारी घरी डिनर पार्टी आहे. जेवणात मंजूडीच्या पद्धतीने तुरिया-पात्रा-वाटाणा, व्हेज माखनवाला ( पनीर आणि इतर सगळ्या भाज्या घालून ) आणि सुकं चिकन करणार आहे. तर ह्या बरोबर जाईल असा भाताचा कुठला प्रकार करावा ? शेवटी खायला चॉकलेट पुडिंग करणार आहे त्यामुळे दही-बुत्ती नको वाटतेय. गाजर,मटार, फरसबी ह्या भाज्या आधीच वापरत असल्याने पुलाव / बिर्याणीही नको.

सशलच्या रेसिपीने मेथी-नारळाचं दूध घालून भातही मस्त जाईल. रच्याकने, बेत मस्त आहे हां, एकदम तोंपासु! फोटो काढ आठवणीने सगळ्यांचे Happy

लेमन राईस/ मसालेभात/ मसूर भात/ चित्रान्न/ पुलियोग्रे राईस किंवा डाळिंब्या (वाल) घालून खिचडी.... असेही पर्याय सुचत आहेत.

सगळं मसाल्याचं आहे तर साधा भात आणि टोमॅटो सार किंवा अमसुलाचं सार. ( पनीरमध्ये टोमॅटो असणार म्हणून अमसुलाचं सार किंवा दिनेशने दिलेलं अननसाचं सार)

गेल्या शनिवारी नवर्याची वाढदिवस पार्टी झाली.त्यासाठी केलेला मेनू.
स्वीट कॉर्न चिकन सूप
पानिनी संद्वीच
कीश(कोस्ट्को मधले )
तंदुरी चिकन
फ्रान्की
पास्ता
७ लेयर डिप
चिप्स
hummingbrid cake घरी केलेला
तिरामिसु (माबो वरची कृती पाहून घरी बनवलेलं)

धन्यवाद सगळ्यांना Happy काल भाताच्या सगळ्या रेसिपीज चाळल्या होत्या. मसूर भात करायचं डोक्यात आहे. मला भाताचे प्रकार फारसे जमत नाहीत. भात मनासारखा मोकळा न होणं, फ्लेवर नीट न येणं इत्यादी. त्यामुळे कुठलीही प्युरी वापरुन करायचे भात डायरेक्ट पार्टीसाठी न करणं बरं Happy पण मसूर भात खिचडीसारखा केला तर बाकीच्या पदार्थांबरोबर जाणार नाही असं वाटतंय. थोडा लसूण आणि किंचित बिर्याणी मसाला घालून केला मसूर भात तर चांगला लागेल का ? म्हणजे अगदी प्लेन नाही आणि अगदी मसालेदार पण नाही !

शूम्पी. मेन्यू एकदम जोरदार आहे Happy

अगो, माखनवाला किंवा इतर कर्‍यांबरोबर साधासा भात्/पुलाव मस्त लागेल. मैत्रिणीकडून एक सोपा आणि चवदार पुलाव शिकलेय. रेसिपी तुझ्या विपूत टाकते.

परत एकदा धन्यवाद सगळ्यांना Happy
येत्या चार दिवसांत माकाचु वर पोस्ट दिसली नाही तर पार्टी बरी पार पडली असं समजा Proud

तीन चार लोक जेवायला आहेत. पालक पराठ्याची फर्माईश आहे. त्यासोबत इतर मेनु सुचवा. भात भाजी नि दाळ वगैरे..

पराठ्याबरोबर एखादी दह्यातली कोशिंबीर्/रायतं, दाल फ्राय, जीरा राईस, कोथिंबीर वडी/ मिनी बटाटेवडे/ मुठीया ह्यापैकी काहीतरी आणि गोडात सिंडरेला ने लिहिलय त्याप्रमाणे गुलाबजाम/ फ्रुट सॅलड असे काही ठेवता येईल. पालकाचे पराठे असतील तर वेगळ्या भाजीची गरज नाही.

Pages