Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राज, इड्ल्या, उपमा हे ट्राय
प्राज, इड्ल्या, उपमा हे ट्राय केलय, इड्ल्यानातर हातपण नाही लावला मुलांनी.
अनिलभाइ पिझ्झा, जेलो हे त्या मुलांना शाळेत लंचला देत असतातच. स्नँक टाइमसाठी द्यायच आहे.
बेगल आणि क्रिम चि़झ, चिझ
बेगल आणि क्रिम चि़झ, चिझ cracker, मिक्स फळांचे तुकडे, पॉपकॉर्न, लो fat योगर्ट, व्हेजि डिप्स. बरोबर ज्युस बॉक्स,organic चॉकलेट मिल्क.
सॉसेज रोल्स, व्हेजिटेबल
सॉसेज रोल्स, व्हेजिटेबल रोल्स, चीज स्ट्रॉज, कॉर्न चिप्स अँड सॅलसा/चीज्/व्हेजिटेबल डिप्स, पिझ्झा पार्सल्स, व्हेजि/चिकन पॅटी विथ सॉस अँड पोटॅटो वेजेस, चिकन नगेट्स, फलाफल अँड पिटा पॉकेटस विथ लेट्युस... अजुन आठवले की सांगते...
छोट्या साइजचे चिकन खिमा व
छोट्या साइजचे चिकन खिमा व बटाटा घालून कट्लेट्स, ते छोट्या बन मध्ये भरून मिनि बर्गर्स. मक्याचे
पोहे तळून थोडेसे मीठ घालायचे. व सर्व आयांचा मित्र टॅन्ग. थोडे मेहेनतीचे आहे पण विमानातील जेवण सारखे प्रत्येक मुलासाठी वेगळा पॅक बनवायचा.
ब्रेड्चे कटरने गोल तुकडे
ब्रेड्चे कटरने गोल तुकडे करायचे. मधे जॅम नाहीतर पीनट बटर. असे दोन सँडवीच पॉपकॉर्नचे छोटे पाकिट. गाजर व काकडीचे चार लांब तुकडे एका रिबिन मधे बान्धायचे असे प्रत्येक मुलाचे पॅकेज.
रिबीन बांधायची आयडिया चांगली
रिबीन बांधायची आयडिया चांगली अहे.
पण मामी, काकडीला पाणी सुटेल की हो...
त्या पेक्षा सेलेरी चालेल....
गणपतिच्या प्रोग्राम साठी
गणपतिच्या प्रोग्राम साठी बटाट्याची भाजी न्यायची आहे.बाकिचे पदार्थ माहीत नाहीत्.पंचवीस माणसांसाठी किती बटाटे लागतील?
मामी, लाजो Thanks, गणपती
मामी, लाजो Thanks,
गणपती बाप्पापण असणार आहेत, non-veg करणार नाही पण sugar-free icecream च sundae मुलांना स्वतः सजवायला दीलं तर ? Toppings मध्ये बेरीज, नटस, व्हॅनिला वेफलस असं काहीतरी ?
शुक्रवारी गौरीचं हळदीकुंकू
शुक्रवारी गौरीचं हळदीकुंकू आणि गणपती साठी ४०-४५ जण येणार आहेत. खरतर दरवर्षी मी जेवणाचाच बेत ठेवते पण यंदा ४ महिन्यांचं बाळ सांभाळून येवढं होईल असं वाटत नाहीये. उपमा, सुरळीच्या वड्या, कचोरी, उकडीचे मोदक आणि गुलाबजाम असा मेनु ठरवला आहे. कसा वाटेल हा मेनु? कचोरी आणि गुलाबजाम विकतचे आणणार आहे. बाकी घरीच करेन. प्लीज काहीतरी सजेशन्स द्या.
आणि ४० लोकांसाठी उपमा करायला रवा किती लागेल साधारण?
सावनी, ४०-४५ लोकांसाठी उकडीचे
सावनी, ४०-४५ लोकांसाठी उकडीचे मोदक करायचे झाले तर कमीत कमी ८० तरी लागतील आणि उकडीचे मोदक लोक आरामात २ तरी खातील असा माझा अंदाज. तुझ्यकडे मोदकाचा लहान साचा असेल तर सायोच्या मलई बर्फीची रेसिपी वापरून मोदक करु शकशील का?
तीच गोष्ट सुरळीच्या वड्यांची. त्याऐवजी ढोकळा करशील का? ते सोपे पडेल असे वाटते.
मी हेच लिहिणार होते. ते इतके
मी हेच लिहिणार होते. ते इतके ४० -४५ मोदक बनवणे एकट्या बाईने कठीण आहे,खास करून लहान मूल असताना. तू मस्त पैकी एक खवा मोदक द्रोणात, आंब्याची डाळ छोते लहान द्रोणात, गरमागरम उपमा जमलेच तर त्याबरोबर हिरवी चटणी, विकतची कचोरी(जी शेवटी एकदम ओवन मध्ये टाकायची), पंधरा मिनीटात गाजर हलवा(हे सुद्धा किसलेली गाजरं बाहेरून आणलेली). पंचखाद्य व तिर्थ दर्शन झाल्यावर शक्यच झाले तर.खूप आहे तसे(माझ्या मते).
नाहीतर दुसरा मेनू गरमा गरम कढी खिचडी,चटणी( किंवा छोले, दही टाकून भटुरे टाईप) जरी केले, विकतचे गूलाबजामून, खवा मोदक तरी बस आहे. आधी ड्राय फ्रूट्स दर्शन झाल्यावर.
गुज्जू मैत्रीणीकडे प्रसादाचे जेवण असायचे जे लोक येतात त्याना. हाच मेनू असायचा. दिवसाला ४० एक लोक यायचे दिड दिवसात. त्यांची कढी खिचडी पण मस्त वाटते द्रोणात. मग एक गरम गूलाबजामून,पेढा वगैरे.
छोले आधी उकडून येणार् त्या दिवशी फोडणी द्यायची. पुरी पिठात किंचीत रवा नी दही टाकून मोठ्या मोठ्या पुर्याच छोले टाईप करायच्या. मोठ्या पानाच्या द्रोणात एक गरम पुरी, त्यावर छोले हा प्रसाद सिंधी चौकात मिळायचा मुंबईत.
त्यानंतर शेवेची बर्फी. मस्त वाटायचे.सर्व मराठी असतील त्याना जरा विच्त्र वाटेल हा मेनू.
हा मेनु कसा वाटतोय Franki
हा मेनु कसा वाटतोय
Franki (Veggi)
http://www.youtube.com/user/vahchef#play/uploads/42/J5PRWm0bYM0
Sukha Aalo
http://www.youtube.com/user/vahchef#play/uploads/8/ObQEcKK8IjY
Beet Curry
http://www.youtube.com/user/vahchef#play/uploads/105/NFoXcolYMqo
Dahi Bhendi
http://www.youtube.com/watch?v=VLsKACvbUoA
Dal Tadka
http://www.youtube.com/user/vahchef#play/uploads/74/BIFyn9W9L6w
फक्त आता हे सगळे सकाळी बणवुन ठेवले तर चालेला का? घरातुन सगळा वास निघुन जावा म्हणून विचारतोय
कारे? कोणासाठी बनवतोय इतकं
कारे? कोणासाठी बनवतोय इतकं सगळं? मेनू झकासच आहे बाकी मी यु ट्युबवर बघितलं नाही. आणि भात लावायला विसरु नकोस दाल तडका करतोयस तर.
सावनी,उकडीचे मोदक ४०-४५
सावनी,उकडीचे मोदक ४०-४५ जणांसाठी ते पण बाळाला सांभाळुन म्हणजे खूप दमशील ग!
गव्हाची ओला नारळ,खसखस घालुन खीर पण छान होते गणपतीत प्रसादासाठी अन पटकनही होते..
शिवाय पंचखाद्यही ठेउ शकतेस.
बाकी जीरा राइस्/चित्रान्न्,काकडी-टोमाटोची कोशिंबीर/मठ्ठा पण लवकर होतात व खूप लोक येणार असतील तर बरे पडतात. बाकी starter/appe. आवडीप्रमाणे ठेवु शकशील/विकतचे आणु शकशील.
माझ्याकडे १४ जण येणार आहेत
माझ्याकडे १४ जण येणार आहेत शनिवारी गणपतीला जेवणासाठी. मला कुणितरी नेहमीच्या मोदकापेक्षा काही वेगळा प्रकार सुचवा. मनु खवा मोदकाची रेसिपी लिहशील का ?
सावनी सुरळीच्या वड्या मिनोती म्हणते तस खरच वेळ खाऊ आहे . मी शेव दही पुरी ठेवली आहे. तयार शेव आणि पुरी आणेन्.(कांदा घालणार नाही.)
सीमा "बाप्पांसाठी वेगळा
सीमा "बाप्पांसाठी वेगळा प्रसाद" नावाचा बीबी आहे गणेशोत्सवात तो एकदा नजरे खालुन घाल.
याच पानावर सगळ्यात वर नवीन लेखनच्या बाजूला हिरव्या रंगाची टॅब आहे गणेशोत्सवात जायला.
मॅनेजर येणार आहे... सहकुटुंब,
मॅनेजर येणार आहे... सहकुटुंब, म्हणून करतोय... हो हो भात तर करायचायच.
सीमा, सायोच्या मलई बर्फीच्या
सीमा, सायोच्या मलई बर्फीच्या कृतीने मोदक कर ग.
सीमा, बघ तुला हे आवडते का
सीमा, बघ तुला हे आवडते का रेसीपी,
आंबा मोदक
http://www.maayboli.com/node/10131#comment-366511
खवा मोदक
http://www.maayboli.com/node/2549?page=48
तुमच्या सगळयांचा उकडीच्या
तुमच्या सगळयांचा उकडीच्या मोदकाचा सल्ला अतिशय पटला. त्यामुळे ते रद्द केले.
सुरळीच्या वड्या मी बरेचदा २०-२५ लोकांसाठी केल्या आहेत त्यामुळे वाटतयं की जमतील. मी कुकर् मधे करते त्यामुळे तसा खूप वेळ नाही लागत.
सीमा, अग मी कालच अननस घालून शीरा करून त्याचे मोदक साच्यातून केले होते. मस्त झाले होते. मी उद्या तेच करणार आहे.
तर आता माझा नवीन मेनु आहे - कचोरी, गुलाबजाम, बटाटा पोहे, शिर्याचे मोदक, सुरळीच्या वड्या
पोहे आणि मोदकातच तुझा खूप वेळ
पोहे आणि मोदकातच तुझा खूप वेळ जाणार आहे. तेव्हा सुरळीच्या वड्यांऐवजी आळूवड्या नाही का चालणार? (देशी दुकानातून वळकट्या आणून घरी फक्त तव्यावर खरपूस करून घ्यायच्या.)
मला जरा प्रमाणाचा सल्ला हवा
मला जरा प्रमाणाचा सल्ला हवा आहे. ४ कुटुंब जेवायला येणार आहेत उद्या संध्याकाळी. total १४ जण. आम्ही दोघ धरून. मी श्रीखंड, पुरी करणार आहे. मसालेभात, खव्याचे किंवा उकडीचे मोदक, Tomato सार, एखादी पनीर भाजी, बटात्ट्याची भाजी, काकडी कोशींबीर, पापड असा बेत आहे. मला कणिक, दही, तांदूळ किती लागेल? माझ प्रमाण नेहमी चुकत आणि कमी पडतात पदार्थ. अगदी आईने सांगीतलेल प्रमाण वापरल तरी somehow कमीच पडत. so please help आणि एक couple गोरं आहे, १ तेलगु आणि २ मराठी. मेनु ठीक आहे ना?
एक couple गोरं आहे>> बाकी
एक couple गोरं आहे>>
बाकी सावळी आहेत का?
इतर पदार्थ असले तर ४ लोकांना एक कप तांदूळ. १/२ कप कणकेत ४ फुलके होतात. म्हणजे ५-६ पुर्या. अर्थात आकारावर अवलंबून आहे. श्रीखंड असलं तर माणशी ३-४ पुर्या. दही कशाला ते लिहिल नाहीस. अच्छा! श्रीखंडाला. एक ते दिड गॅलन दुधाच दही पुरावं.
रचना, मोठे किती आहेत
रचना, मोठे किती आहेत जेवणारे?
*श्रीखंड : घरी चक्का लावणार असशील तर प्रत्येकी दोन पाउंड दह्याचे दोन डबे. (एकूण चार पाउंड दह्याचा चक्का + क्रीम वगैरे)
*पुर्यांना कणिक : कणिक - मैदा असं घेणार असशील तर कालवणाच्या वाटीनं चार वाट्या कणिक आणि साधारण २ ते अडीच वाट्या मैदा.
*मसालेभाताला तीन ते चार मोठ्या वाट्या तांदूळ लागेल. (एक वाटी तांदळाचा मसालेभात-पुलाव साधारण तीन लोकांना पुरतो. आणि तू बाकीचे बरेच पदार्थ करते आहेस.)
२ लहान मुलं आहेत. एक ६ आणि २.
२ लहान मुलं आहेत. एक ६ आणि २. पण मी त्यांना ह्यात include नाही आहे केलेल.
हो बाकीची सावळीच म्हणायची त्यांच्यासमोर :p
बापरे इतका तांदूळ? मला दोनदा करावा लागेल भात. माझ्याकडे भांडी लहान आहेत खूप. ५० पुर्या कराव्या लागतील का मग? आणि मोदक? माझा साचा मोठ्ठा आहे खूप अस मला वाटतय. हो दही श्रीखंडासाठीच..
हो. माणशी तीन ते चार पुर्या
हो. माणशी तीन ते चार पुर्या धरल्या तर साधारण तेवढ्या. (त्यापेक्षा पोळ्या/पराठे का नाही ऑर्डर करत भारतीय दुकानातून?)
भातासाठी मसाला एकत्र तळून-परतून घेतला आणि भात वेगळा शिजवला तर नंतर अल्युमिनम्च्या डिस्पोजेबल ट्रेमधे, परातीत किंवा मोठ्या सलाद बोलमधे एकत्र करता येईल. (हवी तर मी अॅल्युमिनमट्रे मधे करता येण्याजोग्या बेक्ड व्हेज बिर्यानीची कृती देऊ शकते तुला. म्हणजे दोनदा किंवा दोन भांड्यात करावा लागणार नाही.)
चालेल दे ग..hmmm कदाचित
चालेल दे ग..hmmm कदाचित उत्साह आटला बाकीचे पदार्थ करून तर आणेन पोळ्या विकतच्या.
thankyou very much आर्च आणि मृ ...
मृ, अग माझ्या इथे देशी
मृ, अग माझ्या इथे देशी दुकानात असे पदार्थ मिळायला पाहिजेत न. रोजच्या लागणार्या गोष्टी सुद्धा कश्याबश्या मिळतात. कचोरी, गुलाबजाम सुद्धा पोस्टाने मागवले.
सुरळीच्या वड्यांचा पण प्रश्न मिटला. कारण ज्या मैत्रिणीने करायला शिकवल्या तीच करून घेऊन येणार आहे:)
कुकरमध्ये सुरळीच्या वड्या
कुकरमध्ये सुरळीच्या वड्या कश्या करायच्या?
सहीच सावनी, actually माझा पण
सहीच सावनी, actually माझा पण पुर्यांचा प्रश्ण असाच सुटला. ज्या काकु येणार होत्या न त्यांनीच करून आणल्या. घाबरल्या बहुतेक. मागच्या वेळी पोळ्या कमी पडल्या होत्या विसरल्या नव्हत्या बहुतेक
Pages