बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेला धन्यवाद प्रतीसादाबद्द्ल.

मी जे चिकन करणार आहे त्यात खोबर्याचे वाटण नाहीए. मी ते मःनस्विनीने दिलेल्या चमचमीत मटणाच्या रेसेपीने करणार आहे.

आणि हो ज्यूस आणीन आज.

धन्यवाद भाग्य प्रतीसादाबद्द्ल.

उसळ खरच नको ठेवु का? मग एखादी फ्राय भाजी वगेरे बघते मग.

चांगली कल्पना आहे सायलीमी. पुढच्या वेळेला वापरते मी. आत्ता कैरी मिळण वगेरे अवघड आहे.

स्वाती, अ‍ॅपल ज्यूस वापरून पन्हे खूप छान होते. माबो वरच कृती आहे त्याची. पाहुण्यांसाठी नाही जमले तरी एकदा करुन बघ. Happy

मी इडली , सांबार, खोबर्‍याची चटणी, डोसे, बटाटयाची भाजी किंवा खिमा भरून मसाला डोसे असा बेत करते पुष्कळदा ( दोन चारच पाहुणे असले तर ). डोसे वगळता सगळे प्रकार आधी करुन ठेवता येतात.

रस्सम किंवा टॉमेटोचे सार स्टार्टर म्हणून देता येईल. जलजीरा, कोकमाचे सार, लस्सी हे प्रकार सुद्धा आवडतात लोकांना

मँगो लस्सी अतिशय आवडते इथल्या लोकांना. फक्त ती शेवटी देवु नका. जेवताना अधुन मधुन प्यायला जास्त आवडते.अगदी छोटे बटाटेवडे , ढोकळ्या पेक्षा जास्त आवडतील.
तसच पनीर्,सिमला मिर्ची,कांदा,पायनॅपल चे तुकडे,टोमॅटो इत्यादी बांबु स्क्युअर मध्ये लावुन ग्रिल (ओव्हन मध्ये केल तरी चालत) केलेले व्हेज कबाब (नॉन व्हेज सुद्धा अ‍ॅड करता येईल) इथल्या लोकांना स्टार्टर म्हणुन अतिशय आवडले आहेत. Happy तुकडे अगोदर गरम मसाला,लिंबु रस ई मध्ये मॅरिनेट करा.
मसाला पापड अतिशय आवडतात. सगळ्यात सोपा आणि सुटसुटीत पदार्थ. Happy

सलाड जर ठेवायच असेल तर नेहमी पेक्षा काहीतरी वेगळे म्हणुन कांद्याची लाल मिरची पावडर घातलेली कोशिंबीर आवडलेल पाहिल आहे.:)

मेन मेनू झाला का?
मी आधी लिहिले त्याप्रमाणे चिकन करी करणार असशील तर छोटे छोटे मसाला पापड कर्.(मसाला म्हणजे कांदा,लिंबू वगैरे).
अ‍ॅपेटायझर मध्ये चिकन रेशमी कबाब म्हणजे पुन्हा चिकनच त्यापेक्षा पुदीना श्रिंप/मसाला छान आवडते त्याना. तुला काहीही करावे लागणार नाही ज्यास्त, मसाल्यात श्रिंप घोळवून मस्त ग्रील करायला टाक ओवन मध्ये. नाहीतर बेसन तांदूळात घोळवून शॅलो फ्राय. हे खूप मस्त लागते पुदीनाची चटणी व वरून बेसन व रवा घोळवून. वाटल्यास एका स्कूअरला लावून टाक तव्यावर. मस्त लावायचे, गॅस मंद करून बाकीची कामे करायची.
गोडात मी बर्‍याचदा आपली फिरनी नाहीतर तांदूळाची खीर केलीय साखर टाकून. ऑफीसमध्ये पण हिट होती फिरनी/खीर राईस पुडिंग म्हणून.
गुलाबजाम देखील आवडतात त्याना ,बरोबर आईसक्रीम दे देशी मॅगो नाहीतर कुल्फी वगैरे. मस्त हात मारतात. एकदा मी घरी केलेले गुजा वर अशीच बाहेरची मलाई कुल्फी दिली.

उसळ मेन मेनू माहित नाही किती आवडेल ते. पण बटाट्याचे पदार्थ आवडेल. पातल बटाटा भुजणं करी (तिखट नाही करायची) वगैरे. चमचमीत मटणाचा मसाला वापरून बटाटा करी छान होते पण तू चिकन करतेय्स ऑलरेडी ना...

सरबतात मी अगदी खरोखर हेच लिहिणार होते की पन्ह कर. Happy

धन्यवाद दिपा, मेधा, सीमा, मःनस्विनी प्रतिसादांबद्दल. छान छान ऑप्शनस दिसतायत.

काल ग्रोसरी आणली. उसळ एवजी पालक पनीर व गोडामध्ये मँगो मुस ( जुन्या मायबोली वरच्या रेसेपीने) असे बदल केले.

मसाला पापड करीन. चांगली कल्पना आहे.
श्रिंप ची कल्पना मस्त आहे मःनस्विनी . करीन मी कदचीत ते. नाहीतरी फिश फ्राय की श्रिंप कराय्चे हे चाललच आहे.

परत एकदा धन्यवाद सर्वांना. तुमचा वेळ, कल्पना व मदतीसाठी Happy

स्वाती !
मसाला पापड पण छान वाटतील. त्याला एक दुसरा ऑप्शन पण ठेऊ शकतेस.
खोलगट टॉर्टीया चिप्स मोठ्या plate मध्ये ठेवायच्या. प्रत्येक चीप मध्ये थोडा सालसा, थोडा कांदा , टोमेटो, आणि आवडीचे चीज घालायचे आणि १ मिनिट microwave मध्ये ठेवायचे.
पटकन होता हे Appetizer आणि चांगलं पण लागतं.
इंडिअन guests असते तर त्या मध्ये किंचित थोडी हिरवी मिरची पण चालली असती Happy

छान आयडीया आहे पिन्कु आणी पल्लवी.
तुमच्या प्रतीसादाबद्द्ल धन्यवाद. आता मी पुढच्या वेळी आणखीन लोकांना बोलवीन एवढया सगळ्या गोष्टीं ट्राय करायच्यात ना.

मला माझ्या मैत्रिणिना बोलवायचे आहे १० जणी आहेत सकाळि ९ वाजता न्याहारी चे २ पदार्थ सागा एक गोड पण पा हिजे.

श्रुती, खाली दिलेले मेनु बघ कसे वाटत आहेतः

तिखट पदार्थः उपमा / इडली सांबार /साबुदाण्याची खिचडी /आप्पे चटणी /कांदा मटार पोहे /मटार करंजी / व्हेज पफ
गोड पदार्थः गुलाबजाम / गाजरहलवा / नारळ ,मलई , गुलकंद बर्फी/ गोड शिरा केशर, केळं किंवा अननस घालून

यातले शिरा सोडून बाकी गोड पदार्थ आधी करुन ठेवता येईल.

श्रुती,

पॅन केक्स विथ मेपल सिरप आणि व्हीप्ड क्रीम, मिळाल्या तर स्ट्रॉबेरीज / फ्रुट मफिन्स विथ क्रीमचीज / कटलेट सँडविचेस / स्टफ्ड ब्रेड रोल्स.

गर्मी असेल तर फ्रुट स्मुदी / हेल्दी सिरीअल मिल्क्शेक्स
थंडी असेल तर मसाला दुध, वॉर्म राईस पुडिंग...

उपमा शीरा वगैरे पदार्थ मला नको आहेत . शक्यतो आदल्या दिवशी करता येतिल असे पहिजे. कारण ९ खुप लवकर आहे शिवाय स़काळी सगळे शा ळा व ऑफिस चा डबा बनवायचा आहे. कोणी कॉर्न् कट्लेट बनवलि आहेत का ? दुसरे काय आधि बनवता येइल ? मिसळ करता येथे फरसाण मिळत नाही.

कुठलाही स्ट्फ्ड पराठा, सारण आदल्या दिवशी करुन ठेवायचं. तुला मिक्स व्हेज(बारीक चिरलेले कोबी, गाजर, पालक, आणि उकडलेला बटाटा), मुळ्याचा, पनीर, आलु करता येईल. सोबत दही, शेंगदाण्याची चटणी, मेंथांबा, सॉस. गोडाला गरम खिर रव्याची, दलियाची. बघ, आवडतय का?

@ shrutisphatak

बीट चे कट्लेट पण छान लागतात
बर्‍याच जणांना बीट चे काय पदार्थ असु शकतात हे माहीत नसत.
आदल्या दिवशी सारण करू शकतेस आणि मग सकाळी शॅलो फ्राइ करता येतात.

वाटली डाळ, मटार करंजी, फलाफल, सुरळी च्या वड्या असे काही पर्याय पण आहेत

बीट चे कट्लेट पण छान लागतात
बर्‍याच जणांना बीट चे काय पदार्थ असु शकतात हे माहीत नसत.
आदल्या दिवशी सारण करू शकतेस आणि मग सकाळी शॅलो फ्राइ करता येतात.

>> क्रुती यो.जा.टा.

श्रुती, मी सांगितलेले हे ऑप्शन्स आदल्या दिवशी करुन ठेवता येण्यासारखे आहेत....फ्रुट मफिन्स विथ क्रीमचीज / कटलेट सँडविचेस / स्टफ्ड ब्रेड रोल्स.
पॅनकेक्स पण पटापट होतात. दोन तवे टाकलेस तर अर्ध्या तासात १० जणींसाठी पुरेसे बनतिल.
क्रिम आदल्या दिवशीच व्हिप करुन ठेवता येइल किंवा विकत मिळणारे व्हीप्ड क्रिम सुद्धा आणु शकतेस.

फ्रुट स्मुदी ची पुर्ण तयारी आदल्या दिवशी करता येइल... दही - फ्लेवर्ड्/प्लेन, दुध घरात आणुन ठेव. फळं - स्ट्रॉबेरीज, केळी, ब्लु बेरीज इ. इ. अदल्या दिवशी धुवुन साफ करुन ठेवता येतिल. तयार फ्रुट क्रशेस ही वापरता येतिल यात. मोठ्या ब्लेंडर मधे एका वेळेस २-३ स्मुद्या (सर्विंग ग्लास च्या साईज वर अवलंबुन) बनतिल. मिल्कशेक ही तसच.

मसाला दुध आणि राईस पुडिंग ही आदल्या दिवशी बनवता येइल.

या व्यतिरीक्त तुला मसाला पुर्‍या, बटाटा पुर्‍या, मेथी/पालक्/भाजणी चे शॅलो फ्राय करुन मुटके, भाजणीचे वडे/थालिपीठ - लोण्या बरोबर, सेट डोसा असेही पदार्थ करता येतिल...

माझ्या एका मैत्रिणीने सकाळी पावभाजी केलेली. म्हणजे भाजी आदल्या दिवशी करून फ्रीज केलेली. पाव अवनमध्ये एका वेळेस ट्रीमध्ये टाकून भाजलेले. मिल्कशेक, चहा, कॉफी अस सुटसुटीत ठेवलेला बेत होता.
श्रुती, तू इडल्या/ढोकळा देखील आदल्या दिवशी करून फ्रीज करू शकतेस. ऐन वेळी चटणी, सांबारबरोबर गरम द्यावे.
नाहीच तर सरळ बेगल्-क्रीम/सिनॅमन बन्स असं काही ठेव.

श्रुती,
तिखट मीठाच्या पुर्‍या. लसुण-ही.मीरची घालुन छान खमंग होतात. पोटभर पण होतात.
आणि एखादी खिर [शेवया,गहु] किंवा हलवा [दुधी,गाजर], जे आदल्या दिवशी करुन ठेवता येईल.
पुरी बरोबर दही, लोणचे, सॉस ई.

पुढच्या शनीवारी आम्ही मैत्रिणी भेटणार आहोत. चाट थीम आहे... दही/शेव पुरी, पाणी पुरी, भेळ, समोसा चाट, छोले भटुरे, फ्रुट चाट असले सगळे प्रकार होणार आहेत. पण अजुन काही नवीन चाट प्रकार आहे का की जो बघुन/खाऊन मैत्रिणी 'चाट' पडतिल???? Proud

चायनीज भेळ सांगु नका प्लिजच Happy

लाजो, हाय.

इथे आलू टोस्ट मिळतात. ब्रेड च्या स्लाइस वर उकड्लेल्या बटाट्याचे सारण लावतात एका बाजुने. मग ते पिठात बुड्वून तळून घेतात. सर्व करताना बटाटा साईड वर करायची. वरून हिरवी चट्णी पसरायची, मग
टोमॅटो सॉस मग बारीक चिरलेला कांदा व कोथिम्बिर. सर्वात वरून बारीक शेव. मग हे तिरके लेन्ग्थ वाइज कापायचे. ( आधी सर्विन्ग प्लेट मध्ये घालायचे. मग कापायचे) सारणात काय घालतात व कशात बुडवून तळतात ते उद्या विचारून सांगेन. बरेच दिवसात खाल्ले नाही.

कट मिरची: मिरची भजी कापून त्यावरून शेव वगैरे घालतात.

राज कचोरी: मोठी पुरी असते त्यात फोडून मग बटाटा शेव कांदा कोथिम्बिर, चिन्च चट्णी, हिरवी चटणी,
चाट मसाला वगैरे घालायचा.

http://funnfud.blogspot.com/2008/06/khasta-raj-kachori-indian-chaat-dish...

आलू चाटः बटाटे फ्राय करून मग त्यावर वरील आयट्म घालायचे व टूथ पिक्स द्यायच्या.

http://www.awesomecuisine.com/categories/Vegetarian/Snacks/Chaat/
जर मट्का कुल्फी व डिस्पोजेबल द्रोण मिळाले तर आणि मजा येइल. चाट चा थाट! Happy

अमा, त्या ब्रेड आलू प्रकाराला गोल्ड कॉईन पण म्हणतात. ब्रेड स्लाईस गोल आकारात कापून त्यावर बटाट्याचं सारण गोल वळून दाबून बसवायचं आणि तळायचं. वरून एक हिरवा ठिपका आणि एक लाल ठिपका Happy

लाजो, तुझ्या इकडे canapies मिळतात का?

सकाळी सकाळी किती हा जाच. नुसते नावेच ऐकायचे ऑफिसात बसुन. कट मिरची, कचोरी, आलु टोस्ट अहाहा स्वर्ग. Happy

मामी, धन्स Happy
तुम्ही दिलेल्या लिंक्स सहीच आहेत. त्यातल कॉर्न चाट चांगल/सोप वाटलं.
जमल तर त्या आलु टोस्ट चे रेसिपी द्या प्लिज.

Pages