Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्स गं आस बघते.
धन्स गं आस
बघते.
आमच्या घरि माझ्या पुतणिचा
आमच्या घरि माझ्या पुतणिचा वाढदिवस आहे. संद्याकाळी हॉल वर आहे. पण दुपारी घरी जवळ जवळ ४० ते ५० लोक आहेत जेवायला. आम्हि कोकणातले आहोत. त्यामुळे जेवण आतातरी वरण भात, बटाट्याची भाजि, काळ्या वाटाण्याची उसळ, खिर आणि चपात्या अस ठरल आहे.
पण मला हा मेन्यु म्हणजे तोच तोच पणाचा वाटु लागला आहे. कहितरि कोकणी पण जरा वेगळ सजेस्ट करा ना. कोकणी करण एकतर सगळेच कोकणातले आहेत आणि दुसर संध्याकाळी पंजाबी आणी गुजराथि मिक्स जेवण आहे.
मुगाचे कढण (खीर ), काळ्या
मुगाचे कढण (खीर ), काळ्या वाटाण्याच्या भाजीत, ओले काजू, साध्या वरणाच्या जागी हिरवी मिरची आणि खोबरे घातलेले वरण (पण बाकी मसाला नाही ) सोलकढी, रायआवळ्याची चटणी, ताजे लोणचे,
चपात्याना वेळ नसेल तर आंबोळ्या.
>>>>मुगाचे कढण (खीर ), काळ्या
>>>>मुगाचे कढण (खीर ), काळ्या वाटाण्याच्या भाजीत, ओले काजू, साध्या वरणाच्या जागी हिरवी मिरची आणि खोबरे घातलेले वरण (पण बाकी मसाला नाही ) सोलकढी, रायआवळ्याची चटणी, ताजे लोणचे, चपात्याना वेळ नसेल तर आंबोळ्या.
आरे हो सोलकढी तर रोजच असते आमच्याकडे दिनेशदा - शिवाय कोशिंबिर आहे काकडिची दण्याच कुट घातलेली. चपात्यांना प्रॉब्लेम नाहि पण आंबोळ्या पण छान लागतिल ना उसळिबरोबर. मुगाच कढ्ण विसरलेच होते मि छान तेच बनवेन स्विट डिश म्हणुन. तुम्ही सांगितलेल तिखट वरण गावाला सत्यनारायणाच्या पुजेला बनत. बर झाल हा पण छान पर्याय आहे.
पण ति रायआवळ्याची चटणि कशि करायचि? आधी करुन ठेवता येइल का? मुंबइत कुठे मिळतिल रायआवळे? दिनेशदा प्लिज सांगा!
राय आवळे कुठल्याही चिंच आवळे
राय आवळे कुठल्याही चिंच आवळे विकणार्याकडे असतात. बोरिवली, दादर इथे सिझनमधे हमखास मिळतील. ते नसले तर मोरावळ्याचे आवळेही चालतील. दोन्ही आवळे जरा ठेचून त्याच्या बिया काढायच्या. मग हिरव्या मिरच्या, मीठ, थोडेसे आले व जिरे घालून सरबरीत चटणी वाटायची. वाटलीच तर थोडी साखर घालायची. फोडणीची गरज नाही. फार आधी केली तर काळी पडते, पण खराब होत नाही.
माझ्या मुलिच्या वाद दिवसासाथि
माझ्या मुलिच्या वाद दिवसासाथि मेनू सुचवा ना प्लीज ..... पिझ्झा असनार आहे पन त्याच्याबरोबर अजुन काय? घरुन करुन नेता येन्यासारखे ... गरम करवे लागनार नहि असे ..... १५ मुले .... ४-७ वर्शे ... मोथि मानसे पन आहेत...
इथे पार्त्ति प्लानिन्ग तइप्स कोनि ताकल्या आहेत का? ... तर प्लीज ल्लिन्क द्या ......
ईथे पोह्याची उकड असा उल्लेख
ईथे पोह्याची उकड असा उल्लेख वाचला. पण त्याची रेसीपी नाही सापडली. कुठे आहे?
पोह्याची उकड इथे पहा.
पोह्याची उकड इथे पहा.
चेतु, १. चिप्स आणि सालसा २.
चेतु,
१. चिप्स आणि सालसा
२. व्हेजिटेबल प्लॅटर - बेबी गाजरे, सेलेरी, ब्रोकोली वगैरे. आणि डीप (हे असे च्या असे विकत पण मिळते)
३. फळांचे प्लॅटर - strawberry, द्राक्षे, अननस वगैरे
४. सामोसे (दिप ब्रँडचे चिझ - हालपिनो फ्रोझन सामोसे छान जातील पिझ्झा बरोबर)
५. मुलांसाठी ज्युस आणि मोठ्यांसाठी सोडा
त्या पानावर - हे पान पाहायची
त्या पानावर - हे पान पाहायची परवानगी नाही - असे येत आहे. त्या ग्रुपचे सभासद कसे व्हायचे? तो कुठला ग्रुप आहे ते तिथे त्या पानावर दिसले तर सोयीचे होईल. चु. भु. माफ करावी.
हाच गृप आहे तो.. आहारशास्त्र
हाच गृप आहे तो.. आहारशास्त्र आणि पाककृती... वरती स्क्रोल करा मग उजवीकडे आहारशास्त्र आणि पाककृती लिहिलेल दिसेल त्या खाली असलेल्या 'सामिल व्हा' वर टिचकी मारा.
पान उघडले - रेसिपी दिसली !
पान उघडले - रेसिपी दिसली ! मला इतर रेसिपी दिसत होत्या त्यामुळे कळलंच नाही की मी 'आहार व पाककृती' ची सभासद नाहिये ते. आता झाली आहे. नवीन आहे, जरा सांभाळुन घ्या
धन्यवाद अमृता
नो प्रॉब्लेम!! मायबोलीवर
नो प्रॉब्लेम!! मायबोलीवर स्वागत.
रजनीगन्धा, चिप्स आनि सल्सा,
रजनीगन्धा,
चिप्स आनि सल्सा, फ्रुत्त् प्लतेर मि थेव्नार आहेच पन जरा पोतभरिच कहितरि हव होत... अजुन कहि सुचल तर प्लीज सान्ग .....
१८ मोठे माणसे आणि १० लहान मुल
१८ मोठे माणसे आणि १० लहान मुल अशा ग्रुपचा पॉटलक आहे. मला 'मुगभ़जी' करुन न्यायचि आहेत.(इतर पदार्थ असणार आहेत) त्यासाठी किती डाळ भिजवावी लागेल? प्लिज मेजरिंग कप च्या मापात प्रमाण सांगा.
५ ते ६ कप मूगडाळ भिजवावी
५ ते ६ कप मूगडाळ भिजवावी लागेल.
दिनेशदा | अगदी मस्त आहे
दिनेशदा |
अगदी मस्त आहे रेसेपी
एकच शंका आहे. ह्या दिवसात रायआवळ्याची चटणी मुळे काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना? सर्दी - तापाची साथ आहे म्हणुन विचारल. आणि राय आवळे कोणत्या सिझन मध्ये मिळतात?
तूळशीच्या लग्नानंतर आवळे,
तूळशीच्या लग्नानंतर आवळे, चिंचा आणि बोरे बाजारात येतात. जर आता मिळत असतील, तर बाधणार नाहीत. तसे आपण चटणी थोडीशीच तर खातो. आणि शिवाय आवळा म्हणजे भरपूर क जीवनसत्व. त्याने तर सर्दिला प्रतिबंधच होईल.
धन्यवाद दिनेशदा
धन्यवाद दिनेशदा
अरे..... कुथे गेले सगले ....
अरे..... कुथे गेले सगले ....
चेतू सँडविचेस करून नेऊ शकतेस.
चेतू सँडविचेस करून नेऊ शकतेस. मुलांसाठी पीनट बटर जेली किंवा नुसतेच बटर सँडविचेस आणि मोठ्यांसाठी चटणी सँडविचेस, ३ लेयर करायचे, २ वेगळ्या वेगळ्या चटण्या लाऊन, दही वडे करू शकतेस. एखादा भाताचा प्रकार पण जाईल, टोमॅटो राईस किंवा मेक्सीकन राईस वगेरे. ३ लेयर पुडिंग (ते ज्यात बेस ला केक चे तुकडे, मग त्यावर पुडिंग, अणि वर फळांचे तुकडे असतात ते) ठेवलेस तर मस्त पोटभरीचा मेनू होईल. मुलं पण यातलं बरचसं खातात.
नमस्कार मंडळी, माझ्याकडे
नमस्कार मंडळी,
माझ्याकडे विकान्ताला एक अमराठी कुटुंब चहासाठी येणार आहे, तरी कृपया मला थोडक्यात (घरात लहान बाळ आहे व उसगावात असल्यामूळे Limited मदत) करता येण्यासारखा मेनु सुचवा.
धन्यवाद,
चहाबरोबर मराठी मेनू
चहाबरोबर मराठी मेनू :
साबुदाणा खिचडी
(विकतची) आळूवडी-चटण्या-शेव
(विकतच्या) श्रीखंडात दूध घालून त्याला पातळ करायचं. त्यात फळं कापून घालायची.
काही तळायची भानगड नाही. आणि फळं कापून श्रीखंडात आधल्या दिवशी घालून ठेवता येतात. साबुदाणा खिचडीची तयारी करून आयत्या वेळी फोडणीला घालायची.
१. विकतची लिलवा कचोरी. २.
१. विकतची लिलवा कचोरी.
२. आधल्या दिवशी उपमा करून ठेवून दुसर्यादिवशी बटर घालून मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचा.
३. फोडणीचे पोहे
४. स्ट्रॉबेरी शॉर्टकेक - छोटे स्पाँज केक्स मिळतात त्यावर स्ट्रॉबेरीज कापून टाकायच्या आणि वरून व्हीप्ड क्रीम फेटून किंवा नुसत कूल व्हीप आणि स्ट्रॉबेरी सीरप
५. आधल्या दिवशीकंडेन्स मिल्क, कूल व्हीप एकत्र करून त्यात कॅनमधले पायनॅपल आणि मँड्रीन ऑरेंजेस घालून फ्रिज्मध्ये ठेवायच. दुसर्या दिवशी मस्त डिझर्ट तयार.
मृने सुचवलेले पदार्थ
मुलाच्या वाढदिवसानिमीत्त ५-६
मुलाच्या वाढदिवसानिमीत्त ५-६ लहान मुले[वय वर्षे ४] आणि त्यांच्या आया येणार आहेत.
रगडा पाटिस, भेळ आणि अननसाच शिरा हा बेत कसा वाटेल?
सोबत केक असेलच.
की भेळ ऐवजी पास्ता /ढोकळा / अळुवड्या अस काही करु?
४वर्षाची मुलं रगडा पाटिस [बहुतेक त्यातली आलु टिक्की], भेळ आणि अननसाच शिरा हे खातील ना?
सर्वजण संध्याकाळी ५ वाजता येणार आहेत.
यंदाच्या वाढदिवसासाठी नीरजाची
यंदाच्या वाढदिवसासाठी नीरजाची इडली-चटणी-सांबार करण्याची ऑर्डर आहे. सोबत केक असेलच पण डिशमध्ये देण्यासाठी अजून काहीतरी एखादा गोड/तिखट पदार्थ सुचवा.
मन्जूडी- गोड- कोरडे गुलाबजाम/
मन्जूडी-
गोड- कोरडे गुलाबजाम/ गोडाचा शिरा- मूद पाडून/ बंगाली मिठाई- मलई सँडविच वगैरेचा तुकडा/ (मिळत, आवडत असेल, तर) खरवस
तिखट- सुरळीची वडी/ अळूवडी/ कोथिंबीर वडी/ ढोकळा
ऑर्किड- मस्त बेत आहे. काहीतरी प्यायलाही ठेवणार आहेस का? ज्यूस, सरबत वगैरे किंवा आईसक्रीम/ मिल्कशेक/ कोल्ड कॉफी इत्यादी..
शनिवारी संध्याकाळी दहीवडे हवे
शनिवारी संध्याकाळी दहीवडे हवे आहेत तर शुक्रवारी संध्याकाळी वडे तळून पाण्यातून काढून फ्रीजमध्ये ठेवले तर चांगले राहतील का ? ६ माणसांसाठी मिसळ , दहीवडा करायचा आहे.वड्यासाठी किती डाळ घ्यावी लागेल?
हो चांगले रहातील नक्किच ..
हो चांगले रहातील नक्किच .. दही घालुन ठेवले तरी चालते.
६ माणसांसाठी २ वाट्या डाळ पुरेल.
इथे मेनु बाबत सल्ला घेणार्यांनी 'संबंधित' कार्यक्रम कधि आणि कुठे आहे हे पण तपशिलवार लिहावे
.. [ म्हणजे अवचीत पाहूणे आल्याचा आनंदही घेता येईल ]
पूनम, खरवस आणला तर तीन चार
पूनम, खरवस आणला तर तीन चार किलो सुद्धा पुरणार नाही. सगळेच तुटून पडतील त्यावर.
गोड शिरा ऑप्शन बेस्ट आहे. सकाळी करून ठेवता येईल. आयत्यावेळी नुसता गरम करून मूद पाडून देता येईल. बदाम बेदाण्याबरोबर सुके अंजीर, जर्दाळू वगैरे ड्रायफ्रूट्स घालून करेन म्हणजे जरा रॉयल होईल. कोथिंबीर वडीचा ऑप्शनही चांगला आहे पण ती मात्र विकत आणावी लागेल.
@श्रावणी, लोडशेडींग नसेल तर आदल्या तळून पाण्यातून काढलेले वडे फ्रिजमध्ये अगदी छान राहतात.
@ आरती, २१ मार्च, संध्याकाळी ५ वाजता, ठाणे.
Pages