पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रवा बारिक पाहिजे. तो कच्चाच घालायचा. थोडा सोडा घालायचा म्हणजे ते हलके होतील. नाहीतर आतला भाग कडक राहतो. समजा नसेल वापरायचा तर आतमधे खडीसाखरेचा एक छोटा तूकडा (चौकोनी छोटे तूकडे मिळतात ते ) ठेवायचा किंवा. काजूचा छोटा तूकडा ठेवायचा. हे मधे ठेवून त्याभोवती गुलाबजाम वळायचा. आकारही छोटा ठेवायचा.

फ्लॉवरची भाजी, भजी, लोणचे, पराठे, सूप, करंज्या आणि आईस्क्रीमही करता येते. बहुतेक आहेच इथे, नसेल तर मी तरी आहेच.

फ्लॉवरची भाजी, भजी, लोणचे, पराठे, सूप, करंज्या आणि आईस्क्रीमही करता येते. >>>>>>>>>>> आईसक्रिम?रेसिपी प्लीज Happy

धन्स दिनेशदा .... पण मला भाजीच करायची आहे ..फक्त नेहमिसारखा रस्सा भाजी , कीन्वा सुखी भाजी सोडुन. लहान मुलांना पण जरा चटपटीत वाटली पाहिजे अस....

चकली.कॉम वर फ्लॉवरचा खिमा कसा करायचा ते आहे बघ. मी ट्राय नाही केली कधी. पण चांगली होईल असे वाटतंय.

प्राजू
फ्लॉवर नूसता वाफवून (पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि मिठ घालायचे) मग त्यावर चाट मसाला, उकडलेले मटार वगैरे टाकायचे. फार मऊ उकडायचा नाही. हा प्रकार मूलांना आवडतो.
किंवा भजी करायची. नेहमीप्रमाणेच पण आधी फ्लॉवरच्या तूर्‍यांना चिंचेचा कोळ, तिखट मीठ लावायचे. मग नेहमीसारखी बेसनात बुडवुन तळायची. पण पूर्ण नाही तळायची. अर्धवट तळून जरा निवल्यावर प्रत्येक भजी तळव्यात घेऊन जरा दाबायची आणि मग परत तळायची. सगळ्या गड्ड्याच्या अशा भज्या केल्या तरी संपतात.

भान :- मुलांनी भाज्या खाव्यात यासाठी हा उपाय.
फ्लॉवर, कोबी, रताळे, लाल भोप़ळा, कोहळा अशा सर्व भाज्या वापरता येतात. या भाज्यांच्या फोडी करुन वाफवून मॅश करायच्या. मग त्या परत गरम करुन पाणी शक्य तितके आटवायचे. मग त्यात साखर घालायची आणि आटवलेले दूध घालायचे. कॉर्नफ्लोअर जास्त लागत नाही. मग नेहमीप्रमाणे सेट - बीट - सेट करायचे. या मिश्रणात खाद्यरंग आणि इसेन्स आवश्य घालायचा, म्हणजे मूळ वास जातो. शिवाय कसले केलेय ते सांगायचे नाही.

या दोन्ही कृति मी आधी सविस्तर लिहिल्या होत्या. इथे फक्त क्वीक रेफरन्स साठी.

पील्ज मित्रांनो मला ब्रेडच्या पाककृती हव्या आहेत त्या लवकरात लवकर द्या. आमचा इथे खाद्यगंध नावाचा समूह आहे आणि या ५ मार्चला ब्रेडच्या पाककृती अशी संकल्पना ठेवली आहे. मला ब्रेडच्या पाककृती फार माहिती नाही. जर कुणाला मराठमोळ्या/भारतीयमोळ्या पाककृती माहिती असतील, त्याही शाकाहारी तर कृपया इथे लिहा ना!!!!!!! मी आभारी आहे.

बी, तुला सँडविचेसच्या वेगवेगळ्या कृती शोधता येतील.
पॅटिस किंवा कटलेट - http://www.maayboli.com/node/17162
ब्रेड वापरून पुडिंग करता येतं.
तुला पाव (पावभाजीचे पाव) घरी करायला जमत असतील तर जीरा बटरच्या साईजचे पाव तयार करून मिनी पाव-भाजी किंवा मिनी बर्गर किंवा मिनी वडा-पाव या कृती करता येतील.

मंजूडी, खूप खूप धन्यवाद. इथे सिंगापुरात विविध प्रकारच्या विविध देशातून आलेल्या ब्रेड्स मिळतात विकत. मी घरी ब्रेड करणार नाहीये. विकत आणलेल्या ब्रेडपासूनचं मला काहीतरी करायचे आहे.

मी लिंक बघतो. धन्यवाद, मंजूडी. इतकं छान वाटलं ना तुझं उत्तर पाहून.

मित्रांनो, लिहा ना प्लीज जे येत असेल ते लिहा.

बी, ही लालूने दिलेली ब्रेडपासून बनवलेल्या शाही तुकड्याची रेसिपी : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93087.html?1159423671

ब्रेड पुडिंग : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/119260.html?1163526497

शाही ब्रेड पुडिंग : http://www.maayboli.com/node/16579

आणि ह्या ब्रेडच्या अजून काही पाकृ : http://www.maayboli.com/taxonomy/term/722

बी, सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे क्रोस्टिनी अथवा ब्रुस्केटा. चांगल्या बागेतच्या पातळ ( अर्धा सेमी ) तिरक्या स्लाइसेस कापून घे. टोस्टर किंवा ओव्हन मधे जरा कुरकुरीत करून घे.

बारीक चिरलेले टॉमेटो + मीठ + ऑलिव्ह ओईल + थोडा पांढरा कांदा + बेसिल याचं मिश्रण चमचाभर प्रत्येक स्लाइसवर घाल.

वेगवेगळ्या प्रकारचे ऑलिव्ह्स मिळत असतील तर ते एकत्र करुन रफ चॉप करून त्याचं मिश्रण घाल चमचा भर .

रोस्टेड रेड पेपर्स + बेसिल + ऑ ऑ असं मिश्रण घालू शकतोस .

bruscheta असं शोधलंस तर अनेक कृती मिळतील .

फ्लॉवरचे पराठे पण छान होतात. तुरे धुवून मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. पाणी न घालता. मग त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबिर, मिरच्या धणे जिरे पूड मीठ घालायचे. लसूण ठेचून. मैद्याच्या पारीत तेल लावून हे सारण भरून हलक्या हाताने लाटायचे व मस्त भाजायचे.

गोभि मंचुरिएअन/६५ मस्त लागेल.

फ्लोवर मटार बटाटा सुके सारण भरून सामोसे.
फ्लोवर बटाटा सूप. मस्त लागते.

बी, ब्रेडपासून ब्रेड पकोडा, ब्रेड पॅटीज, ब्रेड मंचूरीन, ब्रेड दहीवडा, ब्रेड ढोकळा, ब्रेड चिवडा, वेगवेगळे सँडविचेस वगैरे प्रकार करता येतील.

धन्स दिनेशदा .... पण मला भाजीच करायची आहे ..फक्त नेहमिसारखा रस्सा भाजी , कीन्वा सुखी भाजी सोडुन. लहान मुलांना पण जरा चटपटीत वाटली पाहिजे अस....

<< गोभी मेंचुरिअन कर Happy

मागे मी इथेच कुठेतरी बिस्क्विक पॅनकेक मिक्स चे गुलाबजाम बद्दल वाचलं होते. आता काही केल्या सापडत नाहीत. कोणी मदत करु शकेल का??

Pages