पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिमा धन्स गं...

हे घुटे काय प्रकार आहे करुन पाहायला पाहिजे. हल्ली रात्री जेवणापेक्षा काहीतरी प्यावेसे वाटते.. Happy

मनिषा, जर कवठ कच्चे असेल तर खाऊ नये, घसा बसतो. पिकलेल्या कवठाला बाहेरूनही (न फोडता ) मस्त वास येतो. मुंबईत फार कोवळी फळे विकायला येतात. ती नीट पिकत नाहीत. कधी कधी आत बुरशी आलेली असते.
विकत घेतानाच ती फोडून घेतली तर चांगले.

सग्ळ्यांनी कसले पटापट प्रैसाद दिल्येत, थअ‍ॅक्यु!! Happy

मंजुडे मी शोधली चटणी [पण मला काहीही वाचता येत नाहीये त्यातल. म्हणुन इकडे विचारलं ग. Sad आता तुम्ही ज्या लिंका दिल्यात त्यातली चटणी [दिनेशदांची] मला नाहीच वाचता येत. काय लिहिलय काहीच कळत नाहीये Sad

लीना एस,
इथे या धाग्यावर पाककृती लिहू नका, वेगळा धागा काढून लिहा. वर हेडर मध्ये तशी सूचना लिहीलेली आहे ती वाचलीत का आपण?

मनिषाताई, त्यासाठी तुम्हाला शिवाजी फॉन्ट इंस्टॉल करावा लागेल पीसी मधे!! नेटवर फुकट उपलब्ध आहे. तो जर असुनहि दिसत नसेल तर मात्र जाणकारांना विचारवे लागेल!!

तुरीच्या शेंगांचे काय करतात ?
(सर्च करुन पाहिले आणि बीच्या एका मसालेदार वरणाच्या पोस्ट शिवाय काही सापडले नाही, म्हणून इथे विचारायचे धारिष्ट्य केले). दुवा ऑलरेडी असल्यास आपल्याला दिलेल्या तसदीबाबत दिलगीर आहे.

तुरीच्या शेंगांमधले तुरीचे दाणे वांग्याच्या भाजीत फार मस्त लागतात. उंधीयोमध्येही ते वापरतात. मी कांदा- टॉमेटो , आलं लसूण घालून त्याची लिप्ती (थोडी ओलसर ) उसळ करते. भाकरी - तांदळाची/ ज्वारी/ बाजरी बरोबर मस्त लागते.

रैना तुरीच्या शेंगा मीठ घालून उकड की कुकरमध्ये. आमच्याकडे तश्याच संपतात. दुसरं काही करायला उरतच नाहीत कधी.
सोलाण्यांची आमटी जशी करतात तशीच तुरीच्या दाण्यांची पण भाजून छान आमटी होते.

मी थोडे तुरीचे दाणे, थोडी मुगडाळ (भिजवुन) अशी कचोरी केली होती मागच्याच आठवड्यात.

तूरीच्या शेंगा आमच्याकडे पण नूसत्या उकडूनच संपवतात. खरे तर त्या सोलणे जरा जिकिरीचे असते. आणि ज्यांनी त्या झाडावरुन खुडल्या आहेत, त्यांना त्या खुडणेही किती जिकिरीचे असते ते माहीत असेल.

तुरडाळीच्या शेंगा उकडुन खातात ते माहितच नव्हते. इथे मुंबईत मिळतात त्या शेंगांमध्ये बर्-याच वेळा पांढरी किड असते. त्यामुळे मी जरा दुरच राहते या शेंगांपासुन.

तुरीच्या शेंगा नुसत्या उकडून मस्त लागतात. शेंगा सोलून नुसत्या दाण्यांची लसूण-खोबरं-जिरं वाटण लावून आमटी पण मस्त लागते.

सिंडीच्या सोलाण्या-वांग्याच्या रेसीपीत थोडा बदल करून मी गेल्या आठवड्यात तुर्वांग बनवलं Happy तुरीचे दाणे मस्त लागतात वांग्यासोबत. फोटो टाकते योजा.

@ र्रैना,
तुरीच्या दाण्याचे कढी-गोळे बनवता येतील.

http://www.marathifun.com/marathi/details.php?image_id=2627 ..इथे तुरीची डाळ आणी मुग डाळ वापरुन केली आहे.तुम्ही तुरीच्या शेन्गाचे दाणे वापरुन करु शकता.

Pages