Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईडलीचा रवा आणुन त्याच्या
ईडलीचा रवा आणुन त्याच्या ईडल्या कशा करायच्या ?
इडली फॅन क्लबवर असंख्य
इडली फॅन क्लबवर असंख्य वेगवेगळी प्रमाणं मिळतील. सगळ्यांच्या इडल्या मऊ, लुसलुशीत, टम्म फुगलेल्या, हलक्या होतात तेव्हा कुठलेही एक वापरा.
खुप, खुप, खुप धन्यवाद अल्पना
खुप, खुप, खुप धन्यवाद अल्पना आणि मंजूडी
ट्रे जो मधुन apple sauce
ट्रे जो मधुन apple sauce आणलाय लेकीला आवडेल म्हणुन, तसाच पडुन आहे. कसा संपवता येईल आणी किती दिवस टिकेल(आणुन ८ दिवस झालेत)?
केक करत असाल तर साखर
केक करत असाल तर साखर रीप्लेसमेंट म्हणून तसेच बटर रीप्लेसमेंट म्हणून अॅपल सॉस वापरता येतो. गुगल केले तर किती बटर साठी किती सॉस इ. प्रमाण वगैरे सगळे सापडेल.
त्या अॅपलसॉसचे पन्हे करता
त्या अॅपलसॉसचे पन्हे करता येईल - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/04/blog-post_05.html
तसेच हे १-२ केक्स आहेत ते करुन पाहु शकता - http://earthvegan.blogspot.com/2009/06/applesauce-cake.html
http://earthvegan.blogspot.com/2008/09/cardamom-scented-applesauce-mini....
http://earthvegan.blogspot.com/2009/06/low-fat-zucchini-bread.html
धन्यवाद मिनोती, रुनी!
धन्यवाद मिनोती, रुनी!
आवळा candy कशी करायची... काल
आवळा candy कशी करायची... काल औ'बादहुन आणली... २०० रु. किलो... विचार करत होते आवळ्याचा सिझन आहे तर घरी करुन बघावी.. वर्षभर खाता येइल.
इथे सापडली आहे.. http://nishamadhulika.com/index.php?news=356
पण ह्यात सांगितल्या प्रमाणे आवळे पाण्यात उकळायचे आणि नंतर ते पाणी फेकुन द्ययचे.. हे कितपत योग्य आहे ??
ते पाणी फेकून द्यायची गरज
ते पाणी फेकून द्यायची गरज नाही. तेच पाणी उकळवून आवळ्याचे सरबत करता येते.
सासरी एकवर्ष प्रयोग केला होता मी घरच्या आवळ्यांवर.
आवळ्याच पेठा कसा करायचा?
आवळ्याच पेठा कसा करायचा?
१. आलु, मेथी किंवा इतर
१. आलु, मेथी किंवा इतर पराठावर्गातले प्रकार केल्यावर कशासोबत खायला द्यावे असा प्रश्न पडतो. मी दही असेल तर दही देते, नाहीतर लोणचे, टोमॅटो सॉसही चालतो. पराठ्याबरोबर चटणी मला स्वतःला फारशी आवडत नाही, एकदम बेक्कार कॉम्बो.... एकदा दही फेटुन त्यात मीठ, धणे-जीरे पुड, वाळवलेली कोथिंबीर+पुदिना पुड घालुन दिले होते, तेव्हा लेकीने भांडेही चाटले होते....
आयत्या वेळी दही नसेल तर अजुन काय देता येईल पराठ्याबरोबर?
२. दोन दिवसांच्या ट्रेनप्रवासात मेथी पराठे करुन द्यायचे झाल्यास मॅगी पिचकु सोडुन इतर काही (घरी बनवता येतील असे) काही पर्याय आहेत का? दही टिकणार नाही दोन दिवस. आंबट होईल. गेल्या वेळी मी मॅगी पिचकु दिले होते.
पराठे दही, लस्सी, मख्खन किंवा
पराठे दही, लस्सी, मख्खन किंवा एखादा रायता अन मख्खन किंवा मख्खन अन मसालेवाली चाय /कॉफी अन आचार याबरोबरच खाण्यात मजा आहे.

चटणी ठेपले /धपाटे याबरोबर चालेल कोणत्याही.
आम्ब्याचा छुन्दा,मेथाम्बाही
आम्ब्याचा छुन्दा,मेथाम्बाही छान लागतात पराठ्याबरोबर.
1.2.घरचं लोणी इथे मायबोलीवरच
1.2.घरचं लोणी
इथे मायबोलीवरच मृण्मयीने काळ्या मनुकांची चटणी लिहिली आहे. ती मेथीच्या पराठ्याबरोबर छान लागते आणि टिकाऊही आहे.
घरची उसळी मिरचीही चालेल.
छुंदा पण चांगला लागतो पराठ्याबरोबर.
मला स्वतःला कुठल्याही पराठ्याबरोबर खोबऱ्याची चटणीच लागते.
मेथी आणि पालक पराठ्याबरोबर
मेथी आणि पालक पराठ्याबरोबर श्रीखन्ड छान लागते.
माझीही पहिली पसंती
माझीही पहिली पसंती (दह्यानंतर) छुंद्यालाच. बटरचे छोटे पॅक्स मिळतात ना ? ते पण मस्त. अमूलचे फ्लेव्हर्ड क्रीम चीज मिळते. लिंबाचे गोड लोणचे, जॅमचे छोटे पॅक हा पण चांगला पर्याय आहे.
मेथीच्या पराठ्यातच पिकेलेले केळे कुस्करुन टाकायचे (पिठातच) मग ते पराठे नूसतेही चवदार लागतात.
साधना, पराठ्याबरोबर माझी
साधना, पराठ्याबरोबर माझी आवडती कॉम्बोज् :
१. लोणचे (लिंबाचे, कैरीचे, रसलिंबू, मिरची लोणचे, हळदीचे लोणचे). माझी एक पंजाबी मैत्रीण पराठ्यांसोबत भाज्यांचे लोणचे (गाजर/ कॉलीफ्लॉवर/ मुळा इ.) आणि आवळ्याचे लोणचे हमखास सर्व्ह करते. शिवाय अमूलची किंवा अनसॉल्टेड बटरची डिश असतेच सोबत.
२. दुधीच्या सालीची चटणी किंवा इतर कोरड्या चटण्या (लसूण/ तीळ/ खोबरे/ शेंगदाणे चटणी)
३. डाळीचे पीठ/ भाजणी लावून परतलेली पालेभाजी. खास आवडत्या भाज्या म्हणजे कोथिंबीर/ मेथी/ कांदा पातीची पीठ पेरून भाजी.
४. चीझ स्प्रेड्. त्यात वेगवेगळ्या हर्ब्ज् घालूनही मस्त लागते.
५. दह्याचे अगदी छोटे तयार पॅकही विकत मिळतात. (अमूल, स्फूर्ती वगैरे) दोन-तीन दिवस आरामात बाहेर राहू शकतात. एका वेळेला एक पॅक संपवायचा.
आमच्याकडे घरच्या लोण्याचेच
आमच्याकडे घरच्या लोण्याचेच मुठीपेक्षा थोड्या छोट्या आकाराचे गोळे करुन ठेवतात फ्रिझमध्ये. नाश्त्याच्या वेळी प्रत्येकाच्या पराठ्यावर एकेक गोळा.
घरगुती बटर पॅक.
धिरडी, पराठे आणि थालीपीठा
धिरडी, पराठे आणि थालीपीठा सोबत "टिकलं मिकलं" सुद्धा छान लागतं, ! नगर, बार्शी, सोलापुर च्या लोकांना माहित असेल हा पदार्थ ! करायला अगदी सोप्पा आहे, पुष्कळ जणांना माहिती असणार, पण तरीही 'नवीन पाककृती' मध्ये कृती देत आहे...
http://www.maayboli.com/node/21451
मेथी पराठ्याबरोबर आवळ्याचे
मेथी पराठ्याबरोबर आवळ्याचे लोणचे (उकडून हिरव्या मिरचीसोबत वाटलेले व नेहमीच्या फोडणीत शिजवलेले) छान लागेल. स्वानुभव.
आज छोटे छोटे बटाटे घेतलेत.
आज छोटे छोटे बटाटे घेतलेत. त्याची एखादी रेसेपी सुचवा.
तसेच घरात बेक्ड बीन्सचा (विथ टोमॅटो अॅंड लेस शुगर) ४५०मिली चा एक कॅन आहे. त्याचं काय करावं. (गेल्या वर्षी पण असाच कॅन दिवाळी गिफ्ट मध्ये मिळाला होता, त्याचे ते अमेरिकन चिली केले होते. घरात आवडले नाही. त्यामूळे तो पदार्थ बाद)
आलू बंजारा कर अल्पना मी
आलू बंजारा कर अल्पना
मी परवा वांग्याची रेसिपी दिली त्यात हे आख्खे बटाटे पण चांगले लागतात. दोन्ही बाजुंनी जरा खाचा देऊन.
बेक्ड बीन्सच्या कृती वन डिश मील मध्ये सापडतील बघ तुला.
अगं आलु बंजाराचं करायचय, पण
अगं आलु बंजाराचं करायचय, पण मातीचे भांड ही मिळाले नाहीये अजून आणि बाजारात शेपु पण आला नाहीये.
त्या वांग्याच्या रेसेपीवर पण अजून सोलाणे मिळत नसल्याने आणि काल बाजारात शोधूनही हिरवे हरबरे न सापडल्याने रिप्लाय दिला नव्हता. मटर वापरले तर अगदीच आलु-मटर सारखे लागेल का?
वन डिश मील बघते.
आलु मटर नाही लागणार गं.
आलु मटर नाही लागणार गं. ह्या वाटणाची एकदम वेगळी चव येते. सायोने एक दम आलूची कृती दिली होती माझ्या विपूत. सापडली तर देते तुला.
http://www.sanjeevkapoor.com/
http://www.sanjeevkapoor.com/Recipe.aspx?RecipeId=1544&Header=Searched%2...
ही संजीव कपूरची आहे.
ओके. धन्यवाद. उद्या रात्री
ओके. धन्यवाद. उद्या रात्री करेन आलुचा कोणताही प्रकार.
अल्पना, - छोटे बटाटे साफ करुन
अल्पना,
- छोटे बटाटे साफ करुन त्याला टोचे मार मग सालीसकट वाफवुन घे. ऑऑ + कोथिंबी + लसुण + मीठ एकत्र वाटुन त्यावर चोळ. थोडा वेळ मुरु दे. मग बटाटे थोडे शॅलो फ्राय कर... मस्त लागतात
- बटाटे सालीकाढुन तंदुरी मसाल्यात मॅरीनेट कर आणि सळाईत घालुन ग्रिल कर. रोटी/पराठा आणि दह्या बरोबर मस्त लागतात,
- बेक्डबीन्स मिक्सर मधे वाटुन किंवा हातानेच मॅश करायच्या आणि कटलेट्स मधे, पराठ्यात वापरुन टाकायच्या.
- कांदा, ढब्बु मिरची आणि बेक्डबीन्स ची भाजी... धणे जीरे पुड घालायची . वरतुन भरपुर चीज घालुन बेक करायची आणि गार्लिक ब्रेड सोबत खायची
मला दुधात घालून प्यायला एखादी
मला दुधात घालून प्यायला एखादी घरीच केलेली गर्भारपणात चालतील अश्या ड्रायफ्रुट्स ची पावडर कशी करायची कोणी सांगेल का?
आज सकाळी बदाम थोडे भाजून त्याची पावडर केली..विलायची टाकुन दुधात टाकली पण फार फ्लेवर आला नाही..फ्लेवर येण्यासाठी काय करावे?
फ्लेवर येण्यासाठी, केशर,
फ्लेवर येण्यासाठी, केशर, वेलची, जायफळ असे काहितरी वापरावे लागेल.
धन्यवाद दिनेशदा, त्यात थोडं
धन्यवाद दिनेशदा, त्यात थोडं मिल्क पावडर घातलं तर चालेल का?
मंजूडी ची ही पोस्ट मिळाली...
"काजू, बदाम, पिस्ते समप्रमाणात घेऊन सालं काढून किँचीत भाजून मिक्सरमधून भरड पूड करून घे. त्यात वासापुरती वेलची पावडर मिसळ, दुधाचा मसाला तयार. कुठल्याही गोड पदार्थात घालता येतो आणि फ्रिजमध्ये भरपूर टिकतो."
Pages